क्रिकेट विश्वचषक, २०१५
२०१५ क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ११वी आवृत्ती १४ फेब्रुवारी ते २९ मार्च, इ.स. २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलिया व न्यू झीलँड देशांमध्ये खेळवली गेली.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०१५ | |||
---|---|---|---|
क्रिकेट विश्वचषक | |||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | एकदिवसीय सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने व बाद फेरी | ||
यजमान |
ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड | ||
विजेते | ऑस्ट्रेलिया (५ वेळा) | ||
सहभाग | १४ | ||
सामने | ४९ | ||
मालिकावीर | मिचेल स्टार्क | ||
सर्वात जास्त धावा | मार्टिन गुप्टिल (५४७) | ||
सर्वात जास्त बळी |
मिचेल स्टार्क (२२) ट्रेंट बोल्ट (२२) | ||
अधिकृत संकेतस्थळ | आयसीसी विश्वचषक | ||
|
मेलबर्न येथे आय.सी.सी.ने ३० जुलै २०१३ रोजी आयोजित केलेल्या सोहळ्यात २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये संयुक्तरीत्या आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला[१].
एकूण ४४ दिवस चालणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये १४ देशांचे राष्ट्रीय संघ सहभागी झाले. स्पर्धेमध्ये १४ मैदानांवर एकूण ४९ सामने खेळविले गेले. त्यामधील २६ सामने ऑस्ट्रेलियातील ॲडलेड, ब्रिस्बेन, कॅनबेरा, होबार्ट, मेलबर्न, पर्थ व सिडनी या ठिकाणी तर उर्वरित २३ सामने न्यू झीलंडमधील ऑकलंड, क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, नेपियर, नेल्सन आणि वेलिंग्टन येथे खेळविले गेले.
साखळी फेरीसाठी १४ देशांना अ आणि ब गटामध्ये विभागण्यात आले. अ गटामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, न्यू झीलँड, पात्रता फेरीतील संघ २, पात्रता फेरीतील संघ ३चा समावेश होता. तर ब गटामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे, आयर्लण्ड आणि पात्रता फेरीतील संघ ४चा समावेश होता. साखळी फेरीमध्ये प्रत्येक संघाचे सहा सामने झाले.
विश्वचषकाचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा ७ गडी राखून विजय मिळवित पाचव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
यजमान देशाची निवड
संपादनबोली
संपादनप्रकार
संपादनपात्रता
संपादनस्पर्धेमधील दोन गटांमध्ये १४ देशांचे संघ सहभागी झाले, ते खालीलप्रमाणे:
गट अ | गट ब | ||
---|---|---|---|
क्रमांक | संघ | क्रमांक | संघ |
संपूर्ण सदस्य | |||
२ | ऑस्ट्रेलिया | १ | भारत |
३ | इंग्लंड | ५ | दक्षिण आफ्रिका |
४ | श्रीलंका | ६ | पाकिस्तान |
९ | बांगलादेश | ८ | वेस्ट इंडीज |
७ | न्यूझीलंड | १० | झिम्बाब्वे |
संलग्न सदस्य | |||
१२ | अफगाणिस्तान | ११ | आयर्लंड |
१३ | स्कॉटलंड | १४ | संयुक्त अरब अमिराती |
पारितोषिकाची रक्कम
संपादनआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण १ कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी रक्कम जाहीर केली. ही रक्कम २०११ च्या पारितोषिकाच्या रकमेपेक्षा २० टक्क्यांनी जास्त होती. ही रक्कम खालील प्रकारे वाटण्यात आली.[२]
फेरी | बक्षीसाची रक्कम ($) | एकूण |
---|---|---|
विजेते | $३९,७५,००० | $३९,७५,००० |
उपविजेते | $१७,५०,००० | $१७,५०,००० |
उपांत्य फेरीतील पराभूत संघ | $६,००,००० | $१२,००,००० |
