युवराजसिंह

भारताचा क्रिकेट खेळाडू.
(युवराजसिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

साचा:माहितीचौकट क्रिकेट खेळाडू संपूर्ण माहिती

युवराज सिंग (जन्म १२ डिसेंबर १९८१) हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज आहे. माजी वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेते योगराजसिंग हे युवराज सिंगचे वडील आहेत. २००० सालापासुन तो भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. २००३ मध्ये त्याने पहिला कसोटी सामना खेळला. २००७ ते २००८ पर्यंत तो भारतीय एकदिवसीय संचाचा उपकर्णधार होता. २०११ च्या क्रिकेट विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले होते.

२०११ मध्ये त्याला त्याच्या डाव्या फुफ्फुसाचा एक कर्करोगाच्या गाठीचे निदान झाले आणि इनडियनॅपलिस मध्ये बोस्टन मध्ये कर्करोग संशोधन संस्था तसेच वैद्यक सुविधा येथे केमोथेरपीच्या उपचार करून घेतला. मार्च २०१२ मध्ये युवराजला केमोथेरपीच्या तिसऱ्या आणि अंतिम चक्र पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमधुन मुक्त करण्यात आले आणि एप्रिल महिन्यात तो भारतामध्ये परत आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सन २०१२ मध्ये युवराज सिंहला भारतातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्कार बहाल केला. न्यूझीलॅंड विरुद्ध् टि-२० सामन्यात सप्टेंबर महिन्यात तो क्रिकेटमध्ये पुन्हा परतला. क्रिकेटमध्ये यशस्वी खेळाडू म्हणून दबदबा असलेला युवराज आपल्या वादग्रस्त विधानांनीही चर्चेत राहिला आहे. रोहित शर्माशी इन्स्टाग्रामवर चॅट करताना युझवेंद्र चहलविषयी जातीविषयक टिप्पणीमुळे तो वादात सापडला होता. त्यामुळे त्याला माफीही मागावी लागली होती.[१]

वैयक्तिक जीवन संपादन करा

युवराज हा जट सिख परिवारातून येतो. योगराज सिंग आणि शबनम सिंग हे त्याचे आई-वडिल. त्याचे आई-वडिल घटस्फोटित आहेत. युवराज त्याच्या आई सोबत राहतो. टेनिस आणि रोलर स्केटिंग बालपणामध्ये युवराजच्या आवडत्या क्रीडा होत्या.आणि दोन्ही खेळात तो चांगला होता.त्याने राष्ट्रीय U१४ रोलर स्केटिंग स्पर्धा जिंकली आहे. त्याच्या वडिलांनी त्याचे पदक फेकून दिले आणि स्केटिंग विसरून क्रिकेट वर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला सांगितले. ते प्रत्येक दिवस युवराजचे प्रशिक्षण घेई. त्याने चंदीगड मध्ये डि.ए.व्हि. सार्वजनिक शाळेत शिक्षण घेतले. युवराजने बालकलाकार म्हणून सुद्धा काम केले आहे.

सप्टेंबर १९ २००७ रोजी ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना जोहान्सबर्ग येथे एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी युवराज सिंगने केली. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेट खेळाडू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.

आईपीएल २०१६ पासून संनराईजर्स हैद्राबादच्या टीम मध्ये​ तोे खेळत आहे.

इंग्लंड विरुद्ध खेळताना त्याने एकदिवसीय सामन्यामध्ये त्याच्या वैयक्तिक सर्वाधिक धावा काढल्या.

साचा:Stub-भारतीय क्रिकेट खेळाडू

  1. ^ "युवराजची माफी आणि वादग्रस्त विधानांची मालिका..." kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-06-05. 2020-07-05 रोजी पाहिले.