सुरेश रैना

भारताचा क्रिकेट खेळाडू.

सुरेश रैना (२७ नोव्हेंबर, इ.स. १९८६ - ) हा भारतचा ध्वज भारत क्रिकेट संघातील एक डावखुरा आक्रमक फलंदाज आहे. तो अधूनमधून फिरकी गोलंदाजी सुद्धा करतो. तो उत्तर प्रदेश क्रिकेट संघाकडून राष्ट्रीय सामने खेळतो. आय.पी.एल स्पर्धेत रैना चेन्नई सुपर किंग्स या संघाचा उपकर्णधार आहे. आय.पी.एल. मधील सर्वात जास्त धावा व झेल त्याच्याच नावावर आहे. आय.पी.एल मधील सर्वात जास्त सामने त्याने खेळले आहेत. सुरेश रैना याने २००५ मध्ये १८ वर्षाचा असताना श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका विरुद्ध् आपल्या एकदिवसीय कारा=किर्दीस सुरुवात केली. कसोटी सामने खेळण्यास त्याने २०१० मध्ये सुरुवात केली. २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील तो एक सदस्य होता.याने १ डिसेंबर २००६ रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.हा भारताचा पहिलाच टी ट्वेंटी सामना होता.

सुरेश रैना
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव सुरेश कुमार रैना
उपाख्य सानु
जन्म २७ नोव्हेंबर, १९८६ (1986-11-27) (वय: ३७)
रैनवारी, जम्मु आणि काश्मिर,भारत
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ४८
२०-२० शर्ट क्र. 48
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००२/०३–सद्य उत्तर प्रदेश
२००८–सद्य चेन्नई सुपर किंग्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ११० ५९ १५३
धावा ३७३ २,६२८ ४,०५७ ४,१४३
फलंदाजीची सरासरी ३३.९० ३५.५१ ४३.१५ ३६.९९
शतके/अर्धशतके १/२ ३/१६ ७/२७ ४/२८
सर्वोच्च धावसंख्या १२० ११६* २०३ १२९
चेंडू ३३० ४५८ १,२६० १,१५८
बळी १८ २५
गोलंदाजीची सरासरी ३५.६६ ५७.८५ ३४.२७ ३८.७६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/१ १/१३ ३/३१ ४/२३
झेल/यष्टीचीत ९/– ४७/– ६३/– ६२/–

२२ जानेवारी, इ.स. २०११
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

वैयक्तिक जीवन संपादन

सुरेशचे वडील त्रिलोक चंद निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. त्याचा परिवार १९८० मध्ये श्रीनगर येथून मधुन गाझियाबाद येथे स्थलांतरीत झाला. त्याला ३ मोठे भाऊ दिनेश, नरेश, मुकेश आणि १ मोठी बहिण रेनु आहे.

  भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
  भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.