जाऊ बाई गावात हा झी मराठी दूरचित्रवाणीवर प्रसारित होणारा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे.

जाऊ बाई गावात
निर्मिती संस्था झी स्टुडिओज
सूत्रधार हार्दिक जोशी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ६२
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ४ डिसेंबर २०२३ – ११ फेब्रुवारी २०२४
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम जाऊ बाई गावात: न पाहिलेली मजा

पाहुणे संपादन

स्पर्धक संपादन

  1. रमशा फारुकी (विजेती)
  2. अंकिता मेस्त्री (उपविजेती)
  3. मुक्ता करंदीकर (बाद)
  4. मोनिशा आजगावकर (बाद)
  5. वैष्णवी सावंत (बाद)
  6. शमा लखानी (बाद)
  7. तनया अफजलपूरकर (बाद)
  8. वर्षा हेगडे (बाद)
  9. हेतल पाखरे (बाद)
  10. स्नेहा भोसले (बाद)
  11. श्रेजा म्हात्रे (बाद)
  12. संस्कृती साळुंके (बाद)
  13. रसिका ढोबळे (बाद)

विशेष भाग संपादन

  1. करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार, खेळ सुरू होणार. (४ डिसेंबर २०२३)
  2. शहराकडून गावाकडचा प्रवास कसा असणार? (५ डिसेंबर २०२३)
  3. ऑनलाईन घरात दूध मागवणाऱ्या स्वतःच्या हाताने म्हशीचं दूध काढू शकतील का? (६ डिसेंबर २०२३)
  4. ज्यांना सवय मॅन्यिकुअर पेडीक्युअरची त्या कोंबड्या कशा पकडणार? (७ डिसेंबर २०२३)
  5. शहरात सुसाट गाड्या पळवणाऱ्या बैलगाडीवर कसा ताबा मिळवणार? (८ डिसेंबर २०२३)
  6. रांगड्या कुस्तीची मजा रंगणार. (९ डिसेंबर २०२३)
  7. आलिशान वाड्यात गृहप्रवेश होणार, मिस बावधन कोण होणार? (११ डिसेंबर २०२३)
  8. कोण खेकडे पकडणार, कोणाला खेकडे पकडणार? (१२ डिसेंबर २०२३)
  9. आजोबांना इंग्लिश शिकवणार, परीक्षेमध्ये धमाल होणार. (१३ डिसेंबर २०२३)
  10. मोहीम सैनिकी खडतर आहे, पण मुली कणखर आहेत! (१४ डिसेंबर २०२३)
  11. शहरी मुली लोककला शिकणार, गावात लावणीचा फड रंगणार. (१५-१६ डिसेंबर २०२३)
  12. मुलींनी लावलेलं लग्न गावात गाजणार, श्रेजाला बाबांचे प्रेम मिळणार. (१८ डिसेंबर २०२३)
  13. ट्रॅक्टरच्या शर्यतीत कोण जिंकणार, कोण मागे हटणार? (१९ डिसेंबर २०२३)
  14. खेळ रंगणार, वाद वाढणार. (२० डिसेंबर २०२३)
  15. भैरवदादांच्या मदतीसाठी सरसावल्या मुली, उसाच्या रसाची करणार विक्री, पैशांची खरी किंमत आता ह्यांना कळणार. (२१ डिसेंबर २०२३)
  16. शहरी मुली गावात मुलं शोधणार, बदलून त्यांची स्टाईल त्यांना हिरो बनवणार‌. (२२ डिसेंबर २०२३)
  17. गावातल्या मुलांचा शहरी मुलींसोबत डान्स, डान्समध्ये मारलाय प्रेमाचा चान्स. (२३ डिसेंबर २०२३)
  18. सगळ्या मोहिमा पूर्ण करून चार मुलींना वाड्यात यायचंय, वाड्यातल्या मुलींना त्यांना अडवायचंय, कोण वाड्यात येणार कोण बाहेर जाणार? (२५ डिसेंबर २०२३)
  19. जे नशिबात कधीच नाही आलं, ते प्रेम ते दिवस वर्षाला पुन्हा अनुभवता येणार. (२६ डिसेंबर २०२३)
  20. शहरी मुली भक्तिरसात न्हाऊन जोगवा मागणार, देवीचा गोंधळ होणार. (२७ डिसेंबर २०२३)
  21. वाड्यात खास बेत रंगणार, कोणाला जमणार कोणाचं फसणार? (२८ डिसेंबर २०२३)
  22. बावधन ऑलिम्पिक होणार, चुरशीच्या लढतीत सगळं पणाला लागणार. (२९ डिसेंबर २०२३)
  23. स्नेहा आणि संस्कृतीची मैत्री तुटणार का? (३० डिसेंबर २०२३)
  24. नवीन वर्ष साजरं करायला खास पाहुणे येणार, खास पाहुण्यांसोबत खास धमाल होणार. (१ जानेवारी २०२४)
  25. नवीन वर्षाचं दिमाखात स्वागत होणार, मुली आणि पाहुण्यांसोबत गावातले लोक पण मजा करणार. (२ जानेवारी २०२४)
  26. मोहिमेच्या तालमीसाठी गावभर घातली प्रदक्षिणा, रांगोळी शिकण्यासाठी दिली खास गुरुदक्षिणा. (३ जानेवारी २०२४)
  27. शहरी मुली गावात पथनाट्य करणार, एकमेकींना दिली साथ गावकऱ्यांनी दिली दाद. (४ जानेवारी २०२४)
  28. श्रेजा कशी सहन करणार ही शिक्षा? (५ जानेवारी २०२४)
  29. ज्यांचा अभ्यास नाही पक्का, त्यांना मिळणार धक्का. (६ जानेवारी २०२४)
  30. मुलींना पैशांची किंमत कळणार. (८ जानेवारी २०२४)
  31. लाडका पोस्टमन येणार आठवणींचं पत्र घेऊन. (९ जानेवारी २०२४)
  32. शहरी मुली करणार गावातल्या बायकांना व्हायरल. (१० जानेवारी २०२४)
  33. बावधन ऑर्केस्ट्रा सजणार, काय काय धमाल होणार. (११-१२ जानेवारी २०२४)
  34. शहरातल्या मुलींना कळणार बळीराजाच्या मेहनतीचं महत्त्व. (१३ जानेवारी २०२४)
  35. सण साजरा करुया दणक्यात, धमाल करुया संक्रांत विशेष भागात. (१४ जानेवारी २०२४)
  36. घरच्यांशी भेट होणार, अश्रूंचा बांध फुटणार, घरच्यांचं खास स्वागत होणार. (१५-१६ जानेवारी २०२४)
  37. शहरी मुली घाम गाळून पाणी भरणार. (१७ जानेवारी २०२४)
  38. शहरी मुली करणार भारुड. (१८ जानेवारी २०२४)
  39. म्हातारे सितारे होणार, काय धमाल होणार. (१९-२० जानेवारी २०२४)
  40. ज्यांनी ओलांडली नाही गावची वेस, त्या माऊली मुंबई दर्शनासाठी निघणार. (२२ जानेवारी २०२४)
  41. गावातल्या माऊली करणार मुंबईची वारी, कसा होणार प्रवास भारी? (२३ जानेवारी २०२४)
  42. गावातल्या माऊली पहिल्यांदाच मुंबई बघणार, ह्या प्रवासात काय काय अनुभवायला मिळणार? (२४ जानेवारी २०२४)
  43. गावातल्या माऊली आणि शहरी मुली थुकरटवाडीत धमाल करणार. (२५ जानेवारी २०२४)
  44. रसिका आणि रमशाने दिली फाईट, बावधनच्या काकूंनी केलं वातावरण टाईट. (२६ जानेवारी २०२४)
  45. चुलीवर राबणाऱ्या हातांना नेलपॉलिश लागणार, गावातल्या माऊलींना शहराची हवा लागणार. (२७ जानेवारी २०२४)
  46. बायको करणार आराम, त्यांचे नवरे करणार काम. (२९ जानेवारी २०२४)
  47. शहरी मुलींचा कस लागणार, दाढी करणं ह्यांना कसं जमणार? (३० जानेवारी २०२४)
  48. मुली करत आहेत प्रयत्न, शोधणार गावात लपलेली रत्नं. (३१ जानेवारी २०२४)
  49. स्पर्धेची चुरस अजून वाढणार. (१ फेब्रुवारी २०२४)
  50. बावधन बालनाट्य स्पर्धा होणार. (२ फेब्रुवारी २०२४)
  51. मध्यरात्री भयाण जंगलात मोहीम रंगणार. (३ फेब्रुवारी २०२४)
  52. आडवी तिडवी मडकी तर बनवणार, पण कशा ह्या विकणार? (५ फेब्रुवारी २०२४)
  53. कपडे धुण्याची आली लहर, मुलींनी केला भलताच कहर. (६ फेब्रुवारी २०२४)
  54. वाड्यात भक्तीचा जागर होणार. (७ फेब्रुवारी २०२४)
  55. कोण असेल ती एक, जी होणार गावची लाडकी लेक? (११ फेब्रुवारी २०२४)
  56. मराठी टेलिव्हिजनवरचा सर्वात मोठा चित्रपट, पिक्चर अजून बाकी आहे. (१८ फेब्रुवारी २०२४)