आकाश दीप (जन्म १५ डिसेंबर १९९६) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे.[] त्याने ९ मार्च २०१९ रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०१८-१९ मध्ये बंगालसाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.[] त्याने २४ सप्टेंबर २०१९ रोजी २०१९-२० विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगालसाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[] त्याने २५ डिसेंबर २०१९ रोजी बंगालकडून २०१९-२० रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केले.[]

आकाश दीप
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
आकाशदीप सिंग
जन्म १५ डिसेंबर, १९९६ (1996-12-15) (वय: २७)
बद्दी सासाराम, बिहार, भारत
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात वेगवान मध्यम
भूमिका गोलंदाज
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१९-सध्या बंगाल
२०२२ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २८ मार्च २०२२

३० ऑगस्ट २०२१ रोजी, दीपचा यूएई मध्ये २०२१ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या दुसऱ्या टप्प्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात समावेश करण्यात आला.[] फेब्रुवारी २०२२ मध्ये, २०२२ इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला विकत घेतले.[] २०२२ आशियाई खेळांसाठी भारताच्या संघात जखमी शिवम मावीच्या जागी आकाश दीपचा समावेश करण्यात आला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Akash Deep". ESPNcricinfo. 9 March 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Super League Group A, Syed Mushtaq Ali Trophy at Indore, Mar 9 2019". ESPNcricinfo. 9 March 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Elite, Group C, Vijay Hazare Trophy at Jaipur, Sep 24 2019". ESPNcricinfo. 24 September 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Elite, Group A, Ranji Trophy at Kolkata, Dec 25–28 2019". ESPNcricinfo. 25 December 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Akash Deep replaces injured Washington in RCB". CricBuzz (इंग्रजी भाषेत). 30 August 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "IPL 2022 auction: The list of sold and unsold players". ESPNcricinfo. 13 February 2022 रोजी पाहिले.