क्रिकेट विश्वचषक, १९८७

१९८७ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव १९८७ रिलायन्स विश्वचषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे हे चौथे आयोजन होते. ही स्पर्धा भारत आणि पाकिस्तानमध्ये ८ ऑक्टोबर - ८ नोव्हेंबर १९८७ च्या दरम्यान खेळवली गेली. प्रथमच इंग्लंडबाहेर विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय उपखंडातील भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये विश्वचषक स्पर्धा प्रथमच भरविण्यात आली. ही स्पर्धा रिलायन्स ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, श्रीलंकाझिम्बाब्वे या ८ संघांनी सहभाग घेतला. गट फेरीचे सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ उपांत्य फेरीत गेले. या आधीची स्पर्धा इंग्लंडमध्ये चार वर्षांपूर्वी १९८३ साली झाली. मागील विजेते भारत संघ होता.

१९८७ रिलायन्स विश्वचषक
तारीख ८ ऑक्टोबर – ८ नोव्हेंबर १९८७
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान भारत भारत
पाकिस्तान पाकिस्तान
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१ वेळा)
सहभाग
सामने २७
सर्वात जास्त धावा इंग्लंड ग्रॅहम गूच (४७१)
सर्वात जास्त बळी ऑस्ट्रेलिया क्रेग मॅकडरमॉट (१८)
१९८३ (आधी) (नंतर) १९९२

सर्व सामने ५० षटकांचे होते व सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले.

इंग्लंड, पाकिस्तान, भारत व ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले. ८ नोव्हेंबर १९८७ रोजी इडन गार्डन्सवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ धावांनी हरवत विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. इंग्लंडच्या ग्रॅहाम गूच ने स्पर्धेत सर्वाधिक ४७१ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाचा क्रेग मॅकडरमॉट सर्वाधिक बळी (१८) घेणारा खेळाडू ठरला.

स्पर्धा प्रकार

संपादन

साखळी सामन्यांसाठी ४ संघांचा १ गट बनवण्यात आला होता. या गटातील प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळला व गटातील मुख्य दोन संघ दुसऱ्या गटातील प्रमुख दोन संघांसोबत बाद फेरीतील सामने खेळले.

सहभागी देश

संपादन

या स्पर्धेच्या पात्रता फेरी साठी पहा : १९८६ आय.सी.सी. चषक

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
  भारत यजमान, आयसीसी संपूर्ण सदस्य १९८३ विजेते(१९८३)
  पाकिस्तान १९८३ उपांत्य फेरी(१९७५, १९८३)
  ऑस्ट्रेलिया आयसीसी संपूर्ण सदस्य १९८३ उपविजेते(१९७५)
  इंग्लंड १९८३ उपविजेते(१९७९)
  न्यूझीलंड १९८३ उपांत्य फेरी (१९७५, १९७५)
  श्रीलंका १९८३ गट फेरी(१९७५, १९७९, १९८३)
  वेस्ट इंडीज १९८३ विजेते(१९७५, १९७९)
  झिम्बाब्वे १९८६ आय.सी.सी. चषक १९८३ गट फेरी(१९८३)

मैदान

संपादन

भारतातील मैदाने

संपादन
मैदान शहर
ईडन गार्डन्स कोलकाता
वानखेडे स्टेडियम बॉम्बे
एम.ए. चिदंबरम स्टेडियम मद्रास
लाल बहादूर शास्त्री मैदान हैदराबाद
एम. चिन्नास्वामी स्टेडियम बंगळूर
नेहरू स्टेडियम इंदूर
फिरोजशाह कोटला मैदान दिल्ली
सरदार पटेल स्टेडियम अहमदाबाद
सेक्टर १६ स्टेडियम चंदिगढ
बाराबती स्टेडियम कटक
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान नागपूर
ग्रीन पार्क कानपूर
सवाई मानसिंग मैदान जयपूर
नेहरू स्टेडियम पुणे

पाकिस्तानातील मैदाने

संपादन
मैदान शहर
इक्बाल स्टेडियम फैसलाबाद
जिन्ना स्टेडियम गुजराणवाला
नियाझ स्टेडियम हैदराबाद
इक्बाल स्टेडियम कराची
गद्दाफी स्टेडियम लाहोर
अरबाब नियाझ स्टेडियम पेशावर
पिंडी क्लब मैदान रावळपिंडी

गट फेरी

संपादन
संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
  भारत २० ५.४१३ बाद फेरीत बढती
  ऑस्ट्रेलिया २० ५.१९३
  न्यूझीलंड ४.८८७ स्पर्धेतून बाद
  झिम्बाब्वे ३.७५७

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद





१७ ऑक्टोबर १९८७
धावफलक
झिम्बाब्वे  
१३५ (४४.२ षटके)
वि
  भारत
१३६/२ (२७.५ षटके)








संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
  पाकिस्तान २० ५.००७ बाद फेरीत बढती
  इंग्लंड १६ ५.१४०
  वेस्ट इंडीज १२ ५.१६० स्पर्धेतून बाद
  श्रीलंका ४.०४१

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद











३० ऑक्टोबर १९८७
धावफलक
श्रीलंका  
२१८/७ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२१९/२ (४१.२ षटके)


बाद फेरी

संपादन
  उपांत्य सामने अंतिम सामना
             
नोव्हेंबर ४ - गद्दाफी स्टेडियम, लाहोर
   पाकिस्तान २५२/१०  
   ऑस्ट्रेलिया २६७/७  
 
नोव्हेंबर ८ - ईडन गार्डन्स, कोलकाता
       ऑस्ट्रेलिया २५३/५
     इंग्लंड २४६/८
नोव्हेंबर ५ - वानखेडे स्टेडियम, मुंबई
   भारत २१९/१०
   इंग्लंड २५४/६  

उपांत्य फेरी

संपादन

उपांत्य फेरीतील दोन सामने ४ नोव्हेंबर आणि ५ नोव्हेंबर रोजी खेळविण्यात आले.

