मंदाकिनी गोगटे
मंदाकिनी कमलाकर गोगटे (जन्म : मुंबई, १६ मे १९३६; - मुंबई, १५ जानेवारी २०१०)[१] या मराठी लेखिका होत्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या.
मंदाकिनी गोगटे | |
---|---|
जन्म नाव | मंदाकिनी कमलाकर गोगटे |
जन्म |
१६ मे १९३६ मुंबई, महाराष्ट्र |
मृत्यू |
१५ जानेवारी २०१० मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | मराठी, भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
पती | कमलाकर ना. गोगटे |
अपत्ये | तीन मुली; त्यांतली एक रेखा (सौ. अनघा हुन्नूरकर) |
जीवन
संपादनमंदाकिनी गोगट्यांचा जन्म मे १६, इ.स. १९३६ रोजी ब्रिटिश भारतातील तत्कालीन मुंबई इलाख्यात मुंबई येथे झाला. त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले[१]. त्यापूर्वी त्यांनी चित्रकला शिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यांच्या लघुकथा प्रथम सत्यकथा मासिकातून प्रसिद्ध झाल्या. पुढील काळात त्यांनी प्रामुख्याने विनोदी कथा व बालसाहित्य लिहिले.
जानेवारी १५, इ.स. २०१० रोजी मुंबईत कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
मंदाकिनी गोगटे यांचे प्रकाशित कथासंग्रह
संपादन- गंध मातीचा
- ढळता दिवस
- प्रेमाच्या होड्या
- बायकांचं गणित
- मुंबईच्या रंगीबेरंगी मुली
- सवत माझी लाडकी (कथेवर आधारित त्याच नावाचा चित्रपट आहे.)
- स्वप्नातली परी
कादंबऱ्या
संपादन- दीपाली
- गाणारं घर (अप्रकाशित)
- गार्गी
- भैरवी
- मोठी वेगळी पाऊलवाट
- रसिक बलमा
- ह्या कातर उत्तररात्री
प्रवासवर्णनपर पुस्तके
संपादन- आमचीपण सिंदबादची सफर
- त्या फुलांच्या सुंदर प्रदेशात
बालसाहित्य व इतर
संपादन- चिमाजीअप्पाची मिशी (निबंधमाला)
- छानदार कथा भाग १ व २
- जांबो जांबो ग्वाना
- प्रेमा पुरव : क्रांतिकारी अन्नपूर्णा (चरित्रकथा)
- बागेश्री दिवाळी अंक (संपादन व प्रकाशन)
- बोले तैशी चाले (एकांकिका)
- महंमद घोरीची सांगली (विज्ञानकथा)
- सर्पांची अजब दुनिया
पुरस्कार
संपादन- आचार्य अत्रे पुरस्कार
संदर्भ
संपादन- ^ a b "ज्येष्ठ लेखिका मंदाकिनी गोगटे यांचे निधन". २७ ऑक्टोबर, इ.स. २०१० रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
संपादन- "कथालेखिका मंदाकिनी गोगटे यांचे निधन". २६ फेब्रुवारी २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ ऑक्टोबर, इ.स. २०१० रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |