Ravi (es); রবি (bn); Ravi (fr); Ravi (ast); Ravi (ca); रविशंकर शर्मा (mr); Ravi (de); ରବି (or); Ravi (ga); راوی شانکار شارما (fa); Ravi (sl); ラヴィ (ja); راڤى (ملحن) (arz); ബോംബെ രവി (ml); Ravi (nl); रवि (hi); రవి (te); راوی شانکار شارما (azb); Ravi (en); Ravi (sq); روی (ur); Рави Шанкар Шарма (ru) compositor indio (es); ভারতীয় সঙ্গীত রচয়িতা (bn); compositeur indien (fr); India helilooja (et); compositor indi (ca); Indian composer (1926-2012) (en); cyfansoddwr a aned yn 1926 (cy); ସଙ୍ଗୀତ ରଚୟିତା (or); kompozitor indian (sq); آهنگساز هندی (fa); compozitor indian (ro); بھارتی کمپوزر (ur); מלחין הודי (he); Indiaas componist (1926-2012) (nl); Indian composer (1926-2012) (en); भारतीय संगीत निर्देशक (hi); భారతీయ స్వరకర్త (te); Indian composer (en-ca); compositor indio (gl); ملحن هندي (ar); Indian composer (en-gb); cumadóir Indiach (ga) Ravi Shankar Sharma (en); रवि शंकर शर्मा (hi); രവി ബോംബെ, Ravi, രവി ശങ്കർ ശർമ്മ (ml)

रविशंकर शर्मा (जन्म : ३ मार्च, १९२६ दिल्ली  ; - ७ मार्च, २०१२), हे एक हिंदी चित्रपटांना संगीत देणारे संगीतकार होते. ते मूळचे दिल्लीचे. लहानपणी हातात येईल ती वस्तू घेऊन ते ताल धरत. कलेच्या ओढीने ते १९५० साली मुंबईत दाखल झाले. रस्त्यावर रहात आणि मालाड रेल्वे स्टेशनवर झोपत. मुंबईतील अनेक चित्रपट स्टुडिओंचे हेलपाटे घालून घालून निराश झाल्यावर, शेवटी त्यांना हेमंत कुमार या संगीत दिग्दर्शकांनी उमेदवारी देऊ केली. सुरुवातीला हेमंतकुमार यांनी त्यांना ’आनंदमठ’मध्ये वंदे मातरम या गाण्यात कोरस म्हणून गाण्याची संधी दिली. नंतर रवि, हे हेमंतकुमार यांचे साहाय्यक बनले. साहाय्यक संगीतकार म्हणून काम केलेल्या चित्रपटांपैकी नागिन हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट. उमेदवारी दरम्यान रवीने, देवेंद्र गोयल याने बनवलेल्या वचन या हिंदी चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यांच्या ’वचन’ ने संगीताच्या जोरावर एकाच चित्रपटगृहात सतत २५ आठवडे चालू राहण्याचा पराक्रम केला. त्यानंतर हेमंत कुमारांनी रवीला उमेदवारीतून मुक्त केले.

रविशंकर शर्मा 
Indian composer (1926-2012)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमार्च ३, इ.स. १९२६
दिल्ली
मृत्यू तारीखमार्च ७, इ.स. २०१२
मुंबई
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

गीतांना दिलेल्या साध्या, सोप्या, सरळ चाली हे संगीतकार रवींचे वैशिष्ट्य होते. ते स्वतः उत्तम कवी आणि गायकही होते. आधी चाल आणि मग काव्यरचना हा प्रकार त्यांना पटत नसे.

वैयक्तिक आयुष्य :

संगीतकार रवी १९४६मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांची पत्‍नी १९८६मध्ये निर्वतली. त्यांच्यापासून दुरावलेल्या [] त्यांच्या मुलाने मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरशी लग्न केले आहे.

रवि यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलेले चित्रपट :

  • अमानत
  • अलबेली
  • ऑंखें (१९६८)
  • आज और कल
  • आदमी सड़क का
  • एक साल
  • औरत
  • काजल
  • कौन अपना कौन पराया
  • खानदान (१९६५)
  • खामोश निगाहें
  • गृहस्थी
  • घराना (१९६१)
  • घूॅंघट
  • चायना टाऊन
  • चिराग कहॉं रोशनी कहॉं
  • चौदहवीं का चॉंद(१९६०)
  • दस लाख
  • दिल्ली का ठग
  • दूर की आवाज़
  • दो कलियॉं
  • दो बदन(१९६६)
  • नज़राना
  • निकाह (१९८२)
  • नीलकमल
  • प्यार किया तो डरना क्या
  • भरोसा
  • मेहेरबान
  • वचन
  • शहनाई (२)
  • समाज को बदल डालो
  • हमराज (१९६७)

रवी यांनी संगीत दिलेली आणि गाजलेली गाणी * मिली ख़ाक मे मुहब्बत * चौदहवीं का चॉंद हो (दोन्ही एकाच चित्रपटातील) * नसीब में जो लिखा था * रहा गर्दिशोंमें हरदम * भरी दुनियॉंमें हरदम (तिन्ही दो बदन मधली) *

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ संतोष भिंगार्डे. "सून-मुलाकडून 'प्रॉपर्टी' हडप करण्याचा डाव - संगीतकार रवी". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.