क्रिकेट विश्वचषक, १९८३

१९८३ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव १९८३ प्रुडेंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे हे तिसरे आयोजन होते. ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये ९ ते २५ जून १९८३ च्या दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज श्रीलंकाझिम्बाब्वे या ८ संघांनी सहभाग घेतला. गट फेरीचे सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ उपांत्य फेरीत गेले. या आधीची स्पर्धा इंग्लंडमध्ये चार वर्षांपूर्वी १९७९ साली झाली. मागील विजेते वेस्ट इंडीज संघ होता.

१९८३ प्रुडेंशियल चषक
तारीख ९ – २५ जून १९८३
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६० षटके)
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान इंग्लंड इंग्लंड
वेल्स वेल्स
विजेते भारतचा ध्वज भारत (१ वेळा)
सहभाग
सामने २७
प्रेक्षक संख्या २,३२,०८१ (८,५९६ प्रति सामना)
सर्वात जास्त धावा इंग्लंड डेव्हिड गॉव्हर (३८४)
सर्वात जास्त बळी भारत रॉजर बिन्नी (१८)
१९७९ (आधी) (नंतर) १९८७

सर्व सामने ६० षटकांचे होते व सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले.

इंग्लंड, पाकिस्तान, भारत व वेस्ट इंडीज संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले. २५ जून १९८३ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघाला ४१ धावांनी हरवत विश्वचषक पटकावला.

स्पर्धा प्रकार संपादन

साखळी सामन्यांसाठी ४ संघांचा १ गट बनवण्यात आला होता. या गटातील प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळला व गटातील मुख्य दोन संघ दुसऱ्या गटातील प्रमुख दोन संघांसोबत बाद फेरीतील सामने खेळले.

सहभागी देश संपादन

या स्पर्धेच्या पात्रता फेरी साठी पहा : १९८२ आय.सी.सी. चषक

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
  इंग्लंड यजमान, आयसीसी संपूर्ण सदस्य १९७९ उपविजेते(१९७९)
  ऑस्ट्रेलिया आयसीसी संपूर्ण सदस्य १९७९ उपविजेते(१९७५)
  भारत १९७९ गट फेरी (१९७५)
  न्यूझीलंड १९७९ उपांत्य फेरी (१९७५, १९७९)
  पाकिस्तान १९७९ उपांत्य फेरी (१९७९)
  वेस्ट इंडीज १९७९ विजेते (१९७५, १९७९)
  श्रीलंका १९७९ गट फेरी (१९७५, १९७९)
  झिम्बाब्वे १९८२ आय.सी.सी. चषक पदार्पण पदार्पण

संघ संपादन

मैदान संपादन

मैदान शहर प्रेक्षक क्षमता
काउंटी मैदान ब्रिस्टल ७०००
काउंटी मैदान डर्बी ९५००
काउंटी मैदान साउथहँप्टन ७०००
काउंटी मैदान टाँटन ६५००
एजबॅस्टन मैदान बर्मिंगहॅम २१,०००
ग्रेस रोड लेस्टर १२०००
हेडिंग्ले मैदान लीड्स १७०००
ओव्हल मैदान लंडन २३५००
लॉर्ड्‌स लंडन ३००००
नेविल मैदान टर्नब्रिज वेल्स ४५००
ओल्ड ट्रॅफर्ड मॅंचेस्टर १९०००
सेंट हेलेन्स स्वॉन्झी ४५००
ट्रेंट ब्रिज मैदान नॉटिंगहॅम १५,३५०

साखळी सामने संपादन

गट अ संपादन

संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
  इंग्लंड २० ४.६७१ बाद फेरीत बढती
  पाकिस्तान १२ ४.०१४
  न्यूझीलंड १२ ३.९२७ स्पर्धेतून बाद
  श्रीलंका ३.७५२

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

१३ जून १९८३
धावफलक
पाकिस्तान  
१९३/८ (६० षटके)
वि
  इंग्लंड
१९९/२ (५०.४ षटके)


२० जून १९८३
धावफलक
श्रीलंका  
१३६ (५०.४ षटके)
वि
  इंग्लंड
१३७/१ (२४.१ षटके)


गट ब संपादन

संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
  वेस्ट इंडीज २० ४.३०८ बाद फेरीत बढती
  भारत १६ ३.८७०
  ऑस्ट्रेलिया ३.८०८ स्पर्धेतून बाद
  झिम्बाब्वे ३.४९२

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद
११ जून १९८३
धावफलक
झिम्बाब्वे  
१५५ (५१.४ षटके)
वि
  भारत
१५७/५ (३७.३ षटके)१५ जून १९८३
धावफलक
वेस्ट इंडीज  
२८२/९ (६० षटके)
वि
  भारत
२१६ (५३.१ षटके)


बाद फेरी संपादन

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
जून २२ - ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
   इंग्लंड २१३  
   भारत २१७/४  
 
जून २५ - लॉर्ड्स, लंडन
       भारत १८३
     वेस्ट इंडीज १४०
जून २२ - द ओव्हल, लंडन
   पाकिस्तान १८४/८
   वेस्ट इंडीज १८८/२  

उपांत्य फेरी संपादन

उपांत्य फेरीतील दोन सामने २२ जून रोजी खेळविण्यात आले.

