किरण नगरकर (इ.स. १९४२; मुंबई, महाराष्ट्र - - 5 सप्टेंबर 2019 []) हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक आहेत.

किरण नगरकर
जन्म इ.स. १९४२
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू इ.स. २०१९
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी, इंग्रजी
साहित्य प्रकार कथा, नाटक, समीक्षा
प्रसिद्ध साहित्यकृती सात सक्कं त्रेचाळीस
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. २००१)
किरण नगरकर,चंडीगढ़ 2016
किरण नगरकर यांचे मेलबर्न येथील कार्यक्रमात घेतलेले छायाचित्र (इ.स.२०१२)



कारकीर्द

संपादन

किरण नगरकरांची पहिली कादंबरी इ.स. १९६७-६८ च्या सुमारास 'अभिरुची' मध्ये प्रसिद्ध झाली []. नंतर तीच 'सात सक्कं त्रेचाळीस ' या नावाने मौज प्रकाशनाने इ.स. १९७४ साली प्रकाशित केली</ref name="मटा२०१२०११२">. मराठीतील महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये हिची गणना होते. त्यानंतर त्यांची 'रावण आणि एडी '(इ.स. १९९४) ही कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. 'गॉड्स लिटल सोल्जर 'ही त्यांची केवळ इंग्रजीत प्रकाशित झालेली कादंबरी आहे. रावण अँड एडीककल्ड (इ.स. १९९७) या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले. इ.स. २००१ साली ककल्ड या पुस्तकासाठी नगरकरांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मोजक्याच कादंबऱ्या लिहूनही ते लोकप्रिय झाले आहेत. ह्‌याशिवाय 'कबीराचे काय करायचे?' आणि 'बेडटाईम स्टोरी' ह्या दोन नाट्यकॄती त्यांच्या नावावर आहेत. ' स्प्लिट वाईड ओपन' ह्या चित्रपटातून त्यांनी अभिनय ही केला आहे. अस्तित्ववादी साहित्याचा बिनीचा शिलेदार म्हणून त्यांचे नाव घेता येते.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "कादंबरीकार किरण नगरकर यांचे निधन". www.esakal.com. 2019-09-05 रोजी पाहिले.
  2. ^ सावंत,शशिकांत. "प्रयोगासाठी प्रयोग करणारा मी नाही!". 2012-03-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)