भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ

क्रिकेट क्रीडा संघ
(भारत क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख पुरुष संघाबद्दल आहे. महिला संघासाठी, भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पहा.

भारत
टोपणनाव मेन इन ब्ल्यू
असोसिएशन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
कर्मचारी
कसोटी कर्णधार रोहित शर्मा
ए.दि. कर्णधार रोहित शर्मा
आं.टी२० कर्णधार रिक्त
प्रशिक्षक गौतम गंभीर
इतिहास
कसोटी दर्जा प्राप्त १९३१
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा पूर्ण सदस्य (१९२६)
आयसीसी प्रदेश एसीसी
आयसीसी क्रमवारी सद्य[३] सर्वोत्तम
कसोटी२रा१ला (१ एप्रिल १९७३)
आं.ए.दि.१ला१ला (जानेवारी २०१३)
आं.टी२०१ला१ला[१][२] (२८ मार्च २०१४)
कसोटी
पहिली कसोटी वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लॉर्ड्स, लंडन येथे; २५-२८ जून १९३२
शेवटची कसोटी वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला; ७-९ मार्च २०२४
कसोटी सामने विजय/पराभव
एकूण[४]५७९१७८/१७८
(२२२ अनिर्णित, १ बरोबरी)
चालू वर्षी[५]५/१
(० अनिर्णित)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २ (२०१९-२०२१ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी उपविजेते (२०१९-२१, २०२१-२३)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली वनडे वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेडिंगले, लीड्स; १३ जुलै १९७४
शेवटची वनडे वि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बोलंड पार्क, पर्ल येथे; २१ डिसेंबर २०२३
वनडे सामने विजय/पराभव
एकूण[६]१,०५५५५९/४४३
(९ बरोबरीत, ४४ अनिर्णित)
चालू वर्षी[७]०/०
(० बरोबरी, ० अनिर्णित)
विश्व चषक १३ (१९७५ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (१९८३, २०११)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग; १ डिसेंबर २००६
अलीकडील आं.टी२० वि झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे; १४ जुलै २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[८]२३२१५२/६९
(५ बरोबरी, ६ अनिर्णित)
चालू वर्षी[९]१७१४/१
(१ बरोबरी, १ अनिर्णित)
टी२० विश्वचषक ९ (२००७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२००७, २०२४)
अधिकृत संकेतस्थळ bcci.tv

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

१४ जुलै २०२४ पर्यंत

भारताचा पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघ पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. भारतीय क्रिकेट संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) द्वारे शासित असून  कसोटी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) आणि आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) दर्जा असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचा (आयसीसी) पूर्ण सभासद आहे. भारतीय संघ सध्याचा टी२० विश्वविजेता आहे.

भारतीय संघाने आजवर खेळलेल्या ५७९ कसोटी सामन्यांपैकी १७८ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून तितकेच सामने गमावले आहेत. उर्वरित सामन्यांपैकी २२२ अनिर्णित राहिले तर १ बरोबरीत सुटला आहे. जून २०२४ पर्यंत, भारत १२० रेटिंग गुणांसह आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये (२०२१, २०२३) आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला आहे.

कसोटी स्पर्धांमध्ये बॉर्डर-गावस्कर चषक (ऑस्ट्रेलियाविरुद्ध), फ्रीडम चषक (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध), अँथनी डि मेलो चषक आणि पतौडी चषक (इंग्लंडविरुद्ध) यांचा समावेश होतो.

संघाने १,०५५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामधील ५५९ सामन्यांमध्ये विजय, ४४३ सामन्यांमध्ये पराभव, ९ सामन्यांमध्ये बरोबरी उर्वरित ४४ सामने अनिर्णित राहिले आहेत. जून २०२४पर्यंत, भारत १२२ रेटिंग गुणांसह आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. भारतीय संघाने १९८३, २००३, २०११, २०२३मध्ये चार वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरी गाठण्यामध्ये यशस्वी झाला आहे आणि त्यापैकी १९८३ आणि २०११ अशा दोनदा विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यात संघाला यश आले. विश्वचषक जिंकणारा हा दुसरा संघ होता (वेस्ट इंडीज नंतर) आणि २०११ मध्ये स्पर्धा जिंकल्यानंतर मायदेशात विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ पहिलाच होता. भारताने २००२ आणि २०१३ मध्ये दोनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. याशिवाय, त्यांनी १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१८ आणि २०२३ अशा ७ वेळा एकदिवसीय आशिया चषक जिंकला आहे.

राष्ट्रीय संघाने आजपर्यंत २३२ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले आहेत. त्यापैकी १५२ जिंकले, ६९ गमावले आहेत, ५ बरोबरी आणि ६ सामने अनिर्णित राहिले आहेत. जूलै २०२४ पर्यंत, भारत आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० चॅम्पियनशिपमध्ये २६६ रेटिंग गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. भारताने २००७ आणि २०२४ मध्ये दोनदा आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यांनी २०१६ मध्ये ट्वेंटी२० आशिया चषक आणि २०२२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा जिंकल्या आहेत.

२०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चॅम्पियनशिप जिंकणारा भारत सध्याचा टी२० विश्वचषक चॅम्पियन आहे. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी, बीसीसीआयने संपूर्ण ४२ सदस्यीय तुकडीसाठी एकूण १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली.[१०]

इतिहास

संपादन

सुरुवातीचा इतिहास (१७००-१९१८)

संपादन

ब्रिटिशांनी इ. स. १७०० च्या सुरुवातीला भारतात क्रिकेट आणले आणि १७२१ मध्ये पहिला क्रिकेट सामना खेळविला गेला.[११] तो गुजरातच्या कोळ्यांनी खेळला. त्यावेळी गुजरातचे कोळी समुद्री चाचे होते आणि ते ब्रिटीश जहाजे नेहमी लुटत असत म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने कोळींना क्रिकेट खेळून वळविण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.[१२][१३][१४] १८४८ मध्ये, मुंबईतील पारशी समुदायाने ओरिएंटल क्रिकेट क्लबची स्थापना केली, जो भारतीयांनी स्थापन केलेला पहिला क्रिकेट क्लब आहे. संथ सुरुवातीनंतर, युरोपियन लोकांनी अखेरीस १८७७ मध्ये पारशींना सामना खेळण्यासाठी आमंत्रित केले.[१५] १९१२ पर्यंत, मुंबईतील पारशी, हिंदू, शीख आणि मुस्लिम दरवर्षी युरोपियन लोकांसोबत चतुरंगी स्पर्धा खेळत असत. १९०० च्या दशकाच्या सुरुवातीस, काही भारतीय इंग्लंड क्रिकेट संघासाठी खेळायला गेले. यापैकी काहींचे ब्रिटीशांनी खूप कौतुक केले, ज्यामध्ये की रणजितसिंहजी आणि दुलीपसिंहजी यांचा समावेश होता आणि त्यांची नावे नंतर रणजी करंडक आणि दुलीप करंडक ह्या भारतातील दोन प्रमुख प्रथम श्रेणी स्पर्धांसाठी वापरली गेली. १९११ मध्ये, पतियाळाचे भूपिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष क्रिकेट संघ ब्रिटिश बेटांच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर गेला होता, परंतु केवळ हा संघ इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाशी नाही तर केवळ इंग्लिश काऊंटी संघांविरुद्ध खेळला होता[१६][१७]

कसोटी दर्जा (१९१८–१९७०)

संपादन
 
१९५२ मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाच्या सदस्यांसह दुसरी एलिझाबेथ
 
लॉर्ड्सवर मिडलसेक्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान फलंदाजी करताना लाला अमरनाथ, सी. १९३६[१८]

भारताला १९२६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आले आणि १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये भारताने त्यावेळचे सर्वोत्तम मानले जाणारे भारतीय फलंदाज सी.के. नायडू, यांच्या नेतृत्वाखाली कसोटी खेळणारे राष्ट्र म्हणून पदार्पण केले.[१९] लंडनमधील लॉर्ड्स येथे दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी सामना खेळला गेला. यावेळी भारतीय संघाची फलंदाजीत तितकीशी मजबूत नव्हती[२०] आणि संघ १५८ धावांनी पराभूत झाला.[२१] भारताने १९३३ मध्ये पुरुषांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट मालिकेचे आयोजन केले होते. इंग्लंड हा पाहुणा संघ होता ज्याने बॉम्बे (आता मुंबई) आणि कलकत्ता (आता कोलकाता) येथे दोन कसोटी सामने खेळले. पाहुण्यांनी मालिका २-० ने जिंकली. १९३० आणि १९४०  च्या दशकात भारतीय संघाने आपल्या कामगिरीमध्ये सतत सुधारणा केली परंतु या काळात संघाला आंतरराष्ट्रीय विजय मिळवता आला नाही. १९४० च्या सुरुवातीच्या काळात, दुसऱ्या महायुद्धामुळे भारतीय संघ कोणतेही कसोटी क्रिकेट सामने खेळू शकला नाही. स्वतंत्र देश म्हणून संघाची पहिली मालिका डॉन ब्रॅडमनच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाविरुद्ध (त्यावेळच्या ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघाला दिलेले नाव) १९४७-४८ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली. भारताने खेळलेली ही पहिली कसोटी मालिका होती जी इंग्लंडविरुद्ध खेळली गेली नव्हती. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाने पाच सामन्यांची मालिका ४-० ने जिंकली, ब्रॅडमनने त्याच्या शेवटच्या ऑस्ट्रेलियन उन्हाळ्यात भारतीय गोलंदाजीला त्रास दिला.[२२] त्यानंतर भारताने मायदेशात पहिली कसोटी मालिका इंग्लंडविरुद्ध नाही तर १९४८ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळली. वेस्ट इंडीजने पाच सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली.[२३] भारताने १९५२ मध्ये मद्रास येथे त्यांच्या २४व्या सामन्यात पहिला कसोटी विजय इंग्लंडविरुद्ध नोंदविला.[२४] नंतर त्याच वर्षी, त्यांनी पहिली कसोटी मालिका जिंकली, जी पाकिस्तानविरुद्ध होती.[२५] भारतीय संघाने १९५० च्या सुरुवातीच्या काळात खेळामधील सुधारणा सुरू ठेवली आणि १९५६ मध्ये न्यू झीलंड विरुद्धच्या  मालिकेमध्ये विजय मिळवला. तथापि, दशकाच्या उर्वरित काळात ते पुन्हा जिंकू शकले नाहीत आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश संघांकडून त्यांना वाईटरित्या पराभव पत्करावा लागला. २४ ऑगस्ट १९५९ रोजी, संघ कसोटीत एका डावाने पराभूत झाला आणि हा इंग्लंडकडून भारताचा आतापर्यंतचा पहिलाच ५-० असा पूर्ण पराभव होता.[२६] त्यापुढच्या दशकात घरच्या मैदानावर मजबूत रेकॉर्ड असलेला संघ म्हणून भारताची प्रतिष्ठा निर्माण झाली. त्यांनी १९६१-६२ मध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने पहिली कसोटी मालिका जिंकली आणि त्यानंतर न्यू झीलंडविरुद्धची मालिकाही जिंकली. त्याशिवाय पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिका आणि इंग्लंडविरुद्धची दुसरी मालिका अनिर्णित राखण्यात यश मिळविले. याच कालावधीत भारताने उपखंडाबाहेर १९६७-६८ मध्ये न्यू झीलंडविरुद्ध पहिली मालिका जिंकली.[२७]

१९७० च्या दशकात भारताच्या गोलंदाजीची गुरुकिल्ली होती भारतीय फिरकी चौकडी - बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना, बी.एस. चंद्रशेखर आणि श्रीनिवासराघवन वेंकटराघवन. या काळात सुनील गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ या भारतातील दोन सर्वोत्तम फलंदाजांचा उदयही झाला. भारतीय खेळपट्ट्या फिरकीला साथ देणाऱ्या होत्या आणि त्यामुळे फिरकी चौकडीच्या गोलंदाजीसमोर विरोधी फलंदाजी कोलमडून पडत असे.[२८][२९] अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली १९७१ मध्ये वेस्ट इंडीज (फेब्रुवारी-एप्रिल १९७१) आणि इंग्लंडमध्ये (जुलै-ऑगस्ट १९७१) झालेल्या लागोपाठच्या मालिका विजयात ह्या चौकडीची कामगिरी मोठी होती. गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध मालिकेत ७७४ धावा केल्या तर मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात दिलीप सरदेसाईच्या ११२ धावांनी कसोटी विजयात मोठी भूमिका बजावली.[३०][३१][३२]

 
सी.के. नायडू, भारताचे पहिले कसोटी कर्णधार

एकदिवसीय क्रिकेट आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक यश (१९७०-१९८५)

संपादन

१९७१ मध्ये पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या आगमनाने क्रिकेट विश्वात एक नवीन आयाम निर्माण केला. तथापि, या टप्प्यावर एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला मजबूत मानले जात नव्हते आणि कर्णधार गावस्करसारखे फलंदाज त्यांच्या फलंदाजीच्या बचावात्मक दृष्टिकोनासाठी ओळखले जात होते. भारताची सुरुवात एकदिवसीय सामन्यांमध्ये एक कमकुवत संघ म्हणून झाली आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा पोहोचू शकला नाही.[३३] १९७५ मध्ये पहिल्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध गावस्करच्या कुप्रसिद्ध १७४ चेंडूत नाबाद ३६ धावांच्या संथ खेळीमुळे भारत फक्त ३ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारू शकला आणि संघाला २०२ धावांनी पराभव पत्करावा लागला.[३४]

याउलट, भारताने कसोटी सामन्यांमध्ये एक मजबूत संघ उतरवला आणि घरच्या मैदानावर ते विशेषतः मजबूत होते, जिथे त्यांचे स्टायलिश फलंदाज आणि मोहक फिरकीपटू यांचे संयोजन सर्वोत्तम होते. भारताने १९७६ मध्ये पोर्ट-ऑफ-स्पेन येथे वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तत्कालीन कसोटी विक्रम प्रस्थापित केला, जेव्हा त्यांनी विजयासाठी मिळालेले ४०३ धावांचे आव्हान विश्वनाथच्या ११२ धावांमुळे पार केले.[३५] नोव्हेंबर १९७६ मध्ये संघाने कानपूर येथे आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. भारतीय संघाने न्यू झीलंड विरुद्ध ९ बाद ५२४ धावांवर डाव घोषित केला. ह्या डावामध्ये  कोणत्याही फलंदाजाने वैयक्तिक शतक केले नव्हते.[३६] सहा फलंदाजांनी अर्धशतके केली होती, आणि मोहिंदर अमरनाथच्या सर्वाधिक ७० धावा होत्या.[३७] ही खेळी कसोटी क्रिकेटमधील केवळ आठवी घटना होती जिथे सर्व अकरा फलंदाजांनी वैयक्तिक दुहेरी धावसंख्या गाठली.[३८]

 
१९३२ ते मार्च २०२४ पर्यंतच्या सर्व कसोटी संघांविरुद्ध भारताच्या कसोटी सामन्यांचे निकाल दर्शविणारा आलेख

१९८० च्या दशकात, भारताने आक्रमक शैलीचे फलंदाज तयार केले. ज्यामध्ये मनगटी फटकेबाजीसाठी प्रसिद्ध मोहम्मद अझरुद्दीन, दिलीप वेंगसरकर आणि अष्टपैलू कपिल देव आणि रवी शास्त्री असे तडाखेबाज फलंदाज होते. भारताने १९८३ क्रिकेट विश्वचषक जिंकला तेव्हा त्यांनी अंतिम सामन्यात फेव्हरिट आणि दोन वेळचे गतविजेते वेस्ट इंडीजचा लॉर्ड्स येथे पराभव केला. असे असतानाही, संघाने कसोटी सामन्यांमध्ये मात्र खराब कामगिरी केली.  सलग २८ कसोटी सामन्यांमध्ये संघ विजय मिळवू शकला नाही. १९८४ मध्ये भारताने आशिया चषक जिंकला आणि १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचे विश्व अजिंक्यपद जिंकले. मात्र याशिवाय भारतीय उपखंडाबाहेर भारत हा एक कमकुवत संघच राहिला. भारताचा १९८६ मधील इंग्लंड विरुद्धचा कसोटी मालिका विजय हा पुढील १९ वर्षांसाठी उपखंडाबाहेर भारताचा शेवटचा कसोटी मालिका विजय राहिला. १९८० च्या दशकात गावस्कर आणि कपिल देव (आजपर्यंतचे भारताचे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू) त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. गावस्कर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये विक्रमी ३४ शतके केली आणि १०,००० धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला. नंतर कपिल देव ४३४ बळी घेऊन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज बनले.[३९]  गावसकर आणि कपिल यांच्यादरम्यान अनेकद कर्णधारपदाची देवाणघेवाण केल्यामुळे हा काळ अस्थिर नेतृत्वासाठी सुद्धा प्रसिद्ध होता.[४०][४१]

२० व्या शतकाचा उत्तरार्ध (१९८५-२०००)

संपादन

१९८९ आणि १९९० मध्ये सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळे यांना राष्ट्रीय संघात समाविष्ट केल्याने संघात आणखी सुधारणा झाली. पुढील वर्षी, अमरसिंगनंतरचा भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. असे असूनही, १९९० च्या दशकात, भारताने उपखंडाबाहेर ३३ पैकी एकही कसोटी जिंकली नाही तर मायदेशात ३० पैकी १७ कसोटी जिंकल्या. मायदेशात खेळवल्या गेलेल्या १९९६ क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीत शेजारी श्रीलंकेने बाद केल्यानंतर, वर्षभरात संघ बदलांना समोर गेला. लॉर्ड्स वरील एकाच कसोटीत सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी पदार्पण केले आणि कालांतराने  ते संघाचे कर्णधार बनले. तेंडुलकरची १९९६ च्या उत्तरार्धात अझरुद्दीनच्या जागी कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली, परंतु वैयक्तिक आणि सांघिक कामगिरीमध्ये घसरणीनंतर तेंडुलकरने कर्णधारपद सोडले आणि १९९८ च्या सुरुवातीला अझरुद्दीनला पुन्हा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.[४२]

 
६१९ बळींसह, अनिल कुंबळे कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा जगातील चौथा आणि भारताचा सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय विकेट घेणारा गोलंदाज आहे.[४३]

१९९९ च्या क्रिकेट विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरल्यानंतर, तेंडुलकरला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले आणि संघाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर ३-० आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर २-० असा पराभव पत्करावा लागला. तेंडुलकरने पुन्हा कधीही संघाचे कर्णधारपद न स्वीकारण्याची शपथ घेऊन राजीनामा दिला.[४४]

मॅच फिक्सिंगच्या गर्तेतून विश्वविजेतेपदापर्यंत (२०००-२०१५)

संपादन

इ.स. २००० मध्ये संघाचे आणखी नुकसान झाले जेव्हा माजी कर्णधार अझरुद्दीन आणि सहकारी फलंदाज अजय जडेजा यांना मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकवण्यात आले आणि त्यांना अनुक्रमे आजीवन आणि पाच वर्षांची बंदी घालण्यात आली.[४५][४६] या कालावधीचे वर्णन बीबीसीने "भारतीय क्रिकेटची सर्वात वाईट वेळ" असे केले आहे.[४७] तथापि, नवीन मुख्य - तेंडुलकर, द्रविड, कुंबळे आणि गांगुली - त्यांच्यासोबत असे पुन्हा घडू न देण्याची शपथ घेतली आणि भारतीय क्रिकेटला काळोखाच्या गर्तेतून बाहेर काढले. पहिल्या तिघांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवल्या ज्यामुळे गांगुली त्यांना एका नव्या युगात घेऊन जाऊ शकेल.[४८]

गांगुलीच्या नेतृत्वाखाली आणि भारताचे पहिले परदेशी प्रशिक्षक जॉन राईट यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मोठ्या सुधारणा केल्या.[४९][५०] कोलकाता कसोटी सामन्यात, फॉलोऑन केल्यानंतर कसोटी सामना जिंकणारा भारत कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील फक्त तिसरा संघ ठरला. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉने भारताला "अंतिम सीमा" असे नाव दिले कारण त्याचा संघ भारतात कसोटी मालिका जिंकण्यास असमर्थ ठरला.[५१] २००२ मध्ये, भारत श्रीलंकेसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा संयुक्त विजेता होता आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ते अंतिम फेरीत पोहोचले. अंतिम सामन्यात संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. कसोटी मालिकेतील पराभवानंतर २००६ च्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये एकदिवसीय मालिका जिंकून भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सलग १७ एकदिवसीय विजयाचा विश्वविक्रम केला.[५२]

सप्टेंबर २००७ मध्ये, भारताने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिला-वहिला आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव करून जिंकला.[५३] २ एप्रिल २०११ रोजी, भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून २०११ क्रिकेट विश्वचषक जिंकला, अशा प्रकारे दोनदा विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियानंतरचा तिसरा संघ बनला.[५४] तसेच मायदेशात विश्वचषक जिंकणारा भारत पहिला संघ होता.[५५] २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केले आणि महेंद्रसिंग धोनी पुरुष क्रिकेट संघाचा इतिहासातील पहिला कर्णधार बनला ज्याने क्रिकेट विश्वचषक, आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकल्या.[५६][५७]

 
२०१० मध्ये न्यू झीलंडविरुद्ध गडी बाद केल्यानंतर आनंद साजरा करताना भारतीय खेळाडू

बांगलादेशमध्ये आयोजित २०१४ आयसीसी पुरुष विश्व ट्वेंटी२० मध्ये, भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभूत झाल्याने आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्यापासून दूर राहिला.[५८] २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत अंतिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला, जे पुढे जाऊन विजेते ठरले.[५९]

आशिया चषक २०१६ ते दुसरे टी२० विश्वविजेतेपद (२०१६ पासून पुढे)

संपादन

त्यानंतर भारताने २०१६ ची सुरुवात २०१६ आशिया चषक जिंकून केली, संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. [६०] त्यानंतर घरच्या मैदानावर आयोजित केल्या गेलेल्या २०१६ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला जिंकण्यासाठी पसंती दिली जात होती, परंतु संघ उपांत्य फेरीत स्पर्धेचे विजेते वेस्ट इंडीजकडून पराभूत झाला.[६१] भारताने २०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले परंतु अंतिम फेरीत त्याच प्रतिस्पर्ध्यांकडून संघाला पराभव पत्करावा लागला, २००७ नंतर प्रथमच ते स्पर्धेच्या या टप्प्यावर भेटले होते.[६२][६३]

भारतीय संघाची पुढील प्रमुख जागतिक स्पर्धा २०१९ क्रिकेट विश्वचषक होती जिथे गट फेरीमध्ये संघ सात विजय आणि फक्त यजमान राष्ट्र इंग्लंडविरुद्धच्या एका पराभवासह गटात पहिल्या स्थानावर राहिला.[६४] त्यांनी उपांत्य फेरी गाठली परंतु उपांत्य सामन्यांत न्यू झीलंडकडून १८ धावांनी पराभव पत्करावा लागला.[६५] संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक ६४८ धावा केल्या. भारत २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम सामना न्यू झीलंड विरुद्ध साउथहॅम्प्टन येथे खेळला ज्यामध्ये त्यांचा आठ गड्यांनी पराभव झाला.[६६] २०२२ टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता, परंतु त्यांचा इंग्लंडकडून दहा गाड्यांनी पराभव झाला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या भूमीवर २-१ ने मालिका जिंकल्यानंतर, भारत २०२३ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओव्हल येथे खेळला ज्यात त्यांचा २०९ धावांनी पराभव झाला.[६७] भारताने आर. प्रेमदासा स्टेडियमवर २०२३ आशिया चषक अंतिम सामन्यात  श्रीलंकेविरुद्ध दहा गडी राखून विजय मिळवला.[६८] नऊ गडी बाद करणारा  कुलदीप यादव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.[६९] दरम्यान, २०२२ आशियाई खेळांमध्ये अफगाणिस्तानविरुद्धचा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्याने अग्रमानांकित भारतीय पुरुष क्रिकेट संघाला सुवर्णपदक मिळाले.[७०]

२०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवून सुरुवात केली होती. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध ३०२ धावांनी जोरदार विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि त्यानंतर न्यू झीलंडविरुद्ध ७० धावांनी उपांत्य फेरीत विजय मिळवला. सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकत विराट कोहली ५० एकदिवसीय शतके पूर्ण करणारा पहिला खेळाडू बनला. तसेच, मोहम्मद शमीने एकदिवसीय विश्वचषकामधील, भारतीयासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली (७/५७). संपूर्ण विश्वचषकादरम्यान अपराजित राहिलेल्या भारतीय संघाला अंतिम फेरीत मात्र ऑस्ट्रेलियाकडून सहा गाडी राखून पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहली एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक ७६५ धावा करणारा खेळाडू होता, ज्या एका विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक धावा होत्या.[७१]

भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून २०२४ टी२० विश्वचषक जिंकला.[७२] इंग्लंड आणि वेस्ट इंडीज नंतर दोनदा चषक जिंकणारा तो तिसरा संघ बनला आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून स्पर्धा जिंकणारा पहिला संघ बनला. अर्शदीप सिंगने सर्वाधिक १७ बळी घेतले.[७३][७४]

प्रशासकीय संस्था

संपादन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही भारतीय क्रिकेट संघ आणि भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. हे मंडळ १९२९ पासून कार्यरत आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्रातील चर्चगेट येथे 'क्रिकेट सेंटर' मध्ये आहे. हे जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटनांपैकी एक आहे, २००६ ते २०१० या कालावधीत भारताच्या सामन्यांचे प्रसारण हक्क $६१२,०००,००० मध्ये विकले गेले.[७५] रॉजर बिन्नी सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि जय शाह सचिव आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती भारताचे आगामी सामने भविष्यातील दौरे कार्यक्रमाद्वारे ठरवते. तथापि, बीसीसीआयने, क्रिकेट जगतातील आपल्या प्रभावशाली आर्थिक स्थिती सह, आयसीसीच्या कार्यक्रमाला अनेकदा आव्हान दिले आहे आणि बांगलादेश किंवा झिम्बाब्वे बरोबरच्या दौऱ्या पेक्षा अधिक कमाईची शक्यता असलेल्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अधिक मालिका आयोजित केल्या आहेत.[७६] भूतकाळात, प्रायोजकत्वाबाबत बीसीसीआयने आयसीसीशी संघर्षही केला आहे.[७७]

निवड समिती

संपादन

भारतीय क्रिकेट संघाची निवड बीसीसीआयच्या प्रादेशिक निवड धोरणाद्वारे होते, जिथे प्रत्येक पाच प्रदेशाचे प्रतिनिधित्व एक निवडकर्ता करतो आणि बीसीसीआयने निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित केलेल्या सदस्यांपैकी एक असतो. यामुळे काहीवेळा हे निवडकर्ते त्यांच्या प्रदेशाबाबत पक्षपाती आहेत की नाही यावर वाद निर्माण झाला आहे.[७८]

१८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत, चेतन शर्मा मुख्य निवडकर्ता होते आणि देबाशिष मोहंती, हरविंदरसिंग आणि सुनील जोशी सदस्य होते. २०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेत संघाच्या अयशस्वी कामगिरीनंतर संपूर्ण पॅनेलची हकालपट्टी करण्यात आली.[७९]

७ जानेवारी २०२३ रोजी, शर्मा यांची पुन्हा शिवसुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांच्यासह मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली.[८०]

एका खाजगी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शर्मा यांनी भारतीय संघावर अनेक भडक टिप्पण्या केल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी शिवसुंदर दास ह्यांची अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून नेमणूक झाली.[८१]

४ जुलै २०२३रोजी, अजित आगरकर यांची नवीन मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी शर्मा यांची जागा घेतली.[८२] त्यांनी दास, बॅनर्जी, अंकोला आणि शरथ यांना निवड समितीमध्ये सामील केले.[८३]

संघाचे रंग

संपादन

भारत आपले कसोटी क्रिकेट सामने नेव्ही ब्लू कॅप आणि हेल्मेट सह पारंपारिक सफेद गणवेशात खेळतो. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये परिधान केलेल्या गणवेशात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० साठी निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा असतात, काहीवेळा भारतीय ध्वजातील रंगांचा स्प्लॅश असतो.[८४]

 
क्रिकेट विश्व अजिंक्यपद दरम्यान भारताची क्रिकेट किट.

