मराठी शाब्दबंधानुसार एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन म्हणजे समीक्षा अथवा समीक्षण होय.[]एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरणास अथवा विस्ताराने केलेल्या निरूपणास मराठीत टीका असाही शब्द योजला जातो.[] ग्रंथांशिवाय, नाटक, चित्रपट, संगीत, नृत्य अशा कृतींचेही समीक्षण केले जाते. अर्थव्यवहारात कंपनीची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, उत्पादने इत्यादींची समीक्षा केली जाते. क्रीडा क्षेत्रातील समीक्षेस मराठीत समालोचन असे म्हणतात.

समीक्षा ही नेहमीच कमी शब्दांत असते व तिने तसे असण्यातच तिच्या अस्तित्वाला अर्थपूर्णता लाभते. १९६०ते २०१० या कालावधीत साहित्य प्रांताचे चित्र कोणत्या प्रकारचे आहे ,ज्याला नवसाहित्य म्हणजे नवकविता ,नवकथा असे इतिहासाच्या ओघात म्हणले गेले .ते १९६० च्या आसपास हळूहळू वेगवेगळ्या वातावरणात जाऊ लागले होते आणि त्याचे नवजीवन साहित्य प्रवाहात रूपांतर होऊ लागले होते .फक्त महाराष्ट्राची स्थापना ही मराठी अस्मितेने खेचून आणलेली विजयश्री होती .या मराठी अस्मितेच्या विजयाची ग्वाही देणारे ललित ,ऐतिहासिक साहित्य मराठीत नव्या जोमाने निर्माण होऊ लागले होते .नवसाहित्याच्या संशोधन रूपाविषयी समाधान लेखनातून व्यक्त होऊ लागले होते .निर्मितीला प्रारंभ अनेक लेखकांनी केला सत्यकथा सारख्या प्रभावी व नवसाहित्य घडविणाऱ्या नियतकालिका विशेष संपादकीय दूरदृष्टीचा व व्यक्तिमत्त्व विषयीचा असंतोष व्यक्त करणारी अनियतकालिकांची संस्कृती याच काळात उदय पाहू लागली होती .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने स्वतःचे स्थान आग्रहपूर्वक पूर्वक प्रस्थापित करू पाहणारी दलितांची नवी पिढी उदय पाहू लागली होती.

इतर संबंधित संज्ञा

संपादन

सिंहावलोकन, समालोचन, पुनरावलोकन, परीक्षण, भाष्य, टीका अशा समकक्ष संज्ञा देखील मराठीत वापरल्या जातात. इंग्रजीत समीक्षेस Review असा शब्द वापरला जातो. त्याचा पुनरावलोकन हा शब्दशः अर्थ होऊ शकतो. त्याच क्षेत्रातील लोकांकडून जो Review होतो त्यास इंग्रजीत Peer review अशी संज्ञा उपलब्ध आहे, जी शब्दशः समीक्षा शब्दाशी मिळती जुळती आहे [ दुजोरा हवा]

एखाद्या परिस्थितीचे, साहित्यकृतीचे, कलाकृतीचे, संगीताचे तसेच सामाजिक व राजकीय स्थितीचे अवलोकन करून त्यावर प्रामाणिक मत नोंदवणाऱ्यांना समीक्षक असे म्हणतात.

समीक्षेचे प्रकार

संपादन
  • आदिबंधात्मक समीक्षा
  • आर्थिक समालोचन
  • आस्वादक समीक्षा
  • कलावादी समीक्षा
  • काव्यात्म समीक्षा
  • क्रीडा समालोचन
  • पर्यावरणवादी समीक्षा
  • भाषाशास्त्रीय समीक्षा
  • मानसशास्त्रीय समीक्षा
  • संगीत समीक्षा
  • समाजशास्त्रीय समीक्षा
  • साहित्य समीक्षा
  • सौंदर्यवादी समीक्षा
  • स्त्रीवादी समीक्षा

समीक्षा या विषयाची चर्चा करणारी पुस्तके

संपादन
  • बालसाहित्य : आकलन आणि समीक्षा (विद्या सुर्वे बोरसे)
  • मराठीतील कलावादी समीक्षा ((डाॅ. वि.दा. वासमकर)
  • कथा रूप आणि आस्वाद (डाँ.पंडित टापरे .)
  • काव्यशास्त्र आकलन आणि आस्वाद (डाँ.उदय जाधव )

मराठीतील समीक्षा लेखनाला मिळणारे पुरस्कार

संपादन
  • अहमदनगरचा डॉ. र.बा. मंचरकर समीक्षा पुरस्कार हा पुरस्कार २०१२सालापासून संत व लोकसाहित्यात आयुष्यभर संशोधन केलेल्या प्रा. डॉ. मंचरकर यांच्या स्मृती निरंतर राहण्यासाठी प्रा. डॉ. र. बा. मंचरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जातो. (२०१२ साली हा पुरस्कार रणधीर शिंदे यांना मिळाला होता). २०२० साली हा पुरस्कार नामवंत कवी, समीक्षक व साहित्यिक प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांना प्रदान झाला.)
  • केशवराव कोठावळे पारितोषिक
  • पुणे मराठी साहित्य परिषदेचा रा श्री. जोग समीक्षा पुरस्कार. (२०१३ साली हा पुरस्कार रणधीर शिंदे यांना मिळाला होता)
  • कोमसापचा) प्रभाकर पाध्ये स्मृति पुरस्कार
  • साहित्य विहार संस्था नागपूर चा 2021चा समीक्षा पुरस्कार किरण शिवहर डोंगरदिवे ह्यांच्या समकालीन साहित्यावलोकन ह्या ग्रंथास मिळाला
  • विदर्भ साहित्य संघाचा कुसुमानील समीक्षा पुरस्कार (किरण शिवहर डोंगरदिवे ह्यांना काव्यप्रदेशातील स्त्री ह्या ग्रंथासाठी शतकोत्सवी सोहळ्यात ना नितीन गडकरी आणि महेश एलकुंचवार ह्यांच्या हस्ते मिळाला.)

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b "मराठी शाब्दबंध Marathi WordNet". www.cfilt.iitb.ac.in.