मराठीमाती डॉट कॉम
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
मराठीमाती डॉट कॉम (marathimati.com) हे एक मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे. दिनांक २७ सप्टेंबर २००२ पासून हे संकेतस्थळ कार्यरत आहे माझ्या मातीचे गायन हे या संकेतस्थळाचे नोंदणीकृत ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती तसेच पर्यटन स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून हर्षद खंदारे हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.
मराठीमाती डॉट कॉम चे बोधचिन्ह | |
ब्रीदवाक्य | माझ्या मातीचे गायन |
---|---|
प्रकार | संकेतस्थळ |
उद्योग क्षेत्र | अंतरजाल (इंटरनेट) |
स्थापना | २७ सप्टेंबर २००२ |
संस्थापक | हर्षद खंदारे |
मुख्यालय | १ |
कार्यालयांची संख्या | २ |
महत्त्वाच्या व्यक्ती | हर्षद खंदारे (संस्थापक, मुख्य संपादक), स्वाती खंदारे (सह संपादिका) |
सेवा | माहिती, बातम्या, मुक्त व्यासपीठ, मराठी टंक, दिनदर्शिका, शुभेच्छापत्रे, छायाचित्रे, ज्योतिष, बाळाची नावे |
मालक | हर्षद खंदारे |
पालक कंपनी | ओनवे मीडियाटेक |
संकेतस्थळ | marathimati.com |
मराठीमाती डॉट कॉम या संकेतस्थळाला दिनांक १ जानेवारी २००५ ते १ ऑक्टोबर २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून[१] तर ७८२२ शहरांतून[२] भेट दिली गेली..
मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती
दिनांक १ जुलै इ.स. २०१३ पासून मराठीमाती डॉट कॉमची नवीन आवृत्ती संकेतस्थळ वाचकांसाठी खुली करण्यात आली आहे याच पत्त्यावर उपलब्ध आहे. सभासद नोंदणी करून स्वतःचे अथवा संग्रहित लिखाण प्रकाशित करण्याची सोय यात आहे. डेस्कटॉप, लॅपटॉपसह आता हे संकेतस्थळ मोबाईल, टॅब या सारख्या आधुनिक उपकरणांवरदेखील बघितले जाऊ शकणार आहे, हे या नूतन आवृत्तीचे मुख्य आकर्षण आहे.
बाह्य दुवे
- मराठीमाती डॉट कॉम - मराठीमाती डॉट कॉम अधिकृत संकेतस्थळ
- मराठीमातीचे अॅन्ड्रॉइड अॅप - मराठीमाती डॉट कॉमचे अधिकृत अॅन्ड्रॉइड अॅप