अतिरिक्त वेळ (खेळ)

(एक्स्ट्रा टाईम (फुटबॉल) या पानावरून पुनर्निर्देशित)

अतिरिक्त वेळ किंवा अधिक वेळ (Overtime) हा काही खेळांमधील सामन्यांचा निकाल सामन्याच्या मर्यादित वेळेत न लागल्यास वापरला जातो. प्रत्येक खेळाचे ओव्हरटाईमचे नियम वेगळे असतात. अतिरिक्त वेळाचा वापर फक्त तेव्हाच केला जातो जेव्हा त्या सामन्याचा निकाल लागणे अनिवार्य आहे (उदा. बाद फेरींमधील सामने ज्यांत सामना बरोबरीत सुटू शकत नाही).

काही खेळांमधील ओव्हरटाईम सडन डेथ प्रकारचा असतो ज्यात ओव्हरटाईममध्ये एका संघाने गुण मिळवल्यानंतर लगेच सामना थांबतो. इतर खेळांमधील ओव्हरटाईम एकदा सुरू झाला की पूर्ण करणे बंधनकारक असते.

फुटबॉल संपादन

फुटबॉल खेळाच्या बाद फेरीच्या सामन्यांत जर मर्यादित ९० मिनिटांमध्ये गोलबरोबरी झाली तर सामना ओव्हरटाईममध्ये जातो. ओव्हरटाईम ३० मिनिटांचा असतो (१५ मिनिटांचे दोन भाग). सामना एकदा ओव्हरटाईममध्ये गेला की ३० मिनिटांचा खेळ चालू ठेवणे बंधनकारक आहे. ओव्हरटाईममध्ये जर सामन्याचा निकाल लागला नाही तर पेनल्टी शूटआउटचा वापर केला जातो.

अमेरिकन फुटबॉल संपादन

अमेरिकन फुटबॉलच्या एन.एफ.एल.मध्ये ६० मिनिटांच्या खेळानंतर समान स्कोर असेल तर ३० मिनिटांचा ओव्हरटाईम मिळतो. पहिल्यांचा चेंडू मिळालेल्या संघाने जर टचडाउन केला तर सामना संपतो पर्ंतु जर फील्ड गोल केला तर प्रतिस्पर्धी संघाकडे डाव जातो व सामना चालू राहतो.

बास्केटबॉल संपादन

बास्केटबॉलमध्ये आवश्यकतेनुसार ५ मिनिटांचा ओव्हरटाईम दिला जातो.