आबा गोविंदा महाजन

(आबा गोविंद महाजन या पानावरून पुनर्निर्देशित)


आबा गोविंदा महाजन (जन्म दिनांक 15 जुलै) हे महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यात अधिकारी आहेत. ते मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आहेत. प्रामुख्याने बालसाहित्यासाठी त्यांची ख्याती आहे. त्यांची २१ पुस्तके व ८ पोस्टरकविता प्रकाशित झाल्या आहेत. आबाची गोष्ट या पुस्तकासाठी त्यांना भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त आहे.त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे ३ पुरस्कार मिळाले आहेत

आबा गोविंदा महाजन

आबा महाजन यांचे बालकथा. बालकादंबरी, बालकविता, बालनाट्य व मुलांसाठी ललित लेखन असे बालसाहित्यातल्या सर्व प्रकारांचे लेखन प्रकाशित आहे.

'मन्हा मामाना गावले जाऊ 'हा महाराष्ट्रातील पहिला अहिराणी बालकविता त्यांच्या नावावर आहे. अहिराणी व मराठी असा द्वैभाषिक प्रयोग या पुस्तकात केला आहे.

त्यांचा 'मन्हा गावले' हा दुसरा संपूर्ण अहिराणी बाल-कुमार कवितासंग्रह असून हा कवितासंग्रह नांदेड विद्यापीठात एम एच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.

त्यांच्या अनेक कथा/कविता इतर भाषांत अनुवादित झाल्या असून त्यांपैकी काहींचा पाठ्य पुस्तकांत, विद्यापीठ अभ्यासक्रमांत समावेश झाला आहे.

आबाची गोष्ट या कथासंग्रहाचा साहित्य अकादमी कडून सर्व भारतीय भाषेत अनुवाद होतोय.

आबा गोविंदा महाजन यांची पुस्तके

संपादन

●आबाची गोष्ट(बाल-कुमार कथासंग्रह) ●गमतीदार खेळांचा खजिना(साकेत प्रकाशन) ● गंमतीच्या राज्यात(गमभन।पुणे) ●मौजमजा(बालकवितासंग्रह) ●टांगाटोली(बालकुमार कथासंग्रह) ●चिऊचा मोबाईल ●वाघोबाची गांधीगिरी(बालकवितासंग्रह) ●ठोंब्या (कादंबरी) ●मन्हा गावले (बालकविता संग्रह) ●मन्हा मामाना गावले जाऊ ●शेखचिल्लीची फुल २ धमाल ●हिप हिप हुर्रे (कवितासंग्रह) ●मन्हा गावले(अहिराणी बालकवितासंग्रह) ●आबा गोविंदा महाजन:बालसाहित्य आकलन आणि समीक्षा-संपादन डॉ संगीता म्हसकर।कविता महाजन।संगीता माळी ●आबा गोविंदा महाजन:बालसाहित्य आकलन आणि परिचय-कु मैत्री लांजेवार ●खानदेशी गाव (बालकुमार कवितासंग्रह)शब्दालय प्रकाशन ●ठोंब्या,टकलू अंकल आणि इतर कथा(चित्र कथा),ग्रंथाली प्रकाशन,मुंबई ●जॅक्रुला(बाल्कवितासंग्रह), मनोविकास प्रकाशन पुणे ●बालसाहित्य निर्मितीचा अनुभव (भाषण),दिलीपराज प्रकाशन,पुणे

बाह्य दुवे

संपादन