उपउपांत्य फेरीतील पराभूत संघ | $३,००,००० | $१२,००,००० |
गट फेरीतील विजेते | $४५,००० | $१८,९०,००० |
गट फेरीतून बाहेर गेलेले संघ | $३५,००० | $२,१०,००० |
एकूण | $१,०२,२५,००० |
मैदाने
संपादनसिडनी, न्यू साउथ वेल्स | मेलबर्न, व्हिक्टोरिया | ॲडलेड, साउथ ऑस्ट्रेलिया | ब्रिस्बेन, क्वीन्सलंड | पर्थ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया |
---|---|---|---|---|
सिडनी क्रिकेट मैदान | मेलबर्न क्रिकेट मैदान | ॲडलेड ओव्हल | ब्रिस्बेन क्रिकेट मैदान | वाका क्रिकेट मैदान |
प्रेक्षक क्षमता: ४८,००० | प्रेक्षक क्षमता: १,००,०१६ | प्रेक्षक क्षमता: ५३,००० | प्रेक्षक क्षमता: ४२,००० | प्रेक्षक क्षमता: २४,५०० |
होबार्ट, टास्मानिया | कॅनबेरा, ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी | |||
बेलेराइव्ह ओव्हल | मानुका ओव्हल | |||
प्रेक्षक क्षमता: १६,००० | प्रेक्षक क्षमता: १३,५५० | |||
ऑकलंड, उत्तर बेट | क्राइस्टचर्च, दक्षिण बेट | |||
इडन पार्क | हॅगले ओव्हल | |||
प्रेक्षक क्षमता: ५०,००० | प्रेक्षक क्षमता: १२,००० | |||
हॅमिल्टन, उत्तर बेट | नेपियर, उत्तर बेट | वेलिंग्टन, उत्तर बेट | नेल्सन, दक्षिण बेट | ड्युनेडिन, दक्षिण बेट |
सेडन पार्क | मॅकलीन पार्क | वेस्टपॅक मैदान | सॅक्स्टन ओव्हल | युनिव्हर्सिटी ओव्हल |
प्रेक्षक क्षमता: ३०,००० | प्रेक्षक क्षमता: २२,००० | प्रेक्षक क्षमता: ३६,००० | प्रेक्षक क्षमता: ६,००० | प्रेक्षक क्षमता: ६,००० |
संघ
संपादनप्रत्येक देशाने आपला १५ खेळाडूंचा संघ ७ जानेवारी २०१५ रोजी जाहीर केला.
सराव सामने
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : बांग्लादेश, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
साखळी सामने
संपादनगट अ
संपादनसंघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णीत | धावगती | गुण |
---|---|---|---|---|---|---|---|
न्यूझीलंड | ६ | ६ | ० | ० | ० | +२.५६४ | १२ |
ऑस्ट्रेलिया | ६ | ४ | १ | ० | १ | +२.२५७ | ९ |
श्रीलंका | ६ | ४ | २ | ० | ० | +०.३७१ | ८ |
बांगलादेश | ६ | ३ | २ | ० | १ | +०.१३६ | ७ |
इंग्लंड | ६ | २ | ४ | ० | ० | -०.७५३ | ४ |
अफगाणिस्तान | ५ | १ | ४ | ० | ० | -१.८८१ | २ |
स्कॉटलंड | ६ | ० | ६ | ० | ० | -२.२१८ | ० |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण
- स्टीवन फिनने या सामन्यात ब्रॅड हड्डिन, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल जॉन्सन यांना एकामागोमाग एक बाद करीत हॅट्ट्रीक घेतली.[३]
- जेम्स टेलरला पायचीत म्हणून बाद दिल्यानंतर लगेचच जेम्स अँडरसनला धावचीत घोषित करण्यात आले. टेलरला बाद दिल्याचा निर्णय पुनरावलोकनानंतर रद्द झाल्याने चेंडू मृत घोषित व्हायला हवा होता, त्यामुळे आय.सी.सी.ने (निर्णय पुनरावलोकन प्रणाली वठविणे अटी परिशिष्ट 6 कलम 3.6a नुसार) अँडरसनला बाद दिल्याचा निर्णय चुकीचा असल्याचे कबूल केले.[४]
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : बांग्लादेश - फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी
- टिम साउथीची क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी
- ब्रॅन्डन मॅककुलमचा क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम (१८ चेंडू)
२१ फेब्रुवारी
धावफलक |
वि
|
||
- मुसळधार पावसामुळे १६:४२ वाजता सामना रद्द केला गेला.
