एकनाथ

महाराष्ट्रातील एक संत
Eknath (es); একনাথ (bn); Sant Ekanath (gom-latn); Eknath (ast); Экнатх (ru); एकनाथ (mr); एकनाथ, संत (gom-deva); Eknath (sq); 阿克那斯 (zh); ایک ناتھ (pnb); ایک ناتھ (ur); Eknath (de); Eknath (id); એકનાથ (gu); ఏకనాథుడు (te); Экнатх (tt); संत एकनाथ (sa); saint eknath (hi); ಸಂತ ಏಕನಾಥ್ (kn); ਏਕਨਾਥ (pa); Eknath (en); Eknath (nl); Sant Ekanath (gom); ஏகநாதர் (ta) महाराष्ट्रातील एक संत (mr); indischer Dichter und Mystiker (de); ਭਾਰਤੀ ਹਿੰਦੂ ਸੰਤ, ਦਾਰਸ਼ਨਿਕ ਅਤੇ ਕਵੀ (1533-1599) (pa); Indian Hindu saint, philosopher, and poet (1533– 26 February 1599) (en); ভারতীয় সাধক কবি (bn); महाराष्ट्र के एक संत (hi); filosoof (nl) Эканатх, Эканатха (ru); सन्त एकनाथ (hi); ਸੰਤ ਏਕਨਾਥ (pa); Bharud, sant eknath (en); एकनाथ सूर्यनारायण पैठणकर, संत एकनाथ (mr)

एकनाथ (१५३३-१५९९) हे भारतीय संत, तत्त्वज्ञ आणि कवी होते. ते भगवान विठ्ठलाचे भक्त होते आणि वारकरी चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे. एकनाथांना बहुधा मराठी संत ज्ञानेश्वर आणि नामदेव यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते.

एकनाथ 
महाराष्ट्रातील एक संत
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १५३३ (१५८४ च्या पूर्वीच्या ग्रेगोरियन तारखेसह विधान)
महाराष्ट्र
मृत्यू तारीखइ.स. १५९९
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
संत एकनाथ मंदिर, पैठण

सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (जन्म : पैठण, इ.स. १५३३; - इ.स. १५९९) हे महाराष्ट्तील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. एकनाथांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे या दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.

नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडीत त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. हरीला प्रल्हाद, मेघश्याम व राघोबा अशी तीन अपत्ये झाली. पैकी केवळ मेघश्याम या मधल्या मुलाचा मूळ वंश सद्य स्थितीत पैठण येथे अस्तित्वात आहे. कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत.

ज्ञानेश्वर|संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.

’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य (एकनाथ षष्ठी हा) दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

परंपरा

संपादन

एकनाथांची गुरुपरंपरा :

  1. नारायण (विष्णू)
  2. ब्रह्मदेव
  3. अत्री ऋषी
  4. दत्तात्रेय
  5. जनार्दनस्वामी
  6. एकनाथ

एकनाथांची शिष्यपरंपरा : संत एकनाथ महाराजांच्या शिष्य शाखा महाराष्ट्र आणि बाहेरही मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. त्यापैकी काही , श्री नारायणगड (बीड), श्री भगवानगड (नगर), एकाजनार्दनी नाथपीठ (अंजनगावसुर्जी), श्री अमृतनाथस्वामी मठ (आळंदी), श्री तुकाविप्र महाराज (पंढरपूर,अंजनवती), श्रीकृष्णदयार्णव महाराज (पैठण, भारतातील सर्व मठ), श्री गोपालनाथमहाराज (त्रिपुटी, सातारा)