१९९२ आणि १९९९ क्रिकेट विश्वचषकादरम्यान, भारतीय संघाची किट अनुक्रमे इंटरनॅशनल स्पोर्ट्स क्लोदिंग (ISC) आणि ASICS द्वारे प्रायोजित करण्यात आली होती,[८५][८६] परंतु त्यानंतर २००१ पर्यंत कोणतेही अधिकृत किट प्रायोजक नव्हते. भारतीय संघासाठी अधिकृत किट प्रायोजक नसताना, ओमटेक्सने संघासाठी शर्ट आणि पँट उत्पादित केले, तर काही खेळाडूंनी डिसेंबर २००५ पर्यंत आदिदास आणि रिबॉक सारख्या त्यांच्या वैयक्तिक प्रायोजकांनी त्यांना प्रदान केलेल्या पँट घालणे निवडले.

डिसेंबर २००५ मध्ये, नाइकेने आपले प्रतिस्पर्धी आदिदास आणि रिबॉकला मागे टाकले आणि जानेवारी २००६ मध्ये सुरू झालेल्या भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी पाच वर्षांसाठी करार मिळवला.[८७] नाइके टीम इंडियासाठी दीर्घकाळ किट पुरवठादार होता. त्यांना २०११[८८] आणि २०१६[८९] असा दोनवेळा करार वाढवून मिळाला होता.

नाइकेने सप्टेंबर २०२० मध्ये आपला करार संपुष्टात आणल्यानंतर,[९०]मोबाइल प्रीमियर लीग ह्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मची उपकंपनी एमपीएल स्पोर्ट्स अपेरल अँड ॲक्सेसरीजने नोव्हेंबर २०२० मध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी नाइकेची किट उत्पादक म्हणून जागा घेतली. हा करार डिसेंबर २०२३ पर्यंत चालणार होता.[९१][९२]

नोव्हेंबर २०२२ मध्ये, एमपीएल स्पोर्ट्सने त्यांचा करार संपण्यापूर्वी करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे अधिकार केवल किरण क्लोदिंग लिमिटेड (KKCL) ला सुपूर्द केले.[९३] जानेवारी २०२३ मध्ये, एमपीएलने मे २०२३पर्यंत अंतरिम प्रायोजक म्हणून केवल किरण क्लोदिंग लिमिटेड (KKCL) आणि किलर जीन्स (KKCL च्या मालकीचा ब्रँड) यांची नियुक्ती केली.[९४][९५]

फेब्रुवारी २०२३ मध्ये, आदिदास KKCL च्या जागी आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापूर्वी जून २०२३ मध्ये पाच वर्षांच्या प्रायोजकत्व कराराची सुरुवात करेल अशी घोषणा करण्यात आली.[९६] मे २०२३ मध्ये, बीसीसीआयने अधिकृतपणे आदिदासला मार्च २०२८ पर्यंत चालणाऱ्या पुढील पाच वर्षांसाठी त्यांचे किट प्रायोजक म्हणून घोषित केले.[९७][९८][९९]

कालावधी किट निर्माता शर्ट प्रायोजक [१००]
१९९२ आयएससी
१९९९ एएसआयसीएस आयटीसी लिमिटेड

(विल्स & आयटीसी हॉटेल्स)

१९९३–२००१
२००१–२००५ ओमटेक्स सहारा
२००६–२०१३ नाइके
२०१४–२०१७ स्टार इंडिया
२०१७–२०१९ ओप्पो
२०१९–२०२० बायजूज
२०२०–२०२२ एमपीएल स्पोर्ट्स
२०२३ किलर जीन्स
२०२३ – सद्य आदिदास ड्रीम११
आयसीसी स्पर्धांसाठी प्रायोजकत्व
स्पर्धा किट उत्पादक स्लीव्ह प्रायोजक
१९७५ क्रिकेट विश्वचषक
१९७९ क्रिकेट विश्वचषक
१९८३ क्रिकेट विश्वचषक
१९८७ क्रिकेट विश्वचषक
१९९२ क्रिकेट विश्वचषक आयएससी
१९९६ क्रिकेट विश्वचषक विल्स
१९९८ आयसीसी नॉकआउट चषक
१९९९ क्रिकेट विश्वचषक एएसआयसीएस
२००० आयसीसी नॉकआउट चषक
२००२ आयसीसी चॅम्पियन्स चषक ओमटेक्स
२००३ क्रिकेट विश्वचषक ॲम्बी व्हॅली
२००४ आयसीसी चॅम्पियन्स चषक सहारा
२००६ आयसीसी चॅम्पियन्स चषक नाइके
२००७ क्रिकेट विश्वचषक
२००७ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
२००९ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
२००९ आयसीसी चॅम्पियन्स चषक
२०१० आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
२०११ क्रिकेट विश्वचषक
२०१२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
२०१३ आयसीसी चॅम्पियन्स चषक
२०१४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्टार इंडिया
२०१५ क्रिकेट विश्वचषक
२०१६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
२०१७ आयसीसी चॅम्पियन्स चषक ओप्पो
२०१९ क्रिकेट विश्वचषक
२०२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा एमपीएल स्पोर्ट्स बायजूज
२०२१ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
२०२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आदिदास
२०२३ क्रिकेट विश्वचषक ड्रीम ११
२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक

महत्त्वाच्या स्पर्धा

संपादन

भारतातील महत्त्वाच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी

संपादन
 • एदिसा = एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने
 • टी२०आं. = टी२० आंतरराष्ट्रीय सामने
 • क.आं.सा. = कसोटी आंतरराष्ट्रीय सामने
आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताची कामगिरी
  सामने विजय पराभव अनिर्णित बरोबरी बेनिकाली पहिला सामना
कसोट्या[१०१] ५६३ १६८ १७४ २२२ २५ जून १९३२
एदिसा[१०२] १०१६ ५३१ ४३४ - ४२ १३ जुलै १९७४
टी२०आं.[१०३] १९४ १२३ ६१ १ डिसेंबर २००६

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी

संपादन
क्रिकेट विश्वचषक
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
  १९७५ पहिली फेरी 6/8 3 1 2 0 0
  १९७९ पहिली फेरी 7/8 3 0 3 0 0
  १९८३ विजेता 1/8 8 6 2 0 0
   १९८७ तिसरे 3/8 7 5 2 0 0
    १९९२ पहिली फेरी 7/9 8 2 5 0 1
    १९९६ तिसरे 3/12 7 4 3 0 0
      १९९९ दुसरी फेरी (सुपर सिक्स) 6/12 8 4 4 0 0
    २००३ उपविजेता 2/14 11 9 2 0 0
  २००७ पहिली फेरी 10/16 3 1 2 0 0
    २०११ विजेता 1/14 9 7 1 1 0
   २०१५ उपांत्य फेरी
   २०१९ उपांत्य फेरी ३/१० १०
  २०२३ - - - - - - -
    २०२७ - - - - - -
   २०३१ - - - - - - -
एकूण १२/१२ २ अजिंक्यपदे ६७ ३९ २६
चॅम्पियन्स ट्रॉफी
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
  १९९८ उपांत्य फेरी - - - - - -
  २००० उपविजेता - - - - - -
  २००२ विजेता - - - - - -
  २००४ साखळी फेरी - - - - - -
  २००६ साखळी फेरी - - - - - -
  २००९ साखळी फेरी - - - - - -
   २०१३ विजेता - - - - - -
   २०१७ उपविजेता - - - - - -
एकूण ०७/०७ २ अजिंक्यपदे - - - - -

