योगिराज महाराज पैठणकर,(श्रीएकनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र पैठण) हे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार , प्रवचनकार म्हणून सुपरिचित आहेत. शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे ते १४ वे वंशज [] आहेत. घरात परंपरेने चालत आलेल्या वारकरी सांप्रदायाचे संस्कार असल्याकारणाने बालपणापासूनच परमार्थाप्रती त्यांना विशेष रुची निर्माण झाली. महाराज हे जेष्ठ आध्यात्मिक विभूती तथा श्रीएकनाथमहाराज संस्थानाधिपती श्री भैय्यासाहेब महाराज पैठणकर यांचे नातू. योगिराज महाराजांचे पारमार्थिक शिक्षण सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षणसंस्था आळंदी येथे झाले असून तेथील कीर्तन परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. येथील चार वर्षांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर इ. स. २००५ पासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक कीर्तन व्याख्यानांच्याद्वारा वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. अनेक मोठमोठया व्यासपीठांवरून त्यांनी व्याख्याने दिली आहेत. []

इ. स. २००६ साली त्यांनी "शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन,पैठण" या सामाजिक संस्थेची स्थापना केली[] जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षपूर्तीचे औचीत्त्य साधत त्यांचेद्वारा "Online वारकरीसंप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा" या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाद्वारे सर्व संतांचे वाङ्मय अभ्यासण्याची जगभरातील हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

मिशनद्वारा इ.स. २०१८ सालापासून संत एकनाथ महाराजांच्या नावाने विविध सहा पुरस्कार देण्यात येत असून मुख्य "भानुदास-एकनाथ पुरस्कार" आजवर अनेक महान विभूतींना देण्यात आला आहे. त्यात ह.भ.प.गु.श्री मारोतीबाबा कुऱ्हेकर, जेष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे, ह.भ.प.श्री जितेंद्रनाथ महाराज अंजनगावसुर्जी, गाथा मंदिर अध्यक्ष ह.भ.प.श्री पांडुरंगमहाराज घुले, अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष श्री गोविंददेवगिरीजी महाराज आदींचा समावेश आहे.

मिशनद्वाराच इ.स. २०१८ मध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज समाधी मंदिरात असणाऱ्या श्रीसंत एकनाथमहाराज पाराचा जीर्णोद्धार करून त्याठिकाणी श्री एकनाथमहाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

शांतिब्रह्म प्रकाशनाच्या माध्यमातून वारकरी भजनी मालिका, संत एकनाथ महाराजांचे चरित्र मराठी, संस्कृत व इंग्रजी या भाषेत प्रकाशित करण्यात आले असून पुढे लवकरच आणखी काही ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.[]

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नासिक दौऱ्याचेवेळी त्यांची भेट घेऊन त्यांचा संप्रदायाचे वतीने सत्कार करून संत एकनाथ महाराजांची मूर्ती व श्रीएकनाथकृत भावार्थ रामायण ग्रंथाची प्रत भेट देण्यात आली. या कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील केवळ १४ महाराजांस आमंत्रित करण्यात आले होते. यात एकनाथ महाराजांचा प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

इ.स. २०२३ ते २०२४ हे वर्ष संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे ४२५ वे तसेच ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताचे ४५० वे वर्ष असल्याने श्रीक्षेत्र पैठण याठिकाणी एका भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आपल्याद्वारे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांच्या सेवा याठिकाणी रुजू झाल्या. या सप्ताहात एक विश्वविक्रम करण्यात आला, श्री एकनाथी भागवताचे पारायण अवघ्या १.३१ मिनिटात करण्यात आले.

संत एकनाथमहाराजांचे, संतांचे विचार हे फक्त सांगण्यासाठी नसून त्याचे आचरणही व्हावे या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून श्रीएकनाथ षष्ठीच्या दिवशी स्वतःच्या वाड्यात त्यांनी 'वारकरी-वैष्णव पाद्य पूजनास' सुरुवात केली आहे.[] वृत्तपत्रीय स्तंभ लिखाण, टेलिव्हिजनच्या माध्यमातून कीर्तन आणि संतांच्या वाङ्मयाचा प्रसार ते करीत आहेत.

संत एकनाथ महाराजांच्या अनेक चित्रांचा अभ्यास करून तसेच आधुनिक काळात ज्यांना ज्यांना संत एकनाथ महाराजांचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष दर्शन झाले त्यांच्याशी चर्चा करून, स्वानुभवाने एकनाथ महाराजांची मूर्ती सर्वसामान्य भाविकांस सर्वप्रथम उपलब्ध करून दिली आहे.

पुरस्कार

संपादन

मराठवाडा सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे या संस्थेचा "मराठवाडा भूषण" हा पुरस्कार देण्यात आला आहे.

  • पुणे येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा "ऋग्वेद भूषण" हा पुरस्कार देण्यात आला आहे.[]

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत". 2013-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-04 रोजी पाहिले.
  2. ^ https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-ald24b02660-txt-pd-today-20241122094849. "sakal news paper". Pune.
  3. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11467240.cms[permanent dead link] मटा संकेतस्थळ दि. १९ एप्रिल २०१३ रोजी दुपारी भाप्रवे १३.३६ वाजता जसे तपासले
  4. ^ "Sant Eknath Maharaj". santeknath.org. 2024-06-27 रोजी पाहिले.
  5. ^  [१] Archived 2017-03-23 at the Wayback Machine.
  6. ^ "संत एकनाथ ने ज्ञानी और अज्ञानियों के उत्कर्ष के लिए कार्य किया : ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी -" (इंग्रजी भाषेत). 2025-01-12. 2025-01-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन