१९७८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची अकरावी आवृत्ती आर्जेन्टिना देशामध्ये १ जून ते २५ जून १९७८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

१९७८ फिफा विश्वचषक
Argentina '78
स्पर्धा माहिती
यजमान देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
तारखा १ जून२५ जून
संघ संख्या १६
स्थळ ६ (५ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (१ वेळा)
उपविजेता Flag of the Netherlands नेदरलँड्स
तिसरे स्थान ब्राझीलचा ध्वज ब्राझील
चौथे स्थान इटलीचा ध्वज इटली
इतर माहिती
एकूण सामने ३८
एकूण गोल १०२ (२.६८ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १५,४६,१५१ (४०,६८८ प्रति सामना)

यजमान आर्जेन्टिनाने अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सला अतिरिक्त वेळेत ३–१ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद जिंकले.

पात्र संघ

संपादन
गट अ गट ब गट क गट ड

यजमान शहरे

संपादन
बुएनोस आइरेस बुएनोस आइरेस कोर्दोबा
Estadio Monumental Antonio Vespucio Liberti Estadio José Amalfitani Estadio Olímpico Chateau Carreras
क्षमता: 76,000 क्षमता: 49,540 क्षमता: 46,083
     
मार देल प्लाता रोझारियो मेन्दोसा
Estadio José María Minella Estadio Gigante de Arroyito Estadio Malvinas Argentinas
क्षमता: 43,542 क्षमता: 41,654 क्षमता: 34,875
   

स्पर्धेचे स्वरूप

संपादन

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला ज्यांत पुन्हा ८ संघांचे दोन गट केले गेले. अंतिम सामना वगळता इतर कोणताही बाद फेरीचा सामना ह्या स्पर्धेत नव्हता.

बाह्य दुवे

संपादन