सई ताम्हणकर

अभिनेत्री


सई ताम्हणकर (२५ जुन, १९८६ - ) सई ताम्हणकर या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत ओळखल्या जातात. त्या मूळच्या सांगली या गावच्या आहेत. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सई यांना मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.सई एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे तसेच ती चिंतामण महाविदयालयाची विदयार्थीनी आहे तिची शैक्षणिक कारकीर्द फार उत्तम होती कॉलेजमधील अनेक नाटक व एकाकिंका मध्ये भाग घेत होती.

सई ताम्हणकर
सई ताम्हणकर (२०१८)
जन्म २५ जून, १९८६ (1986-06-25) (वय: ३८)
सांगली, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००५ - कार्यरत आहेत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट दुनियादारी, हंटर, पुणे ५२
वडील नंदकुमार ताम्हणकर
आई मृणालिनी ताम्हणकर

कारकीर्द

संपादन

अभिनयाची आवड असल्याने ती कॉलेजमध्ये विविध नाटक व एकांकिका मध्ये भाग घेत. सईच्या आईच्या मित्राने दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाद्वारे ती अभिन क्षेत्रात उतरली. अंतर-महाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत तिचे आधे अधोरे या दुसऱ्या नाटकामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

वर्ष नाव टीपा
२००८ ब्लॅक अँड व्हाईट हिंदी चित्रपट
२००८ सनई चौघडे मराठी चित्रपट
२००८ पिकनिक मराठी चित्रपट
२००८ गजनी हिंदी चित्रपट
२००९ हाय काय....नाय काय मराठी चित्रपट
२००९ बे दुणे साडे चार मराठी चित्रपट
२०१० अजब लग्नाची गजब गोष्ट मराठी चित्रपट
२०१० मिशन पॉसिबल मराठी चित्रपट
२०१० रिटा मराठी चित्रपट
२०११ झकास मराठी चित्रपट
२०११ राडा रॉक्स मराठी चित्रपट
२०११ दोन घडीचा डाव मराठी चित्रपट
२०१२ पुणे ५२ मराठी चित्रपट
२०१२ अशाच एका बेटावर मराठी चित्रपट
२०१२ गाजराची पुंगी मराठी चित्रपट
२०१२ व्हिला हिंदी चित्रपट
२०१२ नो एंट्री पुढे धोका आहे मराठी चित्रपट
२०१२ अघोर मराठी चित्रपट
२०१२ बाबुरावला पकडा मराठी चित्रपट
२०१२ धागेदोरे मराठी चित्रपट
२०१३ बालक-पालक मराठी चित्रपट
२०१३ झपाटलेला २ मराठी चित्रपट
२०१३ दुनियादारी मराठी चित्रपट
२०१३ टाईम प्लीज मराठी चित्रपट
२०१४ सौ. शशी देवधर मराठी चित्रपट
२०१४ गुरू पौर्णिमा मराठी चित्रपट
२०१४ पोरबाजार मराठी चित्रपट
२०१४ प्यारवाली लव्ह स्टोरी मराठी चित्रपट
२०१४ पोस्टकार्ड मराठी चित्रपट
२०१४ सौ. शशी देवधर मराठी चित्रपट
२०१५ क्लासमेट मराठी चित्रपट
२०१५ हंटर मराठी चित्रपट
२०१५ ३:५६ किल्लारी मराठी चित्रपट
२०१५ तू ही रे मराठी चित्रपट
२०१६ वाय झेड मराठी चित्रपट
२०१६ जाऊंद्याना बाळासाहेब मराठी चित्रपट
२०१६ फॅमिली कट्टा मराठी चित्रपट
२०१६ वजनदार मराठी चित्रपट
२०१६ राक्षस मराठी चित्रपट

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन