स्टंपी[] हा क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेचा अधिक्रुत प्रतिनिधी आहे. त्याला सर्व प्रथम प्रदर्शित कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्या कार्यक्रमात २ एप्रिल २०१० रोजी करण्यात आले. तो एक १० वर्षाचा तरुण हत्ती आहे, तो खूप निश्चयी तसेच जोशपूर्ण आहे. त्याचे नाव ठरवण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.[] अधिक्रुत पणे नावाची घोषणा २ ऑगस्ट २०१० रोजी करण्यात आली.[]

स्टंपी, क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेचा अधिक्रुत प्रतिनिधी.

स्पर्धेचे प्रचालक रत्नाकर शेट्टी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे की,"स्पर्धेच्या प्रतिनिधीची कल्पना, खेळ व चाहते यांची विश्वचषक स्पर्धेसाठी असलेली भावना व्यक्त करते."

माहिती

संपादन

व्यक्तिमत्त्व

संपादन
तो तरूण व जोशपूर्ण असून क्रिकेट व खेळाडू यांच्या बद्दल त्याला खूप प्रेम आहे! संपूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला त्याच्या क्रिकेट मधील दिग्गज्जा प्रमाणे खूप मोठ व्ह्यायच आहे. तरूण असल्यामुले त्याला माहिती आहे की पहिल्याच प्रयत्नात किंवा दहाव्या प्रयत्नात त्याला सर्व काही भेटणार नाही, परंतु क्रिकेटच्या महान खेळाडूंनी त्याला शिकवल आहे की त्याची शक्ती व इच्छाशक्ती ह्यांच्या जोरावर तो सर्वोत्तम होउ शकतो.

परंतु एक हत्ती असल्याने त्याला माहिती आहे की खेळावरील प्रेम अधिक मह्त्वाचे आहे! सरतेशेवटी हत्ती हुशार प्राणी आहे.

तो पुर्णपणे हत्ती आहे व डोक्याने नेहमी विचार करतो. त्याला सध्या जोरात धावता येते नाही, त्यामुळे तो चेंडू सर्व शक्तीने लांब पर्यंत मारायचा प्रयत्न करतो. गोलंदाजी करतांना तो जोरात पिच पर्यंत धावू शकत नाही म्हणुन त्याने यष्टीवर जोरदार जाणार चेंडू टाकण्याची कला विकसीत केली. कोणतीही अडचण आल्यास तो स्वताच्या हुशारीने त्याचे उत्तर शोधुन काढतो.

कधीकधी धीर धरणे थोडे अवघड असते, पण जेव्हा तो यष्टीरक्षण करत असतो तेव्हा तो फोकस राहण्याचा प्रयत्न करतो व महत्त्वाच्या संधी साठी तत्पर राहतो. जेव्हा सर्व गोष्टी जश्या पाहिजे तश्या होत नाहीत तेव्हा तो थोडी मजा करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी हिच गोष्ट महत्त्वाची आहे. त्याला खूप मोठ व्हायच आहे परंतु त्याला क्रिकेट खेळत मस्ती करणारा तरूण राहण महत्त्वाच वाटत.

अश्या फार कमी गोष्टी आहे ज्या त्याला आवडत नाही, त्याला मसाले जरी आवडत असतील तरी, त्याला मिर्ची आवडत नाही. आणि मधमाश्या. त्याला मधमाश्यांची फार भिती वातते (प्रत्येकाला वाटते कि त्याला उंदीराची भिती वाटते पण ते खरे नाही!). त्याला कडकडीत उन आवडत नाही व पाण्यात खेळायला किंवा कडक उन्हात सावलीत बसायला आवडते. त्याला केवळ पिच वरील गर्मी आवडते!

त्याला गल्ली क्रिकेट, मित्रांसोबत राहणे , रेडीयोवर समालोचन ऐकणे, दुरचित्रवाणीवर क्रिकेट पाहाणे, नेट सर्फ करणे, पाण्यात डूंबणे, क्रिकेट सामना खेळायला जाणे आवडते.

कधीकधी तो अति उत्साही होउन स्वताची स्तुती करतो, पण सद्या तो सुधारत आहे आणि त्याला माहिती आहे महत्त्वाची गोष्ट ट्रेनिंग आहे, मग सर्व गोष्टी योग्य वेळी आपोआपच होतील. आयसीसी क्रिकेट विश्वचषकच्या स्टेजवर तो एकदिवस जगाला नक्कीच दाखवुन देईल तो काय करू शकतो!

इतर माहिती

संपादन

स्पर्धेच्या प्रतिनिधीचे काही खास पैलू. तो तरुण आहे, जोशपूर्ण आहे व जिद्दी आहे.[]

  • तरुण , जोशपूर्ण व जिद्दी
  • त्याच्यासाठी क्रिकेट जगातील सर्वोत्तम खेळ आहे.
  • गल्ली क्रिकेट खेळायला त्याला आवडते आणि जमल्यास तो २४/७ क्रिकेट खेळ शकतो.
  • त्याच्या आवडत्या क्रिकेट खेळाडूंना तो खूप मानतो.
  • त्याला माहिती आहे खूप काहि शिकायचे आहे, त्यासाठी त्या खूप मेहनत करावी लागणार आहे.
  • मन एकाग्र करण्यासाठी तो खूप प्रयत्न करतो आहे.
  • एक दिवस आयसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे.
  • वय: १०

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ २०११ विश्वचषक स्पर्धेच्या प्रतिनिधीचे नाव - 'स्टंपी' एनडीटीवी स्पोर्ट्स. २ ऑगस्ट २०१० रोजी पाहिले
  2. ^ प्रथम दर्शन: स्टंपी रेडिफ स्पोर्ट्स. २ एप्रिल २०१० रोजी पाहिले.
  3. ^ आयसीसी विश्वचषक स्पर्धच्या प्रतिनिधीची घोषणा २ ऑगस्ट रोजी करणार. आयसीसी. २ एप्रिल २०१० रोजी पाहिले.
  4. ^ स्टंपीची माहिती. आयसीसी. ३० जुलै २०१० रोजी पाहिले.
  5. ^ स्पर्धेच्या प्रतिनिधीचे नाव - स्टंपी. आयसीसी. ३० जुलै २०१० रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन