बलराज साहनी (मे १, १९१३ - एप्रिल १३, १९७३) हे बॉलीवूड अभिनेते आणि पंजाबी भाषेत लिहिणारे लेखक होते.[१]

बलराज साहनी
दमयंती व बलराज
जन्म बलराज साहनी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

जीवन संपादन

बलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा (आता पाकिस्तान) या गावी एका पंजाबी खत्री कुटुंबात झाला होता. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर[२] त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबिक व्यवसायात व्यतीत केला.

पुढे १९३० साली ते पत्‍नी दमयंतीसह रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले.[३] महात्मा गांधींसोबत काही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील बी.बी.सी.च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते.

'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.[४]

बलराज साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ‘बलराज साहनी-सहिर लुधियानवी फाउंडेशन स्थापन झाले आहे. या फाउंडेशनतर्फे दर वर्षी एका अभिनेत्याला ‘बलराज साहनी पुरस्कार दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार विक्रम गोखले यांना मिळाला.

अभिनय संपादन

प्रकाशित साहित्य संपादन

  • पंजाबी नियतकालिक 'प्रीतलारी' मधून नियमित लेखन
  • मेरा पाकिस्तानी सफर
  • मेरी फिल्मी अमरकथा (आत्मचरित्र)
  • मेरा रूसी सफरनामा

पटकथा संपादन

  • बाजी (१९५१)

पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ एनसायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ पंजाबी लिटरेचर. लेखकः आर.पी. मल्होत्रा, कुलदीप अरोरा. प्रकाशकः ग्लोबल व्हिजन पब्लिशिंग हाऊस, २००३. ISBN 81-87746-51-3. पृ. ४३४
  2. ^ http://www.tribuneindia.com/2001/20010902/spectrum/main2.htm
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2012-07-08. 2010-01-27 रोजी पाहिले.
  4. ^ http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=69006

बाह्य दुवे संपादन