फिफा विश्वचषक किंवा नुसताच विश्वचषक ही फुटबॉल खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. फिफा फुटबॉलची संस्था दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. ह्या स्पर्धेत जगातील 48 देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर विश्वचषकाआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे 48 संघ निवडले जातात.

फिफा विश्वचषक
फुटबॉल विश्वचषक
खेळ फुटबॉल
प्रारंभ १९३०
संघ 48 (अंतिम)
खंड आंतरराष्ट्रीय
सद्य विजेता संघ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
संकेतस्थळ www.fifa.com/worldcup

२०२२ विश्वचषक जिंकणारा आर्जेन्टिना हा सद्य विजेता देश आहे.

आजवर खेळवण्यात आलेल्या २० विश्वचषक स्पर्धांपैकी ब्राझीलने ५, इटलीजर्मनीने ४, आर्जेन्टिनाने ३, फ्रान्सउरुग्वे देशांनी २ तर इंग्लंड,स्पेन देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.

पुढील विश्वचषक स्पर्धांचे आयोजन २०१८ मध्ये रशिया२०२२ साली कतार हे देश करतील.

स्पर्धेचा इतिहास

संपादन

इ.स. १९३० साली या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची सुरुवात झाली. फिफा ही फुटबॉल विश्वातील सर्वांत महत्त्वाची संघटना दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९४२इ.स. १९४६ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या.

पात्रता

संपादन

दर विश्वचषकामध्ये खेळण्यासाठी सुमारे २०० राष्ट्रीय संघांमधून ३२ संघांची निवड केली जाते. ह्यासाठी फिफाने विश्वचषक पात्रता फेरी निर्माण केली आहे. यजमान देशाला आपोआप पात्रता मिळते परंतु उर्वरित ३१ जागांसाठी सर्व उत्सुक संघांना ही फेरी पार करावी लागते. फिफाच्या सदस्य खंडीय संघटनांमधून प्रत्येक विश्वचषकासाठी ठराविक संख्येचे संघ पात्र ठरू शकतात. २०१४ फिफा विश्वचषकासाठी खालील संख्या वापरात आणली जाईल.

स्पर्धेचे स्वरूप

संपादन

पात्रता फेरीमधून निवड झालेल्या ३२ संघांचे प्रत्येकी ४ असे ८ गट केले जातात. प्रत्येक संघ आपापल्या गटामधील इतर तीन संघांसोबत साखळी पद्धतीने सामने खेळतो. विजय मिळवल्यास ३, बरोबरीत सुटल्यास १ तर पराभव झाल्यास ० असे गूण दिले जातात. साखळी फेरीनंतर प्रत्येक गटामधील अव्वल क्रमांकाचे दोन अशा एकूण १६ संघांना बाद फेरीमध्ये प्रवेश मिळतो. बाद फेरीमध्ये निर्धारित वेळेमध्ये जर सामना गोल-बरोबरीमध्ये राहिला तर अतिरिक्त वेळपेनल्टी शूटआउट ह्या पद्धती वापरून सामन्याचा निकाल लावला जातो.

विजेते

संपादन
वर्ष यजमान विजेते स्कोर उपविजेते तिसरे स्थान स्कोर चौथे स्थान संघांची संख्या
१९३०
माहिती
  उरुग्वे  
उरुग्वे
४–२  
आर्जेन्टिना
 
अमेरिका
[] [[Image:{{{flag alias-kingdom}}}|30x27px|border|Flag of युगोस्लाव्हिया]]
युगोस्लाव्हिया
१३
१९३४
माहिती
  इटली  
इटली
२–१ एटा  
चेकोस्लोव्हाकिया
 
जर्मनी
३–२  
ऑस्ट्रिया
१६
१९३८
माहिती
  फ्रान्स  
इटली
४–२  
हंगेरी
 
ब्राझील
४–२  
स्वीडन
१६/१५
१९५०
माहिती
  ब्राझील  
उरुग्वे
[]  
ब्राझील
 
स्वीडन
[]  
स्पेन
१६/१३
१९५४
माहिती
  स्वित्झर्लंड  
पश्चिम जर्मनी
३–२  
हंगेरी
 
ऑस्ट्रिया
३–१  
उरुग्वे
१६
१९५८
माहिती
  स्वीडन  
ब्राझील
५–२  
स्वीडन
 
फ्रान्स
६–३  
पश्चिम जर्मनी
१६
१९६२
माहिती
  चिली  
ब्राझील
३–१  
चेकोस्लोव्हाकिया
 
चिली
१–०  
युगोस्लाव्हिया
१६
१९६६
माहिती
  इंग्लंड  
इंग्लंड
४–२ एटा  
पश्चिम जर्मनी
 
पोर्तुगाल
२–१  
सोव्हियेत संघ
१६
१९७०
माहिती
  मेक्सिको  
ब्राझील
४–१  
इटली
 
पश्चिम जर्मनी
१–०  
उरुग्वे
१६
१९७४
माहिती
  पश्चिम जर्मनी  
पश्चिम जर्मनी
२–१  
नेदरलँड्स
 
पोलंड
१–०  
ब्राझील
१६
१९७८
माहिती
  आर्जेन्टिना  
आर्जेन्टिना
३–१ एटा  
नेदरलँड्स
 
ब्राझील
२–१  
इटली
१६
१९८२
माहिती
  स्पेन  
इटली
३–१  
पश्चिम जर्मनी
 
पोलंड
३–२  
फ्रान्स
२४
१९८६
माहिती
  मेक्सिको  
आर्जेन्टिना
३–२  
पश्चिम जर्मनी
 
फ्रान्स
४–२ एटा  
बेल्जियम
२४
१९९०
माहिती
  इटली  
पश्चिम जर्मनी
१–०  
आर्जेन्टिना
 
इटली
२–१  
इंग्लंड
२४
१९९४
माहिती
  अमेरिका  
ब्राझील
०–० एटा
(३–२) पेशू
 
इटली
 
स्वीडन
४–०  
बल्गेरिया
२४
१९९८
माहिती
  फ्रान्स  
फ्रान्स
३–०  
ब्राझील
 
क्रोएशिया
२–१  
नेदरलँड्स
३२
२००२
माहिती
  दक्षिण कोरिया
  जपान
 
ब्राझील
२–०  
जर्मनी
 
तुर्कस्तान
३–२  
दक्षिण कोरिया
३२
२००६
माहिती
  जर्मनी  
इटली
१–१ एटा
(५–३) पेशू
 
फ्रान्स
 
जर्मनी
३–१  
पोर्तुगाल
३२
२०१०
माहिती
  दक्षिण आफ्रिका  
स्पेन
१–०
एटा
 
नेदरलँड्स
 
जर्मनी
३–२  
उरुग्वे
३२
२०१४
माहिती
  ब्राझील  
जर्मनी
१–०
एटा
  आर्जेन्टिना  
नेदरलँड्स
३–०   ब्राझील ३२
  • नोंदी:
    • एटा — एक्स्ट्रा टाईम नंतर
    • पेशू — पेनल्टी शूटआउट

संदर्भ

संपादन
  1. ^ इ.स. १९३०च्या स्पर्धेत तिसर्‍या क्रमांकासाठीचा सामना अधिकृतरीत्या आयोजित करण्यात आला नव्हता; अमेरिका व युगोस्लाव्हिया उपांत्य फेरीत हरले. आता फिफाने अमेरिकेला Archived 2008-10-19 at the Wayback Machine. तिसरा क्रमांक दिला आहे तर युगोस्लाव्हियाला Archived 2008-10-14 at the Wayback Machine. चौथा. हे क्रमांक या स्पर्धेतील[permanent dead link] त्यात्या देशांच्या एकूण कामगिरीवरुन ठरवण्यात आले आहेत.
  2. ^ a b ह्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीचे व अंतिम सामने खेळवण्यात आले नाहीत. साखळी लढतींमध्ये जे चार संघ सर्वोच्च स्थानावर होते त्यांना गुणांप्रमाणे पहिला, दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक देण्यात आला. [१] Archived 2014-09-10 at the Wayback Machine. Likewise, Sweden's ३-१ victory over Spain (played at the same time as Uruguay vs Brazil) ensured that they finished third.

बाह्य दुवे

संपादन