जोर्वे संगमनेर तालुक्यातील, (अहमदनगर जिल्ह्यातले) गाव आहे

जोर्वे येथे उत्खनन केल्यावर पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष सापडले. हे अवशेष इसवी सनपूर्व १५० चे आहेत. उत्खननाने सापडलेल्या या संस्कृतीला नाव 'जोर्वे संस्कृती' म्हणतात. या अवशेषांमध्ये मुख्यतः रंगवलेली मातीची भांडी व तांब्याची भांडी आणि शस्त्रे आहेत. येथील लोक कोकण व विदर्भ वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली होती. ते विविध पिके पिकवीत.. येथील घरे मोठी चौकोनी, चट्टे व माती यांपासून बनवलेली असत. धान्ये कोठारांत व कणगीत साठवलेली आढळतात. स्वयंपाक दोन कोन्याच्या(?) चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.

तत्कालीन लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवत असत, त्यामुळे मृत व्यक्तींना घरातच दफन केले जाई. लहान मुलांना भांडी एकमेकांना जोडून त्यात गाडले जाई. वयस्कांना पालथे उत्तरेकडे डोके करून त्यांचे दफन केले जात होते. भूत तयार होऊ नये म्हणून त्यांचे पाय तोडले जात.

जोर्वे हे [[जरासंध|जरासंधाचे गाव होते असे सांगितले जाते. (बिहारमधील राजगीर ही जरासंधाची राजधानी असल्याचेही सांगितले जाते.)

हे सुद्धा पहा

संपादन

जोर्वे (पुरातत्त्व उत्खनन स्थळ)