पहिला उपांत्य सामना संपादन

पहिला उपांत्य सामना इंग्लंड क्रिकेट संघ वि भारत क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये मॅंचेस्टर शहरातील ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानावर झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीला यजमान संघ भारतीय संघाला आरामात स्पर्धेतून बाहेर काढून टाकेल असे क्रिकेट तज्ञांचे मत होते. परंतु भारतीय गोलंदांजांनी इतकी भेदक गोलंदाजी सुरू केली की इंग्लिंश फलंदाजांना चेंडू मारताच येईना, बॅटची कड लागून अनेक चेंडू भरकटायला लागले. इंग्लंड संघ भारतीय गोलंदाजी समोर टिकाव धरू शकला नाही आणि परिणामी इंग्लंड संघ २१३ धावांवर सर्वबाद झाला. ग्रेम फाउलर याने ५९ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ३३ धावा केल्या तर भारताकडून कर्णधार कपिल देव याने ११ षटकांत ३५ धावा देत ३ गडी बाद केले. मोहिंदर अमरनाथ आणि रॉजर बिन्नी या दोघांनीही प्रत्येकी २ गडी बाद केले. इंग्लंडच्या २१३ धावांचा पाठलाग भारताने दणक्यात सुरू केला. यशपाल शर्मा आणि संदीप पाटीलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ५४.४ षटकांतच लक्ष्य गाठले आणि पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. यशपाल शर्मा याने ११५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या तर संदीप पाटील याने ३२ चेंडूत ८ चौकारांनिशी ५१ धावा केल्या. गोलंदाजीत १२ षटकांत २७ धावा देत २ गडी बाद करून आणि नंतर ९२ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ४६ धावा करत भारताच्या विजयात मोलाचा खेळ खेळणाऱ्या मोहिंदर अमरनाथ याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

२२ जून १९८३
धावफलक
इंग्लंड  
२१३ (६० षटके)
वि
  भारत
२१७/४ (५४.४ षटके)


पहिला उपांत्य सामना संपादन

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये १९८३ क्रिकेट विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना २२ जून खेळविण्यात आला. लंडन शहरातील द ओव्हल मैदानावर हा सामना पार पडला. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजच्या भेदर माऱ्यासमोर पाकिस्ताननी संघ टिकाव धरू शकला नाही. मोहसीन खान याच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानला ६० षटकात १८४ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानने ८ गडी गमावले. पाकिस्तानी डावात मोहसीन खानच अर्धशतक पूर्ण करू शकला. त्याने १७६ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने ७० धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून माल्कम मार्शल याने सर्वाधिक ३ गडी बाद केले. वेस्ट इंडीजने १८४ या छोट्या धावसंख्येचा पाठलाग अगदी धमाक्यात सुरू केला. उपकर्णधार सर व्हिव्हियन रिचर्ड्स याने ९६ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ८० धावा केल्या तर लॅरी गोम्सच्या ही महत्त्वपूर्ण अश्या ५० धावांच्या जोरावर ८ गडी राखत वेस्ट इंडीजने सामना जिंकला आणि गेल्या २ वेळचे विश्वविजेते असलेला वेस्ट इंडीज क्रिकेट संघ सलग तिसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.


अंतिम सामना संपादन

२५ जून १९८३ रोजी लॉर्ड्स मैदानावर १९८३ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांचे वेस्ट इंडीजच्या भेदक माऱ्यासमोर धिंडवडे निघाले. भारत ५४.४ षटकात १८३ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून कृष्णम्माचारी श्रीकांत याने सर्वाधिक ३८ धावा केल्या. वेस्ट इंडीजच्या अँडी रॉबर्ट्स, माल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग या गोलंदाजी चौकडीने भारतीय फलंदाजीचे तीनतेरा वाजवले. वेस्ट इंडीज संघ सलग तिसऱ्या विश्वविजेतेपदाकडे वाटलाच करु लागला. परंतु दुसऱ्या डावात वातावरणाचा पुरेपूर फायदा भारताला झाला. १८४ ही छोटी धावसंख्या पाठलाग करताना वेस्ट इंडीजला डोंगराएवढी वाटू लागली. खेळपट्टीच्या बदललेली स्थितीने भारतीय गोलंदाजांनी अतिशय भेदर गोलंदाजी सुरू केली. मोहिंदर अमरनाथ आणि मदनलाल या जोडीने ६ गडी बाद केले आणि ५२ षटकांतच वेस्ट इंडीज संघ केवळ १४० धावांवर बाद झाला. भारताने अशक्य कामगिरी शक्य करून दाखविली होती. २ वेळच्या विश्वविजेता वेस्ट इंडीज संघाला ४३ धावांनी हरवत भारताने पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला. मोहिंदर अमरनाथला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

२५ जून १९८३
धावफलक
भारत  
१८३ (५४.४ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१४० (५२ षटके)


विक्रम संपादन

फलंदाजी संपादन

सर्वात जास्त धावा

  1. डेव्हिड गॉव्हर (इंग्लंड) - ३८४
  2. व्हिवियन रिचर्ड्‌स (वेस्ट इंडीज) - ३६७
  3. ग्रॅन्ट फ्लॉवर (इंग्लंड) - ३६०

गोलंदाजी संपादन

सर्वात जास्त बळी

  1. रॉजर बिन्नी (भारत) - १८
  2. मदन लाल (भारत) - १७
  3. मेल (श्रीलंका) - १७

अधिक माहिती .. Archived 2006-09-24 at the Wayback Machine.

बाह्य दुवे संपादन