एकनाथांची वंशपरंपरा : संत एकनाथांच्या वंशजांची अनेक घरे पैठण आणि बाहेरही आहेत. उपलब्ध माहितीनुसार नाथांच्या नंतर त्यांच्या वंशजांनी त्यांची वारकरी संप्रदायाची आणि दत्त संप्रदायाची धुरा नेटाने चालविली. कीर्तन आणि गायन याद्वारे त्यांनी त्या त्या काळी छाप पाडल्याचे अनेक कागदपत्राद्वारे लक्षात येते. त्यांच्यातील पहिले रामचंद्र (भानुदासबाबा) यांचा उल्लेख ग. ह. खरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ गुरूंपैकी एक असा केलेला आहे. छय्याबुवा म्हणून चौथ्या पाचव्या पिढीत एक सत्पुरुष होऊन गेले त्यांच्या संबंधी अनेक कथा सांगितल्या जातात. सहाव्या सातव्या पिढीतील काशिनाथबुवा व रामचंद्रबाबा (२रे) यांचा मोठा प्रभाव भोसले,पेशवे, शिंदे, होळकर,निंबाळकर,गायकवाड, धार देवास आदींवर असल्याचे दिसते. काशिनाथ बुवा यांचा उल्लेख गायक म्हणून येतो तर रामचंद्रबाबा (२रे) यांचा उल्लेख कीर्तनकार व गायक म्हणून येतो. सद्यपरिस्थितीत योगिराज महाराज गोसावी ( योगिराज पैठणकर ) यांचे नाव नाथांचे १४ वे वंशज म्हणून संप्रदायात अग्रक्रमाने घेतले जाते.

एकनाथांचे कार्य व लेखन

संपादन

एकनाथांवरील मराठी पुस्तके

संपादन
  • संत एकनाथ (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
  • संत एकनाथ (विजय यंगलवार)
  • संत एकनाथ (विनायक मुरकुटे)
  • श्री एकनाथ : परंपरा आणि प्रभाव (डॉ. रत्नाकर बापूराव मंचरकर)
  • संतश्रेष्ठ एकनाथ (दीपक भागवत)
  • एकनाथ गाथा (संपादक - साखरे महाराज (नानामाहाराज साखरे))
  • एकनाथ चरित्र (ल.रा. पांगारकर)
  • संत एकनाथ दर्शन (ललित लेखसंग्रह, लेखक -हे.वि. इनामदार)
  • संत एकनाथांचा धर्मविचार (डॉ. सुरेखा आडगावकर)
  • एकनाथांची निवडक भारुडे (डॉ. वसंत जोशी)
  • एकनाथी भागवत सार्थ (सदाशिव आठवले)
  • एकनाथी भागवत (शोधून, विपुल व सुबोध टीपा आणि अल्पचरित्र यांसह लिहिलेला ग्रंथ, लेखक/संपादक गोविंद नारायण शास्त्री दातार)
  • एकनाथी भागवताचा अभ्यास (दा.वि. कुलकर्णी)
  • एका जनार्दनी (एकनाथांवरील दीर्घ कादंबरी, लेखक - अशोक देशपांडे)
  • एका जनार्दनी (डॉ. कल्याणी नामजोशी, डॉ. वि.रा. करंदीकर
  • एका जनार्दनी ! (कादंबरी, लेखक - रवींद्र भट
  • एका जनार्दनी (बालसाहित्य, लेखिका - लीला गोळे)
  • एकोबा (एकनाथांचे चरित्र, लेखिला - डॉ. कुमुद गोसावी)
  • भागवतोत्तम संत एकनाथ (डाॅ. शं. दा. पेंडसे)
  • लोकनाथ (कादंबरी, लेखक - राजीव पुरुषोत्तम पटेल)
  • शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे ओवीबद्ध चरित्र (कवी - केशव, संपादक- योगिराज पैठणकर)
  • श्री एकनाथ चरितं (संत एकनाथ महाराज संस्कृत चरित्र,भाषांतरकार- श्रीमती नलिनी पाटील, संपादक - योगिराज पैठणकर)
  • Sant Eknath Maharaj Charitra ( Translated By Pro. Mr. Vijaykumar Patil, Editor - Shri Yogiraj Maharaj Gosavi)

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन