क्रिकेट विश्वचषक, २०११


इ.स. २०११ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी १९ ते एप्रिल २, इ.स. २०११च्या दरम्यान भारत, श्रीलंकाबांगलादेशमध्ये खेळवण्यात आली. चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत ५० षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात आले.[] फेब्रुवारी १७ रोजी उद्घाटन सोहळा होउन[] १९ फेब्रुवारीला पहिला सामना भारतचा ध्वज भारत आणि बांगलादेशचा ध्वज बांगलादेशमध्ये ढाका येथे शेर-ए-बांगला मैदानात खेळला गेला.[] प्रत्येकी सात संघ असलेल्या दोन गटांत साखळी सामने झाल्यावर त्यांतील सर्वोच्च चार-चार संघानी बाद फेरीत भाग घेतला. एप्रिल २ रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करीत विश्वविजेतेपद मिळवले. यजमान संघाने विश्वविजेतेपद जिकण्याची ही प्रथमच वेळ आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०११
क्रिकेट विश्वचषक, २०११, नकाशा
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान भारत ध्वज भारत
श्रीलंका ध्वज श्रीलंका
बांगलादेश ध्वज बांगलादेश
विजेते भारत ध्वज भारत (२ वेळा)
सहभाग १४ (१०४ देशातून)
सामने ४९
मालिकावीर भारत युवराजसिंग
सर्वात जास्त धावा श्रीलंका तिलकरत्ने दिलशान (५००)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान शहिद आफ्रिदी (२१)
भारत झहीर खान (२१)
अधिकृत संकेतस्थळ आयसीसी विश्वचषक
२००७ (आधी) (नंतर) २०१५

या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही मिळणार होते पण २००९मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आय.सी.सी.ने पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतले[] आणि संयोजन समितीचे मुख्यालय लाहोरहून मुंबईला हलवण्यात आले.[] पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेले १४ साखळी सामने व एक उपांत्य सामना इतर यजमान देशांत खेळण्यात आले.[] पैकी आठ सामने आणि उपांत्य फेरी भारत तर चार साखळी सामने आणि दोन साखळी सामने प्रत्येकी श्रीलंका आणि बांगलादेशात खेळले गेले.[]

या स्पर्धेत आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडने इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा केलेला पराभव सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल होता.[] आयर्लंडच्या केव्हिन ओ'ब्रायनने ६३ चेंडूत ११३ धावा काढीत विश्वचषकांतील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मॅथ्यू हेडनचा विक्रम आपल्या नावावार करून घेतला.[] श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने स्पर्धेत सर्वात जास्त ५०० धावा काढल्या तर भारताच्या झहीर खान आणि पाकिस्तानच्या शहीद आफ्रिदीने प्रत्येकी सगळ्यात जास्त बळी (२१) मिळवले. युवराजसिंग स्पर्धावीर ठरला.

पात्रता

संपादन

आयसीसी नियमा प्रमाणे, १० पूर्ण सदस्य स्पर्धेस पात्र आहेत.[१०] तसेच २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या पात्रता फेरीतून ४ संघ पात्र झाले.

पात्र संघ

संपादन

मैदान

संपादन

स्पर्धेच्या मैदानांची माहिती आयसीसीने २ नोव्हेंबर २०१० रोजी मुंबईत प्रसिद्ध केली. श्रीलंकेत स्पर्धेसाठी दोन नवीन मैदान कॅंडीहंबन्टोटा येथे बांधण्यात आले.[११]

कोलकाता कोलंबो नवी दिल्ली कॅंडी अमदावाद
इडन गार्डन्स
प्रेक्षक क्षमता: ८२,०००
रणसिंगे प्रेमदासा मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
फिरोजशाह कोटला मैदान
प्रेक्षक क्षमता: ४८,०००
मुथिया मुरलीधरन मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ५०,०००
       
चट्टग्राम चेन्नई ढाका
चट्टग्राम विभागीय मैदान
प्रेक्षक क्षमता: २०,०००
एम.ए. चिदंबरम स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४६,०००
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
   
मुंबई हंबन्टोटा मोहाली नागपूर बंगलोर
वानखेडे स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
महिंदा राजपाक्षा मैदान
प्रेक्षक क्षमता: ३७,०००
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
एम. चिन्नास्वामी स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४२,०००
     
श्रीलंकेतील मैदाने
बांगलादेशातील मैदाने

स्पर्धेसाठी १८ पंचाची नियुक्ती करण्यात आली: ५ ऑस्ट्रेलिया, ६ आशिया, ३ इंग्लंड, २ न्यू झीलंड व प्रत्येकी १ दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीज.

ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान

भारत
इंग्लंड
श्रीलंका
वेस्ट इंडीज

पारितोषिक रक्कम

संपादन

क्रिकेट विश्वचषक, २०११ च्या विजेत्याला $ ३० लाख मिळतील, आयसीसीने स्पर्धेसाठी $ १०० लाख ठेवण्याचे जाहीर केले. हा निर्णय २० एप्रिल २०१० रोजी दुबईत झालेल्या आयसीसी बोर्ड मिटींग मध्ये घेण्यात आला.[१२][१३]

चिन्ह

संपादन

स्पर्धेचा प्रतिनिधी

संपादन
 
स्टंपी, क्रिकेट विश्वचषक, २०११
मुख्य पान: स्टंपी

स्टंपी[१४] हा क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेचा अधिकृत प्रतिनिधी आहे. त्याला सर्व प्रथम प्रदर्शित कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्या कार्यक्रमात २ एप्रिल २०१० रोजी करण्यात आले. तो एक १० वर्षाचा तरुण हत्ती आहे, तो खूप निश्चयी तसेच जोशपूर्ण आहे. त्याचे नाव ठरवण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.[१५] अधिकृतपणे नावाची घोषणा २ ऑगस्ट २०१० रोजी करण्यात आली.[१६]

अधिकृत गाणे

संपादन
मुख्य पान: दे घुमा के

क्रिकेट विश्वचषक, २०११ चे अधिकृत गाणे "दे घुमा के", शंकर-एहसान-लॉय ह्या त्रिकुटाने रचले आहे. हे गाणे हिंदी, बांगला व सिंहलीज भाषेत गायलेले आहे.[१७] हे गाणे शंकर महादेवन आणि दिव्या कुमार ह्यांनी गायलेले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारोहात हे गाने गायले जाणार आहे.[१८]

प्रक्षेपण

संपादन

आयसीसीने स्पर्धेचे हक्क ईएसपीएन-स्टार क्रिकेटला २ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकले. ही स्पर्धा २२० देशात दाखवली जाईल.[१९]

सर्व संघांनी १९ जानेवारी २०१० पर्यंत १४ खेळाडूंचा संघ जाहीर केला.

सामने

संपादन

सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०), श्रीलंका प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०) व बांगलादेश प्रमाण वेळ (यूटीसी+६)

साखळी सामने

संपादन

खालील तक्त्यात:[२०]

  • सा = सामने खेळले
  • वि = विजयी
  • सम = समसमान
  • हा = हार
  • अणि = अणिर्नित
  • नेरर = नेट रन रेट
  • गुण = एकुन गुण

प्रत्येक गटातुन पहिले चार संघ उपांत्यपूर्व फेरी साठी पात्र होतील (हिरवा रंग).

रंग माहिती
पहिले चार संघ उपांत्य फेरी साठी पात्र.
साखळी सामन्यात बाद संघ


संघ सा वि हा सम अनि गुण नेरर
  पाकिस्तान १० ०.७५८
  श्रीलंका २.५८२
  ऑस्ट्रेलिया १.१२३
  न्यूझीलंड १.१३५
  झिम्बाब्वे ०.०३
  कॅनडा -१.९८७
  केन्या -३.०४२
२० फेब्रुवारी २०११
०९:३०
न्यूझीलंड   ७२/० - ६९/१०   केन्या एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, चेन्नई
२० फेब्रुवारी २०११
०९:००
श्रीलंका   ३३२/७ - १२२/१०   कॅनडा महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा
२१ फेब्रुवारी २०११
१४:३०
ऑस्ट्रेलिया   २६२/६ - १७१/१०   झिम्बाब्वे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
२३ फेब्रुवारी २०११
१४:३०
पाकिस्तान   ३१७/७ - ११२/१०   केन्या महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा
२५ फेब्रुवारी २०११
१४:३०
न्यूझीलंड   २०६/१० - २०७/३   ऑस्ट्रेलिया विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
२६ फेब्रुवारी २०११
१४:३०
श्रीलंका   २६६/९ - २७७/७   पाकिस्तान रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
२८ फेब्रुवारी २०११
०९:३०
झिम्बाब्वे   २९८/९ - १२३/१०   कॅनडा विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
१ मार्च २०११
१४:३०
श्रीलंका   १४६/१ - १४२/१०   केन्या रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
३ मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान   १८४/१० - १३८/१०   कॅनडा रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
४ मार्च २०११
०९:३०
न्यूझीलंड   १६६/० - १६२/१०   झिम्बाब्वे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
५ मार्च २०११
१४:३०
श्रीलंका   सामना अनिर्णित   ऑस्ट्रेलिया रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
७ मार्च २०११
१४:३०
केन्या   १९८/१० - १९९/५   कॅनडा फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
८ मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान   १९२/१० - ३०२/७   न्यूझीलंड मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
१० मार्च २०११
१४:३०
श्रीलंका   ३२७/६ - १८८/१०   झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
१३ मार्च २०११
०९:३०
न्यूझीलंड   ३५८/६ - २६१/९   कॅनडा वानखेडे स्टेडियम, मुंबई
१३ मार्च २०११
१४:३०
ऑस्ट्रेलिया   ३२४/६ - २६४/६   केन्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
१४ मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान   १६४/३ - १५१/७   झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
१६ मार्च २०११
१४:३०
ऑस्ट्रेलिया   २१२/३ - २११/१०   कॅनडा एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
१८ मार्च २०११
१४:३०
श्रीलंका   २६५/९ - १५३/१०   न्यूझीलंड

वानखेडे स्टेडियम, मुंबई

१९ मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान   १७६/१० - १७८/६   ऑस्ट्रेलिया रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
२० मार्च २०११
०९:३०
झिम्बाब्वे   ३०८/६ - १४७/१०   केन्या इडन गार्डन्स, कोलकाता


संघ सा वि हा सम अनि गुण नेरर
  दक्षिण आफ्रिका १० २.०२६
  भारत ०.९
  इंग्लंड ०.०७२
  वेस्ट इंडीज १.०६६
  बांगलादेश -१.३६१
  आयर्लंड -०.६९६
  नेदरलँड्स -२.०४५
१९ फेब्रुवारी २०११
१४:३०
भारत   ३७०/४ - २८३/९   बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२२ फेब्रुवारी २०११
१४:३०
इंग्लंड   २९२/६ - २९६/४   नेदरलँड्स विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
२४ फेब्रुवारी २०११
१४:३०
दक्षिण आफ्रिका   २२३/३ - २२२/१०   वेस्ट इंडीज फिरोजशाह कोटला मैदान, नवी दिल्ली
२५ फेब्रुवारी २०११
०९:३०
बांगलादेश   २०५/१० - १७८/१०   आयर्लंड शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२७ फेब्रुवारी २०११
१४:३०
भारत   ३३८/१० - ३३८/८   इंग्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
२८ फेब्रुवारी २०११
१४:३०
  वेस्ट इंडीज ३३०/८ - ११५/१०   नेदरलँड्स फिरोजशाह कोटला मैदान, नवी दिल्ली
२ मार्च २०११
१४:३०
इंग्लंड   ३२७/८ - ३२९/७   आयर्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
३ मार्च २०११
०९:३०
दक्षिण आफ्रिका   ३५१/५ - १२०/१०   नेदरलँड्स पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
४ मार्च २०११
१४:३०
बांगलादेश   ५८/१० - ५९/१   वेस्ट इंडीज

शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका

६ मार्च २०११
१४:३०
भारत   २१०/५ - २०७/१०   आयर्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
६ मार्च २०११
०९:३०
इंग्लंड   १७१/१० - १६५/१०   दक्षिण आफ्रिका एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
९ मार्च २०११
१४:३०
भारत   १९१/५ - १८९/१०   नेदरलँड्स फिरोजशाह कोटला मैदान, नवी दिल्ली
११ मार्च २०११
०९:३०
आयर्लंड   २३१/१० - २७५/१०   वेस्ट इंडीज पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
११ मार्च २०११
१४:३०
बांगलादेश   २२७/८ - २२५/१०   इंग्लंड चट्टग्राम विभागीय मैदान, चट्टग्राम
१२ मार्च २०११
१४:३०
भारत   २९६/१० - ३००/७   दक्षिण आफ्रिका विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
१४ मार्च २०११
०९:३०
बांगलादेश   १६६/४ - १६०/१०   नेदरलँड्स चट्टग्राम विभागीय मैदान, चट्टग्राम
१५ मार्च २०११
१४:३०
दक्षिण आफ्रिका   २७२/७ - १४१/१०   आयर्लंड इडन गार्डन्स, कोलकाता
१७ मार्च २०११
१४:३०
इंग्लंड   २४३/१० - २२५/१०   वेस्ट इंडीज एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
१८ मार्च २०११
०९:३०
आयर्लंड   ३०६/१० - ३०७/४   नेदरलँड्स इडन गार्डन्स, कोलकाता
१९ मार्च २०११
०९:३०
बांगलादेश   ७८/१० - २८४/८   दक्षिण आफ्रिका शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२० मार्च २०११
१४:३०
भारत   २६८/१० - १८८/१०   वेस्ट इंडीज एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

बाद फेरी

संपादन
उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२३ मार्च -   ढाका        
   पाकिस्तान  ११३/०
३० मार्च -   मोहाली
   वेस्ट इंडीज  ११२/१०  
   पाकिस्तान  २३१/१०
२४ मार्च -   अहमदाबाद
     भारत  २६०/९  
   ऑस्ट्रेलिया  २६०/६
२ एप्रिल -   मुंबई
   भारत  २६१/५  
   भारत  २७७/४
२५ मार्च -   ढाका
     श्रीलंका  २७४/६
   न्यूझीलंड  २२१/८
२९ मार्च -   कोलंबो
   दक्षिण आफ्रिका  १७२/१०  
   न्यूझीलंड  २१७/१०
२६ मार्च -   कोलंबो
     श्रीलंका  २२०/५  
   श्रीलंका  २३१/०
   इंग्लंड  २२९/६  

उपांत्य पूर्व फेरी

संपादन
२३ मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान   ११३/० - ११२/१०   वेस्ट इंडीज शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२४ मार्च २०११
१४:३०
भारत   २६१/५ - २६०/६   ऑस्ट्रेलिया सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
२५ मार्च २०११
१४:३०
दक्षिण आफ्रिका   १७२/१० - २२१/८   न्यूझीलंड शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२६ मार्च २०११
१४:३०
श्रीलंका   २२९/६ - २३१/०   इंग्लंड रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो

उपांत्य फेरी

संपादन
२९ मार्च २०११
१४:३०
न्यूझीलंड   २१७/१० - २२०/५   श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
३० मार्च २०११
१४:३०
  भारत २६०/९ - २३१/१० पाकिस्तान   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली

अंतिम सामना

संपादन
२ एप्रिल २०११
१४:३०
श्रीलंका   २७४/६ - २७७/४   भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "2011 World Cup Schedule". from CricketWorld4u. 2009-10-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Opening ceremony of 2011 World Cup on Feb 17 in Bangladesh: ICC". Daily News and Analysis. PTI. 2 September 2009. 31 December 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "Final World Cup positions secured". 2009-04-17. 2009-04-17 रोजी पाहिले.
  4. ^ "No World Cup matches in Pakistan". BBC. 2009-04-18. 2009-04-17 रोजी पाहिले.
  5. ^ "World Cup shifts base from Lahore to Mumbai". Cricinfo. 2009-04-17 रोजी पाहिले.
  6. ^ "Pakistan counts cost of Cup shift". BBC. 2009-04-18. 2009-04-18 रोजी पाहिले.
  7. ^ "Pakistan nears solution to World Cup dispute". AFP. 2009-07-31 रोजी पाहिले.
  8. ^ {{{author}}}, {{{title}}}, [[{{{publisher}}}]], [[{{{date}}}]].
  9. ^ Record-breaking O'Brien sees Ireland stun England | Cricket News | Cricbuzz.com
  10. ^ "No Test Cricket For Zimbabwe - ICC". Radiovop. 2011-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-11 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  11. ^ Venues of 2011 World Cup Archived 2010-04-13 at the Wayback Machine. by ICC Retrieved on 10 March 2010.
  12. ^ Prize Money for ICC Cricket World Cup 2011 confirmed by the ICC. Retrieved on 25 April 2010.
  13. ^ क्रिकेट विश्वचषक २०११च्या बक्षिसाची रक्कम Official site.
  14. ^ 2011 World Cup mascot to be called 'Stumpy' NDTV Cricket. Retrieved on 2 Aug, 2010.
  15. ^ First Look: Mascot for 2011 Cricket World Cup by Rediff Sport. Retrieved on 2 April 2010.
  16. ^ ICC to name ICC Cricket World Cup 2011 mascot on 2 August. ICC. Retrieved on 2 Aug, 2010.
  17. ^ Shankar-Ehsaan-Loy score a hit with World Cup song Archived 2011-01-06 at the Wayback Machine. Hindustan Times. Retrieved on 9 January 2011.
  18. ^ "De ghuma ke... Countdown to World Cup begins today". Indian Express. Retrieved on 9 January 2011.
  19. ^ "List of TV Channels that will be showing ICC Cricket World Cup 2011 Match Live". 2011-02-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-11 रोजी पाहिले. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  20. ^ २०११ क्रिकेट विश्वचषक अधिक्रुत संकेतस्थळ Archived 2010-01-07 at the Wayback Machine.. विश्वचषक गुणतालिका. आयसीसी. २६ जून २०१० रोजी पाहिले

बाह्य दुवे

संपादन