सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २१

सहमती हवी

संपादन
Wikipedia Meetups करिता इंग्रजी विकिपीडियात सध्या "विकिपीडिया मिलन" असा शब्दप्रयोग केला आहे. मराठी विकिपीडियात सध्या विकिभेट असा शब्द प्रयोग आहे. सर्वांना अधीक सुगम आणि सुलभ शब्द प्रयोग कोणता वाटतो ते लवकरात लवकर नमुद करा कारण संबधीत पानांच्या शीर्षके लवकरात लवकर बनवणे जरूरी आहे माहितगार ०८:४३, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

छायाचित्र दिसत नाही सहाय्य हवे

संपादन

Photo:Shaniwarwada, पुणे

नमस्कार, विकिपीडिया:विकिभेट/पुणे/निमंत्रण पानात छायाचित्र दिसत नाही आहे. इंग्रजी विकिपीडीयावरील पानात दिसते आहे पण मराठी विकिपीडियावरील पानात दिसत नाही आहे. काही सहाय्य देऊ शकल्यास पहावे हि विनंती माहितगार १०:५७, १४ सप्टेंबर २०१० (UTC)
होय, मै हि हू डॉन ने चित्र दिसण्यात मदत केली,आपण सुचवल्याप्रमाणे विद्यापिठ चित्र वापरले. सुचने करिता धन्यवादमाहितगार १४:५०, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

प्राधान्याने शुद्धलेखन चिकित्सेत सहाय्य हवे

संपादन
विकिपीडिया:विकिभेट/निमंत्रण हे पान मुख्यत्वे विकिपीडियेतर संकेतस्थळावरून/इमेललिस्ट/फेसबुक पाठवण्याचा मानस आहे. प्राधान्याने शुद्धलेखन चिकित्सेत सहाय्य हवे आहे.माहितगार १६:०१, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

वर्ग : विस्तार विनंती

संपादन

सध्या मराठी विकिवरील लेखांची संख्या ३०,८२५ आहे व वर्ग:विस्तार विनंती मधील लेखांची संख्या १३,२४२ आहे म्हणजे जवळजवळ ४०%. सध्या वर्गातील लेखांना वर्गीकरणाची गरज आहे. सांगकाम्या रिकाम्या हे काम फार उत्तम रितीने तसेच जलद करत आहे. मी माझ्या समजुतीनुसार काही बदल रिकाम्या कडून करून घेतले आहेत. परंतु ह्या वर्गात असणार्‍या लेखांना वर्गीक्रुत करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज आहे. ह्याचा उपयोग जर पहायचा असेलतर दालन:क्रीडा मधील तुम्ही काय करू शकता हे सदर पहावे, इथे इच्छुक सदस्याला आपण एकाच ठीकाणी विस्तारण्या जोग्या लेखांबद्दल माहिती देउ शकतो. अश्या प्रकारे आपण ह्या वर्गीकरणाचा फायदा करून घेउ शकतो.

ह्या साठी सर्वांच्या आक्रमक सहभागाची गरज दिसते आहे

Maihudon ०६:३५, १५ सप्टेंबर २०१० (UTC)

  • कौल घेउन जवळपास १ महिना झाला. प्रबंधकपदाचे काय झाले?

वि. नरसीकर (चर्चा) १५:४१, २१ सप्टेंबर २०१० (UTC)

आपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.असाच लोभ कायम ठेवा ही विनंती. ता. क. नवीन कळी बघत असतांना काही तृटी घडल्या आहेत. पूर्ववत कराव्यात ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०३:१३, २४ सप्टेंबर २०१० (UTC)

आपण सर्वांनी निवडुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

Maihudon ०७:४४, २६ सप्टेंबर २०१० (UTC)

30 ऑक्टोबर रोजीची मुंबईतील जिमी वेल्स यांची भेट

संपादन

जिमी वेल्स यांच्याबरोबर झालेल्या तुमच्या मुलाखत/चर्चेवरुन मला असे कळले की जिमी वेल्स हे मुंबईमधे 30 ऑक्टोबरला येणार आहेत. ते खरच येणार असले तर आम्हाला त्यांना मराठी विकीपीडीयासाठी भेटायला आवडेल. आता मी आम्हाला म्ह्टल्यावर आम्ही कोण हे सांगणे आलेच. आम्ही "मराठी अभ्यास केंद्र" या नावाच्या ठाणे येथील अशासकीय संस्थेचे सभासद आहोत. आमची भूमिका आणि इतर माहिती http://marathivikas.org/sub_main.php?SubCid=1 येथे आहे.(संकेत स्थळ अजून प्रायोगिक स्तरावर आहे) अधीक माहिती अधिक परीचयात होईलच.

आपला, नितीन निमकर

नव्या एक्स्टेन्शनांच्या स्थापनांसाठी कौल

संपादन

मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी आणि विस्तार-सिद्धतेसाठी काही नव्या मीडियाविकी एक्स्टेन्शनांची स्थापना (इन्स्टॉलेशन) करण्याचा प्रस्ताव मी विकिपीडिया:कौल#नव्या एक्स्टेन्शनांची स्थापना येथे मांडला आहे. आपण आपला प्रस्तावागणिक कौल त्याच पानावर द्यावा, अशी सादर विनंती!

धन्यवाद.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:३६, ६ नोव्हेंबर २०१० (UTC)

बॉट-अधिमान्यता

संपादन

नमस्कार!

तुम्ही सुचवल्याप्रमाणे सदस्य:सांगकाम्या संकल्प हे सांगकाम्यासाठी सदस्यखाते बनवले आहे. कृपया त्याला सदस्य-गट व्यवस्थापनाच्या तुमच्याकडील विशेषाधिकारांतर्गत बॉट म्हणून अधिमान्यता द्यावी.

--सांगकाम्या संकल्प १४:०२, ७ नोव्हेंबर २०१० (UTC)

Would you please have a look at विकिपीडिया:Bot. - Foxie001 १७:४२, ७ नोव्हेंबर २०१० (UTC)

Thanks for granting me a botflag but I would rather have one for my bot FoxBot. Foxie001 १५:५३, १४ नोव्हेंबर २०१० (UTC)

Disambiguation

संपादन

नमस्कार अभय,

मला इम्तियाझ अहमद हा नवा लेख लिहायचा आहे.ते ४ थ्या लोकसभेचे सदस्य होते.पण इम्तियाझ अहमद नावाचा पाकिस्तानच्या क्रिकेटपटूविषयी लेख आधीच आहे.तेव्हा मला त्या नावाचे disambiguation करायचे आहे.ते कसे करावे?

संभाजीराजे १३:२२, १६ नोव्हेंबर २०१० (UTC)

संभाव्य भेट

संपादन

नमस्कार!

मी गेल्या वीकेंडाला पुण्यात आलो. येत्या रविवार ते मंगळवारादरम्यानचा काळ वगळता एखाद्या दिवशी भेटता येईल. तसा माझा इथला मुक्काम १५ डिसेंबरापर्यंत आहे. तुम्ही पुण्यात कधीपर्यंत आहात आणि कुठल्या दिवशी भेटणे सोयीस्कर पडेल ते कळवा. माझा जीमेल आयडी तुम्हाला ठाऊक असल्याचे आठवते. त्यावर तुम्ही तुमचा पुण्यातला संपर्काचा फोन/मोबाइल नंबर दिला, तर आपण बोलून भेट ठरवू शकू.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०९, २९ नोव्हेंबर २०१० (UTC)

संभाव्य भेट

संपादन

मी तसा पुण्यातच असतो , पण सध्या कामाच्या व्यापामुळे भटकंती सुरू आहे. तरी जर मी १३ डिसेंबर पर्यंत पुण्यात येउ शकलोतर आपली भेट नक्कीच घेईन.

Maihudon ०४:२०, १ डिसेंबर २०१० (UTC)

सुट्टी एंजॉय करा

संपादन

महाराज सुट्टी एंजॉय करा एक मिटींग करता वेळ दिलात.मीत्रांना आणि घरी वेळ द्या बाकी विकिलेखन वापस गल्यानंतर केलेत तरी जमते .माहितगार ०५:४२, ३० नोव्हेंबर २०१० (UTC)

मत हवे

संपादन

नमस्कार अभय, क्रुपया साचा चर्चा:Navbox येथील माझा संदेश बघावे, व आपले मत कळवावे. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०४:४३, २ डिसेंबर २०१० (UTC)

नमस्कार अभय, क्रुपया साचा चर्चा:Navbox मधील माझ्या संदेशाला आपले मत कळवावे. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!)

Hello, can you please take a look to my Bot flag request on your local bot request page? My bot is now flagged on 100+ wikis, and have done enough edits to get the flag here. Appreciating your help in advance. Thanks! — Tanvir • १५:२८, १९ डिसेंबर २०१० (UTC)

Any response to my query please? Thanks. — Tanvir • ०५:२२, २२ डिसेंबर २०१० (UTC)

माफक बंधने

संपादन

गुन्ह्यास प्रोत्साहन हा लेख अभिव्यक्तिस्वातंत्र्य#माफक बंधने च्या शृंखलेतील कायदे विषयक लेख खासकरून सर्वोच्च न्यायालयाचे अभिप्राय आणि निकाल यांच्या संदर्भाने या विशीष्ट बंधन प्रकारांचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने अभिप्रेत होता.कायदे विषयक विशेषत: घटनेतील तरतुदीतील प्रत्येक शब्दावर बराच किस पडतो त्यामुळे विश्वकोशीय लेख बनुशकती एवढा मजकुर सहज उपलब्ध होणार, अभिव्यक्तिस्वातंत्र्य शृंखलेतील लेख मी पुढे लिहिणार निश्चीत आहे पण लगेचही होईल असे नाही त्यामुळे लेखपान वगळले गेल्यास तशी सध्या हरकत नाही.

पण उल्लेखनीयतेच्या संदर्भाने वगळावयावचे लेख मराठी विकिपीडियावर आपण सहसा तातडीनेच वगळतो, पण इंग्रजी विकिपीडिया प्रमाणे सहसा उल्लेखनीयतेच्या चर्चा झालेली बरी पण उल्लेखनीयचेच्या संदर्भाने आपल्या कडे अजून चर्च्हेत सहभाग येत नाही आहे तो येणे जरूरी आहे.खासकरून पाश्चिमात्य संस्कृतीशी तुलना करता आपल्याकडे विवीध गोष्टींची लिखीत नोंदकरून ठेवण्याची विशेष परंपरा नाही. जसे संगीत घराण्यातील एखादा मोठा चांगली कारकिर्द झालेला गायक असेल पण त्याची संदर्भ देण्या इतपत दखल कुठे घेतली गेली असेलच असे नाही , त्या गायका विषयी कुणी व्यक्तीगत पण जेनुआईन माहितीच्या आधारावर लिहिले तर केवळ पडताळण्या जोगा संदर्भ नाही म्हणून घाईने असा मजकुर वगळावा का ?


खासकरून ग्रामिण भागातून येणार्‍या मजकुरा बद्दल नेमके स्विकार्ह काय आणि अस्विकार्ह काय हे कसे ठरवणार कालच्याच एडीट्स मध्ये किन्हवली तालूक्यातील एका पाड्यावरील सेवा संस्थेची माहिती कुणी भरली आहे , आपल्याकडे दोन्ही शक्यता आहेत कि माहिती अगदी जेनुआईन असू शकते किंवा पदरी काही पाडून घेण्याच्या दृष्टीने विश्वासार्ह वाटावे म्हणून भरली जाऊ शकते . संस्था माहिती संदर्भात समजा आपण अधीक कडक राहू पण त्याच लेखात उल्लेख केलेला लहानसा गुंड्याच्या पाड्यातील शेती हवामान लोकांची बोली इत्यादी माहिती कुणी भरली तर अशा मजकुराला नेमका काय न्याय द्यावयाचा .


मला वाटते इंग्रजी विकिपीडियाच्या मानाने भारती भाषी विकिंनी अधीक फ्लेक्सईबल असावे पण तरी प्रश्न राहतोच कि किती आणि नेमके उजवे डावे कसे करावे माहितगार ०१:१६, ३१ डिसेंबर २०१० (UTC)


एनीवे मी वर म्हटल्य प्रमाणे लगेच बनवत नाही आहे त्यामुळे लगेच काही रिस्टोअर करत नाही, तसेही आधी धूळपाटीवर बनवायला लागेल असे दिसते. माहितगार ०५:४५, ३१ डिसेंबर २०१० (UTC)

नववर्षाभिनंदन

संपादन

* हॅप्पी न्यु इयर २०११* नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !*

प्रसन्नकुमार १४:३९, ३१ डिसेंबर २०१० (UTC)

सहाय्य हवे

संपादन
कॉमन्सवर येथे प्राधिकार विषयक एका साचाचे वरून मराठी अनुवादाचे काम नुकतेच पार पाडले.अनुवादीत मजकुरात काही त्रूटी आहेत त्यात सुधारणा आणि सु(विकि)संस्कार करण्याच्या दृष्टीने आपले सहकार्य हवे आहे. हा साचा अद्याप मराठी विकिपीडियात अनुवादीत स्थितीत बहूधा उपलब्ध नसावा त्यामुळे तो मराठी विकिपीडिया(विकिबुक्स) मध्येही आयात करता येईल. माहितगार ०१:३१, ८ जानेवारी २०११ (UTC)
थॅंक्यू सर, व्हेरी नाईस ऑफ यू माहितगार ०५:४७, ८ जानेवारी २०११ (UTC)

सांगकाम्या

संपादन

नमस्कार!

बरोबर. चुकून सांगकाम्या चालवताना सदस्यचर्चा पाने वगळायची काही वेळा राहिली असण्याचा संभव आहे. सदस्य:सांगकाम्या संकल्प सांगकाम्याने केलेले अलीकडील बदल तपासून बघेन व यापुढे फिल्टर लावायचे ध्यानात ठेवेन.

सूचनेबद्दल धन्यवाद.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:४३, १४ जानेवारी २०११ (UTC)

ताफा किंवा तांडा

संपादन

नमस्कार!

आरमारविषयक काही लेखांमध्ये 'जहाजांचा/युद्धनौकांचा तांडा' असे उल्लेख वाचले. याविषयी माझ्या मनात अशी शंका उद्भवली, की जहाजांच्या समूहाला 'ताफा' म्हणतात की तांडा? माझ्या वाचनात 'ताफा' अधिक प्रमाणात आल्याचे स्मरते. परंतु त्याच वेळेस आरमारात/ कोळी-मच्छीमारांमध्ये 'तांडेल्' असा हुद्दा असतो, असेही स्मरते... ज्याचा संबंध कदाचित 'तांडा' या शब्दाशी असू शकतो. माझ्याकडे तूर्तास याविषयी संदर्भ शोधायला पुरेशी पुस्तके, साधने नाहीत. तुम्हांला याविषयी अधिक शोध घेऊन नेमका शब्द काय असावा, ते हुडकता येईल काय?

बाकी, कॉरल समुद्र याचेही नाव तसेच ठेवणे योग्य, की 'प्रवाळ समुद्र' असे मराठीकरण करून केलेले बरे (जसे मृत समुद्र, तांबडा समुद्र, पीत समुद्र, मोती नदी इत्यादी).?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:२७, १६ जानेवारी २०११ (UTC)

भीमराव रामजी आंबेडकर

संपादन

नमस्कार!

भीमराव रामजी आंबेडकर लेखातील संपादनयुद्ध व्यवस्थित पद्धतीने हाताळल्याबद्दल धन्यवाद! त्या दिवशीचे बदल पाहिल्यावर तू दाखवलेली सबुरी व घेतलेली भूमिका रास्तच होती. कालदेखील संभाजी ब्रिगेड लेखात घडलेल्या एकांगी दृष्टिकोनयुक्त लिखाणामुळे तू आणि माहीतगारांनी दाखवलेल्या सजगतेची आवश्यकता अधोरेखित झाली.

सध्या मराठी विकिपीडियावर विकिपीडियाविषयक माहिती (साचा :विकिपीडिया) असलेले लेख घडवण्याचा एक उपक्रम हाती घेतला आहे. मराठी विकिपीडिया हा लेख म्हणूनच बनवला आहे. त्यात तू कदाचित ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची माहिती भरू शकशील. इ.स. २००३ साली १ मे रोजी मराठी विकिपीडियाची स्थापना झाली, असे विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिकेच्या सप्टेंबर, इ.स. २०१०च्या अंकात नोंदवले आहे... त्यानुसार मी पहिला लेख/ पहिली काही संपादने शोधायचा प्रयत्न करतोय; पण अजून काही हाती गवसले नाही.

असो. बाकी सर्व ठीक. साचा:सदस्य सिंगापूर वगैरेसारखे हलकेफुलके आणि कूल सदस्य साचे बनवायचाही मनसुबा आहे.. जेणेकरून आपल्याकडच्या सदस्यांना इथले वातावरण खेळकर वाटेल. तूही अमेरिकेविषयी/अन्य कशासाठीतरी सदस्य साचे बनवून दे की.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१४, २५ जानेवारी २०११ (UTC)

username upsurtion

संपादन

Hi, i am mayur a hindi wikipedian, can you please vacate a user name Mayur by renaming this to Mayur1 and Mayurbot to Mayur so as to have a global account for me, this user is not active since a long time and since i have already claimed Mayur named account in nearly all wikimedia project, Thanks in advance--Mayurbot १७:०५, २६ जानेवारी २०११ (UTC)

Hello,
Thanks for your interest in Marathi wikipedia. We do not rename a user unless there's a compelling reason. The reasons you have provided (user being inactive and you having "claimed" a username in many wikimedia projects) do not sound compelling to me. Also, your name (Mayrbot) sort of implies that you are (or wish to be), a bot of some sort. If that's the case, I'd encourage you to keep using Mayurbot.
Is there a specific problem you will face by using Mayur1 yourself? If so, let me know and we can work to resolve it.
Thanks again for your edits on w:mr.
अभय नातू १७:११, २६ जानेवारी २०११ (UTC)
Thank you for reply, You are not understanding the main problem that I have two account one is Mayur and another is mayurbot.I have "mayur" account on all wikimedia projects except some five projects including yours.I have already requested to english wikipedia to change my user name (see here and they accpted my request.This is because of global account claim.I have already registerd global account with name "mayur" so will have to change the remaing projects users name.Mayur bot is my bot account that i usese in hindi wiki, i have the complete global account for Mayurbot but not for Mayur which is my main account.I hope you will have understood the problem--Mayurbot ०५:२८, २७ जानेवारी २०११ (UTC)
Contrary to your assertion, w:en has not yet granted your request. I will wait for their research and decision before moving forward on w:mr.
अभय नातू १५:५१, ३१ जानेवारी २०११ (UTC)

नमस्कार

संपादन

कोराडीस ६६० मे.वॅ. प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे त्यामुळे प्रचंड व्यस्तता आहे.येथे हवा तसा वेळ देता येत नाही. तरीपण अधुनमधुन जमेल तसे वेळ काढतच असतो.ख्यालीखुशाली विचारल्याबद्दल मनःपुर्वक आभार.

वि. नरसीकर (चर्चा) १४:०६, २८ जानेवारी २०११ (UTC)

रेगेक्स-टायपो-फिक्स व ऑटोविकीब्राउझर

संपादन

नमस्कार!

ऑटोविकीब्राउझराच्या रेगेक्स-टायपो-फिक्स (इंग्लिश: RegExTypoFix ;) या अवजाराने शुद्धलेखनातील नेहमी घडणार्‍या चुका परिणामकारक रित्या व कमी वेळात दुरुस्त करता येतात. या अवजाराचा वापर करून सदस्य:सांगकाम्या संकल्प सध्या छोट्या प्रमाणात दुरुस्त्या करून पाहत आहे. नेहमी घडणार्‍या टायपोंची किंवा चुकांची यादी बनवून त्यातून रेगेक्स वापरून काही पॅटर्न बनवले तर बॉट लावून शुद्धलेखनाचा दर्जा सुधारता येईल. या कामी तुझ्याकडून काही मार्गदर्शन/मदत/सहभाग लाभला, तर बरे होईल ... म्हणून हा संदेश.

जमल्यास या काही दुव्यांवर जाऊन माहिती घेऊन बघ :


धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:४९, २९ जानेवारी २०११ (UTC)

हो .. उदयोन्मुख लेख उद्यापर्यंत बदलतो.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:५४, २ फेब्रुवारी २०११ (UTC)

1 मे, २००३

संपादन

नमस्कार अभय, मलाही सुरूवातीची तारीख नीटशी माहिती नाही आहे. मुखपृष्ठावरील सर्‌वात जुना बदल २० ऑक्टोबर २००३ ला केलेला दिसतो आहे. त्यावेळी बहुधा सदस्य:Hemanshu हे प्रबंधक/प्रचालक होते. त्यांच्याकडून किंवा हर्षलकडूनच बरोबर माहिती मिळेल.

बाकी सध्या जरा कामात व्यस्त आहे त्यामुळे कोणतेही बदल करण्यास वेळ मिळत नाही. पण अधूनमधून चक्कर मारून जातो.

- कोल्हापुरी ०८:५३, ३१ जानेवारी २०११ (UTC)

1 मे, २००३ तारीख मीच मेटावर वाचली , प्रेस रिलीजकरिता असलेल्या कोणत्याशा पानावर हि तारीख बरीच वर्षे होती आणि अगदी अलिकडे पर्यंत होती. मी तो संदर्भ सेव्ह करून ठेवला असता तर बरे झाले अस्ते त्याचा पुन्हा एकदा मेटावरच शोध घ्यावयास लागेल. जूनी संपादने जतनकरण्याची प्रक्रीया नंतर केव्हातरी सुरू झाली असावी त्यामुळे कोल्हापुरी म्हणतात तसे १ मे पर्यंत जाणारे जुन्यात जुने संपादन सापडत नाही.हिमांशु पहिले प्रचालक असले तरी पहिले संपादक नसावेत (असा माझा कयास आहे) हिमांशुच्या पुर्वीची इतर सुबोध वैगैरे इतर काही सदस्यांची आणि बरीच अनामिक संपादने आढळतात असे स्मरते.माहितगार १५:२२, ३१ जानेवारी २०११ (UTC)

पुढे आपल्या कडे

संपादन
चर्चा पानावर तुमचा प्रतिसाद वाचला म्हटले चला, शुभस्य शीघ्रम म्हणून विकिपीडिया:संपादनेथॉन/साईटनोटीस बनवली , यात सुधारणांकरिता आपण समयोचीत हातभार लावला आहे, मला वाटते अजूनही सुधारणांना वाव आहे , आणि निश्चींतपणे(नेहमी प्रमाणे :) उरलेली (शुद्धलेखनादी) जबाबदारीचे ओझे आपल्या खांद्यावर लादून (आजच्या पुरता) पळ काढत आहे !

माहितगार २१:२१, ९ फेब्रुवारी २०११ (UTC)

विचीत्र समस्या!

संपादन

नमस्कार, मी जेव्हा मराठी विकिपीडिया मध्ये प्रवेश करण्यास Login पानावर अथवा मुखपृष्ठा वर जातो तेव्हा माला दुसर्या पानावर पाठवले जाते जेथे हे दिसते "Wikipedia is sustained by people like you. Please donate today." आणि पुढे काही नाही करता येत. कशामुळे होते आहे हे? काही अंदाज?

--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ११:२६, १८ फेब्रुवारी २०११ (UTC)

Hi, the problem seems to be solved, but i am unable to type marathi --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०४:३६, २१ फेब्रुवारी २०११ (UTC)
धन्यवाद अभय, मला आता मराठी मध्ये लिहिता येत आहे. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०४:४६, २१ फेब्रुवारी २०११ (UTC)

मदत हवी!

संपादन

subtype of a road = मराठी मध्ये कसे लिहीणार? दुसरा प्रकार???--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०५:४९, २३ फेब्रुवारी २०११ (UTC)

सेना भवन

संपादन
माझ्या आठवणी प्रमाणे दिल्लीस्थित भारतीय लष्करी दलाचे मुख्यालय किंवा संरक्षण मंत्रालय यापैकी एकाचे परंपरागत नाव "सेना भवन" आहे आणि ते अधीक प्रचलीत ,सुयोग्य सयुक्तीक असावे असे वाटते. त्याचे पुर्ननिर्देशन शिवसेना भवनाकडे करण्याबद्दल मी साशंक आहे. माहितगार ०९:४६, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)
याबाबतीत नि:संदिग्धीकरण पान बनवणे कदाचीत उचीत असेल किंवा कसे माहितगार १०:०३, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)

धन्यवाद

संपादन

नमस्कार, मॅरेथॉनला बोलवल्यावर आम्ही विकिपीडियाच्या लोगोच्या प्रतीमेस लुटूपुटूची प्रदक्षीणा घालून थांबतो,आपण त्या लोगोस खरोखरची प्रदक्षीणा घालत धावत आला आहात , मराठी भाषादिनानिमित्त आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो हि शुभेच्छा, माहितगार १९:११, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

कसेनुसे मुळीच होऊ नका मी माझ्या ओठावरले वाक्य पूर्ण करतो, आपल्याला आपल्या 'विश्व'कोश शर्यतीत सोबतीने धाऊ शकतील असे भरपुर मराठी संपादनपटु भेटोत हि आणखी एक शुभेच्छा!!माहितगार १९:३२, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

संपादनेथॉन विश्लेषण

संपादन

विश्लेषणाबद्दल धन्यवाद! मात्र बहुधा एका बाबीत चूक झाली असावी - संपादनेथॉन ७२ तास, म्हणजे ३ दिवस चालली. त्यामुळे सरासरी दिवसाची आकडेवारी काढताना तिनाने भागायला हवे. म्हणजे प्रतिदिन नवीन लेख = ४८ / ३ = १६, वगैरे. खेरीज पुढील वर्षातील भाकित वर्तवण्याची कल्पना चांगली असली, तरीही हे लक्षात घ्यायला हवे, की संपादनेथॉन सुटीच्या दोन दिवसांमध्ये आयोजल्यामुळे आकडेवारी भरघोस दिसत आहे. वीकडे चालू असताना, बहुसंख्य लोकांचा संपादनदर मर्यादित राहतो. त्यामुळे हा घटक नॉर्मलाइझ करता माझ्या मते पुढील वर्षाचे भाकीत तू सध्या नोंदवलेल्या आकड्यांच्या (५ * ०.२५)+(२ * १.०)/७.० = ४६% पातळीपर्यंत सीमित राहण्याची वास्तवाधारित शक्यता दिसते. तेही नोंदवले, तर लोकांना अधिक वास्तविक अंदाज येईल.

बाकी, ११-११-११ दिनांकाच्या उद्दिष्टाची महत्त्वाकांक्षा तूर्तास सोडावी, अशीच चिन्हे आहेत; कारण तसल्या उद्दिष्टांनी लेखसंख्या वाढली, तरीही दर्जा आणि आशयसंपन्नता वाढायची शक्यताही कल्पनेत बसत नाही.

एकंदरीत संपादनेथॉन अपेक्षेहून काकणभर यशस्वी ठरली, त्याबद्दल अभिनंदन!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४४, १ मार्च २०११ (UTC)

ओके ओके. आरंभबिंदूला तू घेतलेली आकडेवारी २४ तासांतरची होती तर. माझी आधीचा संदेश टाकताना थोडी गफलत झाली.
बाकी, गेल्या २-३ दिवसांत काही ईमेल तुला धाडले आहेत, तू जरूर पाहशील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:२३, २ मार्च २०११ (UTC)

नमस्कार

संपादन

सध्या मोकळा वेळ मिळणे थोडे अवघडच झाले आहे, अजुन २ महिने स्थिती कदाचीत अशीच राहिल. त्यामुळे सध्या विश्वचषक स्पर्धा सोडल्यास इतर गोष्टीसाठी वेळ काढणे थोडे अवघड जात आहे.

संपादनेथॉनची कल्पना खूप चांगली वाटली, तुमचे, संकल्पचे , माहितीगार यांचे अभिनंदन.

Maihudon ०६:५४, ३ मार्च २०११ (UTC)

कॉरल समुद्राच्या लढाईवरील लेखाच्या घडवणुकीबद्दल धन्यवाद!

संपादन

नमस्कार अभय!

कॉरल समुद्राची लढाई या लेखाच्या घडवणुकीसाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद! लेख सकृद्दर्शनीच माहितीपूर्ण आणि रंजक वाटत आहे. :) बाय द वे, तू पुस्तकांमधून/ अन्य मुद्रित माध्यमांमधूनही संदर्भ हुडकून काम केलेस का?

मेटावरून अजूनही अधूनमधून SWMT मंडळींची भरीव मदत चालू आहे ,पण किमान व्यक्तिगत पातळीवर मला त्यांच्या नाक खुपसण्याबाबत आक्षेप आहे हे खरे.अलिकडील आपण वगळलेला लेख राजीव आगाशे मधील वाक्य अख्ख मराठीत होत , ज्या SWMT मराठीचा गंधही नसलेल्या कुणी त्यावर Delete साचा लावला.नंतर अल्पावधीत आपण तो लेख वगळलात.राजीव आगाशे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नसतील पण सक्रीय चित्रकार आहेत हे इंडियन एक्सप्रेसमधील बातमीवरून स्प्ष्ट होत [१] . तरी सुद्धा विश्वकोशीय दखल घ्यावी किंवा नाही माहिती पुरेशी आहे किंवा नाही हे वेगळे मुद्दे आहेत ज्याचा निर्णय मराठी विकिपीडियन्सनी घ्यावयास हवा . मराठीचा गंध नसणार्‍या उपटसुंभांनवर किती अवलंबून रहावयाचे याचा गांभीर्याने विचारकरण्याची गरज आहे असे मला वाटते माहितगार ०१:२९, ७ मार्च २०११ (UTC)

मला वाटतेकी इंडियन एक्सप्रेस मधील माहितीही स्वतंत्र लेखबनवण्या इतपत पुरेशी नाही. त्या मुळे आपण लेख वगळलात हे ठिक.माझा उद्देश SWMT च्या कामाकडे सुयोग्य लक्ष रहावे या दॄष्टीने होता आणि तसे तुमचे लक्ष आहे या बद्द्ल धन्यवाद. पिंपरी-चिंचवड सारख्या लेखातून अथवा पुण्यातील चित्रकला वगैरेसारख्या लेखातून आगाशांच्या रंगेत्रमची दखल घेता येईल.पण असे लेख तयार करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना इतर पर्यायांची कल्पना असतेच असे नाही.हे मार्गदर्शन नवागत संपादकांपर्यंत कसे पोहोचवता येईल हा एक वेगळा प्रश्न आहे.माहितगार ०२:२५, ७ मार्च २०११ (UTC)

धन्यवाद!

संपादन

चौदावे दलाई लामा या लेखात तत्काळ मदत केल्याबद्दल धन्यवाद!

सुप्रभात

संपादन

नमस्कार, सर, 'अग्न्याशय' या लेखाचे शिर्षक बदलुन 'स्वादुपिंड' असे कराल का? (ही फक्त एक विनंती आहे.) लोभ असावा - सदस्‍य: Namskar .

मराठी विकिपेडीयात भर घालण्याच्ही इछा आहे

संपादन

मला मराठी विकिपेडीयात भर घालण्याच्ही इछा आहे. भटकंतीची आवड असल्याने बरीच छायाचित्रे आहेत्. काही शिलालेख वगैरे. कशाप्रकारे मदत करू शकतो ते कळवा.

भारतीय क्षेपणास्त्रे

संपादन

भारतीय क्षेपणास्त्रे किंवा आधुनिक भारतीय शस्त्रे असा साचा बनवूयात का? बनवायचा झाल्यास कसा बनवावा?

(देशानुसार) क्षेपणास्त्रे हा साचा बनवतो आहे. सूचना, सुधारणा कळवणे. निनाद ०४:०९, १८ मार्च २०११ (UTC)
क्षेपणास्त्र माहिती चौकट बनवतांना गंडलो आहे असे दिसते. तो कसा वापरावा यासाठी मदत हवी आहे, करणार का? साचा तयार झाल्यास इतर सर्व देशांची क्षेपणास्त्रे पुढच्या आठवड्यात येथे घेऊन यायचे म्हणतो :) एकदम विकि वॉरझोन!

निनाद १२:३३, १८ मार्च २०११ (UTC)

संपादनाच्या युक्त्या

संपादन

तुमच्याकडे वेगवान संपादनाच्या काही युक्त्या आहेत का?

मंदार कुलकर्णींच्या सदस्यपानावर तुमची पृच्छा वाचली. महाभारताच्या विविध प्रतींमध्ये कौरवांच्या किमान तीन याद्या आहेत. एका यादीत १०१, दुसरीत १०३ तर तिसरीत ४६ नावे आहेत. काही नावे दोनदा आली आहेत तर काही त्याच अर्थाच्या दुसर्‍या शब्दाने दर्शविली आहेत. खरी यादी कोणती ते ठरवणे अशक्यप्राय आहे. ज्या कौरवाने महाभारतात काहीतरी काम कले आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती सहज मिळू शकते.---J १२:५४, १८ मार्च २०११ (UTC)

टॉमाहॉक क्षेपणास्त्र

संपादन

मी Tomahawk (missile) http://en.wikipedia.org/wiki/Tomahawk_%28missile%29 वरील शब्द गुगल ट्रांसलेटर वर टाकुन पाहिले त्याचा निकाल होता - टॉमहॉक (मिसाइल)

टॉमाहॉक क्षेपणास्त्र

संपादन

मी Tomahawk (missile) http://en.wikipedia.org/wiki/Tomahawk_%28missile%29 वरील शब्द गुगल ट्रांसलेटर वर टाकुन पाहिले त्याचा निकाल होता - टॉमहॉक (मिसाइल)

खुलासा करावा

Dr.sachin23 ०२:३०, २१ मार्च २०११ (UTC)

धन्यवाद

संपादन

Dr.sachin23 ०२:४१, २१ मार्च २०११ (UTC)

नमस्कार! मी. बाबा देसाई. (baba.kokan@gmail.com) धामणसे या विषयावर लिहिण्यास सुरवात केली आहे. मला मदत करा- सदर लेखाचे पान पुढे लिहिण्यासाठी सापडत नाही. जे मी जतन केले होते.

मराठी तिथी

संपादन

मी मराठी तिथी वर काम करत होतो आणि मला तेथे वर्ग:ज्येष्ठ महिना आणि वर्ग: आषाढ महिना सापडले. तेथे सगळ्या तिथी पण मिळाल्या

तसेच मला वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव मिळाला आणि त्यात अनेक "सण आणि उत्सव" मिळाले.

यात बरेच साम्य आढळले जसे "आषाढ शुद्ध एकादशी" वर्ग:आषाढ महिना आणि "आषाढी एकादशी" वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव. असे अनेक मिळाले. हे दोन्ही एकत्र होऊ शकतात का... का वेगळे ठेवायचे? का हे दोन्ही वर्ग लेखाच्या खाली लिहायचे?... सदस्य:मंदार कुलकर्णी

सांगकाम्या

संपादन

आपल्याला काही प्रकारच्या सांगकाम्यांची आवश्यकता आहे. (मी हे पूर्वी चावडीवर म्हंटले होते)

  • १. एकदा एखाद्या पानाचा दुवा बनवला असता त्याचे इतर सर्व लेखात दुवे देणारा सांगकाम्या हवा आहे. यावर मराठीमध्ये शब्दांची रूपे बदलतात त्यानुसार सांगकाम्याकडून काम होणे अवघड आहे असा आक्षेप घेतला गेला आहे. परंतु तरीही याचा उपयोग आहेच. उदा. डीएनए असा शब्द किंवा सिग्मंड फ्रॉईड हे नाव सर्वत्र (बहुदा) असेच येईल. व बहुसंख्य ठिकाणी ते दुव्यात बदलले जाऊ शकेल. यामुले विकीकरणाचा वेग उत्तम रित्या वाढेल.
  • २. वर्गिकरण करून देणारा सांगकाम्या हवा आहे. म्हणजे उदा. महाराष्ट्रातील विद्यापीठे या लेखामध्ये अनेक विद्यापीठांची यादी आहे. त्या सर्वांना वर्गिकृत करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठे असा वर्ग देणे आवश्यक आहे. पण त्याच वेळी त्यांना भारतातील विद्यापीठे या वर्गातही आणणे आवश्यक आहे.

वरील दोन्ही कामे काही प्रमाणात सांगकाम्याने करण्यासारखी आहेत. प्रत्येकवेळी लेख संपादनात उघडून हे काम करत बसणे मला वेळखाऊ मठ्ठ वाटते. हा प्रस्ताव मांडण्यासाठी मला मदत कराल काय?

याशिवाय तुम्हाला काही अजून प्रकारच्या वेगवान संपादना:साठी आवश्यकता भासल्या असतील त्याही दिल्यात तर अजून उत्तम!

अ‍ॅ,र्‍य,र्‍ह

संपादन
अलिकडे युनिकोड हा लेख नवीन सदस्य Ashish Gaikwad यांनी अद्दयावत केला. त्यांच्या संपादनांवरून ते या विषयातील जाणते आहेत हे लक्षात येते. त्यांनी अ‍ॅ,र्‍य,र्‍ह चे सध्याचे मराठी विकिपीडियावरील लेखन चुकीचे होत असल्याचे नोंदवले आहे. मला या क्षेत्रातील अधीक ज्ञान नसल्यामुळे नेमका फरक लक्षात आला नाही पण कुणी जाणकार व्यक्ति तसे नोंदवते आहे म्हणजे दखल घेण्याची आवश्यकता आहे असे वाटते माहितगार ०५:४४, ६ एप्रिल २०११ (UTC)
ओ सॉरी, मला वाटले तुम्ही लेख तपासाल असेल, Ashishरावांनी सरळ लेखातच कॉमेंट टाकली आहे.मला वाटते इतर सिसॉप्सपैकी सुद्धा कुणाचे लेखातील बदलांकडे लक्ष गेलेले दिसत नाही. माहितगार १९:०९, ६ एप्रिल २०११ (UTC)

____ नमस्कार , खरेतर हे पान आणि मराठी wiki core team/group मधील सदस्यांना शोधायला माझा खूप वेळ गेला. so according to me अभय नातू and Mahitgar are core team members. i have checked list of admins for marathi ( total 9 ). as mentioned above ॲ | ऱ्ह | ऱ्य these letters and some other issues are there in mr:wiki = मराठी विकिपीडिया . i can help you in these issues, to know about me you can visit

http://aag2011.blogspot.com also http://facebook.com/ashish.gaikwad007 ...

please contact me after 12 मे २०११ कारण १२ तारखेला माझी CETची परीक्ष आहे. Ashish Gaikwad ११:१७, १० मे २०११ (UTC)

स्रोत मजकूर

संपादन

तुम्ही नोंदवलेला विकिस्रोतात हलवण्याचा मुद्दा रास्त असला, तरीही ते विशिष्ट अभंग बर्‍याच मराठी संस्थळांवर उपलब्ध आहेत. त्यासाठी विकिपीडियाच्या मुख्य नामविश्वात स्वतंत्र पान ठेवण्याची गरज नाही; किंबहुना विकिस्रोत उपलब्ध होईपर्यंत बाह्य दुव्यांवर अश्या मुक्तस्रोत साहित्याचे काम आरामात निभावू शकेल, असे माझे मत आहे.

अर्थात अन्य काही सबळ कारण असल्यास, जरूर कळवा. उडवलेले लेख माघारी आणता येतील.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०५, १४ एप्रिल २०११ (UTC)

Hi, could you flag my bot user:MerlIwBot? Your bot policy say that i should contact you if there is not objection at the request. Merlissimo १४:०४, १६ एप्रिल २०११ (UTC)

Thanks. Merlissimo २१:००, १६ एप्रिल २०११ (UTC)

पानात संदर्भ कसे टाकायचे ?

संपादन

पानातील मजकुराला संदर्भ द्यायचा असल्यास तो कसा द्यायचा याचे कृपया मराठीत मार्गदर्शन दिल्यास आभारी राहील.संतोष दहिवळ १७:३०, २० एप्रिल २०११ (UTC)

संदर्भ जोडला

संपादन

जोर्वे या पानाला यशस्विपणे संदर्भ जोडला आहे. कृपया तपासून पहा व ही पध्दत योग्य असल्यास लगेच कळवा.

पुनर्निदेशित पान दिसत नाही

संपादन

मी केदारेश्वर देवालय हे माझे नवीन पान धर्मापुरी या पानाकडे पुनर्निदेशित केले आहे परंतु तिथे ते दिसत नाही. यावर उपाय कळवा. संतोष दहिवळ १९:४९, २१ एप्रिल २०११ (UTC)

प्रतिसाद न आल्याने

संपादन

आपला प्रतिसाद न आल्याने मी पान उलटवले आहे तरी या समस्येवर उपाय सांगावा. संतोष दहिवळ १९:४८, २१ एप्रिल २०११ (UTC)

नमस्कार

संपादन

खूप दिवसांनी लिहितोय, क्षमस्व. पक्षी विषयात भर पडते आहे. मी चढविलेले आवाज ऐकले का? काही सुधारणा हवी का? (कोणाचीही काही प्रतिक्रिया नाही, काम जमले नाही का?). पक्ष्यांचे कुळ या विषयावर लिहावयाचे आहे. एक नवा वर्ग पक्षीकुळ असा बनवावा का? की आणखी काही? मला न सुचल्याने तुम्हाला विचारीत आहे. असे लेख साधारण बुलबुल सारखे व्हावेत. त्याबद्दलही तुमचे मत सांगितल्यास सोयीचे होईल. सर्व पक्ष्यांची मराठी कुळ नावे मला अद्याप सापडलेली नाहीत. gypsypkd (चर्चा) ०६:२९, २२ एप्रिल २०११ (UTC)

शब्द हवा!

संपादन

नमस्कार अभय, तबयेत वगेरे ठीकठाक असेल असी अपेक्षा! तुमची मदत हवी होती. "स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचे Production team" ह्या संदर्भात "Production Team" हा शब्द काय असायला हवा? क्रूपया मदत करावी! तस्दी बद्द्ल क्षमस्व! प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०६:१०, २६ एप्रिल २०११ (UTC)


प्रशांत शिरसाठ यांना  " निर्मिती चमू "असे सुचवावे का ?

राहुल देशमुख १९:१८, ३० एप्रिल २०११ (UTC)

Marathi name for see also

संपादन

what is Marathi name for 'See also '? -- . Shlok talk . ०६:२६, ७ मे २०११ (UTC)

see also = हेही पहा

A move discussion is initiated at the Talk page of en:Narayan Shripad Rajhans, a page I recently moved. Let us know your view on this.-- . Shlok talk . १८:४६, ७ मे २०११ (UTC)

आचारसहिता (विस्तार विरुद्ध दर्जा)

संपादन

नमस्कार,

विपी विस्तार विरुद्ध दर्जा ह्या जुन्याच विवादात मी नपडता, मी स्वतःहावरच काही बंधने, आचारसहिता म्हणून घालून घेण्याचे ठरविले आहे. आपण मला हे सांगावे की किती आशय घनता हे किमान उदिष्ट असावे (आपली आशय घनता २२.०० च्या वर आहे) , तसेच विपी वर सदस्याची आशय घनता कोठे दाखवण्यात येते तेपण सांगावे.

आपण १०० पेक्षा जास्त संपादने केलेल्या सदस्यानसाठी आशय घनता आचारसहिता/जागरूकता अभियान सुरुकरू शकू कदाचित काही सुधारणेची अपेक्षा करायला काय हरकत आहे.

राहुल देशमुख १४:२६, ८ मे २०११ (UTC)

सांगकाम्यांची आवश्यकता आहे.

संपादन

नमस्कार, साचा:साहित्यिक - ला "मराठी लेखक" वर्गातील लेखात दुवे देणारा सांगकाम्या हवा आहे. प्रत्येकवेळी लेख संपादनात उघडून हे काम करत बसणे मला वेळखाऊ वाटते. क्रूपया मदत करावी! . Shlok talk . १५:०३, १० मे २०११ (UTC)

portal page for Marathi Wikipedia

संपादन

hi, on English and also Japani Wikipedia I found page for portals. here is link to it http://en.wikipedia.org/wiki/Portal:Contents/Portals . .


i think Marathi Wikipedia should have page like this. this will enable well arranged browsing experiance for users. . . Ashish Gaikwad ११:२९, ११ मे २०११ (UTC)

नवीन मथळ्याखाली स्थानांतरीत केले

संपादन

एखादे नवीन पान तयार झाल्यानंतर ब-याच वेळा आपणाकडून तेच पान त्याच नावाने नवीन मथळ्याखाली स्थानांतरीत केले अशी स्थानांतराची नोंद आढळते. याच आशयाचे जुने पान नसल्यास अशा स्थानांतराचा उद्देश काय? कि हा आपल्या प्रचालनाचा एक भाग आहे याचा कृपया खुलासा व्हावा. संतोष दहिवळ १७:११, ११ मे २०११ (UTC)

कालमापन साचा अर्धा ध

संपादन

आपण कालमापन साचात पध्दतीत अर्ध्या ध ची दुरुस्ती केली पण तोपर्यंत मी पुराचुंबकिय कालमापन पध्दती हे पान तयार केले तरी आता ते कसे स्थानांतरीत करावे हे सांगा. संतोष दहिवळ १८:४७, ११ मे २०११ (UTC)

मराठी साठी एकही खाते विकसक\विकासक नाही

संपादन
मराठीसाठी ५१ सांगकामे (bots ) , ९ प्रचालक , १ प्रशासक आहे , परंतु एकही खाते विकसक नाही. खाते विकसक म्हणजे काय ? याची माहिती द्यावी.

माझ्या मतानूसार खाते विकसक म्हणजे ती व्यक्ती जी एखादा विषय सांभळते . जसे की : विज्ञान, अभियांत्रिकी, भाषा, इतिहास ईत्यादी. ??? Ashish Gaikwad १५:५३, १२ मे २०११ (UTC)

अ‍ॅपल

संपादन

सांगकाम्या चालवून सर्व अ‍ॅपल वर्ग, साचे, लेख ॲपल खाली स्थानांतरीत करता येईल काय? संतोष दहिवळ ०६:१९, १३ मे २०११ (UTC) आणि Ashish Gaikwad ०६:४६, १३ मे २०११ (UTC)

साचासाठी मार्गदर्शन

संपादन

मी महाराष्ट्रातील पुरातत्वीय उत्खनन झालेल्या ठिकाणांविषयी फक्त पुरातत्वीय माहिती देण्याच्या संकल्पात आहे. त्यासाठी एक साचा बनविण्याचा विचार करतोय की ज्यात ही सर्व ठिकाणे टाकता येतील.

पण प्रश्न असा आहे हि ठिकाणांची नावे साचात कशी टाकावीत?
कारण समजा मी नेवासे या ठिकाणाविषयी फक्त पुरातत्वीय माहिती लिहिणार आहे व मी साचात नेवासे या नावाने ठिकाण टाकले तर या नावाने या शहराविषयीच्या सर्वसामान्य माहितीचा लेख आधीच असणार. हे बहुधा ब-याचश्या ठिकाणांविषयी आपण म्हणू शकतो.
मग नवीन पान तयार करताना उदा.१) नेवासे (अहमदनगर) २) नेवासे उत्खनन असे उदाहरण १ मध्ये ठिकाणाचे नाव व कंसात जिल्ह्याचे नाव व उदाहरण २ मध्ये ठिकाणाचे नाव व सर्वांपुढे उत्खनन अशा पध्दतीने साचात ठिकाणे टाकावीत की आपल्याला यापेक्षा वेगळे काही सुचते याचे मार्गदर्शन करावे. संतोष दहिवळ १६:५०, १३ मे २०११ (UTC)

साम्राज्य साचा

संपादन

आपण साम्राज्ये साच्यात जो बदल केला आहे, विशेषत: इजिप्शियन साम्राज्य, तेथे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. मूळात इजिप्तच्या इतिहासात काही कालखंड आहेत, त्यात Old Kingdom, Middle Kingdom आणि New Kingdom असे भाग पडलेले आहेत. नवे राज्याच्या काळात इजिप्शियन साम्राज्य प्रस्थापित झाले. तथापि ऐतिहासिक (शास्त्रीय) दृष्टीकोनातून त्यास इजिप्शियन साम्राज्य म्हणण्याऐवजी नवे राज्य (New Kingdom) म्हटले जाते... आपण इंग्लिश विकीपेडियावरचे दुवे पाहू शकता. १. नवे राज्य २. साचा - इजिप्तचा इतिहास

Aniruddha22Paranjpye


धन्यवाद. सध्या इजिप्तचे नवे राज्य हे ठीक होईल. पुढे ह्यासंदर्भात आपल्याकडे नवे राज्य ह शब्द सामान्य/रुळेपर्यंत ठेवण्यास हरकत नाही. अनिरुद्ध परांजपे १४:११, १८ मे २०११ (UTC)

बरेच दिवसांनी!

संपादन

सर्व क्षेमकुशल. मध्यंतरी बरेच दिवस बिझी होतो. आता जरा वेळ आहे. चौकशीबद्दल धन्यवाद!!!
अभिजीत साठे २०:३४, १९ मे २०११ (UTC)

वर्ग: 'साहित्य अकादमी पुरस्कार ' वर्गा सारखा "संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते" असा वर्ग करता येईल का ?-- . Shlok talk . ०४:४७, २० मे २०११ (UTC)

माहेर मासिकाचा अंक

संपादन

नमस्कार अभय,

माहेर मासिकाचा अंक या महिन्याच्या आरंभी प्रकाशित झाला आहे. माझ्याकडेही त्याची प्रत अजून पोचली नाहीय. त्यात प्रकाशित झालेल्या लेखाची स्कॅन केलेली प्रत तुम्हांला किंवा अन्य आप्तेष्टांना ऑनलाइन पाठवायला एक महत्त्वाची मर्यादा अशी आहे, की हा अंक ताज्या खपात असल्यामुळे प्रताधिकाराचा मुद्दा संवेदनशील ठरतो. त्यासाठी मला मासिकाच्या ऑफिसात चौकशी करून स्कॅन प्रत बनवण्याची शक्यता पडताळून बघावी लागेल.

औपचारिक सोपस्कारांची सोय झाली, की तुला कळवतोच.

बाकी, विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिकेबद्दल माहिती गोळा करण्यासंबंधी चावडीवर आवाहन केले आहे. त्यात तुझ्याकडूनही वार्तांकन लाभल्यास उत्तम!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३१, २० मे २०११ (UTC)

मी , माझा

संपादन

अभय, मी, माझा हे माझ्या लक्षात आले.... धन्यवाद.... माझ्या मेल ला सवडीने उत्तर देशील... मंदार कुलकर्णी १९:३३, २८ मे २०११ (UTC)

You are You are Invited for discussion at Category talk:Politicians arrested and charges with corruption-- . Shlok talk . २०:०८, १ जून २०११ (UTC)

विकीकोट्स वरील 'व्यक्‍ती आणि वल्ली‎'

संपादन

नमस्कार अभय,

इतक्यात मी विकीकोट्स वर थोडेसे काम केले. तेथे 'व्यक्‍ती आणि वल्ली‎' अशा तर्हेचा प्रकल्प आहे. मला त्याचा नेमका उद्देश समजलेला नाही. थोडक्यात अशा तर्हेचे काम मराठी विपी वर एक वर्ग तयार करून करता आले असते. आता ह्या प्रकल्पा आतार्गत तयार होत असलेले लेख हे विपी वरील लेखाची पुनरावृत्तीच होईल / होते आहे. तरी आपण नेमके उद्दिष्ट सांगितले तर त्या दृष्टीकोनातून काम करणे सोपे होईल.

धन्यवाद

राहुल देशमुख १६:१९, २ जून २०११ (UTC)

खाते एकत्रीकरण

संपादन
बरीच मंडळी इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषातून खाते उघडतात , नंतर बर्‍याचदा खाते एकत्रीकरणाबद्दल पृच्छाकरतात , सध्या मदत केंद्रावरही तत्सम पृच्छा दिसते आहे.
खाते एकत्रीकरणाबद्दल नेमकी विनंती प्रक्रीया कशी असावी , ती नेमकी कुणाकडे करावी तसेच प्रशासक या नात्याने तुमच्याकडे अशी विनंती आल्यास खाते एकत्रीकरणाचा अधिकार सध्या तुमच्या कक्षेत उपलब्ध आहे का या बद्दल मार्गदर्शन हवे.
उदाहरणार्थ सदस्य:अभिजीत साठे त्यांच्या एका खात्याचे दुसर्‍या खात्यावरील चर्चा पानाकडे पुर्ननिर्देशन आहे.यांची संपादन संख्या मोठी आहे कुणास त्यांच्याशी संपर्क करावयचा झाल्यास एकत्रीकरण न झालेल्या खात्या मुळे नवीन संदेश आल्याची सूचना त्यांना दिसेलच असे खात्रीने सांगता येत नाही.
संवाद सुलभ रहावा म्हणून खाते एकत्रीकरणाबद्दल माहितीची गरज आहे असे वाटते माहितगार ०६:०२, ३ जून २०११ (UTC)


मराठी संस्करणाची योजना

संपादन

नमस्कार अभय,

विकिवर्सिटी ह्या सहप्रकल्पा साठी मराठी डोमेन मिळवण्याचे प्रयत्न कुठे पर्यंत आले आहेत. ह्या प्रकल्पाच्या मराठी संस्करणाची योजना कशी काय आहे, याबद्दल काही माहिती मिळू शकेल काय?

राहुल देशमुख १७:४८, १३ जून २०११ (UTC)


त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद ..!

मराठी विकिव्हर्सिटी प्रकल्पावर काही काम करावे का ? ते (विपी) म्हणतात की १० सदस्य काम करण्यास इच्छुक असतील तर डोमेन मागता येतो. इतरही सहप्रकल्प बाल्यावस्थेत असतांना नवीन काम सुरु करावे का ? पण सुरवात केली नाही तर विकास अजून लांबेल व काळानरूप प्रत्येक प्रकल्पाला आप आपला चाहता वर्ग मिळेलच. तेव्हा ह्या विषयावर चावडीत चर्चा करावी किंवा कसे ? मराठी विकिव्हर्सिटी हा सहप्रकल्प सुरु व्हावा ह्यासाठी काय प्रयत्न करायचे ते सुचवावे.

राहुल देशमुख १३:०३, १४ जून २०११ (UTC)

२ अकाउंट्स

संपादन

अभय,

सदस्य चर्चा:अभिजीत साठेसदस्य चर्चा:Abhijitsathe ही दोन पाने एकत्रित करता येतील काय?
अभिजीत साठे १३:०८, १६ जून २०११ (UTC)

Bot flag request for CocuBot

संपादन

Hi! Could you please take a look at my bot flag request? Thanks in advance! --Cocu १२:४३, २३ जून २०११ (UTC)

पानकाढा साचे व मोडकी पुनर्निर्देशने

संपादन

हो. ते लक्षात आल्यामुळेच काही अतिशयक ढोबळ चुका असलेले लेख उडवले आहेत. बाकी गोष्टी चाळणी लावून आणि तत्सम शीर्षके उपलब्ध आहेत का, ते तपासून मग उडवावे लागतील.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१६, २४ जून २०११ (UTC)

  • पावसाळा सुरु झाला असल्यामुळे साईटवरच्या कामांना मर्यादा आली आहे.थोडा वेळ मिळ्त आहे.

वि. नरसीकर (चर्चा) १३:०६, २५ जून २०११ (UTC)

खाते एकत्रीकरण

संपादन
मला माझ्या दोन खाती - सदस्य:Aniruddha Paranjpye आणि सदस्य:Aniruddha22Paranjpye एकत्र करायची आहेत.

पैकी पहिले खाते ४-५ वर्षांपूर्वी उघडले होते त्यावेळी एकाच खात्यातून विकि सहप्रकल्पांवर प्रवेश करण्याची सोय नव्हती. मध्ये मी त्याच खात्यावर ३ वर्ष काम करीत नव्हतो. कालांतराने इंग्लिश विकिपीडियावरील पहिल्या खात्याचा परवलीचा शब्द विसरलो. आणि संबंधित मेल-आयडीही आठवत नाही, बहुधा मी योग्य मेल आयडी टाकला नसेन. त्यामुळे अलीकडेच, जानेवारीत इंग्लिश विकिवर नवे खाते उघडल्यावर ते वैश्विक प्रवेश सुविधेखाली मराठी विकीवर नवे खाते तयार झाले आणि तेव्हापासूनच मी ह्या नव्या खात्याचाच वापर करतोय. आता मला असे दोन खाते एकत्रीकरणाची सोय असल्यास एकत्र करून हवे परंतु त्याचा परिणाम इतर सहप्रकल्पावरील खात्यांवर होणार नाही ना, तेथील इतर खातीपण एकत्र ओईल का ह्याबद्दल माहिती हवी.

अनिरुद्ध परांजपे १३:४४, २६ जून २०११ (UTC)
ह्यावर आपले उत्तर लवकरात लवकर आले तर बरे होईल.
अनिरुद्ध परांजपे १६:१९, २८ जून २०११ (UTC)
वैश्विक खात्यात नक्की काय बदल होतील? आणि मला इतर सहप्रकल्पातील खाती संबंधीत सहप्रकल्पात एकत्र करण्याबाबत सांगावे लागेल का? आणि दुसरी बाब म्हणजे खाती एकत्रीकरणानंतर ती कोणत्या नावे कायम राहील की तिला नवीन नाव देता येते?
अनिरुद्ध परांजपे १३:५२, ३० जून २०११ (UTC)

प्रग्याण ओझा

संपादन

नमस्कार अभय,

प्रग्याण ओझाच्या नावाच्या बाबतीत थोडा गोंधळ झाल्यासारखा वाटतो आहे. सध्या ह्या लेखाचे multiple redirects झालेले आहेत. प्रग्याण ओझाला जोडलेली पाने. तुमचे मत कळवावे.

Maihudon ०४:२५, २८ जून २०११ (UTC)


लोकाश्रय

संपादन

नमस्कार अभय,

आपण सुचवल्या प्रमाणे चावडी (ध्येय आणि धोरणे) साठी काही मुलभूत चर्चा चावडीवर झालेली आहे. ह्या चावडीचा थेट प्रभाव हा विपीच्या भविष्यातील कार्यप्रणीलीवर पडणार असल्याचे संकेत आपण दिले असल्याने ह्या व्यासपीठाची निर्मिती आम सहमतीने, गरजेपोटी, विचारविनिमयातून लोकशाही पद्धतीने झाल्यास त्यास लोकाश्रय लाभेल असे वाटते. चावडी निर्मिती बाबत आपले काही विचार/योजना असल्यास कळवावे. अन्यथा ठरल्या प्रमाणे मी सादर नवीन चावडी तयार करून चर्चेसाठी त्वरित उपलब्ध करून देतो.

राहुल देशमुख ०४:३८, २९ जून २०११ (UTC)

नमस्कार अभय,
चावडी (ध्येय आणि धोरणे) साठी झालेल्या चर्चेची संकीर्ण माहिती लिहिणे हेच मलापण प्रारूप आराखड्याच्या निमित्याने अपेक्षित होते. आपण म्हणता त्याप्रमाणे मी संकीर्ण माहिती लिहितो, पण बरेच मुद्दे हे अजून चर्चिल्या गेलेले नाहीत त्यावर सरळ लिहिले तर पुन्हा सदस्य मूळ विषय सोडून त्यावर कीस पडतील का ? (उदाहरणा दाखल देलेल्या गोष्टींवर चर्चा होते पण मूळ विषयास लोक घालत नाहीत असा अनुभव आहे) मी अजूनही विपी वर नवखा आहे म्हणून मी अनुभवी जेष्ठ सदस्यान बाबत सुचवले होते. तसेच ह्या विषयाचा आग्रह धरणे, आणि इतर चर्चे दरम्यान मी थोडा जास्त सक्रीय सहभाग (कधी आक्रमकता) दाखवला आहे. तेव्हा ह्या विषयावर पुन्हा संकीर्ण माहिती लिहिणे हा एकपात्री प्रयोग वाटेल का ? (मनात शंका होती). पण जर आपणास मी हे कार्यपूर्ण करावे असे वाटते तर मला तसे करण्यात आनंदच आहे. कुपया मार्गदर्शन करावे.
राहुल देशमुख ०४:१३, ३० जून २०११ (UTC)

संकीर्ण चर्चेचा मसुदा

संपादन

नमस्कार अभय, व्यस्तते मुळे थोडा उशीर होतोय पण तरी आपल्या सागण्या वरून मी संकीर्ण चर्चेचा मसुदा तयार केला आहे. चावडीवर आणण्य पूर्वी मी आपल्या पुरवावलोकना साठी येथे देत आहोत. आपला अभिप्राय द्यावा. तसेच काही बदल सुचवायचे असतील तर तेही सांगावे.

  • १. हे पान का पाहिजे. आत्ता असलेली पाने (चावडी, चावडी/प्रगती, विविध कौलपाने, इ) का पुरेशी नाहीत.

विपी वर बरीच चर्चा पाने आहेत. बहुतेक पाने हि विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आलेली आहेत. आज पावेतो ध्येय आणि धोरणे ह्या बाबत आपण इतर पानांवर चर्चा करत आलो आहेत परंतु असे निदर्शनास आले आहे कि इतर विषयांच्या भाऊ गर्दीत ह्या महत्वाच्या विषयांस सातत्य, सामजस्य आणि गांभीर्याने हाताळण्यात आम्ही कोठे तरी कमी पडतो आहोत. तेव्हा यासाठी एक वेगळे पान करता येईल का? तेथे प्रत्येक सूचना/मुद्द्यावर विस्तारित चर्चा केल्यास त्याला योग्य तर्हेने संरचित करता येईल आणि त्वरित निर्णय घेणे सोपे जाईल.

  • २. या पानावर कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल.
  1. ह्या ठिकाणी मराठी विपिच्या भविष्यातील ध्येय आणि धोरणे बाबत सर्व विषयांवर व्यापक स्तरावर धोरणात्मक ( High level Statergy ) चर्चा केली जाईल.
  2. ठरवलेल्या ध्येय आणि धोरण बाबत काही काळाने समीक्षाकारणाने पण चर्चा करता येईल.
  3. गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकना साठी पण येथे चर्चा करता येईल
  4. वेग वेगळ्या चर्चा पानावर आलेल्या सूचनांचे सामाईक समालोचन येथे करता येईल
  • ३. या पानावर कोणत्या विषयांवर चर्चा करू नये.
  1. व्यक्तिगत समस्या
  2. मदतीसाठी
  3. दुरुस्तीसाठी सूचना
  4. सूक्ष्म सूचना
  5. गप्पा-टप्पा
  • ४. यात कोण भाग घेऊ शकेल.

ह्या मध्ये मराठी विपी वरील कोणताही सदस्य भाग घेऊ शकेल. सर्वाचे ह्या चावडीत स्वागतच असेल.

  • ५. या पानाच उद्दिष्ट काय.

ह्या पानाचे मुख्य उद्दिष्ट असे आहेत

  1. भविष्यातील मराठी विपी बाबत गंभीरतेने विचार करून योग्य ध्येय आणि धोरणे ठरविणे.
  2. ध्येयाची आखणी करणे
  3. ध्येय गाठण्यासाठी लागणारी धोरणे ठरवणे
  4. ठरवलेल्या धोरणांची योग्य अंमलबजावणी
  5. ध्येय आणि धोरणांचा नेमाने आढावा घेणे समीक्षा करणे
  6. गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकन करून त्यांमध्ये परिवर्तन करणे
  • ६. इतर

सदर चावडी हि गंभीर विषयास धरून असल्याने सदस्यांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि चावडीवरील अनुभव अधिक सहज आणि सुखकर करण्यासाठी काही योजना सदर चावाडीस वेगळे स्मरण चिन्ह वापरावे. ह्या चावडीस बोध वाक्य असावे तसेच चावडी वरील सहज अनुभवासाठी आकर्षक सूचना/संकेत साचे असावेत. ह्या गोष्टी जरी थोड्या व्यावसाईक स्वरूपाचा वाटत असल्या तरी गंभीर विषयाकडे सदस्यांना आकर्षित करण्यासाठी आणि चावडीची लोकप्रियता वाढवण्यासाठी असे करण्यास हरकत नसावी. सदर चावडीचे संबंधित टिपणे मुख्य चावडीत प्रदर्शित करावे.

  • ७. पुरोगामी मराठी विपी

मराठी विपी हा पुरोगामी असावा म्हणजे प्रयोगशील असावा. सुरक्षीत जोखीम घेऊन काही प्रयोग जरूर केले पाहिजे. प्रयोग म्हणजे १००% यश अशी हमी कधीच देता येणार नाही. पण जोपर्यंत नवीन प्रयोग करणार नाही तोपर्यंत नवीन क्षितिजे सर करता येणार नाही, "प्रयोगांती परमेश्वर". कोंबडा कोणाचाही आरवो आम्हाला तर सकाळ होण्यात आस्था आहे राहुल देशमुख ०८:३१, २ जुलै २०११ (UTC)


इ.स. xxxx असे दृश्य स्वरूप

संपादन

नमस्कार अभय !

ते बदल करण्याचे मुख्य कारण असे, की महिन्यांच्या/दिवसांच्या पानांवर जे इ.स. लेखांचे दुवे आहेत, ते मूळ इ.स. लेखांच्या शीर्षकाप्रमाणे जसेच्या तसे दाखवणे अधिक योग्य ठरते. जुन्या लेखांची संपादने करताना काही ठिकाणी इसवी सनांच्या दुव्यांमध्ये नवीन सदस्यांचा गोंधळ झालेला दिसतो; त्याचे कारण मूळ इ.स. लेखाचे शीर्षक कसे आहे, ते ठाऊक नसते (xxxxवरून इ.स. xxxxला पुनर्निर्देशने असली तरीही).

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २२:१९, १ जुलै २०११ (UTC)

मला वाटते, मूळ लेखांच्या शीर्षकांकडे दुवे नोंदवणे विकिसंकेतांना धरून आहे. त्यामुळे केवळ दिसायला चांगले दिसते, हे समर्थन पटत नाही.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:५८, ६ जुलै २०११ (UTC)
[[इ.स. xxxx|xxxx]]चे पुनर्निर्देशन बर्‍याच पानांवरून होत असल्यामुळेच मराठी विकिपीडियावरच्या अनेक संपादकांच्या संपादनांमध्ये इ.स. लेखांना दुवे देताना चुका झाल्याचे आढळते. त्यापेक्षा जर ग्रेगोरियन दिनदर्शिकेच्या सर्व पानांवर इ.स. xxxx असे थेट लेखांकडे नेणारे दुवे असतील आणि ते तसेच्या तसे दृश्यमान असतील, तर या चुका संभवण्याचे प्रमाण आपोआप घटेल. याबाबत खायचे आणि दाखवायचे दात निराळे न ठेवण्याचे तत्त्व वापरणे अधिक परिणामकारक ठरेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:३९, ७ जुलै २०११ (UTC)
बाकी, रसभंग काय होतो, ते काही मला कळत नाही. नेमकेपणे माहिती वाचण्यात कसला रसभंग आलाय ?!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:१८, ७ जुलै २०११ (UTC)
तूर्तास, तू म्हणतोस तसे ते बदल माघारी घेतो. मात्र उद्यापर्यंत कामातून फार वेळ सवड मिळणार नसल्यामुळे बहुतकरून शुक्रवारी रात्री सांगकाम्या लावून बदल करता येतील.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:३०, ७ जुलै २०११ (UTC)
  • नमस्कार अभय आणि संकल्प

मी आपण लोकांमधील इ.स. च्या दृश्य स्वरूपा वरूनची चर्चा वाचत होतो. चर्चा आता बहुतेक निर्णयाप्रत आलेली दिसते पण निर्णय सर्वानुमते झालेला दिसत नाही म्हणून मी काही निरीक्षणे आणि माझे मत (नमागता) देत आहोत क्षमा असावी.

     संकल्पांच्या   संकल्पनेत  तथ्याउंश आहे असे वाटते कारण  
  1. सदस्याला संपादन करताना इ.स.१९५७ असे करणे सोपे असल्याने (फक्त[[) विकीकरणाचे प्रमाण वाढेल, अंतर्गत दुव्यांचे प्रमाण वाढेल आणि वर्गीकरण अधिक होईल. (मुख्यतः सदस्य/संपादन हा केंद्रबिंदू मानून निर्णय ध्यावे )
  2. ह्या पद्धतीत कमी बाईटस लागतील
  3. रस भंग: -

उदा. - १८५७ च्या उठवत १८७५ स्वातंत्र सैनिकांनी भाग घेतला.

. इ.स. १८५७ च्या उठवत १८७५ स्वातंत्र सैनिकांनी भाग घेतला.

वरील वाक्यांमध्ये इ. स. सहित तारीख लिहणे अधिक सोयीस्कर दिसते. (एका संखेला दुवा आणि दुसरीस नाही ???)' थोडक्यत इतर संख्यान पासून तारखांना वेगळे दाखवावे आणि त्या साठी इ.स. चा उपसर्ग म्हणून वापर करण्यास हरकत नसावी.' ह्या मुळे रसभंग नहोता वाचन अधिक सुलभ होईल. इतर ऐतिहासिक साहित्यात पण इ.स. लिहिण्याची पद्धत आहेच.

मला असे वाटते कि विपी वर आपण दिनांक लिहण्याचे स्थायी स्वरूप ठरून घ्यावे आणि ते जाहीर करावे मग इतर सदस्यांना पण ते लवकरच अंगवळणी पडेल आणि भविष्यातील इ. स. बद्दलचा गुंता सुटेल. राहुल देशमुख ०६:४३, ७ जुलै २०११ (UTC)

शेक्सपियरचे नाव

संपादन

अभय नमस्कार, आपण चावडीवर लिहिण्या पूर्वीच माहितीगाराच्या पडत्या फळाची आज्ञा मानून मी विकिपीडिया:धूळपाटी चावडी (ध्येय आणि धोरणे) ह्या नावानी सदर कामाचा श्रीगणेशा करून टाकला होता. त्या अनुषंगाने विकिपीडिया:धूळपाटी पानावर सूचना मिळवण्या साठी साचा पण तयार करून लावला आहे. सूचना साच्यात थोडे बदल करून धूळपाटी वरील पानाचा तात्पुरता दुवा पण भरला आहे. तेव्हा नामांतराचा प्रश्न सुटेपर्यंत ह्याच नावाने काम चालवावे असे वाटते. (....आम्हाला तर सकाळ होण्यात आस्था आहे ..!) राहुल देशमुख १५:११, ९ जुलै २०११ (UTC)

Hello,

I think you should have a look at वर्ग:Speedy deletion requests, that contains many pages that should be deleted.

Regards

--Hercule २३:३३, ९ जुलै २०११ (UTC)

Return to the user page of "अभय नातू/जुनी चर्चा २१".