रवींद्र सदाशिव भट (सप्टेंबर १७, १९३९ - नोव्हेंबर २२, २००८) हे मराठी संतांचे चरित्र कादंबऱ्यांतून रेखाटणारे लेखक, प्रसिद्ध कवी, नाटककार, पटकथाकार होते.

रवींद्र सदाशिव भट
जन्म नाव रवींद्र सदाशिव भट
जन्म सप्टेंबर १७, १९३९
वाई, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू नोव्हेंबर २२, २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र संतसाहित्यिक, साहित्यकार, लेखक, कवी, नाटककार, पटकथाकार
भाषा मराठी
साहित्य प्रकार संतसाहित्य, कादंबरी, नाटक, कविता, बालसाहित्य

त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह म्हणून काम केले होते. 'ते माझे घर' या चित्रपटाचे रवींद्र भट निर्माता होते. 'ते माझे घर' या चित्रपटास 1963 सालचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.

कारकीर्द

संपादन

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशन वर्ष (इ.स.)
अनादि मी अनंत मी कादंबरी
अरे संसार संसार नाटक
अवघी दुमदुमली पंढरी नाटक
अस्सा नवरा नको गं बाई नाटक
आभाळाचे गाणे कादंबरी
इंद्रायणीकाठी कादंबरी
एक कळी फुलली नाही नाटक
एक धागा सुखाचा
एका जनार्दनी कादंबरी
ओठावरली गाणी कविता
कथा समर्थांच्या बालसाहित्य
कृष्णाकाठचा भुत्या ललित लेख
केल्याने होत आहे रे नाटक
खुर्ची काव्यसंग्रह
घरट्यात एकटी मी कादंबरी
घास घेई पांडुरंगा कादंबरी
जयगंगे भागीरथी बालसाहित्य
जय जय रघुवीर समर्थ बालसाहित्य
जाणता अजाणता काव्यसंग्रह
दीनांची माऊली बालसाहित्य
देवाची पाऊले कादंबरी
बंध विमोचन राम कादंबरी
भगीरथ कादंबरी
भेदिले सूर्यमंडळा कादंबरी
मन गाभारा गाभारा काव्यसंग्रह
मोगरा फुलला काव्यसंग्रह
योगसुखाचे सोहळे चिंतनात्मक
स्वामी विवेकानंद बालसाहित्य
संत एकनाथ बालसाहित्य
संत तुकाराम बालसाहित्य
संत नामदेव बालसाहित्य
सत्यं शिवं सुंदरम कादंबरी
सागरा प्राण तळमळला कादंबरी
सारी पावले मातीचीच ललित लेख
स्वातंत्रवीर बालसाहित्य
हेचि दान देगा देवा कादंबरी
ज्ञानदेव डोळा पाहू चला चिंतनात्मक
वन्ही तो चेतवावा रे कादंबरी
कान्हियाचे चोरी केली काव्यसंग्रह
समर्थ रामदास चित्ररूप चरित्रकथा बालसाहित्य

चित्रपट

संपादन
वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
गोविंदा गोपाळा मराठी कथा, पटकथा
ते माझे घर मराठी कथा, पटकथा
नसती उठाठेव मराठी कथा, पटकथा

अनुबोधपट

संपादन
वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
पंडिता रमाबाई मराठी
चार हातांचा देव मराठी
कोका वाजतो वाजतो मराठी
महाराष्ट्राची वीस वर्षे मराठी
आम्ही शिवथरची लेकरं! मराठी
भलरी दादा भलरी! मराठी
लोकमाता मराठी

पुरस्कार

संपादन
पुरस्काराचे नाव वर्ष (इ.स.)
राष्ट्रपती पुरस्कार १९६३
चेतना पुरस्कार १९९३
म. सा. प. पुरस्कार १९९३-१९९४
कै. सुशिलाबाई काळे पुरस्कार १९९५
फाय फाउंडेशन १९९६
वाई भूषण १९९८
दर्पण पुरस्कार १९९८
पुणे विद्यापीठ स्वामी स्वरूपानंद पुरस्कार २०००
कादंबरीकार कै. ना. ह. आपटे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २००३

बाह्य दुवे

संपादन