दुनियादारी (चित्रपट)

२०१३ भारतीय चित्रपट
(दुनियादारी या पानावरून पुनर्निर्देशित)

दुनियादारी हा २०१३मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारित असून याचे कॅमेरामन संजय जाधव यांनी त्यांच्या ड्रीमिंग २४/७ या संस्थेतर्फे केले आहे. जाधव यांनी चेकमेट, रिंगा रिंगा आणि फक्त लढ म्हणा या चित्रपटांचेही दिग्दर्शन केलेले आहे.

दुनियादारी
प्रमुख कलाकार
भाषा मराठी
प्रदर्शित १९ जुलै २०१३


कलाकारसंपादन करा

 • स्वप्नील जोशी - श्रेयस तळवलकर उर्फ ​​बच्चूच्या भूमिकेत
 • अंकुश चौधरी - दिगंबर शंकर पाटील उर्फ ​​डी.एस.पी.च्या भूमिकेत
 • ऊर्मिला कानेटकर - मिनाक्षी इनामदार उर्फ मिनूच्या भूमिकेत
 • सई ताम्हणकर - शिरीन घाटगेच्या भूमिकेत
 • जितेंद्र जोशी - साईनाथ देडगावकर उर्फ ​​साईच्या भूमिकेत
 • सुशांत शेलार - प्रीतम घाटगेच्या भूमिकेत
 • संदीप कुलकर्णी - श्रेयस गोखले उर्फ ​​एम.के.च्या भूमिकेत
 • वर्षा उसगांवकर - राणी माँच्या भूमिकेत
 • रिचा परियाल्ली - सुरेखा भाटेच्या भूमिकेत
 • आनंद अभ्यंकर - महाविद्यालयाचे प्राचार्याच्या भूमिकेत
 • नागेश भोसले - शिरीन आणि प्रीतमच्या वडिलांच्या भूमिकेत
 • राजेश भोसले -
 • श्रीरंग देशमुख - दिवाकरराव देडगावकर साईच्या वडिलांच्या भूमिकेत
 • अजिंक्य जोशी - अशक्याच्या भूमिकेत
 • नितेश काळबांडे - बंटीच्या भूमिकेत
 • कासिम पिशोरी - अण्णा भाटेच्या भूमिकेत (सुरेखाचे वडील)
 • प्रणव रावराणे - साॅरीच्या भूमिकेत
 • उदय सबनीस - इन्स्पेक्टर इनामदारच्या भूमिकेत (मिनूचे वडील)
 • योगेश शिरसाट - श्री/सुनीलच्या भूमिकेत
 • उदय टिकेकर - श्री.तळवलकर (श्रेयसचे वडील)च्या भूमिकेत
 • सुनील गोडबोले - अण्णा भाटे (सुरेखाचे वडील)च्या भूमिकेत

गाणीसंपादन करा

या चित्रपटातल्या शीर्षक गीतासाठी सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमीत राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळी, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांनी आपला आवाज दिला आहे.

 • जिंदगी जिंदगी
 • टिक टिक वाजते
 • यारा यारा
 • देवा तुझ्या गाभाऱ्याला

संदर्भसंपादन करा