लोकमान्य ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.[ संदर्भ हवा ]

लोकमान्य
प्रकार ऐतिहासिक
निर्मिती संस्था दशमी क्रिएशन्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १३६
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २१ डिसेंबर २०२२ – ५ ऑगस्ट २०२३
अधिक माहिती

कलाकार

संपादन

विशेष भाग

संपादन
  1. ज्यांचे कर्तृत्त्व असामान्य त्यांची चरित्रगाथा. (२१ डिसेंबर २०२२)
  2. लग्नसमारंभात बाळ आपल्या स्वभावाने सर्वांची मने जिंकणार. (२२ डिसेंबर २०२२)
  3. वरदक्षिणा म्हणून बाळ कोणती मागणी करणार? (२४ डिसेंबर २०२२)
  4. बाळ आणि सत्यभामेच्या संसाराची सुरुवात वादाने होणार की संवादाने? (२९ डिसेंबर २०२२)
  5. बाळचं वाचनाचं वेड सत्यभामाला कोड्यात टाकणार. (३१ डिसेंबर २०२२)
  6. बाळला गंगाधर शास्त्री घरच्या जबाबदारीची जाणीव करून देणार. (५ जानेवारी २०२३)
  7. बाळ वडिलांच्या सावलीला कायमचा परका होणार. (७ जानेवारी २०२३)
  8. वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी बाळ शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेणार. (१२ जानेवारी २०२३)
  9. सत्यभामाकडे बाळ आपलं मन मोकळं करु शकेल का? (१४ जानेवारी २०२३)
  10. बाळचं शिक्षण त्याच्या आणि सत्यभामाच्या नात्यात अंतर निर्माण करेल का? (१९ जानेवारी २०२३)
  11. बाळच्या अभ्यासातील हुशारीचं साऱ्यांनाच आश्चर्य वाटणार. (२२ जानेवारी २०२३)
  12. आपली प्रकृती सुधारण्यासाठी बाळ कोणता निर्णय घेणार? (२६ जानेवारी २०२३)
  13. कुटुंबाचा बाळ होणार देशाचा लोकमान्य. (२८ जानेवारी २०२३)
  14. ध्येयाच्या ओढीने घराबाहेर पडलेल्या बाळच्या पावलांना आता घराची वाट खुणावेल का? (२ फेब्रुवारी २०२३)
  15. घराची जबाबदारी की देशसेवा, बाळला गवसेल का आपलं आभाळ? (४ फेब्रुवारी २०२३)
  16. सत्यभामाला शब्द दिल्याप्रमाणे बाळ परत येईल का? (९ फेब्रुवारी २०२३)
  17. बाळचे बदललेले रूप पाहून टिळक कुटुंबीय आश्चर्यचकित होणार. (११ फेब्रुवारी २०२३)
  18. घराच्या आधी देशाबद्दलचा विचार करताना बळवंत मनातून अस्वस्थ होणार. (१६ फेब्रुवारी २०२३)
  19. बळवंतला आगरकरांच्या रुपात तोडीस तोड मित्र भेटणार. (१९ फेब्रुवारी २०२३)
  20. कॉलेजमधील वादविवाद स्पर्धेत बळवंत आणि आगरकर समोरासमोर येणार. (२३ फेब्रुवारी २०२३)
  21. आगरकरांच्या बुद्धिचातुर्याने बळवंत आश्चर्यचकित होणार. (१ मार्च २०२३)
  22. दुष्काळाच्या प्रश्नाने बळवंतचे मन हेलावणार. (४ मार्च २०२३)
  23. आगरकरांचा मानी स्वभाव बळवंतला कोड्यात टाकणार. (८ मार्च २०२३)
  24. सत्यभामाच्या मनस्वी विचारांचं बळवंतला कौतुक वाटणार. (९ मार्च २०२३)
  25. बळवंत मैत्रीखातर आगरकरांच्या पाठीशी उभा राहणार. (१० मार्च २०२३)
  26. सत्यभामाच्या बोलण्यातून बळवंतला प्रेरणा मिळणार. (११ मार्च २०२३)
  27. बळवंतने उंचावरून मारलेली उडी पाहून मित्रांना आश्चर्य वाटणार. (१६ मार्च २०२३)
  28. बळवंतने केलेली मदत आगरकरांना कळणार का? (१९ मार्च २०२३)
  29. बळवंत इंग्रज अधिकाऱ्याला त्याचं मत ठणकावून सांगणार. (२२ मार्च २०२३)
  30. बळवंत आणि आगरकर राष्ट्राच्या हितासाठी कोणता मार्ग स्वीकारणार? (२३ मार्च २०२३)
  31. संशयी नजरेने पाहणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला बळवंत रोखठोक उत्तर देणार. (२४ मार्च २०२३)
  32. बळवंत घरात लक्ष देत नाही म्हणून सत्यभामा आणि काकूची चिंता वाढणार. (२५ मार्च २०२३)
  33. वासुदेव बळवंत फडकेला झालेली अटक पाहून बळवंत कोणता निर्णय घेणार? (२९ मार्च २०२३)
  34. बळवंत नवी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार. (३० मार्च २०२३)
  35. सत्यभामामुळे टिळक कुटुंब आनंदाचा क्षण अनुभवणार. (३१ मार्च २०२३)
  36. बळवंतने सांगितल्याप्रमाणे सत्यभामाचं पहाटे पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार का? (१ एप्रिल २०२३)
  37. बळवंत टिळकांनी सुरू केलेल्या शैक्षणिक कार्याला समाजाची साथ मिळणार का? (५ एप्रिल २०२३)
  38. शाळेतील इतर शिक्षक बळवंतरावांची फजिती करण्यासाठी कोणता बेत आखणार? (६ एप्रिल २०२३)
  39. इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध बळवंतरावांची लेखणी तळपणार. (७ एप्रिल २०२३)
  40. वृत्तपत्र सुरू करण्याच्या मार्गावरील संकटांचा सामना कसा करणार बळवंतराव? (८ एप्रिल २०२३)
  41. वृत्तपत्र सुरू करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा ताळमेळ कसा सावरणार बळवंत? (१२ एप्रिल २०२३)
  42. बळवंतरावांचे केसरी आणि मराठा वृत्तपत्र सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होणार. (१३ एप्रिल २०२३)
  43. केसरी आणि मराठा वृत्तपत्र छपाईचा पहिला दिवस कसा असेल? (१४ एप्रिल २०२३)
  44. वृत्तपत्र घरोघरी पोहोचण्यासाठी टिळक काय करणार? (१५ एप्रिल २०२३)
  45. टिळकांच्या अग्रलेखांची चर्चा देशभरात होणार. (१६ एप्रिल २०२३)
  46. बळवंतराव टिळकांना एका प्रतिभावंत राजाकडून भेटीचं निमंत्रण येणार, टिळकांसाठी ही राजभेट खास ठरणार का? (२२ एप्रिल २०२३)
  47. राधाबाईंना टिळक कोणतं आश्वासन देणार? (२६ एप्रिल २०२३)
  48. राधाबाईंची बाजू सत्याची की असत्याची, हे बळवंतराव कसं शोधणार? (२७ एप्रिल २०२३)
  49. टिळकांना राधाबाईंची बातमी छापण्यासाठी पुरावे मिळतील का? (२८ एप्रिल २०२३)
  50. राधाबाईंची बाजू मांडणारा लेख टिळक आणि आगरकर लिहिणार का? (३ मे २०२३)
  51. कोल्हापूर संस्थान प्रकरणाच्या बातम्यांमुळे टिळकांना माफी मागावी लागणार का? (४ मे २०२३)
  52. बळवंतराव टिळकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढावी लागणार. (५ मे २०२३)
  53. तुरुंगवास घडेल म्हणून टिळक माफी मागायला तयार होतील का? (६ मे २०२३)
  54. आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या टिळकांना गळचेपी करणाऱ्या ब्रिटिश सत्तेच्या न्यायालयात न्याय मिळणार का? (१३ मे २०२३)
  55. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या टिळकांना पहिला तुरुंगवास घडणार. (२० मे २०२३)
  56. डोंगरीच्या तुरुंगात गेल्यावर टिळक आणि आगरकर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आणखी आक्रमक भूमिका घेणार. (२७ मे २०२३)
  57. डोंगरीच्या तुरुंगात गेल्यावर कोणत्या नव्या आव्हानांना सामोरे जाणार बळवंतराव? (३१ मे २०२३)
  58. तुरुंगात लेखन-वाचन करण्याची परवानगी मिळवण्यासाठी टिळक आणि आगरकर आक्रमक भूमिका घेणार. (१ जून २०२३)
  59. टिळक आणि आगरकर डोंगरीच्या तुरुंगातून घरी परतणार. (२ जून २०२३)
  60. डोंगरीच्या तुरुंगातून घरी आल्यावर टिळक आणि आगरकर कोणती नवी योजना आखणार? (३ जून २०२३)
  61. वृत्तपत्र सुरू ठेवण्यासाठी होणारी आर्थिक चणचण बळवंतराव कशी सोडवणार? (७ जून २०२३)
  62. टिळक आणि आगरकरांच्या कार्याचा सर्वत्र सत्कार आणि गौरव होणार. (८ जून २०२३)
  63. टिळक-आगरकरांच्या भेटीला जेम्स फर्ग्युसन येणार. (९ जून २०२३)
  64. बळवंतरावांना नामजोशी आणि आबासाहेबांकडून कोणत्या आनंदवार्ता कळणार? (१० जून २०२३)
  65. बळवंतरावांचे मत समजून घेतील का आगरकर? (१४ जून २०२३)
  66. केसरीच्या कार्यालयात तात्विक वादावादी होणार. (१५ जून २०२३)
  67. टिळक आणि आगरकरांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडणार. (१६ जून २०२३)
  68. टिळक आणि आगरकरांमधील मतभेद केसरीतील कर्मचाऱ्यांना उघडपणे दिसणार. (१७ जून २०२३)
  69. आगरकरांच्या राजीनाम्याविषयी काय प्रतिक्रिया देतील बळवंतराव? (२१ जून २०२३)
  70. गोपाळ कृष्ण गोखले टिळकांना भेटायला येणार. (२२ जून २०२३)
  71. टिळक आणि आगरकरांमध्ये केसरीतील भूमिकेवरून वाद होणार. (२३ जून २०२३)
  72. टिळक आणि आगरकर एकमेकांशी अबोला धरणार. (२४ जून २०२३)
  73. आगरकर आणि यशोदाला घर सोडून जाताना थांबवू शकेल का सत्यभामा? (२८ जून २०२३)
  74. आगरकर आणि टिळक यांच्यातील मतभेदाची झळ यशोदा आणि सत्यभामालाही भोगावी लागणार. (२९ जून २०२३)
  75. समाजसुधारणा आणि इंग्रजांनी केलेले कायदे यावर टिळक परखड मत मांडणार. (३० जून २०२३)
  76. आपल्याच समाजातील लोकांच्या बोचऱ्या टिका कसे सहन करणार टिळक? (१ जुलै २०२३)
  77. टिळकांवर समाजाने बहिष्कार टाकल्यामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नात विघ्न येणार. (५ जुलै २०२३)
  78. समाजात तेढ निर्माण करण्याऱ्या दंग्यांविषयी टिळक कोणती भूमिका घेणार? (६ जुलै २०२३)
  79. लोकमान्य टिळक चतुःसुत्रीची घोषणा करणार. (२३ जुलै २०२३)

बाह्य दुवे

संपादन
रात्री ९.३०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | अस्मिता | चूकभूल द्यावी घ्यावी | गाव गाता गजाली | जागो मोहन प्यारे | भागो मोहन प्यारे | काय घडलं त्या रात्री? | लोकमान्य | पुन्हा कर्तव्य आहे | लाखात एक आमचा दादा