|}

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
  २००७ विजेता - - - - - -
  २००९ सुपर ८ - - - - - -
  २०१० सुपर ८ - - - - - -
  २०१२ सुपर ८ - - - - - -
  २०१४ उपविजेता - - - - - -
  २०१६ उपांत्य फेरी - - - - - -
   २०२१ सुपर १२ - - - - - -
  २०२२ ? - - - - - -
   २०२४ ? - - - - - -
   २०२६ ? - - - - - -
   २०२८ ? - - - - - -
    २०३० ? - - - - - -
आय.सी.सी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
स्थान बदलते<bɾ>(अंतिम सामना: )<bɾ>२०१९-२१ ? - - - - - -
आयसीसी विश्वचषक सुपर लीग
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
२०२०-२२ ? - - - - - -
आशिया चषक
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
  १९८४ विजेता १/३ 0 0 0
  १९८६ सहभाग नाही - - - - - -
  १९८८ विजेता १/४ - -
  १९९०-९१ विजेता १/३ 0 0
  १९९५ विजेता १/४ 0 0
  १९९७ उपविजेता २/४ 0
  २००० साखळी फेरी ३/४ 0 0
  २००४ उपविजेता २/६ ? ? ? ? ?
  २००८ उपविजेता २/६ ? ? ? ? ?
  २०१० विजेता १/४ ? ? ? ? ?
  २०१२ साखळी फेरी ३/४ 0 0
  २०१४ साखळी फेरी ३/५ 0 0
  २०१६ विजेता १/५ 0 0 0
  २०१८ विजेता १/६ 0 0
  २०२० - - - - - -

कसोटी मैदान

संपादन
मैदान शहर कसोटी सामने
इडन गार्डन्स कोलकाता ३४
फिरोज शहा कोटला दिल्ली २८
एम‌.ए. चिदंबरम‌ मैदान चेन्नई २९
वानखेडे स्टेडियम मुंबई २१
ग्रीन पार्क (सद्य नाव: मोदी मैदान) कानपुर १९
ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई १७
एम. चिन्नास्वामी स्टेडियम बंगळूर १६
नेहरू मैदान, चेन्नई चेन्नई
विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड नागपूर
सरदार पटेल स्टेडियम,मोटेरा स्टेडियम अमदावाद
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम मोहाली
बारबती स्टेडियम कटक
लाल बहादुर शास्त्री स्टेडियम हैदराबाद
बॉम्बे जिमखाना मुंबई
गांधी स्टेडियम जलंधर
के डी सिंग बाबु स्टेडियम लखनौ
सवाई मानसिंह स्टेडियम जयपुर
सेक्टर १६ स्टेडियम चंदिगड
विद्यापीठ स्टेडियम लखनौ
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम चिंचवड

विक्रम

संपादन

सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वात जास्त विक्रम आहेत. सर्वात जास्त एकदिवसीय सामनेकसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ह्या शिवाय एकदिवसीय सामने व कसोटी सामन्यात सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या(३०९ धावा) नावावर आहे. विरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय क्रिकेटपटु आहे ज्याने त्रिशतक झळकावले आहे. कसोटी सामन्यात संघाची सर्वात जास्त धाव संख्या ७०५ (वि. ऑस्ट्रेलिया) तर एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या ४१३ ( वि.बर्म्युडा) आहे.

भारताच्या अनिल कुंबळे ने एकाच डावात १० विकेट (वि. पाकिस्तान)घेण्याचा विक्रम केलेला आहे, ह्या शिवाय ५०० कसोटी बळी घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.

हे सुद्धा पहा

संपादन
 1. भारतीय क्रिकेट संघनायक
 2. भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