- पावसामुळे रद्द झालेला हा क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील हा फक्त दुसरा सामना ठरला.
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- श्रीलंका संघाचे दोन्ही सलामीवीर (लाहिरू तिरीमन्ने आणि तिलकरत्ने दिलशान) एकही धाव न काढता बाद झाले. असे एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा घडले
- अफगाणिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० बळी घेणारा हमीद हसन हा पहिलाच गोलंदाज ठरला. तसेच तो सर्वात जलद ५० बळी घेणारा ७वा गोलंदाज ठरला.
वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, गोलंदाजी
वि
|
||
समिउल्लाह शेनवारी ९६ (१४७) रिची बेरिंग्टन ४/४० (१० षटके) |
- नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी
- स्कॉटलंडची २१० ही धावसंख्या ही त्यांची क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
- अलास्डेर एव्हान्स आणि मजीद हक यांची ६२ धावांची भागीदारी ही स्कॉटलंडतर्फे ९व्या विकेटसाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी ठरली.
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- कुमार संगाकाराने २२ चौकार मारुन क्रिकेट वर्ल्ड कप इतिहासातील एका डावात सर्वात जास्त चौकार मारण्याचा स्टीफन फ्लेमिंगचा (२१ चौकार) विक्रम मोडला.
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- वर्ल्ड कप स्पर्धेत पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने सर्वात निचांकी धावसंख्या नोंदविली.
- ऑस्ट्रेलियाने २६ धावांच्या मोबदल्यात ८ गडी गमाविले. ही त्यांची एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वात खराब खेळी ठरली.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र.
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- ज्यो रूट हा वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकाविणारा सर्वात लहान फलंदाज ठरला.
वि
|
||
नौरोझ मंगल ३३ (३५) मिचेल जॉन्सन ४/२२ (७.३ षटके) |
- नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी
- ऑस्ट्रेलियाची ४१७/६ ही वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
- ऑस्ट्रेलियाने २७५ धावांनी मिळविलेला विजय हा वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय.
वि
|
||
- नाणेफेक : बांग्लादेश, गोलंदाजी
- स्कॉटलंडतर्फे वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये शतक झळकावणारा काईल कोएट्झर हा पहिलाच फलंदाज.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे स्कॉटलंड स्पर्धेतून बाहेर.
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- डॅनियेल व्हेट्टोरीचे एकदिवसीय सामन्यातील ३०० बळी पूर्ण.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर.
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- ग्लेन मॅक्सवेलचे पहिले एकदिवसीय शतक, वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरे सर्वात जलद शतक आणि ऑस्ट्रेलियातर्फे वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात जलद शतक (५१ चेंडू)
- तिलकरत्ने दिलशानने मिचेल जॉन्सनच्या एकाच षटकात ६ चौकार मारले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले.
- कुमार संघकाराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४,००० धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत लगोलग तीन शतके झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र.
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- बांग्लादेशतर्फे वर्ल्ड कप स्पर्धेत शतक करणारा महमुदुल्ला हा पहिलाच फलंदाज
- महमुदुल्ला आणि मुशफिकुर रहीम यांनी केलेली १४१ धावांची भागीदारी ही बांग्लादेशतर्फे ५व्या विकेटसाठी वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट भागीदारी तसेच इंग्लंड विरुद्ध सर्वोत्कृष्ट भागीदारी
- इंग्लंड विरुद्ध बांग्लादेशच्या सर्वात जास्त धावा.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश आणि श्रीलंका उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र. बांग्लादेश वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्यांदा गट फेरी पार करून पुढच्या फेरीसाठी पात्र तर प्रथमच बाद फेरीसाठी पात्र.
- ह्या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड स्पर्धेतून बाहेर.
वि
|
||
फ्रेडी कोलमन ७० (७४) नुवान कुलशेकरा ३/२० (७ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- कुमार संगाकाराचा एकदिवसीय इतिहासात लागोपाठ ४ शतके झळकाविण्याचा विक्रम.
- अँजेलो मॅथ्यूस हा श्रीलंकेतर्फे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक झळकाविणारा फलंदाज ठरला (२० चेंडू).
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
- बांगलादेशतर्फे लागोपाठ दोन शतके झळकाविणारा महमुदुल्ला हा पहिलाच फलंदाज.
- न्यू झीलंडतर्फे एकदिवसीय सामन्यांमध्ये ५००० धावा झळकाविणारा रॉस टेलर हा चवथा फलंदाज.
वि
|
||
शफिकउल्लाह ३० (६४)
क्रिस जॉर्डन २/१३ (६.२ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- अफगाणिस्तानच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे इंग्लंडसमोर २५ षटकांमध्ये १०१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
गट ब
संपादनसंघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णीत | धावगती | गुण |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ६ | ६ | ० | ० | ० | +१.८२७ | १२ |
दक्षिण आफ्रिका | ६ | ४ | २ | ० | ० | +१.७०७ | ८ |
पाकिस्तान | ६ | ४ | २ | ० | ० | -०.०८५ | ८ |
वेस्ट इंडीज | ६ | ३ | ३ | ० | ० | -०.०५३ | ६ |
आयर्लंड | ६ | ३ | ३ | ० | ० | -०.९३३ | ६ |
झिम्बाब्वे | ६ | १ | ५ | ० | ० | -०.५२७ | २ |
संयुक्त अरब अमिराती | ६ | ० | ६ | ० | ० | -२.०३२ | ० |
वि
|
||
- नाणेफेक : झिंबाब्वे, गोलंदाजी
- डेव्हिड मिलर आणि जे.पी. डुमिनी यांनी केलेली नाबाद २५६ धावांची भागीदारी ही एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील पाचव्या विकेटसाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी ठरली [५]
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
वि
|
||
शैमान अनवर ६७ (५९)
तेंडाई चटारा ४२/३ (१० षटके) |
शॉन विल्यम्स ७६ (६५) मोहम्मद तौकीर ५१/२ (९ षटके) |
- नाणेफेक : झिंबाब्वे, गोलंदाजी
- संयुक्त अरब अमिरातीच्या एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वाधिक धावा.
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
- एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात खराब सुरुवात पाकिस्तानच्या संघाने एका धावेच्या बदल्यात ४ गडी गमावून नोंदविली.
- वेस्ट इंडीज संघाचा हा पाकिस्तान विरुद्धचा सर्वात मोठा विजय ठरला
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- भारताचा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलाच विजय
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
- पावसामुळे झिम्बाब्वेसमोर ४८ षटकांमध्ये ३६३ धावांचे लक्ष ठेवण्यात आले.
- क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत द्विशतक झळकावणारा क्रिस गेल हा पहिलाच फलंदाज ठरला. त्याची १३८ चेंडूंतील द्विशतकी खेळी ही सर्वात जलद ठरली.
- क्रिस गेलने या सामन्यात आपल्या कारकीर्दीतील ९००० धावांचा टप्पा ओलांडला. असे करणारा तो ब्रायन लारानंतर वेस्ट इंडीजचा दुसरा फलंदाज ठरला.
