फिफा विश्वचषक यजमान देश

दर चार वर्षांनी खेळवल्या जात असलेल्या फिफा विश्वचषकाच्या यजमान देशाची निवड फिफाच्या साधारण बैठकीमध्ये केली जाते. ह्यासाठी उत्सुक देशांना आपल्या निविदा सादर करणे बंधनकारक आहे. साधारणपणे विश्वचषक अमेरिकायुरोप ह्या दोन खंडांमध्ये आलटून-पालटून खेळवला जातो. आजवर आशियामध्ये एकदा (२००२) व आफ्रिकेमध्ये एकदा (२०१०) ह्या स्पर्धेचे यजमानपद गेले आहे.

जगाच्या नकाशावर विश्वचषकाचे यजमान देश, १९३०-२०२२.गडद हिरवा: एकदा, फिका हिरवा: दोनदा

आजवरचे यजमान संपादन

वर्ष यजमान
1930   उरुग्वे
1934   इटली
1938   फ्रान्स
1942 दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द
1946 दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द
1950   ब्राझील
1954   स्वित्झर्लंड
1958   स्वीडन
1962   चिली
1966   इंग्लंड
1970   मेक्सिको
1974   पश्चिम जर्मनी
1978   आर्जेन्टिना
1982   स्पेन
1986   मेक्सिको
1990   इटली
1994   अमेरिका
1998   फ्रान्स
2002   दक्षिण कोरिया /   जपान
2006   जर्मनी
2010   दक्षिण आफ्रिका
2014   ब्राझील
2018   रशिया
2022   कतार