संदर्भ

संपादन
 1. ^ "श्रीलंकेला मागे टाकत आयसीसी टी२० क्रमवारीत भारत १ल्या क्रमांकावर". न्यूज १८. 2 April 1974. ९ जानेवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ७ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
 2. ^ "आयसीसी टी२० क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर". जागरण जोश. ३ एप्रिल २०१४. ९ जानेवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ११ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 3. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
 4. ^ "Test matches - Team records". ESPNcricinfo.
 5. ^ "Test matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
 6. ^ "ODI matches - Team records". ESPNcricinfo.
 7. ^ "ODI matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
 8. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
 9. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
 10. ^ https://sangbadbhumi.com/how-will-the-125-crore-prize-money-get-distributed/
 11. ^ डाऊनिंग, क्लेमेंट (१७३७). विल्यम फॉस्टर (ed.). भारतीय युद्धांचा इतिहास. लंडन.
 12. ^ डाऊनिंग, क्लेमेंट (१९७८). भारतीय युद्धांचा इतिहास. p. १८९. OCLC 5905776.
 13. ^ ड्रू, जॉन (६ डिसेंबर २०२१). "द ख्रिसमस द कोलीज टूक क्रिकेट". द डेली स्टार (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
 14. ^ ड्रू, जॉन (२१ डिसेंबर २०२१). "पूर्व भारतातील व्यापाऱ्यांनी या पंधरवड्याच्या ३०० वर्षांपूर्वी क्रिकेट भारतीय किनाऱ्यावर कसे आणले". Scroll.in (इंग्रजी भाषेत). १ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहिले.
 15. ^ "कॉलोनीयल भारतातील क्रिकेट आणि राजकारण". रामचंद्र गुहा. १९९८. JSTOR ६५१०७५.
 16. ^ "ब्रिटिश बेटांवर भारत, १९११". क्रिकेट अर्काईव्ह. ९ नोव्हेंबर २०१२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २१ सप्टेंबर २००६ रोजी पाहिले.
 17. ^ अल्डरमन, एल्गन. "शेकडो आणि उष्णतेच्या लाटा: 1911 च्या अखिल भारतीय इंग्लंड दौऱ्याची कथा ज्याने देशाची ओळख निर्माण करण्यास मदत केली". द टाइम्स (इंग्रजी भाषेत). ISSN 0140-0460. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
 18. ^ लाला अमरनाथ हे भारताकडून खेळताना कसोटी शतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज आहेत.
 19. ^ "१९०९-१९६३ - इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्सच". आयसीसी. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 20. ^ "१९३२ मध्ये या दिवशी भारताने पहिला कसोटी सामना खेळला होता". एएनआय न्यूज (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 21. ^ "भारताचा इंग्लंड दौरा, १९३२". ईएसपीएन क्रिकइन्फो. २५ डिसेंबर २००६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 22. ^ "भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९४८". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ मे २००६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 23. ^ "वेस्टइंडीजचा भारत दौरा". १६ डिसेंबर २००६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 24. ^ "इंग्लंडचा भारत दौरा, १९५१-५२". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ मे २००६ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ मार्च २०२२ रोजी पाहिले.
 25. ^ "बियॉंड बाउंड्रीज". डेक्कन क्रॉनिकल. २९ मार्च २०११. १ एप्रिल २०११ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ एप्रिल २०११ रोजी पाहिले.
 26. ^ "इंडिया सफर ०-५ व्हाईटवॉश इन इंग्लंड इन १९५९". २४ ऑगस्ट २०१३. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 27. ^ "न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेत भारत, न्यूझीलंड कसोटी मालिकेत भारत १९६७/६८ धावसंख्या, सामन्यांचे वेळापत्रक, सामने, गुण सारणी, निकाल, बातम्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ जानेवारी २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 28. ^ दिनकर, एस. (१८ जून २०२०). "व्ही.व्ही.कुमारच्या नजरेतून दिग्गज फिरकी चौकडी". द हिंदू. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 29. ^ "इंडियाज फेम्ड स्पिन क्वार्टेट - द गोल्ड स्टॅंडर्ड फॉर हंटिंग इन पॅक्स". २० सप्टेंबर २०१६. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 30. ^ "सुनील गावस्कर यांनी ५० वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजचा सामना कसा केला आणि ते भारताचे पहिले स्पोर्ट्स सुपरस्टार बनले". ६ मार्च २०२१. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 31. ^ "सुनील गावस्कर यांच्या पदार्पणातील मालिकेत ७७४ धावा". १९ एप्रिल २०१३. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 32. ^ "दिलीप सरदेसाई, भारताला यश मिळवण्यात मदत करण्यात महत्त्वाची भूमिका असलेला फलंदाज". दगार्डियन.कॉम. १६ जुलै २००७. २९ मार्च २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १२ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 33. ^ "विशाखापट्टणम येथे टीम इंडिया विक्रमाच्या उंबरठ्यावर, ५०-षटकांच्या क्रिकेटमध्ये अग्रेसर". २३ ऑक्टोबर २०१८. २४ ऑक्टोबर २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 34. ^ "सनीज वर्ल्ड कप गो-स्लो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जानेवारी २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 35. ^ "जेव्हा भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध ४०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून जागतिक क्रिकेटला कायमचे बदलून टाकले". १२ एप्रिल २०१३. १६ एप्रिल २०१३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 36. ^ "सर्वाधिक जास्त धावचीत, आणि सर्वात कमी धावसंख्या जी कधीच केली गेली नाही". 14 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 37. ^ "शतक आणि अर्धशतकाशिवाय सर्वोच्च कसोटी धावसंख्या". ३० जून २०१५. १४ जानेवारी २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 38. ^ "नोंदी. कसोटी सामने. सांघिक नोंदी. एका डावात दुहेरी धावसंख्या गाठणारे सर्वाधिक फलंदाज". ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जानेवारी २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 39. ^ "३० जानेवारी १९९४: जेव्हा कपिल देव जगातील आघाडीचे विकेट घेणारे गोलंदाज बनले". ३० जानेवारी २०१९. १४ जानेवारी २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 40. ^ "सुनील गावस्कर: भारताने वेस्ट इंडिज मालिका जिंकूनही कर्णधारपदाची बदली करण्यात आली". द टाइम्स ऑफ इंडिया. इंडो-अशियन न्यूज सर्व्हिस. २९ जून २०२०. ६ जानेवारी २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
 41. ^ "१९८४ च्या कोलकाता कसोटीसाठी कपिल देवला का वगळण्यात आले याबद्दल सुनील गावस्कर: 'मी माझ्या एकमेव मॅचविनरला का वगळू'". ७ मार्च २०२१. १४ जानेवारी २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 42. ^ "'सचिन तेंडुलकरकडे मजबूत संघ नव्हता पण तो सर्वात प्रेरणादायक कर्णधारही नव्हता'". ५ सप्टेंबर २०२०. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 43. ^ "Anil Kumble". ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ फेब्रुवारी २००९ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 44. ^ "तेंडुलकरच्या राजीनामा देण्याच्या निर्णयामागील कारणे". १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 45. ^ "२००० साली या दिवशी: मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा यांच्यावर बंदी घालण्यापूर्वी त्यांनी त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला". फर्स्टपोस्ट (इंग्रजी भाषेत). ३ जून २०२२. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 46. ^ बालचंद्रन, कनिष्का (६ एप्रिल २०२३). "'कॉट आउट' वर सुप्रिया सोबती गुप्ता: मला भारतीय क्रिकेटच्या मॅच फिक्सिंग गाथेतील मानवी घटक बाहेर आणायचे होते". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 47. ^ अनंतसुब्रमणिअन, विघ्नेश (१० नोव्हेंबर २०१७). "१० विस्मरणीय क्षण जे कोणत्याही भारतीय क्रिकेट चाहत्याला पुन्हा जगायचे नाहीत". www.sportskeeda.com (इंग्रजी भाषेत). १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 48. ^ "भारतीय क्रिकेट: मधल्या फळीतील निवृत्ती हा एका युगाचा शेवट आहे". बीबीसी न्यूज. २३ ऑगस्ट २०२२. १८ ऑक्टोबर २०१५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 49. ^ "परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारत-न्यूझीलंड द्विपक्षीय क्रिकेट संबंधांचे कौतुक केले, म्हणतात की राष्ट्र जॉन राइट, स्टीफन फ्लेमिंगला कधीही विसरणार नाही". द टाइम्स ऑफ इंडिया. ९ ऑक्टोबर २०२२. ६ मार्च २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 50. ^ "५ जुलै १९५६ - भारताचे पहिले परदेशी प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म". ६ मार्च २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 51. ^ स्टीव्ह वॉ. "I am proud that everybody gave 100%". फ्रॉम द वॉ फ्रण्ट. ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ ऑक्टोबर २००७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 52. ^ "टीडब्लूआयकडे भारत-पाकिस्तान मालिकेचे उत्पादन हक्क". द हिंदू - स्पोर्ट. २६ नोव्हेंबर २००७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 53. ^ "२००७ मध्ये या दिवशी भारताने आयसीसी टी२० विश्वचषक जिंकला होता". द टाइम्स ऑफ इंडिया. २४ सप्टेंबर २०२२. २७ एप्रिल २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 54. ^ धोनी आणि गंभीरच्या खेळीने भारताची विश्वचषकला गवसणी Archived १२ डिसेंबर २०११, at the Wayback Machine. ईएसपीएन क्रिकइन्फो. Retrieved 12 December 2011
 55. ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०११ पुनरावलोकन: मायदेशात विश्वचषक जिंकणारा भारत पहिला संघ ठरला". WION (इंग्रजी भाषेत). १६ मे २०१९. २५ ऑक्टोबर २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२२ रोजी पाहिले.
