पेनल्टी शूटआउट (फुटबॉल)
पेनल्टी शूट-आउट हा प्रकार फुटबॉल खेळाच्या सामन्यांमध्ये वापरला जातो. जर मर्यादित ९० मिनिटांच्या खेळानंतर व ३० मिनिटांच्या ओव्हरटाईमनंतर देखील सामना गोलबरोबरी स्थितीत राहिला असेल तर पेनल्टी शूट-आउटचा वापर होतो. ह्या पेनल्टी किकचे नियम साधारण खेळामधील पेनल्टी किकपेक्षा वेगळे आहेत.
पेनल्टी शूट--आउटदरम्यान दोन्ही संघांना किमान ५ वेळा किक मारण्याची संधी दिली जाते. जो संघ सर्वाधिक वेळा गोल करेल तो विजयी घोषित केला जातो.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत