सदस्य चर्चा:Sankalpdravid/जुनी चर्चा ४
शब्दरचनेत गोंधळ
संपादन>>मी चढविलेली चित्रे आंतरजालातून घेतलेली आहेत.आता त्यावर प्रताधिकार असण्याचे काहीच कारण नसावे.ह्यात दूसर्या वाक्यात "आता त्यावर माझा" असे लिहायचे होते जे अनवधानाने राहून गेले,असो.मला ह्याविषयात जास्त माहिती नाही मी आपण दिलेल्या दूव्यांवरून ती मिळवेन आणि इथून पुढे त्यानुसारच चित्रे संचिका चढविण्याचा प्रयत्न करेन,तूर्त मी चढविलेल्या संचिका काढून टाकण्यास माझी काहीच हरकत नाही.ओके.செ.प्रसन्नकुमार ०४:०७, २४ जुलै २०१० (UTC)
- मला कित्येक दिवसांपासून आपले मनःपूर्वक आभार मानायचे होते ते ह्यासाठी आपण अगदी लक्षपूर्वक शुद्धलेखन,चूका,इतर गुंतागुंतीचे प्रश्न ह्यांवर पहारा ठेऊन असतात.आपल्या सारख्या मित्रांची विकिपीडियाला खूपच मदत होते,जर आम्हा संपादकांकडून आपणास काही बार्नस्टार वगैरे देता आला असता तर मी तो पुढाकाराने दिला असता..असो आपल्या सहकार्याबद्दल मी आपला आभारी आहे.(जास्तच फॉर्मल वाटत असले तरी कृपया स्विकार व्हावा..मनात आले आणि सांगून मोकळा झालो.थँक यू संकल्प !)செ.प्रसन्नकुमार ०४:१२, २४ जुलै २०१० (UTC)
कीटकनाशके
संपादनआपल्या म्हणण्याप्रमाणे आवश्यक ते बदल केलेत.कृपया तपासावे.जुन्या पानांवर पानकाढा साचा लावला आहे. ते पण कृपया काढावेत ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) ०३:४६, २५ जुलै २०१० (UTC)
विकिपीडिया:सजगता
संपादन- सदस्यांच्या प्रताधिकार सजगतेकरिता विकिपीडिया:सजगता हे अविशीष्ट पणे विवीध सूचना दर्शवणारे पान् पाहून् सुधारणा सुचवाव्यात हि विनंती.माहितगार ०७:४०, २६ जुलै २०१० (UTC)
साचा:Infobox Particle
संपादनसाचा:Infobox Particle is in progress. that name went there accidentally. I will notify you as soon as I finish making it. then you can change it to साचा:मूलकण माहितीचौकट . currently I don't think I have स्थानांतरण permission ( will get after few days I think).
साचा:Infobox Particle
संपादनthis template is ready. kindly shift it to साचा:मूलकण माहितीचौकट . thanks
अनिकेत जोगळेकर ११:३६, २९ जुलै २०१० (UTC)
प्रसन्नकुमारांची छायाचित्रे
संपादन- सदस्य प्रसन्नकुमारांनी चढवलेली बरिचशी चित्रे मी उडवली आहेत. पण काही छायाचित्राबद्दल मी निर्नय करू शकलो नाही कारण त्यातील काही सार्वजनिक ठिकाणावहून घेतलेल्या जाहीरातीतून घेतलेली चित्रे आहेत. तर काही प्रॉडक्ट संदर्भात आहेत ती एकदा पाहून वगळण्या जोगी चित्रे वगळण्यात सहाय्य हवे आहे विशेष:योगदान/Prasannakumar/चित्र नामविश्व
- दुसरा विषय असा की नवागतांनी केलेल्या योगदानाकडे चटकन लक्ष जाते.पण सदस्य नाव नेहमी दिसणारे असेल तर आपण सहसा चित्रे तपासेनासे होतो, यावर काही उपाय करावयास हवा. मैही हू डॉन यांनी पणबरीच चित्रे चढविली आहेत त्यांच्याशीही चर्चेची आवश्यकता आहे. असे दिसते. माहितगार १५:२४, ६ ऑगस्ट २०१० (UTC)
नागद्वार
संपादनकृपया नागद्वार हा लेख बघावा.त्यावर आपली नेहमीप्रमाणे निष्पक्ष व सडेतोड प्रतिक्रिया आमंत्रित करतो.वाट बघत आहे.अशा प्रकारचे लेख लिहावेत काय?ते सयुक्तिक वगैरे आहेत काय ईत्यादी. वि. नरसीकर (चर्चा) ०३:५५, ७ ऑगस्ट २०१० (UTC)
आहो जरा धीर धरा..
संपादननमस्कार संकल्प,मी सध्या सर्वच अभिनेत्र्या,अभिनेते ह्यांच्या लेखांचे प्रमाणीकरण करण्याचे हाती घेतले आहे,त्यानुसार मी त्यात आवश्यक त्या गोष्टींचा अंतर्भाव करणार आहेच,तेव्हा अगदीच लेखन पूर्ण झाले आहे असे समजून निर्णयावर येऊ नका,गैरसमज नको म्हणुन आपणांस ईपत्र पाठवित आहे,मला थोडा अवधी मिळावा,जेणेकरून सगळ कस व्यवस्थित करून ठेवेन म्हणतो.कळावे.Prasannakumar ०५:०९, ७ ऑगस्ट २०१० (UTC)
विक्रम साळुंखे
संपादन- सदस्य:Svikram69 हे प्रबंधक कधीपासुन आहेत?
वि. नरसीकर (चर्चा) ०५:२८, ८ ऑगस्ट २०१० (UTC)
- तसेच सदस्य:Svikram69 यांनी १००० हजार संपादने पार केलेली नाहीत. [१] हे पहा, या यादीत १००० संपादने कुणी पार केली आहेत ते दिसतेच आणि त्या प्रत्येकाला बार्नस्टार मिळतोच असेही नाही (मी प्रत्येकाच्या सदस्य पानावर जाऊन पाहिले). सदस्य:Svikram69 दि. ०२-मे-२०१० पासून सदस्य आहेत आणि सदस्य:महाराष्ट्र एक्सप्रेस त्यांना सन २००७ साली बार्नस्टार कसा काय देऊ शकतील. शिवाय त्यांच्या पानावर अविश्रांत आणि योगदानाचे बार्नस्टारही लावलेले आहेत. मला वाटते सदस्य:Svikram69 यांनी कोणा दुसर्याचे सदस्य पान कॉपी पेस्ट केले आहे. Gypsypkd ०६:३६, ८ ऑगस्ट २०१० (UTC)
बहुदा कौस्तुभचे पानाची नक्कल.
वि. नरसीकर (चर्चा) ०८:०४, ८ ऑगस्ट २०१० (UTC)
साचा
संपादननमस्कार, मी q:साचा:व्यक्ती हा साचा (कॉपी करून) तयार केला. या पुढे हा साचा तेथील प्रत्येक लेखात लावायचा आहे. व्यक्ती असे {{}} कंसात लिहिले असता साचा दिसतो पण त्या समोर (असलेले पर्याय) कसे लिहावे हे कळले नाही. साचा प्रत्यक्ष वापरण्यासाठी काय करावे? तसेच तेथे अन्य दोन तीन नवीन साचे तयार केले आहेत तेही एकदा पहावे, विशेषतः त्यातील रंगसंगती जमली आहे का? Gypsypkd ११:१५, ९ ऑगस्ट २०१० (UTC)
Help with Marathi project logos
संपादनHello Sankalpdravid. I'm currently collecting the project names/slogans of all the Wikimedia projects as part of a logo cleanup. Would you mind helping me with the Marathi (mr) project logos? Could you confirm the translations I already have and translate the ones that I don't?
- Wiktionary = ?
- the free dictionary = ?
- Wikibooks = विकिबुक्स्
- Open books for an open world (or "Free books for a free world" if that's easier to translate) = ?
Would you mind responding on my Meta-Wiki talk page? Thanks in advance for your help! Cbrown1023 चर्चा २३:२८, १० ऑगस्ट २०१० (UTC)
आपल्या विकिवरील काही शब्द
संपादननमस्कार,आपण शुद्धेलेखनाचे दूवे दिल्याबद्दल आभारी आहे,त्या निमित्ताने मी आपले लक्ष खालील काही शब्दांकडे वेधू ईच्छितो,हेच आणि असे अनेक शब्द मराठी विकिपीडियाच्या मुख्य साच्यात आढळतात ते वेळीच बदलले पाहिजे अथवा सरावाने तेच प्रमाण शब्द होतील.(जे सध्या माझ्यामते अशुद्ध आहेत) उदा.म्हणून एखादा शब्द/लेख शोधल्या नंतर समोर येणारे शब्द पहा:
- "आंतरिक शोध" -इथे नविन वाचकाला कसा बोध होणार कि आंतरिक शोध नक्की काय सूचीत करते ते?
- "विकीविक्स"-हे काय आहे हे मलाही माहित नाही.विकिविक्स??
- "गुगल"- "गूगल" ह्या शब्दाच्या रोमन समरूपात दोन ओ असतांना दिर्घ उच्चार होतो तो र्हस्व का लिहीण्यात आला आहे?Google
- "विंडोज्"- विंडोज् कि विंडोझ नक्की कोणता शब्द योग्य आणि मराठी देवनागरी आहे?Windows
- "लाईव"-लाईव?? मराठीत माझ्यामते लाईव्ह असा शब्दप्रयोग प्रचलीत आहे,लाईव,ड्राईव,जाईव,इ.शब्द हिंदी देवनागरीत लिहीण्याची पद्धत आहे.Live
- "याहु!"-इथेही तेच,याहू असे असायला हवे,कारण उकारान्त शब्द दिर्घोच्चारी आहे,Yahoo !
- "इक्सालीड"-हे मलाही माहित नाही.पण असे नविन सहसा परिचीत नसणारे शब्दप्रयोग कंसात अधिक माहिती सह दिले तर नवशिक्यांना मदत होईल.
असे अनेक चूकीचे शब्द विकिपीडियाच्या मुख्या साच्यात (Core)आहेत जे देवनागरी मराठीत बसत नाहीत परंतु वापरात येत असल्याने हळूहळू तेच सर्वमान्य होत आहेत. अशा अनेक शब्दांचा वेध घेऊन आवश्यक ते बदल करावेत आणि भाषेच्या शुद्धलेखनाविषयी असेच आग्रही रहावे,कळावे,धन्यवाद.Prasannakumar ०४:१९, ११ ऑगस्ट २०१० (UTC)
विक्शनरीविषयी
संपादन>बर ह्या निमित्ताने एक गोष्ट आपण हाती घेऊया,ती अशी कि परभाषक शब्दांची योग्य मराठी प्रतिरुपे वगैरे असे..म्हणजे एकदाच क्लिअर होईल.बाकी मराठी साठी आपण आहातच,आणि भाषेचे नियम आहेत,परभाषक शब्दांची एक यादी आणि त्यांच्या उच्चार व समरूपांबद्दल काही करता येत असेल तर सांगा हळुहळु तोही शब्दकोश तयार करु.आपले काय म्हणणे आहे,बर आपल्या विक्शनरी मध्ये फक्त इंग्रजी आणि मराठीच शब्द असावेत का? कि इतरही भाषा चालतील ? म्हणजे तसे काही करावयाचे असेल तर तेही सांगा.कारण मला तिथली काही कल्पना नाहीये.कळावे.Prasannakumar १३:२२, ११ ऑगस्ट २०१० (UTC)
- मी सविस्तर चर्चा माहितगार ह्यांच्या चर्चापानावर केली आहे ती देखील पहावी.विक्शनरीवरील प्रचालकपदाच्या अर्जावर आपला कौल द्यावा ही विनंती.क.लो.अ.
- मराठी विक्शनरीवर मी भरीव योगदान देऊ इच्छितो कृपया मार्गदर्शन करावे.तत्पूर्वी संदर्भासाठी माझ्या चर्चा पहाव्या.
- http://mr.wiktionary.org/wiki/सदस्य_चर्चा:Prasannakumar (मराठी विक्शनरी)
- http://ta.wikipedia.org/wiki/பயனர்_பேச்சு:Prasannakumar (तमिळ विकि)Prasannakumar ०४:२४, १३ ऑगस्ट २०१० (UTC)
New MainPage Mukha Prushtha
संपादनHi Wikipedians,
I have recently Redesigned our Marathi Wiktionary [[२]],I have modified the whole content which was present in earlier format (Old Wiktionary Mainpage) and has replaced it with new boxes and colour combinations.For user's convinience I have kept minimum number of links on front page,and have provided a link to the previous version of Mainpage Under section [[३]]Wiktionary Samaaj Mukhaprushtha,I hereby request all active members of Marathi wiktionary to leave your comments on NEW LOOK and send me your suggestions either on my Talkpage or Here just below this Message,I welcome your suggestions & complains,Looking forward to a better work on wiktionary project,Thanks all,Regards,Prasannakumar ०३:४५, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
धन्यवाद
संपादनमानवी विकास निर्देशांक ह्या लेखात योग्य बदल केल्याबद्दल धन्यवाद. रिपोर्टला अहवाल हा शब्द मला सुचत नव्हता... अभिजीत साठे १३:४७, १४ ऑगस्ट २०१० (UTC)
Excuse me?
संपादनI don't find 'mr wikipedia embassy'.
So, I request you for दक्षिण कोरिया.
Can you help me? --Idh0854 १२:४७, १५ ऑगस्ट २०१० (UTC)
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
संपादनडावीकडील शोधपेटीत 'मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या' हे टाकुन 'शोधा' वर क्लिक करा. तीन निकाल येतात. पहिला, आपण पुनर्निर्देशित केलेले पान, दुसरा मी भाषांतरीत केलेला लेख. या दोन लेखांचे एकत्रिकरण व दुसरा लेख उडविणे आवश्यक आहे असे मला वाटते.काय व कसे करावे? कृपया चर्चा करावी ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) ११:१४, १६ ऑगस्ट २०१० (UTC)
सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या व सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या या दोन नावांचे वेगवेगळे लेख लिहिण्यात आलेत व त्यांचे पुनर्निर्देशन 'मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या' या लेखाकडे झाले. यामुळे हा प्रकार घडला असे माझे मत आहे.
वि. नरसीकर (चर्चा) ११:२४, १६ ऑगस्ट २०१० (UTC)
कृपया हे पान वहे पृष्ठ ही दोन वेगवेगळी पाने पूर्णपणे वरपासुन ते खालपर्यंत बघावीत ही नम्र विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०२:४६, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
कौल
संपादनसमर्थन कौल दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार. वि. नरसीकर (चर्चा) ०७:४३, १८ ऑगस्ट २०१० (UTC)
कमिंग सून
संपादन"एवढीच माहिती?! नाही नाही! कमिंग सून' :D"
अहो पण कोणाची सून? आणी कोठे येत आहे? कधी येत आहे? काही कळवाल कि नाही?? :-D
अभय नातू १५:५७, १८ ऑगस्ट २०१० (UTC)
संकेतस्थळ दुवा
संपादनमराठीतर भाषेतील संकेतस्थळाचा दुवा नोंदवताना त्या-त्या भाषेच्या मजकुराबद्दल वाचकांना पूर्वकल्पना देण्यासाठी - {{संकेतस्थळ}}चा वापर करता येईल.
Maihudon ०८:५४, १९ ऑगस्ट २०१० (UTC)
नमस्कार
संपादनमी सध्या, एखाद्या लेखात,बर्याच काळ प्रलंबित असलेला 'काम चालु' साचा असेल तर तो काढण्याचे काम सुरू केले आहे. त्याऐवजी 'विस्तार' वा 'भाषांतर' साचा(जो लागु असेल तो) लावत आहे.हे काम ठिक वाटते काय?बरोबर आहे किंवा चुक?
वि. नरसीकर (चर्चा) १५:५१, २२ ऑगस्ट २०१० (UTC) अगदी मनातले बोललात.मी तोच criteria ठेवला आहे.(बॉट चे संपादन बघत नाही.फक्त सदस्यांचेच बघतो) वि. नरसीकर (चर्चा) १६:१९, २२ ऑगस्ट २०१० (UTC)
काम चालु साचा
संपादनकृपया येथे बघा. काही मोजके अपवाद वगळता,व त्या साच्याची पाने सोडुन,किमान २ महिने वा त्यापेक्षा जास्त प्रलंबित असलेला 'काम चालु साचा' लेखातुन काढण्यात आला आहे. त्यास पर्याय म्हणुन भाषांतर साचा किंवा विस्तार साचा लावला आहे.
- पुढे विनंती अशी की अश्या प्रकारची कामे आपल्या लक्षात आली असतील किंवा येतील तर मला जरुर कळवावे.त्याचा निपटारा करावयाचा मी शक्यतोवर प्रयत्न करेन.
- भाषांतरसाचा लावलेले माझे व ईतर लेख पूर्ण करण्याचाही पुढील प्रयत्न राहील.
वि. नरसीकर (चर्चा) १०:०२, २३ ऑगस्ट २०१० (UTC)
भूतानमधील शहरे
संपादनTranslate please. What does this mean? "Cities of Bhutan" or "Populated places in Bhutan"? --Impro ०५:५४, २४ ऑगस्ट २०१० (UTC)
कवेलु
संपादनरुफिंग टाईल यासाठी मराठीत नेमकी काय शब्दयोजना करावी? आमचेकडे(विदर्भात) 'कौल' म्हणतात(कौलारु घर).पण देवीचा 'कौल' याचेशी त्याचे साधर्म्य आहे. 'कवेलू' पण म्हणतात. तो हिंदी शब्द आहे.कउल असे म्हणणे अशुद्धलेखन होईल. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) ०६:५६, २५ ऑगस्ट २०१० (UTC)
कमेंट
संपादननुकताच आपण संपादिलेला बसवेश्वर लेख बघितला."यातील भाषांतर साचा बाहेर दिसेल असा ठेवावा ज्याने या लेखात भाषांतर बाकी आहे असे कळेल.तो साचा कमेंट मध्ये टाकल्यास जोपर्यंत संपादनासाठी तो लेख उघडत नाही तोपर्यंत त्या लेखात अभाषांतरीत मजकूर आहे हे कळणार नाही." या भावनेपोटीच तो साचा मी बाहेर लावला होता.आपले याबद्दल विचार कळतील तर बरे होईल.माझी त्याबाबत धारणा नक्की करता येईल. थोडा त्रास देत आहे.
वि. नरसीकर (चर्चा) १५:४६, २५ ऑगस्ट २०१० (UTC)
साचा हितसंघर्ष
संपादन- लेखात लावण्याकरिता साचा:लेखनऔचित्य हि बनवला आहे त्याच्या प्रभावाचा अनुभवही चांगला आहे. मराठीमाती आणि कविता महाजन या लेखात लावलेला आढळेल . साचा:हितसंघर्ष सदस्य पानावर लावण्याकरिता आहे दोन्ही मिळून इफेक्टीव्ह होते आहे हे खरे .हितसंबध असलेली पुढील संपादने टळण्यात चांगला हातभार लागतो आहे.म्राठीमातीकार हर्षद खंदारेंची आणि इतरही तत्सम संपादने थांबण्यात यामुळे बरीच मदत झाली. अर्थात या साचात अजून सुधारणेस वाव आहे हेही खरे माहितगार १५:३२, २६ ऑगस्ट २०१० (UTC)
- साचा:लेखनऔचित्य साचाची सुशोभीकरण चौकट माझ्याकदून मोडली गेल्याचे दिसते , पुर्नस्थापनात सहकार्य हवे आहेमाहितगार १६:०९, २६ ऑगस्ट २०१० (UTC)
आभार
संपादननमस्कार, तुम्ही तातडीने हिरडा लेखात योग्य बदल केल्याबद्दल उपचार म्हणून नव्हे खरोखरच मी आभारी आहे. नाहीतर तो ले़ख तसाच राहिला असता. येवढ्यात जास्त वेळ देता येत नाही, तो आणखी कमी होत जाईल असे वाटते. जर मा़झ्या लेखात काही कमी आढळली आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवश्य्क बदल कराल का? सध्या माझे वेळेचे गणीत फारच बिघडले आहे. कदाचित दीर्घ विकिरजेवरही जावे लागेल (सध्या सगळेच अनिश्चित) म्हणून तुम्हाला आणि वि. नरसीकर यांना विनंती केली आहे. gypsypkd (चर्चा) ०५:०१, १ सप्टेंबर २०१० (UTC)
विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा
संपादनआपण देवनागरी लेखनव्यवस्था सुरळीत चालावी म्हणुन तातडीने सहकार्य पुरवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा व्हेक्टर बद्दल प्रेस रिलीज पाठविण्याचा मानस आहे. विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी मजकुर येथे प्रेस रिलिजमध्ये सुयोग्य सुधारणा करण्यात सहकार्य हवे आहे.माहितगार ०७:५४, ६ सप्टेंबर २०१० (UTC)
सोयबीन
संपादनसंकल्प,
सोयबीनमधील माहितीचा मोठा लचका तुम्ही उडवलात. त्यात काही अवैश्वकोशीय मजकूर असला तरी इतर बरीचशी माहिती ग्राह्य होती असे वाटते. एकदा पुनर्निरीक्षण करुन उपयोगी माहिती पुनर्स्थापित कराल का?
अभय नातू १६:५०, ७ सप्टेंबर २०१० (UTC)
प्राधान्याने शुद्धलेखन चिकित्सेत सहाय्य हवे
संपादन- विकिपीडिया:विकिभेट/निमंत्रण हे पान मुख्यत्वे विकिपीडियेतर संकेतस्थळावरून/इमेललिस्ट/फेसबुक पाठवण्याचा मानस आहे. प्राधान्याने शुद्धलेखन चिकित्सेत सहाय्य हवे आहे.माहितगार १६:०३, १४ सप्टेंबर २०१० (UTC)
- सहाय्याकरिता धन्यवाद. मी Marathi (मराठी) Wikipedia ऑर्कूट ग्रूपच्या इव्हेंट्स मध्ये जोडले पण फेसग्रूपच्या इव्हेंट प्रमाणे सदस्यांना व्यक्तिगत मेल जातो का माहित नाही.Marathi (मराठी) Wikipedia ऑर्कूट ग्रूप मॉडरेटर म्हणून तुम्हाला सर्व ग्रूपसदस्यांना एकाच मेसेज मध्ये कळवणे सहज शक्य होत असल्यास पहावे हि नम्र विनंती.माहितगार १३:०९, १५ सप्टेंबर २०१० (UTC)
वर्ग : विस्तार विनंती
संपादनसध्या मराठी विकिवरील लेखांची संख्या ३०,८२५ आहे व वर्ग:विस्तार विनंती मधील लेखांची संख्या १३,२४२ आहे म्हणजे जवळजवळ ४०%. सध्या वर्गातील लेखांना वर्गीकरणाची गरज आहे. सांगकाम्या रिकाम्या हे काम फार उत्तम रितीने तसेच जलद करत आहे. मी माझ्या समजुतीनुसार काही बदल रिकाम्या कडून करून घेतले आहेत. परंतु ह्या वर्गात असणार्या लेखांना वर्गीक्रुत करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज आहे. ह्याचा उपयोग जर पहायचा असेलतर दालन:क्रीडा मधील तुम्ही काय करू शकता हे सदर पहावे, इथे इच्छुक सदस्याला आपण एकाच ठीकाणी विस्तारण्या जोग्या लेखांबद्दल माहिती देउ शकतो. अश्या प्रकारे आपण ह्या वर्गीकरणाचा फायदा करून घेउ शकतो.
ह्या साठी सर्वांच्या आक्रमक सहभागाची गरज दिसते आहे
Maihudon ०६:३५, १५ सप्टेंबर २०१० (UTC)
transliterate from APS to wikipedia request
संपादननमस्कार, सदस्य:Madshri यांनी सदस्य चर्चा:Madshri#transliterate from APS to wikipedia request येथे काही तांत्रीक शंका विचारली आहे.मला या विषयावर अद्याप अधीक माहिती प्राप्त न झाल्याने आपणास या विषयाबद्दल काही कल्पना असल्यास सहाय्य देता आलेतर पहावे हि नम्र विनंती माहितगार ०५:१३, १६ सप्टेंबर २०१० (UTC)
फक्त नमस्कार
संपादनकाहीही विशेष नाही.फक्त नमस्कार.बरेच दिवसांनी दिसलात म्हणुन वि. नरसीकर (चर्चा) ०३:०४, १८ सप्टेंबर २०१० (UTC)
Thanks!