- क्रिस गेलने रोहित शर्मा आणि ए.बी. डी व्हिलियर्सच्या एकदिवसीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक १६ षट्कार मारण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
- क्रिस गेल आणि मार्लोन सॅम्युएल्स यांनी केलेली ३७२ धावांची भागीदारी ही एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील सर्वोच्च भागीदारी होय.
वि
|
||
शैमन अन्वर १०६ (८३)
पॉल स्टर्लिंग २/२७ (१० षटके) |
गॅरी विल्सन ८० (६९) अमजद जावेद ३/६० (१० षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
- शैमन अन्वर हा यू.ए.ई. तर्फे वर्ल्ड कप स्पर्धेत शतक करणारा पहिलाच फलंदाज ठरला.
- आयर्लंड तर्फे शैमन अन्वर आणि अमजद जावेद यांनी केलेली १०७ धावांची भागीदारी ही वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ७ व्या विकेटसाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी ठरली.
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- ए.बी. डी व्हिलियर्स हा एकदिवसीय इतिहासातील सर्वात जलद १५० धावा (६४ चेंडू) आणि वर्ल्ड कप स्पर्धेत दुसरे सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला.
- जेसन होल्डर (वे) हा वर्ल्ड कप सामन्यात सर्वात जास्त धावा देणारा गोलंदाज ठरला (१०४ धावा).
- दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या ४०८/५ धावा ह्या वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सर्वात जास्त धावा आणि ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त धावा ठरल्या.
- दक्षिण आफ्रिकेचा २५७ धावांचा विजय हा वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताने २००७ मध्ये बरम्यूडावर मिळविलेल्या सर्वोत्कृष्ट विजयाशी बरोबरी करणारा ठरला.
वि
|
||
शैमन अन्वर ३५ (४९)
रविचंद्रन अश्विन ४/२५ (१० षटके) |
रोहित शर्मा ५७* (५५) मोहम्मद नवीद १/३५ (५ षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- वहाब रियाझ हा पाकिस्तानतर्फे वर्ल्ड कप स्पर्धेत ५० धावा व ४ बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला.
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- हाशिम अमलाची १५९ धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली.
वि
|
||
अहमद शहझाद ९३ (१०५)
मंजुला गुरूगे ४/५६ (८ षटके) |
शैमान अनवर ६२ (८८) शहीद आफ्रिदी २/३५ (१० षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी
- पाकिस्तानतर्फे ८००० धावा करणारा शहीद आफ्रिदी हा चवथा फलंदाज.
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
- वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग ८ वा विजयामुळे भारतीय संघाने त्यांच्याच विक्रमाशी बरोबरी केली.
- या सामन्यातील विजयामुळे भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र.
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
- पावसामुळे सामना ४७ षटकांचा करण्यात आला आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २३२ धावांचे लक्ष ठेवण्यात आले.
वि
|
||
- नाणेफेक : झिंबाब्वे, गोलंदाजी
- या सामन्याच्या निकालामुळे झिंबाब्वे आणि संयुक्त अरब अमिराती स्पर्धेतून बाहेर.
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
वि
|
||
एबी डि व्हिलियर्स ९९ (८२)
मोहम्मद नवीद ३/६३ (१० षटके) |
स्वप्नील पाटील ५७* (१००) एबी डि व्हिलियर्स २/१५ (३ षटके) |
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी
- ''या सामन्यातील विजयामुळे दक्षिण आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र.
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोणी यांनी केलेली नाबाद १९६ धावांची भागीदारी ही भारतातर्फे वर्ल्ड कप स्पर्धेतील ५ व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी ठरली.
वि
|
||
नासिर अझीझ ६० (८६)
जेसन होल्डर ४/२७ (१० षटके) |
जॉन्सन चार्लस् ५५ (४०) अमजद जावेद २/२९ (८ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
- सरफराज अहमद हा पाकिस्तानतर्फे वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकाविणारा १ ला फलंदाज ठरला.
- या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र.
- या सामन्याच्या निकालामुळे आयर्लंड स्पर्धेतून बाहेर.
बाद फेरी
संपादनउपांत्यपूर्वफेरी | उपांत्यफेरी | अंतिम सामना | ||||||||
१८ मार्च – सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी | ||||||||||
श्रीलंका | १३३ | |||||||||
२४ मार्च – इडन पार्क, ऑकलंड | ||||||||||
दक्षिण आफ्रिका | १३४/१ | |||||||||
दक्षिण आफ्रिका | २८१/५ | |||||||||
२१ मार्च – वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन | ||||||||||
न्यूझीलंड | २९९/६ | |||||||||
न्यूझीलंड | ३९३/६ | |||||||||
२८ मार्च – मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न | ||||||||||
वेस्ट इंडीज | २५० | |||||||||
न्यूझीलंड | १८३ | |||||||||
१९ मार्च – मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न | ||||||||||
ऑस्ट्रेलिया | १८६/३ | |||||||||
भारत | ३०२/६ | |||||||||
२६ मार्च – सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी | ||||||||||
बांगलादेश | १९३ | |||||||||
भारत | २३३ | |||||||||
२० मार्च – ॲडलेड ओव्हल, ॲडलेड | ||||||||||
ऑस्ट्रेलिया | ३२८/७ | |||||||||
पाकिस्तान | २१३ | |||||||||
ऑस्ट्रेलिया | २१६/४ | |||||||||
उपांत्यपूर्व फेरी
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- थरिंदू कौशलचे श्रीलंकेकडून एकदिवसीय पदार्पण
- जे.पी.डुमिनीने अँजेलो मॅथ्यूज, नुवान कुलसेकरा आणि थरिंदू कौशल यांना दोन षटकांतील लागोपाठच्या चेंडूंवर बाद करित हॅट-ट्रीक साजरी केली. असे करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच गोलंदाज ठरला.
- कुमार संगकारा आणि महेला जयवर्दनेचा हा शेवटचा सामना.
- दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदाच बाद फेरीच्या सामन्यात विजय मिळवीला.
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- रोहित शर्माचे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले शतक.
- महेंद्रसिंग धोणीचा एकदिवसीय कर्णधार म्हणून १०० वा विजय
- भारतीय संघाने लागोपाठ सातव्या एकदिवसीय सामन्यात विरुद्ध संघाला सर्वबाद केले. हा एक विक्रम आहे.
- बांगलादेशचा कर्णधार मशरफे मोर्तझा याला धीम्या षटक गतीमुळे एका एकदिवसीय सामन्यातून निलंबित करण्यात आले. तसेच त्याच्या मानधनातून ४०% व संपूर्ण संघाच्या मानधनातून २०% रक्कम दंड म्हणून कापून घेण्यात आली.
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- शहीद आफ्रिदी आणि मिस्बाह-उल-हक यांचा शेवटचा एकदिवसीय सामना.
- ३३ व्या षटका दरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीबद्दल वहाब रियाझ (पा) याला मानधनाच्या ५०% तर शेन वॉटसन (ऑ) याला मानधनाच्या १५% दंड करण्यात आला.
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- न्यू झीलंडतर्फे विश्वचषक स्पर्धेत लागोपाठ दोन शतके झळकाविणारा मार्टिन गुप्टिल हा पहिलाच खेळाडू.
- विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरी द्विशतक झळकाविणारा तसेच न्यू झीलंडतर्फे द्विशतक झळकाविणारा मार्टिन गुप्टिल हा पहिलाच खेळाडू.
- ह्या सामन्यात एकून ३१ षटकार मारले गेले. हा विश्वचषक स्पर्धेतील एक विक्रम आहे. तसेच एकदिवसीय इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम आहे.
उपांत्य फेरी
संपादनवि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- दक्षिण आफ्रिकेच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४३ षटकांचा करण्यात आला आणि न्यू झीलंड समोर विजयासाठी २९८ धावांचे लक्ष ठेवण्यात आले.
