महेश कोठारे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
महेश कोठारे (सप्टेंबर २८, इ.स. १९५३ - हयात) हे मराठी चित्रपट-अभिनेते आहेत. त्याबरोबर ते मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता आहेत.
महेश कोठारे | |
---|---|
जन्म |
महेश अंबर कोठारे २८ सप्टेंबर १९५३ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | _ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र |
मराठी सिनेमा हिंदी सिनेमा |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९८५ - चालू |
भाषा | मराठी, हिंदी |
प्रमुख चित्रपट |
धूमधडाका दे दणा दण थरथराट धडाकेबाज झपाटलेला, झपाटलेला २ (ए जिवलगा) जबरदस्त |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | जय मल्हार, विठू माऊली, प्रेम पॉयझन पंगा, सुख म्हणजे नक्की काय असतं!, पिंकीचा विजय असो!, माझी माणसं |
वडील | अंबर कोठारे |
पत्नी | नीलिमा कोठारे |
अपत्ये | आदिनाथ कोठारे |
अधिकृत संकेतस्थळ | http://maheshkothare.blogspot.com |
जीवन
संपादनमहेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत[१]. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले [२]. "ओह डैम इट" हे त्यांचे पेटंट वाक्य आहे.
महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिली देखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असताना देखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकाचे पात्र साकारण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या.
कारकीर्द भरात असताना कोठारेंनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठाऱ्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली.
महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठाऱ्यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची मन उधाण वाऱ्याचे ही मालिका लोकप्रिय ठरली.
कारकीर्द
संपादनअभिनीत चित्रपट
संपादनवर्ष | शीर्षक | शेरा |
---|---|---|
2010 | आयडियाची कल्पना | |
2000 | खतरनाक | |
2005 | खबरदार | Guest Appearance |
1983 | गुपचुप गुपचुप | Ashok |
1971 | घर घर की कहानी | |
घरचा भेदी | ||
1964 | छोटा जवान | |
2007 | जबरदस्त | |
1992 | जिवलगा | |
1993 | झपाटलेला | CID Inspector Mahesh Jadhav |
2013 | झपाटलेला २[३] | CID Inspector Mahesh Jadhav |
1989 | थरथराट | CID Inspector Mahesh Jadhav |
थोरली जाऊ | ||
2011 | दुभंग[४] | |
1987 | दे दणादण | Sub Inspector Mahesh Danke |
1990 | धडाकेबाज | Mahesh Nemade |
1998 | धांगडधिंगा | Advocate Mithare |
1985 | धूमधडाका | Mahesh Jawalkar |
2004 | पछाडलेला | Inspector Mahesh Jadhav |
2008 | फुल ३ धमाल | |
1994 | माझा छकुला | Inspector |
1996 | मासूम | Hindi Movie |
1968 | राजा और रंक | |
लेक चालली सासरला | ||
2010 | वेड लावी जीवा | |
2006 | शुभमंगल सावधान | |
1970 | सफर | Feroz Khan's Younger Brother |
दिग्दर्शित चित्रपट
संपादनवर्ष | नाव |
---|---|
२००० | खतरनाक |
२००५ | खबरदार |
२००० | चिमणी पाखरं' |
२००८ | जबरदस्त |
१९९१ | जिवलगा |
१९९३ | झपाटलेला |
२०१३ | झपाटलेला २ |
१९८९ | थरथराट |
२०११ | दुभंग |
१९८७ | दे दणादण |
१९९० | धडाकेबाज |
१९९८ | धांगडधिंगा |
१९८५ | धूमधडाका |
२००४ | पछाडलेला |
१९९४ | माझा छकुला |
१९९६ | मासूस |
१९९९ | लो मै आ गया |
२०१० | वेड लावी जीवा |
२००७ | शुभमंगल सावधान |
- गुपचुप गुपचुप
- घरचा भेदी
- लेक चालली सासरला
महेश कोठारे यांचे बालकलाकार म्हणून अभिनित चित्रपट
चित्रपट
संपादनमहेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट
- वेड लावी जीवा
- फुल ३ धमाल
महेश कोठारे दिग्दर्शित हिंदी चित्रपट
दूरचित्रवाणी
संपादन- मस्त मस्त है जिंदगी (झी टीव्ही)
- मन उधाण वाऱ्याचे (स्टार प्रवाह)
- जय मल्हार (झी मराठी)
- विठू माऊली (स्टार प्रवाह)
- प्रेम पॉयझन पंगा (झी युवा)
- पाहिले न मी तुला (झी मराठी)
- सुख म्हणजे नक्की काय असतं! (स्टार प्रवाह)
- पिंकीचा विजय असो! (स्टार प्रवाह)
- माझी माणसं (सन मराठी)
- आई मायेचं कवच (कलर्स मराठी)
बाह्य दुवे
संपादन- आय.एम.डी.बी. कॉम - महेश कोठारे यांचे प्रोफाइल (इंग्लिश मजकूर)
- ^ पेंढारकर, अभिजीत (2014). विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. प्रत्यक्ष मुलाखत.
- ^ Poundarik, Ajay (2021-08-11). LAXMIKANT-PYARELAL Music Forever (इंग्रजी भाषेत). Blue Rose Publishers.
- ^ Mahesh Kothare returns with Zapatlela 2
- ^ Dubhang