ब्रिस्टल (इंग्लिश: Bristol ही इंग्लंड देशामधील एक शहरी काउंटी व प्रमुख शहर आहे. ब्रिस्टल शहर इंग्लंडच्या नैर्ऋत्य भागात एव्हॉन नदीच्या व अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१४ साली ४.३२ लाख लोकसंख्या असलेले ब्रिस्टल इंग्लंडमधील सहाव्या तर युनायटेड किंग्डममधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

ब्रिस्टल
Bristol
युनायटेड किंग्डममधील शहर


लिव्हरपूलचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 51°27′N 2°35′W / 51.450°N 2.583°W / 51.450; -2.583

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश नैर्ऋत्य इंग्लंड
स्थापना वर्ष इ.स. ११५५
क्षेत्रफळ ११० चौ. किमी (४२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३६ फूट (११ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ४,३२,५००
  - घनता ३,८९२ /चौ. किमी (१०,०८० /चौ. मैल)
  - महानगर १०,०६,६००
प्रमाणवेळ यूटीसी±००:००

इ.स. ११५५ साली शहराचा दर्जा मिळालेले ब्रिस्टल १३व्या ते १८व्या शतकांदरम्यान लंडन खालोखाल यॉर्कनॉरविकसोबत इंग्लंडमधील सर्वात महत्त्वाचे शहर होते. औद्योगिक क्रांतीदरम्यान मॅंचेस्टर, बर्मिंगहॅम, लिव्हरपूल इत्यादी शहरांची झपाट्याने प्रगती झाली व ब्रिस्टलचे महत्त्व काहीसे कमी झाले. तरीही सध्या ब्रिस्टल इंग्लंड देशामधील एक प्रगत व सुबत्त शहर आहे.

ब्रिस्टल विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

जुळी शहरे

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: