दया पवार

मराठी साहित्यिक

दया पवार (१५ सप्टेंबर इ.स.१९३५ - सप्टेंबर २०, १९९६) हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.

दया पवार
जन्म नाव दगडू मारुती पवार
टोपणनाव दया पवार
मृत्यू सप्टेंबर २०, १९९६
दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
चळवळ मराठी दलित साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती बलुतं
वडील मारुती

पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे.जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन पवारमॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्यांच्या मामा आणि आईच्या धीराने त्यांनी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा दिली. बोर्डिंगच्या अधिकाऱ्यांनी दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून पवार बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागलेव इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळवले.

मॅट्रिक नापास झालेल्या दया पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.

पवार यांची मुलगी प्रज्ञा ही एक मराठी कवयित्री आणि गद्यलेखक आहे.

प्रकाशित साहित्य

संपादन
  • अछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद).
  • कोंडवाडा (कवितासंग्रह)
  • चावडी (कथासंग्रह)
  • जागल्या (कथासंग्रह)
  • धम्मपद (कवितासंग्रह)
  • पाणी कुठंवर आलं गं बाई... (वैचारिक)
  • पासंग(कथासंग्रह)
  • बलुतं (आत्मकथन). ’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.
  • बीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)
  • विटाळ (वैचारिक)

पुरस्कार

संपादन
  • पद्मश्री
  • बलुतं’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा पुरस्कार (१९७९)

दया पवारांवरील मराठी पुस्तके

संपादन
  • दया पवार यांच्या साहित्याचा अभ्यास (भास्कर खांडगे)

दया पवारांवरील संशोधन

संपादन
  • दया पवार यांचे समग्र साहित्य(एक अभ्यास)(प्रभंजन चव्हाण)