 56. ^ "एमएस धोनी ३ आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून निवृत्त झाला". १५ ऑगस्ट २०२०. १४ ऑगस्ट २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 57. ^ "धोनीची निवृत्ती: ३ आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार". १५ ऑगस्ट २०२०. १ डिसेंबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 58. ^ "२०१४ मध्ये या दिवशी: श्रीलंकेने अंतिम सामन्यात भारताला हरवून टी२० विश्वचषक जिंकला". १६ एप्रिल २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 59. ^ "टीम इंडियाचे वर्ल्ड कप २०१५ रिपोर्ट कार्ड". द टाइम्स ऑफ इंडिया. २८ मार्च २०१५. ३ जुलै २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 60. ^ "भारताने बांगलादेशचा पराभव करत विक्रमी सहाव्या आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले". द टाइम्स ऑफ इंडिया. ७ मार्च २०१६. १८ एप्रिल २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 61. ^ "३१ मार्च २०१६: एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारताचा टी२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध पराभवाचा सामना". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). ३१ मार्च २०२१. ७ एप्रिल २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 62. ^ सिद्धार्थ मोंगा (१५ जून २०१७). "प्रबळ भारताचा आणखी एका अंतिम फेरीत प्रवेश". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ जून २०१७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 63. ^ अँड्र्यू फिडेल फर्नांडो (१८ जून २०१७). "इंडिया हुडू ब्रोकन इम्फॅटिकली बाय पाकिस्तान". ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ डिसेंबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 64. ^ "विश्वचषक 2019: भारताचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास". ८ जुलै २०१९. १६ एप्रिल २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 65. ^ "२०१९ विश्वचषक उपांत्य सामना भारत वि न्यूझीलंड". ३ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 66. ^ "अंतिम निकाल, साउथहॅम्प्टन, जून १८ – २३, २०२१, आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप". ३ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 67. ^ "ऑस्ट्रेलिया वि भारत, आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३, लंडन येथील अंतिम सामना, ०७ - ११, २०२३ - पूर्ण धावफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 68. ^ "श्रीलंका वि भारत, कोलंबो येथील अंतिम सामना, आशिया चषक, सप्टेंबर १७, २०२३ - पूर्ण धावफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 69. ^ "आशिया चषक २०२३ आकडेवारी – आशिया चषक". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 70. ^ "India Asian games".
 71. ^ "कोहलीने त्याच्या ५० व्या एकदिवसीय शतकाच्या प्रसंगाचे वर्णन 'परफेक्ट पिक्चर' असे केले". १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 72. ^ "दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या द्वंद्वयुद्धानंतर भारताचे टी२० विश्वचषकावर शिक्कामोर्तब". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. २९ जून २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 73. ^ अचल, अश्विन (२९ जून २०२४). "भारत वि दक्षिण आफ्रिका, टी२० विश्वचषक अंतिम सामना: १७ वर्षांनंतर भारताने दुसरा टी२० विश्वचषक जिंकला". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. १ जुलै २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 74. ^ "टी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहून विजेतेपद पटकावणारा पहिला संघ बनून भारताने रचला इतिहासातील".
 75. ^ "निम्ब्सने किक्रेटचे हक्क $६१२ दशलक्ष किमतीमध्ये घेतले". द हिंदू. भारत. १० जानेवारी २००७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 76. ^ "भारताच्या भीतीला आयसीसीला द्यावे लागणार तोंड". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २००६. ८ फेब्रुवारी २००७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 77. ^ "भारताचे आयसीसीला आव्हान". टीव्हीएनझेड. ८ फेब्रुवारी २००७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 78. ^ "निवड धोरण क्षेत्रीय नाही : पवार". द ट्रिब्यून. भारत. ८ फेब्रुवारी २००७ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 79. ^ "टी२० विश्वचषक परिणाम: बीसीसीआयकडून संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी, नवीन समितीसाठी कर्णधारपद विभाजित करणे हे मुख्य काम". द टाइम्स ऑफ इंडिया. १८ नोव्हेंबर २०२२. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 80. ^ "बीसीसीआय कडून अखिल भारतीय वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या नियुक्त्यांची घोषणा". www.bcci.tv (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०२३ रोजी पाहिले.
 81. ^ "चेतन शर्मा यांचा बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा". द टाइम्स ऑफ इंडिया. १७ फेब्रुवारी २०२३. ISSN 0971-8257. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 82. ^ "भारताच्या मुख्य पुरुष निवडकर्ता म्हणून अजित आगरकरची निवड". क्रिकबझ्झ. ४ जुलै २०२३. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 83. ^ "बीसीसीआयकडून अजित आगरकर यांची भारताच्या निवड समितीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ५ जुलै २०२३. ISSN 0971-751X. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 84. ^ "निळ्या रंगाच्या आयकॉनिक शेड्स: १९८५ ते २०२१ पर्यंत टीम इंडियाच्या जर्सीची उत्क्रांती". WION (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०२१. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 85. ^ "रंगसंगती: क्रिकेटच्या कपड्यांच्या क्रांतीची कथा". cricket.com.au (इंग्रजी भाषेत). ९ मे २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 86. ^ "क्लासिक वर्ल्ड कप किट्स – १९९९". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). ३० एप्रिल २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 87. ^ "नाइकेने भारतीय क्रिकेट संघाला सुसज्ज करण्यासाठी बोली जिंकली". द न्यूयॉर्क टाइम्स (इंग्रजी भाषेत). एजन्सी फ्रान्स-प्रेस. २५ डिसेंबर २००५. ISSN 0362-4331. ६ मे २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 88. ^ "नाइके टीम इंडिया किटचे प्रायोजक राहील – टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 89. ^ "किट प्रायोजक नाइकेवर खेळाडू, बीसीसीआय नाराज". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). २२ ऑगस्ट २०१७. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 90. ^ "नाइकेने कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआय पोशाख प्रायोजकत्वासाठी नवीन निविदा काढणार". द फिनान्शियल एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). १९ जुलै २०२०. २५ नोव्हेंबर २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 91. ^ "एमपीएल स्पोर्ट्स अपेरल अँड आणि ॲक्सेसरीज, भारतीय क्रिकेट संघाचे नवीन किट प्रायोजक". द फिनान्शियल एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०२०. २ नोव्हेंबर २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 92. ^ "बीसीसीआय कडून एमपीएल स्पोर्ट्स टीम इंडियासाठी अधिकृत किट प्रायोजक म्हणून घोषित". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १७ नोव्हेंबर २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 93. ^ "बायजूज, एमपीएलला बीसीसीआय सोबतच्या प्रायोजकत्व करारातून बाहेर पडण्याची इच्छा". मिंट (इंग्रजी भाषेत). २२ डिसेंबर २०२२. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 94. ^ "अधिकृत घोषणेशिवाय भारताचे किट प्रायोजक बदलले, श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० साठी नवीन जर्सी लाँच". हिंदुस्थान टाइम्स (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०२३. ३ जानेवारी २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 95. ^ "KKCL's किलर ने एमपीएल स्पोर्ट्सची जागा टीम इंडियाचा अधिकृत किट प्रायोजक म्हणून घेतली". द इकॉनॉमिक टाइम्स. ६ जानेवारी २०२३. ISSN 0013-0389. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 96. ^ खोसला, वरुनी (२१ फेब्रुवारी २०२३). "आदिदास ₹३५० कोटींमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे किट प्रायोजित करणार". मिंट (इंग्रजी भाषेत). ९ मार्च २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 97. ^ "बीसीसीआय आणि आदिदासने भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत किट प्रायोजक म्हणून बहु-वर्षीय भागीदारीची घोषणा केली". www.bcci.tv (इंग्रजी भाषेत). २६ मे २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 98. ^ "भारतीय क्रिकेट संघाच्या किटचे नवे प्रायोजक म्हणून आदिदासचे नाव". हिंदुस्थान टाइम्स (इंग्रजी भाषेत). २२ मे २०२३. २६ मे २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 99. ^ "Adidas to be India's kit sponsor till 2028". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ मे २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 100. ^ "बायजू लवकर बाहेर पडण्याचा विचार करत असल्याने, आतापर्यंत भारतीय जर्सीला प्रायोजित केलेल्या प्रत्येक ब्रँडचे नाव". www.mensxp.com (इंग्रजी भाषेत). २२ डिसेंबर २०२२. ६ मे २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
 101. ^ "Test results summary". Cricinfo. 20 November 2012 रोजी पाहिले.
 102. ^ "ODI results summary". Cricinfo. 25 April 2012 रोजी पाहिले.
 103. ^ "T20I results summary". Cricinfo. 25 April 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  भारत च्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

इराणी करंडक · चॅलेंजर करंडक · दुलीप करंडक · रणजी करंडक · रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा · देवधर करंडक