संपादनThanks for this! गणेश धामोडकर ०६:१९, १८ सप्टेंबर २०१० (UTC)
मी सध्या विशेष:अवर्गीकृत पाने येथील लेखात वर्ग टाकत आहे.सध्या 'क' पर्यंत पोचलो आहे.(कोलगेट).कृपया तेथील सय अद्ययावत् करावी ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) ०७:४७, १८ सप्टेंबर २०१० (UTC) निरोप वाचला. धन्यवाद विकिभेटीबद्दल काही कळले काय?
वि. नरसीकर (चर्चा) १६:३२, १८ सप्टेंबर २०१० (UTC)
आभार
संपादनआपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.असाच लोभ कायम ठेवा ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) ०३:१६, २४ सप्टेंबर २०१० (UTC)
मोलाची कामगिरी
संपादनआभार.कामगिरी तर सुरु आहे.कामगिरीचा दर्जा घसरल्यास लगेच निदर्शनास आणा व सहाय्य करा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) १७:०४, २४ सप्टेंबर २०१० (UTC)
आभार
संपादनआपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
Maihudon ०७:४७, २६ सप्टेंबर २०१० (UTC)
उल्लेखनियता
संपादनचौके हायस्कूल ,मालवण च्या निमीत्ताने असे वाटते की ग्रामीण भागातून येणार्या माहिती संदर्भात, इतर विश्वकोशिय संकेताशी तडजोड करण्याची आवश्यकता नक्कीच नाही परंतु ग्रामीण भागांची निरपेक्ष संदर्भ देण्याच्या मर्यादा आणि उल्लेखनीयता या अधीक चांगल्या पद्धतीने कशा समजून घेता येतील किंवा कसे या बद्दल अधीकचर्चेची गरज आहे असे वाटते.
तसेच पानकाढा एवजी उल्लेखनीयता साचा लावल्यास उल्लेखनीयता विषयक चर्चा पुढे नेण्यास हातभार लागेल असे वाटते.
माहितगार ०८:२७, १७ ऑक्टोबर २०१० (UTC)
Speedy delete
संपादनPlease delete this page, that was done by mistake. And also delete pages from my logs that I had moved from Wikipedia namespace to Portal namespace. The Wikipedia namespace was used by error (lack of experience in portal building) and partially because the template I used had that error in itself. Please delete the recent pages where I have used Wikipedia namespace. Thanks. गणेश धामोडकर ०३:५८, २० ऑक्टोबर २०१० (UTC)
Thanks
संपादनDear Sankalpa,
My name is Mandar Kulkarni. So hence forth, you can call me Mandar. I completely agree with your suggestions given. Actually I am very new in this field and will certainly act upon your inputs.
आपल्या म्हणण्याप्रमाणे आवश्यक ते बदल केलेत.कृपया तपासावे. ते पण कृपया काढावेत ही विनंती.
Thanks,
Mandar
आदर्श लेख
संपादननमस्कार!बरेच दिवसांनी बोलण्याचे झाले.मंदार सारख्या उत्साही व येणार्या नवागत सदस्यासाठी एक आदर्श लेख तयार करावा किंवा असलेल्या लेखांमधुन तो निवडावा. तो लेख उदाहरण म्हणुन देण्यास योग्य राहील.(अशा प्रकारे लेख तयार करावा असे उदाहरण). याबाबत आपला काय विचार आहे?कृपया कळवावे ही विनंती.एखादा तश्या प्रकारे लेख आपल्या माहितीत असल्यास ते पण कळवावे. वि. नरसीकर (चर्चा) १५:२८, २९ ऑक्टोबर २०१० (UTC)
माहितीचौकट सॉफ्टवेअर
संपादनमी माहितीचौकट सॉफ्टवेअर हा साचा तयार केला आहे. तो सॉफ्टवेअरसंबंधीच्या लेखात कसा वापरावा हे आपण कृपया सांगावे.
वि. आदित्य (चर्चा) ०७:१७, ५ नोव्हेंबर २०१० (UTC)
AWB
संपादननमस्कार संकल्प,
तुम्ही AWB वापरुन साफसफाई करत असल्याचे ध्यानात आले व त्याबद्दल एक सूचना करावीशी वाटली. सहसा AWBतून घाउक प्रमाणात बदल केले जातात जे repeatitive असतात. तर अशा बदलांसाठी एखादे नवीन खाते उघडावे व त्यास सांगकाम्या करावे म्हणजे तुमचे व्यक्तिशः केलेले बदल व automated बदल यांत फरक राहील. अर्थात, असे करणे भागच आहे असे नाही.
अभय नातू ०५:५८, ७ नोव्हेंबर २०१० (UTC)
सांगकाम्या संकल्प
संपादनसांगकाम्या संकल्प सदस्याला सांगकाम्या म्हणून अधिमान्यता दिली आहे.
अभय नातू १५:४५, ७ नोव्हेंबर २०१० (UTC)
धन्यवाद
संपादनधन्यवाद संकल्प द्रविड. माझ्या लक्षात ती गोष्ट आली नव्हती.तेव्हा यापुढील लेखात मी ती काळजी नक्कीच घेईन.आतापर्यंत लिहिलेल्या लेखांना सांगकाम्या लावून बदल घडवून आणता येईल का?
संभाजीराजे १९:२३, १२ नोव्हेंबर २०१० (UTC)
पुणे, २०१०
संपादनसंकल्प,
नोव्हेंबर २७च्या सुमारास तुम्ही पुण्यात परतणार असल्याचे वाचले. असे असल्यास आपल्याला भेटता येईल का?
अभय नातू १४:५६, २९ नोव्हेंबर २०१० (UTC)
- उद्या किंवा परवा संध्याकाळी भेट घडू शकेल. माझा सेलफोन क्र. ०९८२२५-२५७११ आहे.
- अभय नातू ०३:४८, ३० नोव्हेंबर २०१० (UTC)
मत हवे
संपादननमस्कार संक्लप, क्रुपया साचा चर्चा:Navbox येथील माझा संदेश बघावे, व आपले मत कळवावे. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०४:४३, २ डिसेंबर २०१० (UTC)
- संकल्प, तुमचा संदेश वाचुन आनंद वाटला, मलाही परत सक्रीय होऊन बरे वाटते आहे. सध्या मी रस्ते व महामार्गांवर लेख लिहित आहे. मी इंग्रजी विकिपीडिया मध्ये सुद्धा तेच काम करतो आहे, म्हणुन दोन्ही विकिपीडीया मध्ये एकाच वेळेस लेख टाकतो अथवा संपादीत करतो. मला तुमची मदत पुन्हा लागणार आहे, जेव्हा मी en:Template:infobox road या साच्याला मराठी विकिपीडीया मध्ये तैयार करण्याचे काम चालु करीन. हा खूप मोठा साचा आहे व त्यात खूप काम करवे लागणार आहे, पण एकदा तो साचा तैयार झाला, मग पुढे कुठल्याही महामार्ग अथवा रस्त्यांचे लेख पटकण लिहिता येतील. क्षमा असावी जर माझ्यामुळे तुमच्या अमुल्य वेळेत जास्त बाधा येत असतील! --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०८:३७, २ डिसेंबर २०१० (UTC)
- नमस्कार संकल्प, ६ जानेवारी २०११ रोजी सदस्य:Czeror ने ह्या साच्यामध्ये बदल केला. तरीपण अजुन हा साचा चांगला दिसत नाही आहे. क्रुपया साचा सुधारण्यास मदत करावी. तस्दीबद्द्ल क्षमस्व. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १०:१२, ७ जानेवारी २०११ (UTC)
- नमस्कार संक्लप, मला ही गोष्ट रोज खटकत होती की मराठी विकिपीडीया मधील सगळे लेख खराब दिसत होते कारण साच्यांच्या CSS मध्ये काहितरी गडबड झाली होती. म्हणून मग मी ते साचे सुधरवण्याचे काम स्वतावर घेतले. तेसेही आपण सगळे मराठी विकिपीडीयासाठी खटपट तर करत आहोत, मग मी माझा वाटा पूर्ण करतोय. :) --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०६:५८, २१ फेब्रुवारी २०११ (UTC)
- नमस्कार संकल्प, ६ जानेवारी २०११ रोजी सदस्य:Czeror ने ह्या साच्यामध्ये बदल केला. तरीपण अजुन हा साचा चांगला दिसत नाही आहे. क्रुपया साचा सुधारण्यास मदत करावी. तस्दीबद्द्ल क्षमस्व. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १०:१२, ७ जानेवारी २०११ (UTC)
मित्रा लेख आणखीन लिहायचा आहे.
संपादनधन्यवाद. माझ्या लेखाचे शुद्धीकरण केल्याबद्दल. mर-३ कसे काय नावा पुढे आणायचे....(मी सुमार वाचक आहे)
सहाय्य विनंती
संपादन- बर्याच दिवसांनी दादोजी कोंडदेव प्रत्य्क्षात लेखन करतो आहे. सवड असल्यास संदर्भ दुव्यांमध्ये दुरूस्ती साधून देण्यास सहाय्य करावे.माहितगार ०९:१२, २८ डिसेंबर २०१० (UTC)
- होय,तीनएक वर्षापासून कुठेसा ताटकळत असताना काही नियतकालीकातील दोन्ही बाजूंच्या इतिहास संशोधकांचे लेखन वाचनात आले ते स्कॅनकरून घेण्याची संधी पण मिळाली, लेखनाचा योग नव्हता. आज सुट्टीचा काही वेगळा बेत होता तो बदलला जाऊन थोडे लेखन झले.जमेल तेवढे समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
- मी साचा:इतिहासलेखन बनविला आहे, भारतीय इतिहासाबद्दल होणार्या मराठीच नव्हे तर इंग्रजी विकिपीडियावरीही बर्याच इतिहास विषयक लेखात उपयोगी ठरावा असे माझे व्यक्तिगत मत आहे. या साचातही सुधारणेस वाव निश्चित आहे, केल्यास स्वागतच आहे.माहितगार १५:३५, २८ डिसेंबर २०१० (UTC)
नववर्षाभिनंदन
संपादन* हॅप्पी न्यु इयर २०११* नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !*
प्रसन्नकुमार १४:३८, ३१ डिसेंबर २०१० (UTC)
मदतःवर्ग निवडने बाबत
संपादनविद्युत घटक (Electronic components) बद्दल लेख कोणत्या वर्ग।वर्गात लिहावा.
धन्यवाद!
नमस्कार
संपादननमस्कार ! सध्या प्रचंड व्यस्ततेमुळे येथे येणे जमत नाही.तरीही थोडा वेळ कसातरी काढतो.आज आपण दिसलात म्हणुन हा लेखनप्रपंच. वि. नरसीकर (चर्चा) १४:३८, २ जानेवारी २०११ (UTC)
सांगकाम्या
संपादनसंकल्प,
सांगकाम्याकरवी शुद्धलेखन बदलून घेताना शक्यतो फक्त मुख्य नामविश्वातीलच लेखात बदल करवून घ्यावे. चर्चा, सदस्य चर्चा पानांत बदल केल्यास गोंधळ उडण्याची शक्यता असते.
अभय नातू ०४:०२, १४ जानेवारी २०११ (UTC)
ताफा, तांडा, कॉरल, प्रवाळ
संपादननमस्कार,
जहाजांच्या समूहास ताफा, तांडा दोन्ही शब्द योग्य वाटतात व मी दोन्ही वाचलेली आठवतात. जहाज/नौकांच्या संदर्भात मी ताफापेक्षा तांडा जास्त वाचल्याचे स्मरते, तसेच तुम्ही म्हणल्याप्रमाणे तांडा-तांडेल मुळे या शब्दाला मी झुकते माप दिले. अजून एक म्हणजे ताफा हा तात्पुरत्या समूहास म्हणतात कि काय असे मला वाटते. सध्या या विषयावर माझे थोडेबहुत वाचन चालू आहे, तरी त्यातून ताफा जास्त चपखल असल्याचे उघड झाल्या बदल करतो.
सध्या फ्लीट व टास्कफोर्स या दोन्ही इंग्लिश शब्दांसाठी मी तांडा योजला आहे पण दोन्हीत फरक असतो. मला आत्तातरी यांसाठी दोन वेगळे शब्द आठवत नाहीत, तरी त्याबद्दल तुम्हाला काही स्मरत असल्यास कळवावे.
मला वाटते कॉरल समुद्र ठीक राहील पण प्रवाळ समुद्र/प्रवाळी समुद्र यांकडून तिकडे पुनर्निर्देशन करण्यास हरकत नाही.
अभय नातू ०७:३९, १६ जानेवारी २०११ (UTC)
- नमस्कार,
टास्कफोर्स या इंग्लिश शब्दांसाठी "कार्यदळ" ह्या शब्दाचा विचर करवा.
- राहुल देशमुख १४:१७, ३१ जानेवारी २०११ (UTC)
१ मे, २००३
संपादनसंकल्प,
सर्वप्रथम, तुझ्या supportबद्दल धन्यवाद :-)
मी मराठी विकिपीडिया सुरू होण्याची १ मे, २००३ ही तारीख निश्चित करण्याचा (थोडासा) प्रयत्न केला पण फारसे काही हाती गवसले नाही. मी कोल्हापुरीला संदेश टाकला आहे तसेच मेटावरही याबद्दल संशोधन कसे करावे हे विचारले आहे. पाठपुरावा करुन काहीतरी धागादोरा मिळतो का हे पहातो.
अभय नातू १७:४४, २५ जानेवारी २०११ (UTC)
"स्पुटकाव्य" लेख
संपादनआपण विचारले आहे की 'स्फुट' म्हणजे काय? [ "स्पुटकाव्य" लेख वगळला. (स्फुटकाव्य असे लिहितात. 'स्फुट' म्हणजे काय?!)]
- ज्ञानेश्वरांनी केलेले इतर लेखन ज्या मध्ये विराणी, अभंग, भावगीते, गवळणी आदींचा समावेष आहे, मराठी संत वांङमयामध्ये हे लेखन "स्पुटकाव्य" नावाने वर्गीकृत आहे.
राहुल देशमुख १३:५५, ३१ जानेवारी २०११ (UTC)
उदयोन्मुख लेख
संपादनसंकल्प,
वेळ मिळाला की मुखपृष्ठावरील उदयोन्मुख लेख बदलशील का?
अभय नातू २२:२०, १ फेब्रुवारी २०११ (UTC)
धन्यवाद
संपादनधन्यवाद! बाह्य दुवे द्यायला हवे होते, ते येथून पुढे... :) बाकी भर चालूच राहील. -निनाद
धन्यवाद सर
संपादनधन्यवाद सर,
आपल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल.
तुम्ही सुचविल्याप्रमाणे कोथळाकरिता नवीन पान निर्मिले आहे.
संचिका चढवताना copyrights विषयी त्या पानावर उल्लेख कुठे असतो हे मला सुचवा.
ज्या संचिका चढविल्या आहेत त्या सर्व मी काढलेले फोटो आहेत, ते वगळले जाऊ नये यासाठी उपाय सुचवा.
Dr.sachin23 ०१:५३, ७ फेब्रुवारी २०११ (UTC)
सर,
तुम्ही केलेला वाफविणे व उकडणे मधील बदल मला अनपेश्कित वाटला. दोन्ही मध्ये माध्यमाचा बदल आहे. वाफविलेले पदार्थ वाफेवर शिजवले जातात व उकडलेले पदार्थ प्रत्यक्ष पाण्यात.
उदा. समजा दोन्ही सारखे असतील तर इडली जर उकडली तर ? Dr.sachin23 ०३:५९, २१ फेब्रुवारी २०११ (UTC)
अॅन्ड्रॉइड या लेखाच्या बदलाबद्दल
संपादनमित्रा मला माफ कर पण "ANDROID" चा शब्दाचा उच्चार मराठी मध्ये "अॅन्ड्रॉइड" असा होतो, "अँड्रॉइड" असा नाही. तुला पाहिजे असेल तर तू गूगल वर वरील दोन्ही मराठी शब्द सर्च कर. तुला असे आढळून येईल कि, गूगल वर सर्वात जास्त रिजल्ट्स "अॅन्ड्रॉइड" या शब्दाचेच मिळतील. त्यामुळे हा लेख कृपया हा पूर्वस्थितीत करावा.
धन्यवाद! Sainath468 १८:४०, ९ फेब्रुवारी २०११ (UTC)
"अँड्रॉइड" या लेखाच्या बदलाबद्दल!
संपादनधन्यवाद!
मला ह्या बाबत काही कल्पना नव्हती. लेखात सुधारणा केल्याबद्दल आभार!
Sainath468 १३:११, १० फेब्रुवारी २०११ (UTC)
"अँड्रॉइड" या लेखाच्या बदलाबद्दल!
संपादनधन्यवाद!
मला या बाबत काही कल्पना नव्हती. लेखात सुधारणा केल्याबद्दल आभार!
Sainath468 १३:११, १० फेब्रुवारी २०११ (UTC)
नवीन पाने तयार करण्याबद्दल
संपादनसन्कल्प,
आपण मराठी विकिपीडिया वर करीत असलेल्या कामाबद्दल मनापासून धन्यवाद्. मला अनेक नवीन पाने सुरु करायची आहेत्. क्रुपया काही मार्गदर्शन् केल्यास खूपच मदत होईल. धन्यवाद्.
सुजित उपाध्ये
"योग्य उपयोग" संचिकांबद्दल
संपादन- विकिमीडिया कॉमन्सप्रमाणेच "योग्य उपयोग" संचिकांना भारतीय भाषी आणि त्यात मराठीसुद्धा विकिपीडियांवर परवनानगी नसावी असे माझे मत आहे, ते मी साचा चर्चा:प्रताधिकारित संचिका येथे सविस्तार मांडले आहे.साचा चर्चा:प्रताधिकारित संचिका येथे चर्चा मर्यादीत राहील म्हणून हि चर्चा चावडी येथे किंवा विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा स्थानांतरीत करावी किंवा कसे ? माहितगार ०८:०२, १३ फेब्रुवारी २०११ (UTC)
- होळी लेखातील होळीचे पूजन चित्र् पहावे हा उचित वापर तत्वाच्या दुरून पण जात नाही. आपल्या कार्यरत सदस्यांच्या अनवधानाने त्यांना फटका बसू नये म्हणून काळजी घेतलेली बरी मी मागे मांडलेली चर्चा आता चावडीवर मांडली आहे माहितगार ०५:५८, २३ मार्च २०११ (UTC)
I am not able to type in Devanagaree
संपादनDevanagaree fonts are not appearing in my window since morning and not get activated after Ctl-M also. Sugeest me about the problem. Dr.sachin23 १४:३०, १९ फेब्रुवारी २०११ (UTC)
ठिक आहे
संपादन- टंकता न येण्याचा त्रास मलाही होत होताच, मला वाटते मराठी विकिपीडियापाने लोड न होण्याची समस्या मिडियाविकि डेव्हेलपमेंट टिमचे सदस्य:Catrope यांनी केलेल्या दुरूस्त्यानंतर सुटली आहे, अनामिक संपादक मंडळी ज्या पद्धतीने गायब होती आणि आता परतली आहेत त्या अर्थी समस्या व्यापक होती, पण आता मराठी विकिपीडीया पुरती समस्या धसास लागलेली आहे आणि गाडी सुरळीत आहे असा अर्थ घेण्यास हरकत नसावी.
अर्थात त्यांनी मराठी विकिपीडीया प्रमाणे मराठी विक्शनरीत सुधारणा केल्या नसल्यामुळे तेथील समस्या अद्दाप सुटलेली नाही.माहितगार १७:५१, १९ फेब्रुवारी २०११ (UTC)
उकडणे, वाफवणे व बॉयलिंग
संपादननमस्कार, उकडणे, वाफवणे हे दोन्ही लेख पुर्ववत केलेले आहेत. भाषेच्या अपूर्ण ज्ञानामुळे ही चुक झाली, कृपया आपल्याकडून असेच योग्य मार्गदर्शन मिळावे नाराण १८:४५, २० फेब्रुवारी २०११ (UTC)
उल्लेखनीयता रद्दीकरण
संपादनHi Sankalpdravid, I noticed you're one of the active sysops on this wiki. Do you think you and/or your colleagues might find some time to clean out the speedy deletion requests? Thanks in advance and regards, Wutsje १३:५५, २४ फेब्रुवारी २०११ (UTC)
बाळकृष्ण भगवंत बोरकर
संपादननमस्कार संकल्प, मी बा.भ.बोरकार यांची माहिती अद्यावत करते आहे.एक शंका, संकलित व निवडक काव्यसंपदा यामध्ये ज्या लिंका दिल्या आहेत त्या द्यायच्या आहेत ना? ते बरोबर आहे का?
हा साचा स्वतःच तयार करुन वापरताना काही गोष्टी या लेखात नीट दिसत नाहीत. कृपया या साच्यात योग्य तो बदल करावा.
धन्यवाद,
वि. आदित्य (च/यो) १३:४८, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)
राहुल शेवाळे
संपादनराहुल शेवाळे या नावाचा गूगलवर शोध घेतला असता बर्यापैकी (दोन परिच्छेद) होऊ शकतील एवढी माहिती उपलब्ध दिसते. याचा अर्थ लेख लगेच पुर्ननिर्मित करण्याची आवश्यकता आहे असेही नाही.केवळ अशा विषयां संदर्भाने उल्लेखनीयते बद्दल अधीक चर्चा मराठी विकिपीडियावर येत्या काळात व्हावयास हवी म्हणजे भविष्यातील प्रचालकांकरिता सोईचे राहील माहितगार १६:३७, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)
शुभेच्छा
संपादननमस्कार, मराठी भाषादिनी पहिल्या संपादनेथॉनचे उत्साहाने यशस्वी संयोजन केले, आपल्याकडून भविष्यातही अशाच संपादनेथॉन होऊन आपल्याबरोबरीने धावणारे संपादनपटु भेटोत, आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो हि शुभेच्छा.माहितगार २०:०३, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)
संपादनेथॉन समारोप आणि विश्लेषण
संपादनसंकल्प,
लक्षात ठेवून समारोपाच्या वेळची आकडेवारी नोंदवून ठेवल्याबद्दल धन्यवाद. येथे तेव्हा पहाटेचे तीन वाजलेले असल्यामुळे अस्मादिक गाढ झोपेत होते :-)
या आकडेवारीचे काही विश्लेषण मी एका वेगळ्या पानावर मांडले आहे.
अभय नातू १८:०४, २८ फेब्रुवारी २०११ (UTC)
- संपादनेथॉन तीन दिवस असली तरीही मी पकडलेले आरंभबिंदूचे आकडे ४८तास आधीचेच होते, त्यामुळे दोनाने भागणे बरोबर ठरेल.
- संपादनेथॉनमुळे सगळे आकडे फुगले असतील हे मान्य पण वीकेंडपेक्षा वीकडेमध्येच जास्त संपादने होतात हे माझ्याकडील गेल्या २-३ वर्षांच्या आकडेवारीवरून लक्षात येते. तसेच पुढे जाता संपादनांचा दरच नव्हे तर त्यांच्या वाढीचा दर सुद्धा(rate of change of accelration; second derivative) वाढीवच असेल (अशी अपेक्षा/आशा) करूनच मी ही भाकिते वर्तवली आहेत (यात कॉर्पोरेट बजेटिंग मध्ये जसे नफ्याचे भाकित करतात याचा थोडासा प्रभाव असू शकतो... :-D)
- अभय नातू १७:२३, १ मार्च २०११ (UTC)
सहाय्य आणि अभिप्राय
संपादनमिडियाविकी:Anoneditwarning संदेशात मराठी देवनागरी लिपीच वापरावी अशी सुचना जोडली आहे त्यात शुद्धलेखन आणि इतर काही सुधारणा असल्यास बघावे. तसेच चावडीवर विकिपीडिया:चावडी#मराठी विकिपीडियाची सध्याची मराठी लेखन प्रणाली चर्चा आणि कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपल्या सुचना आणि अभिप्रायाची विनंती आहे.माहितगार ०४:२७, ५ मार्च २०११ (UTC)
नमस्कार,
संपादन<< बाकी, गेल्या आठवड्यात शाळा (कादंबरी) व पूर्वरंग या पुस्तकांवरील लेखांवर श्रद्धेने काम केले आहे, :)
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. कोणत्या पुस्तकांवर लिहिणे अपेक्षीत आहे? त्यांची यादी आहे का? मला खूप वेळ मिळत नाही त्यामुळे अजून पूर्ण अंदाज आलेला नाहीये. जरा बिचकायला होते. हा तेल नावाचा इतिहास आहे / जगायचीही सक्ती आहे ह्यावर लिहिले तर चालणार आहे क? लिंक देणे जरा अवघड वाटते आहे आता. केलेले संपादन alignment च्या दृष्टीने बरोबर आहे की नाही हे कोणी तपासते का?
