भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७८-७९
भारत क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्धामुळे तब्बल १४ वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळली. भारताचा हा दुसरा पाकिस्तान दौरा होता. पाकिस्तानी भूमीवर भारताने पहिल्यांदा एकदिवसीय सामने खेळले. कसोटी मालिकेत पाकिस्तानने २-० असा विजय संपादन केला. हा भारताविरुद्धचा पाकिस्तानचा पहिला कसोटी मालिका विजय ठरला. एकदिवसीय मालिकादेखील पाकिस्तानने २-१ अशी जिंकली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये सरफ्राज नवाझच्या गोलंदाजीवर सातत्याने बाहेर जाणाऱ्या चेंडूंना पंच वाईड देत नाहीत हे बघून भारतीय संघ संतापला. भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदी याने निषेध म्हणून संघासह मैदानत्याग केला. आयसीसीने तिसरा सामना पाकिस्तानला बहाल करत विजयी घोषित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्या पद्धतीने निकाल लागलेला हा एकमेव सामना आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७८-७९ | |||||
पाकिस्तान | भारत | ||||
तारीख | १ ऑक्टोबर – १९ नोव्हेंबर १९७८ | ||||
संघनायक | मुश्ताक मोहम्मद | बिशनसिंग बेदी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | झहिर अब्बास (५८३) | सुनील गावसकर (४४७) | |||
सर्वाधिक बळी | सरफ्राज नवाझ (१७) | भागवत चंद्रशेखर (८) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन १ ऑक्टोबर १९७८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी एकमेकांविरुद्ध पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- पाकिस्तानी भूमीवर भारताने प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- भारताने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- सुरिंदर अमरनाथ, चेतन चौहान आणि कपिल देव (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन १३ ऑक्टोबर १९७८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अझमत राणा (पाक) आणि यशपाल शर्मा (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादन ३ नोव्हेंबर १९७८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- खेळपट्टीच्या बाहेर जाणाऱ्या अनेक चेंडूंना वाईड घोषित न केल्याने संतप्त भारतीय संघाने सामना अर्ध्यावरच सोडून मैदान त्यागले.
- भरत रेड्डी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१६-२१ ऑक्टोबर १९७८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- कपिल देव (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
संपादन२७ ऑक्टोबर - १ नोव्हेंबर १९७८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- मायदेशात पाकिस्तानचा भारतावर पहिला कसोटी विजय.