पहिला उपांत्य सामना

संपादन

पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ वि पाकिस्तान क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये लाहोर मधील गद्दाफी स्टेडियम या मैदानावर झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड बूनच्या संयमी ६५ धावांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड बून आणि डीन जोन्स या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदरी केली. ऑस्ट्रेलिया ३०० धावांचा टप्पा गाठणार असे वाटत असतानाच पाकिस्तानी कर्णधार इम्रान खान याच्या भेदक गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शरणागती पत्करली. इम्रान ने ५ षटकांमध्ये १७ धावा देऊन ३ गडी बाद गेले. परंतु पुढे पाकिस्तानी गोलंदाजांनी तब्बल ३४ अवांतर धावा दिल्याने ऑस्ट्रेलियाला २६७ धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानची ३८ धावांवर ३ बाद खराब सुरुवात झाली. तदनंतर कर्णधार इम्रान खान (८४ चेंडूत ५८ धावा) आणि उपकर्णधार जावेद मियांदाद (१०३ चेंडूत ७० धावा) यांनी २६ षटकांमध्ये ११२ धावा जोडल्या. परंतु जावेद मियांदाद बाद झाल्यावर आवश्यक धावगती ७.८७ च्या वर गेली. पुढे पाकिस्ताने ९९ धावात ६ गडी गमावत २४९ धावांवर पाकिस्तान संघ सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने उपांत्य सामना १८ धावांनी जिंकत दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

दुसरा उपांत्य सामना

संपादन

दुसरा उपांत्य सामना बॉम्बे मधील वानखेडे स्टेडियम येथे खेळविण्यात आला. यजमान भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड ७९ धावांवर २ गडी बाद असताना, घडाडीचा फलंदाज ग्रॅहाम गूच (१३६ चेंडूत ११५ धावा) आणि कर्णधार माईक गॅटिंग (६२ चेंडूत ५६ धावा) या जोडीच्या उत्तम फलंदाजीने इंग्लंडची धावसंख्या १९ षटकांमध्ये ११७ धावांपर्यंत जाऊन पोचली. ग्रॅहाम गूच बाद झाल्यावर धावसंख्येत आणखी ५१ धावांची भर पडत इंग्लंडने ६ गडी गमावत २५४ धावांपर्यंत मजल मारली. भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. सुरुवातीस भारताने ७३ धावांमध्ये ३ गडी गमावले. मधल्या फळीतील मोहम्मद अझहरुद्दीन (७४ चेंडूत ६४ धावा) ने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एडी हेमिंग्स ने जेव्हा मोहम्मद अझहरुद्दीनला पायचीत बाद केले तेव्हा भारत ५ गडी गमावून २०४ धावांवर होता. भारताला शेवटच्या १० षटकांमध्ये ५ गडी शिल्लक असताना ५० धावांची गरज होती. सामना अटीतटीच्या स्थितीत पोचला. भक्कम स्थितीत असताना देखील भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज आणि तळातील फलंदाजांना खेळपट्टीवर टिकता आले नाही. शेवटचे ५ गडी भारताने केवळ १५ धावांमध्ये गमावले. ४५.३ षटकांमध्ये २१९ धावांवर भारत सर्वबाद झाला. चार वर्षांपूर्वी भारताकडून झालेल्या पराभवाचे उट्टे इंग्लंडने या उपांत्य फेरीत भारताला हरवत काढत दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

५ नोव्हेंबर १९८७
धावफलक
इंग्लंड  
२५४/६ (५० षटके)
वि
  भारत
२१९ (४५.३ षटके)


अंतिम सामना

संपादन

१९८७ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकाता मधील ईडन गार्डन्स येथे खेळविण्यात आला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. डेव्हिड बून (१२५ चेंडूत ७५ धावा) आणि माइक व्हेलेटा (३१ चेंडूत ४५ धावा) या जोडीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकांमध्ये २५३ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर टिम रॉबिन्सन पायचीत बाद झाला. बिल ॲथी (१०३ चेंडूत ५८ धावा) आणि कर्णधार माईक गॅटिंग (४५ चेंडूत ४१ धावा) या दोघांनी चिवट खेळ केला. परंतु कर्णधार माईक गॅटिंग बाद झाल्यावर सामन्याचे पारडे ऑस्ट्रेलियाकडे फिरले. त्यानंतर ॲलन लॅम्ब (५५ चेंडूत ४५ धावा) याने डाव सावरण्याची पराकाष्ठा केली. पण आवश्यक धावगती वाढू लागली. शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असताना इंग्लंड त्या १७ धावा करु शकला नाही. ऑस्ट्रेलियाने सामना ७ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाने प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला. इंग्लंडला दुसऱ्यांदाही क्रिकेट विश्वचषकाअच्या विजेतेपदापासून वंचित रहावे लागले.


विक्रम

संपादन

फलंदाजी

संपादन

सर्वात जास्त धावा

  1. ग्रहम गूच (ईंग्लडं) - ४७१
  2. डेव्हिड बून (ईंग्लडं) - ४४७
  3. जैफ मार्श (ऑस्ट्रेलिया) - ४२८

गोलंदाजी

संपादन

सर्वात जास्त बळी

  1. क्रेग मॅकडर्मॉट (ऑस्ट्रेलिया) - १८
  2. इम्रान खान (पाकिस्तान) - १७
  3. बी पीटर्सन (वेस्ट इंडीज) - १४

अधिक माहिती .. Archived 2006-09-23 at the Wayback Machine.

बाह्य दुवे

संपादन