कॉरल समुद्राची लढाई
संपादनधन्यवाद संकल्प,
हा लेख लिहिताना मुख्यत्वे इंग्लिश विकिपीडियावरुन माहिती घेतली आहे पण त्याशिवाय पुस्तके, चित्रपट, इ. चा ही आधार घेतला. टेल्स ऑफ द साउथ पॅसिफिक, हवाई ही जेम्स मिशनरकृत पुस्तके, पर्ल हार्बर, तोरा! तोरा! तोरा! हे चित्रपट त्यात शामिल आहेत. माझे यापूर्वीचे दुसर्या महायुद्धाबद्दलचे वाचन, लेखन, अभ्यासही बरेच कामात आले.
अभय नातू ०७:५०, ६ मार्च २०११ (UTC)
धन्यवाद!
संपादनचौदावे दलाई लामा या लेखात मोलाची मदत केल्या बद्दल धन्यवाद! इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल आपल्या कडे लेख नसलेला पाहून तातडीने लिहिला. :)
वर्ग
संपादनक्षेपणास्त्रे लेखांची मालिका आपण युद्ध आणि शस्त्रे या वर्गातून का वगळली आहेत? क्षेपणास्त्रे ही शस्त्रेच आहेत. त्यांना त्या वर्गात स्थान असायला हवे.
- वर्गीकरणाची कल्पना समजली. ठीक हरकत नाही! निनाद ०३:५४, १८ मार्च २०११ (UTC)
धन्यवाद !
संपादनधन्यवाद ! आपणाकडून निरंतर नविन ज्ञान व सुचना अशाच मिळाव्यात, हिच अपेक्षा ! कृपया नविन वर्ग मला कसा तयार करावा हे सागांवे ? मला "महाराष्ट्रातील महामंडळे" असा वर्ग तयार करायचा आहे.
रविकुमार बोडखे
सिद्धान्त
संपादनमराठी शुद्धलेखनाच्या १.३ या नियमानुसार ज्या सामासिक शब्दांतला दुसरा शब्द अंत असा असतो ते शब्द अनुस्वाराऐवजी ‘न’ला ‘त’जोडून लिहावेत. उदा०
अर्थान्त, उपान्त्य, दुःखान्त, देहान्त, दीर्घान्त, मरणान्त, युगान्त, र्हस्वान्त, वृत्तान्त, वेदान्त, व्यंजनान्त, शालान्त, शोकान्त, सत्रान्त, सिद्धान्त, सुखान्त, स्वरान्त वगैरे. असे न लिहिलेत तर देहांत=अनेक देहांमध्ये, वेदांत=अनेक वेदांमध्ये, सिद्धांत=अनेक सिद्धपुरुषांत असे चुकीचे अर्थ होतील.
अंकीय वहन या लेखात मी दुरुस्त केलेला सिद्धान्त शब्द आपण बदलवून सिद्धांत असा केला आहे, तो मी परत बदलत आहे.
अंत, अंतर, अंत्य, कांडांत काढणे(=खरपूस मार देणे), कृतांत(=यम), धादांत(=सपशेल), निवांत, भाषांत, भाषांतर, रूपांत, रूपांतर आदी शब्द अनुस्वार देऊनच लिहावेत.... J ०५:२९, ३१ मार्च २०११ (UTC)
स्रोत मजकूर
संपादनसंकल्प,
स्रोत मजकूराची पाने उडवताना त्यातील अप्रतिबंधित मजकूर विकिस्रोतवर घालावा असे वाटते. मराठी विकिस्रोतला अजून तरी कोणी हात घातलेला नाही, तरी असा मजकूर विकिपीडिया किंवा विकिबूक्सवर कोठे तरी तात्पुरता जपून ठेवावा असे माझे मत आहे.
हा मजकूर विकिपीडियाला उपयुक्त नसला तर तो येथून काढणे योग्यच. असा मजकूर लिहिताना कोणीतरी मेहनत घेते ती वाया जाऊ नये तसेच गूगलमहाराजांना कोठे तरी हे सापडून एखाद्या मराठी शोध घेणार्याला मिळावा ही इच्छा.
अभय नातू १६:५५, १४ एप्रिल २०११ (UTC)
उडवलेले लेख
संपादनउडवलेले लेख माघारी आणता येतील
असा मजकूर लेख नामविश्वात असू नये, किंबहुना नसावाच. माझा रोख लेख परत आणण्याबद्दल नसून मजकूर विकिस्रोतावर हलवण्याआधी कोठेतरी तात्पुरता ठेवण्याबद्दल होता.
अभय नातू १७:०९, १४ एप्रिल २०११ (UTC)
केदारेश्वर विषयी
संपादनसंदिग्ध नावाच्या आपल्या मुद्द्याशी मी सहमत आहे. वास्तविक हा लेख मला धर्मापुरी या नावाने हवा आहे. पण धर्मापुरी हे पान पहिलेच आस्तित्वात आहे मी हा लेख धर्मापुरीकडे पुनर्निर्देशित केला होता पण त्यानंतर तो तिथे दिसलाच नाही म्हणून मी तो परत उलटवला यासंदंर्भात मी अभय नातू यांचे मार्गदर्शन मागवले होते पण मला उलगडा झाला नाही. कृपया आपण या समस्येवर उपाय सांगितल्यास आभारी राहिल. संतोष दहिवळ १५:२३, २२ एप्रिल २०११ (UTC)
विकिप्रकल्प पक्षी
संपादननमस्कार, नवीन पक्षी चौकट आवडली तसेच पक्षी विषयाच्या नव्या विकिप्रकल्पाबद्दलही वाचले, अभिनंदन आणि धन्यवाद. एखाद्या लेखात नेमकी कोणती माहिती, कोणत्या क्रमाने हवी ते कळल्यास मी तशी माहिती लिहू शकेन. बुलबुल लेख बघावा, यातील माहितीप्रमाणे इतर पक्ष्यांच्या कुळाबद्दलही लिहावयाचे आहे. त्याबद्दलही काही सूचना असल्यास मला सांगावे, या लेखांची कच्ची माहिती तयार होत आहे. त्यातच योग्य बदल मी करू शकेन. पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. gypsypkd (चर्चा) १०:१४, २३ एप्रिल २०११ (UTC)
- पक्षीशास्त्रात पक्ष्यांच्या श्रेणी, कुळ वगैरे मध्ये खूप बदल झालेले दिसून येतात. यात जगभरातील विविध शास्त्रज्ञांचे मत भिन्न आहे. काहींच्या मते भारतात १७ श्रेणी आहेत, काहींच्या मते २२. आपला लेख [४] या इंग्रजी लेखासारखा क्लेमेण्टनी ठरविलेली यादी प्रमाण मानून तयार करावा का? त्याने विकिच्या आवृत्यात बदल होणार नाहीत. काही श्रेणीत काही पक्षी आहेत तर काही याद्यांमध्ये त्यांची नावे नाहीत. नवीन पुस्तकांचे संदर्भ वेगवेगळे दिसतात. शिवाय श्रेणी, कुळ वगैरे साठी अस्सल मराठी शब्द सापडेपर्यंत ल्ॅटीन नावांचे देवनागरीत लिप्यांतरण करून नवे लेख तयार करावे का? याबाबत तुमचे मत जाणून घेता आले तर बरे होईल, की हा विषय चावडीवर देऊन कौल घ्यायचा? gypsypkd (चर्चा) ०५:४६, २५ एप्रिल २०११ (UTC)
कोरे लेख ?!
संपादननमस्कार संक्लप, मी सद्द्या कोरे लेख बनवुन, त्यात मग नंतर लेख टाकणार आहे. सुरवात करून मग पुढे मजकुर टाकयला सोपे जाइल म्हणुन लेख बनवले. पुढच्या काही दिवसात मी त्या लेखामध्ये मजकुर टाकून ते लेख चांगले बनवेन. मी फक्त १९९० पर्यंतच लेख टाकले कारण मी तेवढा साठा पूर्ण करेन व मग पुढे जाइन. दुसरे कारण म्हणजे की लेखाच्या नावात जर काही चूक झाली असेल तर आपल्या सारखे प्रचालक ते सुधरवतील व मग पुढे मी त्यात मजकुर टाकेन, अशी माझी ईछा आहे. क्रुपया मला सांगवे जर माझ्या कडून काही चुक झाली आहे? मी ती सुधरवण्याचा प्रयत्न करेन. जो पर्यंत मी विकीपीडीया वर आहे तो पर्यंत मी मराठी विकीपीडीयाला 'फुसक्या लेखांचा ढिगारा' होऊ देणार नाही, मी माझे अतोनात प्रयत्न चालु ठेवेन जो पर्यंत मराठी विकीपीडीयाचा दर्जा उंचवत नाही . :) --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १२:१७, ३ मे २०११ (UTC)
साचा सुचवावा
संपादननमस्कार, आपण मागविल्या प्रमाणे मी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे किमान पातळीपर्यंत विस्तारीकरण करीत आहो पाच राष्ट्राध्यक्षांच्या पानांचे काम संपवले पण आहे परंतु मी सध्या वापरात असलेल्या साच्यात (सिनेटर साचा हाच साचा ओबामा साठी वापरलेला होता म्हणून मी पण तोच पुढेही वापरला)मर्यादा आहेत जसे मृत्यू स्थान व तारीख आदी, आपण ह्या करिता योग्य साचा सुचवावा अथवा असलेल्या साच्यात सुधारणा कराव्यात किंवा कसे, कुपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद ..! राहुल देशमुख १८:४४, ६ मे २०११ (UTC)
मत हवे
संपादनA move discussion is initiated at the Talk page of en:Narayan Shripad Rajhans, a page I recently moved. Kindly Let us know your view on this. . Shlok talk . १९:०७, ७ मे २०११ (UTC)
सांगकाम्यांची आवश्यकता आहे.
संपादननमस्कार,
ला लेखात दुवे देणारा सांगकाम्या हवा आहे. प्रत्येकवेळी लेख संपादनात उघडून हे काम करत बसणे मला वेळखाऊ मठ्ठ वाटते. . Shlok talk . १४:४८, १० मे २०११ (UTC)
साचा:माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
संपादनDear sankalp, Some problem @ अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस in साचा:माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष. Kindly help.-- . Shlok talk . १३:०२, १३ मे २०११ (UTC)
साचा:भौतिकशास्त्र
संपादनसाचा:भौतिकशास्त्र ला लेखात दुवे देणारा सांगकाम्या हवा आहे. -- . Shlok talk . १९:४०, १३ मे २०११ (UTC)
साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा
संपादनसाचा:भारतीय स्वातंत्र्यलढा ला लेखात दुवे देणारा सांगकाम्या हवा आहे. -- . Shlok talk . ११:१८, १५ मे २०११ (UTC)
खुलभर दुधाची कहाणी
संपादनसंकल्प,
माहेरचा हा अंक ऑनलाइन उपलब्ध आहे का? आम्हा परदेशवासीयांना या मासिकाची छापील प्रत मिळवणे म्हणजे जिकीरीचे काम आहे...
अभय नातू १६:१३, २० मे २०११ (UTC)
- अभयने म्हटल्या प्रमाणे अंक वाचता नाही आलेला. वृत्तपत्रांपेक्षाही साप्ताहीके आणि मासिकातून विकिपीडियाची माहिती येणे खूप महत्वाचे कारण एक तर माहिती सविस्तार लिहिता येते आणि अंक हे वाचनात प्रदीर्घ काळ रहाण्याची शक्यता असते या दृष्टीने आपण उचललेले पाऊल अभिनंदनीय आहे. माहितगार ०७:२४, २९ मे २०११ (UTC)
सगळ्यात कमी बदल असलेले लेख
संपादनDear Sankalp,
I observed that the articles in सगळ्यात कमी बदल असलेले लेख are mostly the names in English. Should all these articles be deleted from Marathi Wikipedia? What is your opinion? .... Mandar Kulkarni:मंदार कुलकर्णी १०:५६, २३ मे २०११ (UTC)
विभाग, प्रिफेक्चर, प्रभाग इत्यादी
संपादनसंकल्प,
आपला स्ंदेश नीटसा कळाला नाही. आपण उल्लेख केल्याप्रमाणे विविध देशांमधील राजकीय विभागांना वेगवेगळी नावे आहेत. चीन व जपानमध्ये प्रिफेक्चर व रिजन, रशियामध्ये ओब्लास्त, फ्रान्समध्ये डिपार्टमेंट, स्पेनमध्ये कम्युनिटी इत्यादी. ह्या सर्वांना मराठीमध्ये चपखल शब्द नाहीत (असतील तर मला माहित नाहीत), जपानमधील रिजन्सना मी प्रदेश तर प्रिफेक्चरना प्रांत हे शब्द वापरले आहेत. हे योग्य वाटत नसतील तर पर्यायी शब्द म्हणजे आपण सुचवल्याप्रमाणे प्रभाग किंवा विभाग हे वापरले जाउ शकतात.
अभिजीत साठे १९:०८, २ जून २०११ (UTC)
- प्रिफेक्चरला प्रांत ऐवजी प्रभाग ह शब्द अधिक योग्य आहे हे मला मान्य आहे पण ३२ लेखांमध्ये प्रांत असा उल्लेख आहे. एखाद्या सांगकाम्या लावून हे बदल करता येतील काय?
अभिजीत साठे १४:५५, ६ जून २०११ (UTC)- नक्कीच चालेल. मी ह्या पुढील लेखांमध्ये प्रिफेक्चर हा शब्द वापरेन.
अभिजीत साठे १५:३०, ६ जून २०११ (UTC)
- नक्कीच चालेल. मी ह्या पुढील लेखांमध्ये प्रिफेक्चर हा शब्द वापरेन.
नमस्कार
संपादननमस्कार महाराज ! कसे काय आहात? वि. नरसीकर (चर्चा) १५:३१, १४ जून २०११ (UTC)
सध्या प्रचंड व्यस्तता आहे त्यामुळे येथे वेळ देउ शकत नाही, ही खंत आहे.'पोट आधी' या नात्याने तिकडेच वेळ बराच जातो.सुटीचे दिवशी पण अर्धा दिवस.असा अधुन मधुन चोरुन येत असतो. वि. नरसीकर (चर्चा) १५:४४, १४ जून २०११ (UTC)
शीर्षक
संपादनशीर्षक 'श्री व सी' हे बहुधा चुकीचे लिहिले आहे. योग्य शीर्षक 'श्री व सौ' आहे काय ?
हो ती तय्पोग्रफिकाल चूक होती. "श्री व सौ" असेच शीर्षक हवे होते. आपण लेख विस्तारासाठी दिलेले सर्व रकाने काढून टाकलेत. मी ते मुद्दाम लावले होते जेणे करून विस्तार करणे सोपे जावे. मी ईग्रजी विपी वर बर्याच ठिकाणी असे तयार रकाने (readymande frame work) दिल्याचे पहिले म्हणून देले होते. असे रकाने देऊ नये का ?
धन्यवाद
राहुल देशमुख १६:०५, १४ जून २०११ (UTC)
सदस्य:Mvkulkarni23/माहितीचौकट हिंदुस्तानी गायक
संपादन"सदस्य:Mvkulkarni23/माहितीचौकट हिंदुस्तानी गायक" साचा बनवला आहे. कृपया तपासून होकार द्यावा..... मंदार कुलकर्णी १६:१८, १४ जून २०११ (UTC)
उपवर्ग
संपादनसंकल्प नमस्कार, वर्गास उपवर्ग कधी द्यावे ? उपवर्गाची निर्मिती कशी करावी ? आणि लेख लिहिल्यावर वर्ग द्यावे कि उपवर्ग. मला बर्याच ठिकाणी उपवर्गात नोंद आहे पण वर्गात नोंदी नसल्याचे आढळते. नेमके काय असायला पाहिजे आणि कोणती पद्धत पळावी कुपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद
राहुल देशमुख १३:५५, १५ जून २०११ (UTC)
"सदस्य:Mvkulkarni23/माहितीचौकट हिंदुस्तानी गायक" साचा
संपादनAs per your guidance, I have made "सदस्य:Mvkulkarni23/माहितीचौकट हिंदुस्तानी गायक" साचा बनवला आहे. कृपया तपासून होकार द्यावा. Also let me know, how it can be replased with all existing साचा in the wikipedia....मंदार कुलकर्णी १२:३६, १९ ऑगस्ट २०११ (UTC)