वर्षा उसगांवकर

मराठी चित्रपट अभिनेत्री

वर्षा उसगांवकर (जन्म: २८ फेब्रुवारी, १९६८) ही एक मराठी, हिंदी भाषिक चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे दोन वर्षे रीतसर शिक्षण घेतले आहे.

वर्षा उसगांवकर
वर्षा उसगांवकर
जन्म वर्षा उसगांवकर
२८ फेब्रुवारी, १९६८ (1968-02-28) (वय: ५६)
उसगांव,गोवा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा कोंकणी भाषा, मराठी भाषा
प्रमुख चित्रपट गंमत जंमत
वडील अच्युत काशिनाथ उसगांवकर
आई माणिक उसगांवकर
पती
अजय शर्मा (ल. २०००)

महापूर या नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेला मुंबई आंतर राज्य नाट्य सुवर्णपदक प्राप्त झाले. अजय शर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला.[]

वर्षा उसगांवकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता गंमत जंमत. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला. नंतर खट्याळ सून नाठाळ सासू, तुझ्याविना करमेना, हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशस आणि लपंडाव यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित 'यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी दूध का कर्ज हा हिंदी चित्रपट केला. हा चित्रपट मराठीत उपकार दुधाचे नावाचे डब केला गेला होता. १९९० च्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात महाभारत या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. दिग्दर्शक जब्बार पटेल दिग्दर्शित एक होता विदूषक सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित आत्मविश्वास चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्त्व ठळकपणे जाणवते. त्यांचे ब्रह्मचारी हे नाटक गाजले आहे. वक्त , चौदहवी का चांद या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होत.

वर्षा आणि अजय शर्मा (२०१५)

चित्रपट कारकीर्द

संपादन

वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांमधून अभिनयास प्रारंभ केला. त्यांनी दिग्गज कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर तसेच अशोक सराफ यांसारख्या प्रसिद्ध अभिनेेेेत्यांबरोबर काम केले आहे.

चित्रपट सूची

संपादन

मराठी

संपादन
चित्रपट साकारलेली भूमिका वर्ष
अफलातून
आत्मविश्वास
गंमत जंमत
आमच्या सारखे आम्हीच
उपकार दुधाचे
एक होता विदूषक
ऐकावं ते नवलच
कुठं कुठं शोधू मी तिला
घनचक्कर
चल गंमत करू
जखमी कुंकू
जमलं हो जमलं
डोक्याला ताप नाही
तुझ्याचसाठी
तुझ्यावाचून करमेना
धनी कुंकवाचा
नवरा बायको
पटली रे पटली
पसंत आहे मुलगी
पैंजण
पैज लग्नाची
पैसा पैसा पैसा
प्रेमाच्या सुलट्या बोंबा
बाप रे बाप
बायको चुकली स्टँडवर
भुताचा भाऊ
मज्जाच मज्जा
मालमसाला
मुंबई ते मॉरिशस
राहिले दूर घर माझे
रेशीमगाठी|
लपंडाव
शुभमंगल सावधान
शेजारी शेजारी
सगळीकडे बोंबाबोंब
सवत माझी लाडकी
सवाल माझ्या प्रेमाचा
सुहासिनी
सूडचक्र
हमाल दे धमाल
हाऊसफुल्ल

हिंदी

संपादन
चित्रपट साकारलेली भूमिका वर्ष
दिलवाले कभीना हारे
दूध का कर्ज
साथी
हनीमून
हफ्ता बंद
तिरंगा

दूरचित्रवाहिनी मालिका

संपादन

समाजकार्य

संपादन

वर्षा उसगांवकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे. ही संस्था आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते.

संदर्भ

संपादन
  1. ^ देसाई, माधवी (२०११). गोमन्त सौदामिनी. कोल्हापूर: माणिक प्रकाशन. pp. २४१-242.

बाह्य दुवे

संपादन