मुख्य मेनू उघडा
Wiktionary-logo-mr.png
Look up कोकणी भाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
कोकणी भाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

कोंकणी ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात बोलली जाणारी एक इंडो-युरोपीय भाषा आहे. महाराष्ट्र, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग आणि गोवा येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. कोकणी लिहिण्यासाठी, कर्नाटकात कानडी तर गोवा आणि महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर होतो. गोव्यात रोमन लिपीसुद्धा वापरतात. केरळातील कोकणी लोक मल्याळी लिपी वापरतात व कोकणी मुसलमान अरबी लिपी वापरतात. गोव्यात कोकणी आणि मराठी या भाषांना राज्यभाषा म्हणून मान्यता आहे. अनुस्वार हा कोंकणी भाषेचा श्वास आहे.

कोंकणी
कोंकणी
स्थानिक वापर भारत
प्रदेश गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ
लोकसंख्या ७६ लाख
क्रम १२३
बोलीभाषा

बारदेशी, आंतरूजी, शास्तिकार, मालवणी, कॅनरा क्रीस्तांव, कॅनरा सारस्वत,

सिद्दी, कोच्ची
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी देवनागरी, रोमन लिपी, कानडी लिपी, मल्याळी लिपी, अरबी लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-२ kok
ISO ६३९-३ kok[मृत दुवा]

कोकणी ही (macrolanguage) एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार (individual languages) गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी गोव्याची कोंकणी ही त्यांपैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा असर आहे.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी कोकणीही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ७६ लाखांहून अधिक आहे.

इंडो-आर्यन भाषांत ही सर्वांत दक्षिण टोकाकडील भाषा आहे. तिचे नाते मराठी आणि गुजरातीशी आहे. केरळमध्ये आणि कर्नाटकात बोलल्या जाणाऱ्या कोंकणी भाषेत द्रविड भाषांतले अनेक मूळ शब्द आहेत[१].

अनुक्रमणिका

वैशिष्ठ्येसंपादन करा

कोंकणी भाषेचे व्याकरण अन्य भारतीय भाषांसारखेच आहे. कोंकणीमध्ये (दीर्घ स्वर सोडून) १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. प्रत्येक स्वर नाकात उच्चारला जातो.

स्वरसंपादन करा


या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


कोंकणी भाषेचे एक वैशिष्ट्य असे आहे की कोंकणीतला चा उच्चार मराठीतल्या अ च्या उच्चारापेक्षा वेगळा आहे. मराठीत वापरतात त्या ’अ’साठी IPA चिन्ह आहे ə (unrounded mid vowel), तर कोंकणीतला ’अ’ ɵ(rounded Close-mid central vowel) ने दाखवतात.

कोंकणीत ’ए’ या स्वराचे तीन उच्चार आहेत. :e, ɛ आणि æ.

कोंकणीत वापरला जाणारा æ स्वर IPA च्या æ (Near-open front unrounded vowel) या प्रमाण स्वरापासून वेगळा आहे. कोंकणीत वापरतात तो स्वर ɛ आणि æ यांच्या मधला आहे, आणि प्रमाण æ पेक्षा लांब आहे. प्रमाण æ फक्त युरोपियन भाषांतून आलेल्या तत्सम शब्दांसाठी वापरला जातो.

Front Near-front Central Near-back Back
Close
 
i •
• u
ɪ •
• ʊ
e •
• ɵ
• o
ɛ •
ʌ • ɔ
a •
• ɒ
Near‑close
Close‑mid
Mid
Open‑mid
Near‑open
Open

व्यंजनसंपादन करा

Consonants
  Labial Dental Alveolar Retroflex Alveopalatal Velar Glottal
Voiceless
stops
p

t̪ʰ
  ʈ
ʈʰ

cɕʰ
k
 
Voiced
stops
b

d̪ʰ
  ɖ
ɖʰ
ɟʝ
ɟʝʰ
ɡ
ɡʰ
 
Voiceless
fricatives
    s   ɕ   h
Nasals m

n̪ʰ
  ɳ
ɳʰ
ɲ ŋ  
Liquids ʋ
ʋʰ
  l ɾ
ɾʰ
ɭ ɽ j    

कोंकणीतील व्यंजने मराठीच्या व्यंजनांसारखीच आहेत.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा