पी.आर. मान सिंग (२४ नोव्हेंबर, १९३८ - ) हे भारतातील प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आणि प्रशासक आहेत. १९८३ क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते व्यवस्थापक होते. त्यांच्या व्यवस्थापनात भारतीय संघ १९८७ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचला. यानंतर त्यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून काम केले.

पी.आर. मान सिंग
व्यक्तिगत माहिती
जन्म [[ ]], [[{{{वर्षजन्म}}}|{{{वर्षजन्म}}}]] ({{{वर्षजन्म}}}-{{{महिनाजन्म}}}-{{{दिनांकजन्म}}}) (वय: अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "{")[[वर्ग:{{{वर्षजन्म}}} मधील जन्म]]
भारत
कारकिर्दी माहिती
प्रथमवर्गीय{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा ५७ {{{धावा२}}} {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी {{{फलंदाजीची सरासरी१}}} {{{फलंदाजीची सरासरी२}}} {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके {{{शतके/अर्धशतके१}}} {{{शतके/अर्धशतके२}}} {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी {{{बळी१}}} {{{बळी२}}} {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी ५९.०० {{{गोलंदाजीची सरासरी२}}} {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी१}}} {{{५ बळी२}}} {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी१}}} {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

१३ ऑक्टोबर, इ.स. २०२३
दुवा: ESPNcricinfo (इंग्लिश मजकूर)

कारकीर्द

संपादन

मान सिंग हे उजव्या हाताचा फलंदाज आणि ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून १९६५-६९ दरम्यान पाच प्रथम वर्गीय सामने खेळले. त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादचे आणि मोइन-उद-दौलाह सुवर्ण चषक स्पर्धेत हैदराबाद ब्लूजचे प्रतिनिधित्व केले. [] []

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर मानसिंग यांनी क्रिकेट प्रशासनाचे काम केले. १९७८ मध्ये भारताच्या पाकिस्तान दौऱ्यावर त्यांनी सहाय्यक संघ व्यवस्थापक म्हणून काम केले [] 1१९८३ च्या क्रिकेट विश्वचषकासाठी व्यवस्थापक म्हणून त्यांची निवड करण्यात आली. या पदासाठी बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत झालेल्या मतदानात निरंजन शाह यांच्यावर १५-१३ अशी मात केली होती. [] कपिल देव यांची या स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती करणाऱ्या सहा सदस्यीय निवड समितीचा मानसिंग भाग होते. यानंतर त्यांनी आणि कपिल देव यांनी स्पर्धेसाठीचा संघ निवडला. [] इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या सुरुवातीस सट्टेबाजांची भारताला ६७ पैकी १ असा भाव दिला होता. अनेक अडचणींवर मात करीत भारताने ही स्पर्धा जिंकली व त्याद्वारे भारतीय क्रिकेटच नव्हे तर संपूर्ण भारताचा इतिहास बदलला. []

या स्पर्धेआधि विस्डेन क्रिकेट मंथली या नियतकालिकाच्या संपादक डेव्हिड फ्रिथ यांनी भारतीय संघाला अत्यल्प ठरवीत जाहीर केले की भारताने जर ही स्पर्धा जिंकली तर मी स्वतःचे "शब्द खाईन". भारताने हा चषक जिंकल्यावर मान सिंग यांनी फ्रिथ यांना याची आठवण करून दिली. आपल्या मासिकाच्या सप्टेंबर १९८३ च्या आवृत्तीत फ्रिथ यांनी मानसिंग यांच्या पत्राची एक प्रत आणि आपल्या तोंडात कागदाचा तुकडा असलेल्या छायाचित्रासह, "भारताने मला माझे शब्द खाण्यास लावले" असे छायाचित्र दिले होते. [] [] []

वैयक्तिक जीवन

संपादन

मानसिंग हे सिकंदराबादमधील कारखाना भागात राहतात. त्यांनी आल्या घराला पॅव्हेलियन असे नाव दिले आहे. येथे त्यांनी आपल्या कारकीर्दीदरम्यान एकत्र केलेल्या शेकडो पुस्तके, टाय, बॅट आणि इतर अनेक आठवणींच्या कक्षाे उद्घाटन 2003 मध्ये सचिन तेंडुलकरने केले होते. [] []

चित्रण

संपादन

भारताच्या १९८३ विश्वचषक विजयावर आधारित २०२१चा भारतीय चित्रपट ८३मध्ये पंकज त्रिपाठी यांनी मान सिंगची व्यक्तिरेखा साकारली. चित्रपटात मान सिंग हैदराबाद बोलीचा वापर हुबहू करताना दिसते. []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Man Singh". CricketArchive. 2021-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 December 2019 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "PR Man Singh: One-man treasure trove of cricket tales and memorabilia". Cricbuzz. 22 December 2015. 26 December 2019 रोजी पाहिले.
  3. ^ a b Lokapally, Vijay (26 June 2019). "When manager flouted Board rules". Sportstar. 26 December 2019 रोजी पाहिले.
  4. ^ Subrahmanyam, V. V. (25 May 2019). "I enjoyed every bit of my role, says 1983 cricket World Cup manager Man Singh". The Hindu. 26 December 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "The year everything changed".
  6. ^ "1983 WC triumph: did you know?". News18. 25 June 2010. 26 December 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "When Kapil's Devils made a scribe eat his words". DNA India. 21 June 2008. 26 December 2019 रोजी पाहिले.
  8. ^ Das, Jagannath (5 July 2019). "Chattis saal baad…Man Singh has it all". Telangana Today. 26 December 2019 रोजी पाहिले.
  9. ^ "Pankaj Tripathi on meeting manager Man Singh for 83: Got emotional listening to his life journey". India Today. 4 July 2019. 26 December 2019 रोजी पाहिले.