प्रभाकर पेंढारकर (१९३२ - ऑक्टोबर ७, २०१०) हे मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते. ते मराठी चित्रपटनिर्माते भालजी पेंढारकर यांचे पुत्र होते.

प्रभाकर पेंढारकर

ते फिल्म्स डिव्हिजन या भारतीय शासनाच्या चित्रपटनिर्मिती करणाऱ्या संस्थेत इ.स. १९६१ सालापासून निर्मातापदावर होते. फिल्म्स डिव्हिजन संस्थेतील नोकरीत त्यांनी तीस माहितीपटांची निर्मिती केली. त्यांनी आंध्रप्रदेश चित्रपट विकास मंडळाचे चित्रपट निर्मितीविषयक सल्लागार म्हणूनही काम केले.

प्रकाशित साहित्य

संपादन
  • अरे संसार संसार
  • आणि चिनार लाल झाला
  • चक्रीवादळ
  • निर्मिती चित्रपट : दो ऑंखें बारा हाथ (या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी)
  • प्रतीक्षा
  • रारंगढांग

दिग्दर्शन

संपादन
  • आंधळा मारतो डोळा
  • प्रीत तुझी माझी
  • बालशिवाजी (इ.स. १९८६)
  • भाव तेथे देव (इ.स. १९६१)
  • शाब्बास सूनबाई (इ.स. १९८६)

बाह्य दुवे

संपादन