शंकर महादेवन

भारतीय संगीतकार

शंकर महादेवन (जन्मदिनांक ३ मार्च १९६७ - हयात)(तमिळ: சங்கர் மகாதேவன் ;) (जन्मदिनांक ३ मार्च १९६७; तरकड ग्राम, पालक्काड, केरळ - हयात) हा भारतीय संगीतकार व गायक आहे. त्याने तमिळ, हिंदी, मराठी चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शन व गायन केले आहे. भारतीय चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय या त्रिकुटाचा तो एक सदस्य आहे.

शंकर महादेवन

शंकर महादेवन
आयुष्य
जन्म मार्च ३, १९६७
जन्म स्थान चेंबूर, मुंबई, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा तमिळ
संगीत साधना
गुरू श्रीनिवास खळे
गायन प्रकार गायन, संगीतकार
संगीत कारकीर्द
कार्य गायन,
पेशा गायकी, संगीतकार
कारकिर्दीचा काळ १९९८ पासून -
बाह्य दुवे
[अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर) संकेतस्थळ]

महादेवनाचे हिंदुस्तानी संगीतात प्रशिक्षण झाले आहे. त्याने मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. तो ब्रेथलेस या हिंदी पॉप अल्बमाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आला. अगं बाई अरेच्या! मधील मन उधाण वाऱ्याचे या गाण्याद्वारे मराठी चित्रपटात पण ठसा उमटवला. नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रदर्शित होत असलेल्या कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पदार्पण करेल.त्यातील सूर निरागस हो हे गाणे सुद्धा त्यांनी गायलेले आहे.

बाह्य दुवे

संपादन