मँचेस्टर

(मॅंचेस्टर या पानावरून पुनर्निर्देशित)

मॅंचेस्टर (इंग्लिश: Manchester हे इंग्लंड देशामधील महानगरी बरो व एक प्रमुख शहर आहे. हे शहर इंग्लंडच्या मध्य-उत्तर भागात वसले असून ते ग्रेटर लंडन खालोखाल ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

मॅंचेस्टर
Manchester
युनायटेड किंग्डममधील शहर


चिन्ह
मॅंचेस्टरचे ग्रेटर मॅंचेस्टरमधील स्थान
मॅंचेस्टर is located in इंग्लंड
मॅंचेस्टर
मॅंचेस्टर
मॅंचेस्टरचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 53°28′N 2°14′W / 53.467°N 2.233°W / 53.467; -2.233

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश वायव्य इंग्लंड
काउंटी ग्रेटर मॅंचेस्टर
स्थापना वर्ष इ.स.चे पहिले शतक
क्षेत्रफळ ११५.६५ चौ. किमी (४४.६५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२५ फूट (३८ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ५,०२,९००
  - घनता ४,३४९ /चौ. किमी (११,२६० /चौ. मैल)
  - महानगर २५,५३,३७९
प्रमाणवेळ यूटीसी±००:००
manchester.gov.uk


सुमारे १८२० सालामधील मॅंचेस्टर येथील एक यंत्रमाग कारखाना

१९व्या शतकापर्यंत एक लहान गाव राहिलेले मॅंचेस्टर औद्योगिक क्रांतीदरम्यान जगातील पहिले औद्योगिक शहर बनले. येथील वस्त्र निर्माण उद्योग जगातील सर्वात मोठा होता. लिव्हरपूल ते मॅंचेस्टर ही १८३० साली धावलेली जगातील सर्वात पहिली व्यावसायिक रेल्वे सेवा होती व मॅंचेस्टर येथे जगातील पहिले रेल्वे स्थानक बांधले गेले होते. इ.स. १८९४ मध्ये बांधल्या गेलेल्या मॅंचेस्टर कालव्याद्वारे मॅंचेस्टर आयरिश समुद्रासोबत जोडले गेले ज्यामुळे येथील उद्योगास अधिकच चालना मिळाली.

सध्या मॅंचेस्टर हे इंग्लंडमधील एक प्रगत शहर असून येथील संगीत, वास्तूशास्त्र, खेळ इत्यादींसाठी ते प्रसिद्ध आहे. येथे राहणारे १४.४ टक्के लोक दक्षिण आशियाई वंशाच्या आहेत.

मॅंचेस्टर शहर खेळांकरिता प्रसिद्ध असून प्रीमियर लीगमध्ये खेळणारे मॅंचेस्टर युनायटेडमॅंचेस्टर सिटी हे दोन सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. २००२ राष्ट्रकुल खेळ येथील सिटी ऑफ मॅंचेस्टर स्टेडियममध्ये आयोजीत केले गेले. हे स्टेडियम सध्या मॅंचेस्टर सिटी हा क्लब वापरत असून मॅंचेस्टर युनायटेड आपले सामने ओल्ड ट्रॅफर्ड ह्या ऐतिहासिक मैदानामधून खेळतो. मॅंचेस्टरमध्ये आजवर १९६६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो १९९६, २०१२ उन्हाळी ऑलिंपिक, २००३ युएफा चॅंपियन्स लीग अंतिम सामना तसेच २००८ युएफा युरोपा लीग अंतिम सामना इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे सामने खेळवले गेले आहेत.

इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये खेळणारा लॅंकेशायर काउंटी क्रिकेट क्लब मॅंचेस्टर येथे स्थित आहे व तो आपले सामने ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानामधून खेळतो.

वाहतूक

संपादन

मॅंचेस्टर विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून तो २०१३ साली ब्रिटनमधील तिसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: