क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात.
स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी होता. अदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो.
• पी.टी. उषा हीस 'भारताची सुवर्णकन्या' असे सुद्धा म्हणतात.
...की भारताच्या १९वर्षाखालील खेळाडू अंबाटी रायुडूने २००४/५ मध्ये खेळल्या गेलेल्या १९वर्षाखालील कसोटी मालिकेत इंग्लंड विरुद्ध सलग तीन अर्धशतके केली होती?
...की ऑगस्टीन केली हा उजव्या हाताने खेळणारा फलंदाज व यष्टीरक्षक १९२० आणि १९३० दरम्यान आयर्लंड क्रिकेट संघाकडून २५ वेळा खेळला होता?
आपण खेळ क्रीडा विषयातील रसिक, खेळाडू , क्रिडा शिक्षक,क्रिडा संपादक,क्रिडा बातमीदार लेखक अथवा वाचक प्रेक्षक असल्यास आपले येथे स्वागत आहे. आपण नविन लेख तयार करू शकता तसेच विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या लेखांमध्ये आपण आपले योगदान देउ शकता.
नवीन सदस्यांना विनंती :कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे.आणि अधिक माहिती आणि मदती करिता विकिपीडिया:क्रीडा येथे भेट द्यावी.