- न्यू झीलंड प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र.
- न्यू झीलंडच्या २९९ धावा हा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील सर्वोत्कृष्ट यशस्वी पाठलाग.
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- ऑस्ट्रेलिया सातव्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र. त्यांनी आतापर्यंत सर्वच्या सर्व सात उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळविला.
- ऑस्ट्रेलियाची ३२८/७ ही धावसंख्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या.
- १९८७ नंतर प्रथमच कोणताही आशियाई संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला नाही.
अंतिम सामना
संपादनमुख्य पानः क्रिकेट विश्वचषक, २०१५ - अंतिम सामना
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकला
- ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्कचा हा शेवटचा एकदिवसीय सामना
आकडेवारी
संपादनफलंदाजी
संपादनफलंदाज | संघ | सामने | डाव | नाबाद | धावा | सर्वोत्कृष्ट | सरासरी | धावगती | १०० | ५० | चौकार | षट्कार |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मार्टिन गुप्टिल | न्यूझीलंड | ९ | ९ | १ | ५४७ | २३७* | ६८.३७ | १०४.५८ | २ | १ | ५९ | १६ |
कुमार संगाकारा | श्रीलंका | ७ | ७ | २ | ५४१ | १२४ | १०८.२० | १०५.८७ | ४ | ० | ५७ | ७ |
ए.बी. डी व्हिलियर्स | दक्षिण आफ्रिका | ८ | ७ | २ | ४८२ | १६२* | ९६.४० | १४४.३१ | १ | ३ | ४३ | २१ |
ब्रेंडन टेलर | झिम्बाब्वे | ६ | ६ | ० | ४३३ | १३८ | ७२.१६ | १०६.९१ | २ | १ | ४३ | १२ |
शिखर धवन | भारत | ८ | ८ | ० | ४१२ | १३७ | ५१.५० | ९१.७५ | २ | १ | ४८ | ९ |
२९ मार्च २०१५ पर्यंत अद्ययावत[६] |
गोलंदाजी
संपादनगोलंदाज | संघ | सामने | डाव | षटके | निर्धाव | धावा | बळी | सर्वोत्कृष्ट | सरासरी | इकॉनॉमी | ४ | ५ |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मिचेल स्टार्क | ऑस्ट्रेलिया | ८ | ८ | ६३.५ | ३ | २२४ | २२ | ६/२८ | १०.१८ | ३.५० | १ | १ |
ट्रेंट बोल्ट | न्यूझीलंड | ९ | ९ | ८५.० | १४ | ३७१ | २२ | ५/२७ | १६.८६ | ४.३६ | १ | १ |
उमेश यादव | भारत | ८ | ८ | ६४.२ | ५ | ३२१ | १८ | ४/३१ | १७.८३ | ४.९८ | २ | ० |
मोहम्मद शमी | भारत | ७ | ७ | ६१.० | ७ | २९४ | १७ | ४/३५ | १७.२९ | ४.८१ | १ | ० |
मॉर्ने मॉर्केल | दक्षिण आफ्रिका | ८ | ८ | ६८.१ | ४ | २९९ | १७ | ३/३४ | १७.५८ | ४.३८ | ० | ० |
२९ मार्च २०१५ पर्यंत अद्ययावत[७] |
संदर्भ
संपादन- ^ "२०१५ वर्ल्डकपचा शंखनाद". 2013-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-07-30 रोजी पाहिले.
- ^ [१]
- ^ स्टीवन फिनची हॅट्ट्रीक
- ^ अँडरसनला बाद देण्याचा पंचांचा निर्णय चुकीचा - आय.सी.सी.ची कबूली
- ^ सर्वोकृष्ट भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेने झिंबाब्वेला नमविले
- ^ फलंदाजांची आकडेवारी cricinfo.com वर
- ^ गोलंदाजांची आकडेवारी cricinfo.com वर