रणजित सिंह
(रणजितसिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराजा रणजितसिंग (जन्म : १३ नोव्हेंबर १७८०; - २७ जून १८३९) हा १७९९ ते १८३९ कालखंडात राज्य केलेला पंजाबचा शेवटचा महाराजा होता. लाहोर ही त्याच्या राज्याची राजधानी.. त्याच्या राज्यात शीख, शीखेतर हिंदू आणि मुसलमान या सर्वांना समान हक्क होते. रणजितसिंगाच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याचे पतन सुरू झाले.
महाराजा रणजितसिंग | ||
---|---|---|
शेर-ए-पंजाब | ||
अधिकारकाळ | एप्रिल १२, १८०१ - जून २७, १८३९ | |
राजधानी | लाहोर | |
जन्म | नोव्हेंबर १३, १७८० | |
गुजराणवाला, पंजाब | ||
मृत्यू | जून २७, १८३९ | |
पूर्वाधिकारी | महासिंग | |
उत्तराधिकारी | खरकसिंग | |
वडील | महासिंग |
रणजितसिंह याच्याशी गल्लत करू नका.
महाराजा रणजितसिंगाची स्मारके
संपादन- पाकिस्तानातील लाहोरमध्ये हातात तलवार घेतलेल्या व घोड्यावर बसलेल्या रणजितसिंगाचा नऊ फूट उंचीचा पुतळा तेथील शाही किल्ल्यामधे उभारला आहे. पुतळ्याचे अनावरण २७ जून २०१९ रोजी झाले.
- भारतातील लुधियाना येथे चार एकर क्षेत्रावर पसरलेले महाराजा रणजितसिंग युद्ध संग्रहालय. हे वर्ष १९९९मधे अस्तित्वात आले.