प्रेमानंद गज्वी (जन्म : इ.स. १९४७) हे मराठी कवी, लेखक व नाटककार आहेत. यांची लेखनशैली ही सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारी शैली आहे [ संदर्भ हवा ]. सध्या सेवानिवृत्त...बीपीटी मधून लेखांचा महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. त्यांच्या घोटभर पाणी या एकांकिकेचे १४ भाषांत अनुवाद झाले आहेत.

प्रेमानंद गज्वी
जन्म इ.स. १९४७
चंद्रपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार वृत्तपत्रीय लेखन
चळवळ नाट्य
प्रसिद्ध साहित्यकृती किरवंत
प्रभाव नाट्यक्षेत्र

प्रेमानंद गज्वी यांचे 'बोधी प्रकाशन' आहे.


छावणी :-

‘छावणी’हे प्रेमानंद गज्वी यांचे नाटक.या नाटकाला सेन्सार बोर्डाने सुरुवातीला परवानगी दिली नव्हती. नंतर दिली गेली.हे नाटक संविधानविरोधी आहे.(२०१५)असा ठपका या नाटकावर ठेवण्यात आला होता. त्यावर देशभर अभिव्यक्ती स्वातंत्र्य-सेन्साॅर बोर्ड या अनुषंगाने चर्चा झाली. या नाटकावर ठेवलेला हा ठपका पूर्णपणे चुकीचा होता.कारण प्रेमानंद गज्वी हे संविधान मूल्ये जगणारे आणि या मूल्यांच्या रुजवणुकीसाठी आपली लेखणी झिजवणारे आंबेडकरवादी लेखक आहेत. त्यांच्या सर्वच नाट्यलेखनातून मानवी मूल्यांची बुज राखली गेली आहे. त्यांनी लेखनातून शोषितांची बाजू घेतली आहे.‘छावणी’हे नाटकही त्याला अपवाद नाही.‘छावणी’च्या निर्मितीनी नंतरच्या वादासंबंधी मनोगतात आवश्यक ती माहिती गज्वी यांनी दिली आहे.डाॅ.अशोक बाबर यांनी प्रस्तावनेतून या नाटकाच्या अशयसूत्राची विस्तृत चर्चा केली आहे,ती चर्चा हे नाटक समजून घेण्यास उपयुक्त ठरते. या नाटकातून गज्वी यांनी थेट व्यवस्थेला प्रश्न विचारलेले आहेत.आंबेडकरी जाणिवेची अभिव्यक्ती या नाटकातून झालेली आहे. विषमतामुक्तीचा आशय घेऊन सामाजिक संघर्षाचे नाट्य यातून उभे राहते.जात-वर्गातून निर्माण झालेल्या विषमतेला नाकारत सामाजिक समतेचे सूचन या नाटकातून होते.देशात सामाजिक आणि आर्थिक पातळीवरील समता निर्माण झाली नाही तर भविष्यात अराजक निर्माण होऊ शकते, हा इशाराही हे नाटक देते.

भांडवली व्यवस्थेला नकार, जातिअंताचे संसूचन, धर्म व्यवस्थेतील ढोंगीपणा-शोषण, वर्गसमूहातील वाढलेली आर्थिक विषमता आणि आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे प्रकटीकरण या महत्त्वाच्या सूत्रांना केंद्रभूत ठेवून हे नाटक आकार घेते. वर्तमान समाजात ज्या विविध समूहांच्या-गटाच्या-विचारांच्या वा इतर स्वरूपाच्या संकुचित हितवादी छावण्या आहेत. त्या छावण्यांनाही छावणीमुक्तीचा संदेश हे नाटक देते. चिंतनशीलता, वैचारिकता, प्रबोधनात्मकता हे या नाटकाचे मूलभूत विशेष आहेत. हे नाटक रंगभूमीवर आले नाही. ते येऊ नये म्हणून काही लोकांनी प्रयत्न केले. या नाट्यसंहितेचे पुस्तक छापायलाही अनेकांनी नकार दिला होता.शेवटी नागपूरच्या विजय प्रकाशनाने २०१८ला छापले. महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या परंपरेतील हे महत्त्वाचे समकालीन नाटक आहे. मराठी नाट्येतिहास त्याची दखल घेईलच!

प्रेमानंद गज्वी यांचे कथासंग्रह

संपादन
  • ढीवर डोंगा
  • लागण

कादंबऱ्या

संपादन
  • जागर
  • हवे पंख नवे

काव्य संग्रह

संपादन
  • एकतारी
  • येतोय

नाटके

संपादन
  • किरवंत
  • गांधी आणि आंबेडकर
  • छावणी
  • जय जय रघुवीर समर्थ
  • डॅम इट अनू गोरे (नाटकाचे मूळचे नाव ‘व्याकरण’)
  • तन-माजोरी
  • देवनवरी
  • नूर महंमद साठे
  • पांढरा बुधवार
  • रंगयात्री
  • शुद्ध बीजापोटी
  • घोटभर पाणी
  • पांढरा बुधवार (हे नाटक [अमरावती] विद्यापीठाच्या एमए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.
  • बेरीज-वजाबाकी
  • (प्रेमानंद गज्वी) समग्र एकांकिका

वैचारिक

संपादन
  • अजिंठा नाट्यलेणी (गज्वी आणि इतर पाच लेखक)
  • (अकरा बोधीसूत्रे अर्थात ज्ञानसूत्रे म्हणजेच) आर्ट फाॅर नाॅलेज (सहलेखक : प्रा. आदित्य देसाई)
  • बोधी
  • बोधी कला-संस्कृती
  • सगुण नगुण
  • १९९० पश्चात मराठी नाटक :संरचना आणि चर्चा ,साहित्य अकादमी पुरस्कृत (१/७/२०२२).
  • निवडक प्रेमानंद गज्वी (प्रेमानंद गज्वी यांचा लेखनप्रवास)

पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दिला जाणारा वि.वा. शिरवाडकर पुरस्कार २००९
  • मसापचा जीवनगौरव पुरस्कार
  • ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद (नियोजित)
  • नव्वदोत्तर नाटक कार्यशाळा - प्रमुख वक्ते साहित्य अकादमी, स्थळ श्रीरामपूर.

संकीर्ण

संपादन

संदर्भ

संपादन