कविता महाजन ( : नांदेड, ५ सप्टेंबर १९६७; - पुणे, २७ सप्टेंबर २०१८) या मराठी लेखिका, कवयित्री होत्या.[]

कविता महाजन
जन्म नाव कविता महाजन
जन्म सप्टेंबर ५, इ.स. १९६७
नांदेड (मराठवाडा)
मृत्यू २७.०९.२०१८
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखन, अनुवाद, संपादन, रेखाचित्रण,
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, बालसाहित्य, अनुवादित साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती ब्र, भिन्न, कुहू, ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम
वडील स.दि. महाजन
पुरस्कार साहित्य अकादमी

कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयात एम.ए. केले होते. तसेच त्या राष्ट्रीय स्तरावरील नेट ही परीक्षाही उत्तीर्ण झाल्या होत्या. चित्रकार त्र्यंबक वसेकर हे त्यांचे आजोबा होते.

कविता महाजन यांचे प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अनित्य अनुवादित कथांचे संपादन मूळ लेखिका- मृदुला गर्ग, अनुवादक मीना वैशंपायन मनोविकास प्रकाशन
अन्या ते अनन्या अनुवादित कथांचे संपादन मूळ लेखिका-प्रभा खेतान, अनुवाद - अनिता जोशी मनोविकास प्रका
अंबई : तुटलेले पंख अनुवादित कथासंग्रहाचे संपादन राजहंस प्रकाशन २०१४
आग अजून बाकी आहे अनुवादित कथासंग्रहाचे संपादन मनोविकास प्रकाशन
आगीशी खेळताना अनुवादित व्यक्तिचित्रणे मनोविकास प्रकाशन
उंबरठ्याच्या अल्याड पल्याड अनुवादित आत्मकथन, संपादित; मूळ लेखिका -सलमा; अनुवाद - सोनाली नवांगुळ मनोविकास प्रकाशन
कुमारी माता अनुवादित पुस्तक, संपादित; मूळ लेखक -अमरेंद्रकिशोर, सुनीता शर्मा; अनुवाद प्रतिमा डिके मनोविकास प्रकाशन
कुहू (लहान मुलांसाठी) मल्टीमिडीया कादंबरी दिशा क्रिएटिव्ह्ज राजहंस प्रकाशन २०१४
ग्राफिटीवॉल लेखसंग्रह राजहंस प्रकाशन २००९
जोयानाचे रंग बालसाहित्य राजहंस प्रकाशन सप्टेंबर २०११
ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम कादंबरी राजहंस प्रकाशन २०१४
तत्पुरुष काव्यसंग्रह
तिमक्का चरित्र इंद्रायणी साहित्य २०१९
तुटलेले पंख (संपादित : भारतीय लेखिका पुस्तक मालिका) लेखसंग्रह
दुहेरी शाप अनुवादित संपादित आत्मकथन, मूळ लेखिका - कौसल्या बैसंत्री, अनुवाद - उमा दादेगावकर मनोविकास प्रकाशन
धुळीचा आवाज काव्यसंग्रह
पूल नसलेली नदी (संपादित : भारतीय लेखिका पुस्तक मालिका) कथा संग्रह
पौर्णिमादेवी बर्मन चरित्र इंद्रायणी प्रकाशन २०१९
मृगजळीचा मासा काव्यसंग्रह
बकरीचं पिल्लू जंगल गोष्टी - पाच पुस्तकाचा संच इंद्रायणी साहित्य
ब्र कादंबरी राजहंस प्रकाशन २००५
भिन्न कादंबरी राजहंस प्रकाशन जुलै २००७
रजई अनुवादित लघुकथासंग्रह मूळ लेखिका इस्मत चुगताई
वन डिश मील पाकशास्त्र इंद्रायणी साहित्य
वारली लोकगीते आदिवासी लोकगीतांचे संकलन व संपादन साहित्य अकादमी
वैदेही यांच्या निवडक कथा (संपादित : भारतीय लेखिका पुस्तक मालिका) कथा संग्रह
(जानकी श्रीनिवास मूर्ती यांच्या कथांचा अनुवाद. अनुवादक : उमा कुलकर्णी)
समतोल खा सडपातळ रहा पाकशास्त्र इंद्रायणी साहित्य प्रकाशन
समुद्रच आहे एक विशाल जाळं कवितासंग्रह राजहंस प्रकाशन
वाचा जाणा करा बालसाहित्य रोहन प्रकाशन २०१९

कविता महाजन यांना मिळालेले पुरस्कार

संपादन
  • न.चि.केळकर पुरस्कार केसरी ट्रस्ट, २००५
  • काकासाहेब गाडगीळ पुरस्कार२००५
  • ना.ह.आपटे पुरस्कार,पुणे मराठी ग्रंथालय ,२००५
  • कवयित्री बहिणाई पुरस्कार (इ.स. २००८)
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (इ.स. २००८)
  • साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला)(इ.स. २०११)
  • मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाङ्मय पुरस्कार ‘जोयानाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (२०१३). []

कविता महाजन व त्यांच्या साहित्याविषयीची पुस्तके

संपादन
  • भिन्न : एक आकलन (समीक्षा ग्रंथ, लेखक - पुरुषोत्तम सदानंद तायडे)

कविता महाजन यांच्या पुस्तकांचा इतर भाषांत झालेला अनुवाद

संपादन
  • चू - स्मिता दाते,वाणी प्रकाशन ,दिल्ली =ब्र या कादंबरीचा हिंदी भाषेत झालेला अनुवाद
  • Kuhoo=मनीष गव्हाणे यांनी केलेला कुहू या कादंबरीचा केलेला इंग्रजी अनुवाद ,दिशा क्रिएटीवज,वसई
  • भिन्न या कादंबरीचा कन्नड भाषेत झालेला अनुवाद =मनोहर प्रकाशन,धारवाड,कर्नाटक

बाह्य दुवे

संपादन
  1. पुस्तकविश्वमधील मुलाखत Archived 2011-12-28 at the Wayback Machine.
  2. साप्ताहिक लोकप्रभामधील मुलाखत
  3. 'भिन्न' कादंबरीच्या निमित्ताने कविता महाजन यांची मुलाखत (दिनांक- १९/०१/२००९ रोजी घेतलेली मुलाखत)

संदर्भ

संपादन

४) "भिन्न : एक आकलन", पुरुषोत्तम सदानंद तायडे, अक्षरवाङमय प्रकाशन, पुणे- (पहिली आवृत्ती -२ ऑक्टोबर २०१८) ५)कविता महाजन यांची कन्या दिशा महाजन यांनी दिलेली माहिती,तसेच इंरायणी साहित्य ,पुणे आणि रोहन प्रकाशन,पुणे यांनी दिलेली माहिती

  1. ^ "लेखिका कविता महाजन यांचे निधन". २८. ९. २०१८. 2019-07-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ [१]दैनिक 'दिव्य मराठी'तील बातमी