जेम्स अँडरसन

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

जेम्स मायकेल जिमी अँडरसन (जुलै ३०, इ.स. १९८२:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा २००३ पासून इंग्लंडसाठी सतत खेळत आहे. अँडरसन काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळतो.

जेम्स ॲंडरसन
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव जेम्स मायकल ॲंडरसन
उपाख्य जिमी, जिम, जिम्झा, द बर्नली एक्सप्रेस
जन्म ३० जुलै, १९८२ (1982-07-30) (वय: ४१)
बर्नली, लॅंकेशायर,इंग्लंड
उंची ६ फु २ इं (१.८८ मी)
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ९ (prev. ४०)
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००२–present लॅंकेशायर (संघ क्र. ९)
२००७/०८ ऑकलंड
२००० लॅंकेशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने १८८ १९४ २९६ २६१
धावा १,३५३ २७३ २,०३९ ३७६
फलंदाजीची सरासरी ८.९६ ७.५८ ९.२६ ८.९५
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/१ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ८१ २८ ८१ २८
चेंडू ३७,८७७ ९,५८४ ५८,८७५ १२,७३०
बळी ७०३ २६९ १,११४ ३२८
गोलंदाजीची सरासरी २६.५२ २९.२२ २४.६७ २८.५७
एका डावात ५ बळी ३२ ५४
एका सामन्यात १० बळी n/a -
सर्वोत्तम गोलंदाजी ७/४२ ५/२३ ७/१९ ५/२३
झेल/यष्टीचीत १०१/– ५३/– १५७/– ६८/–

११ जुलै, इ.स. २०२४
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

अँडरसन क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. याने जलदगती गोलंदाजांमध्ये सर्वाधिक तर एकूण गोलंदाजांमध्ये (मुतिया मुरलीधरन नंतर) दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक बळी घेतले आहेत.

फेब्रुवारी २०२३मध्ये हा आयसीसी गोलंदाज क्रमवारीत हा पहिल्या क्रमांकावर होता. त्यावेळी त्याने सर्वाधिक वयाच्या गोलंदाजाने पहिला क्रमांक मिळविण्याचा विक्रम रचला.[१][२] २०२४मध्ये निवृत्तीच्या आधी अँडरसन ७व्या क्रमांकावर होता.[३] वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या मोजक्या जलदगती गोलंदाजांत अँडरसन एक आहे.[४]

अँडरसन आपला पहिला कसोटी सामना २००३मध्ये आणि शेवटचा २०२४मध्ये खेळला. हा इंग्लंडकडून २००२-१५ दरम्यान एकदिवसीय आणि २००७-०९ दरम्यान टी२० सामने खेळला..[५] २०१८मध्ये इंग्लंडच्या १,०००व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या सर्वोत्तम संघामध्ये त्याची निवड केली होती.[६]

अँडरसन जलदगती गोलंदाजांमध्ये कसोट्यांमधून सर्वाधिक बळी (७०४) घेणारा आहे. हा ६०० आणि ७०० बळी घेणारा पहिला जलदगती गोलंदाज आहे. इंग्लंडकडून अँडरसनने सर्वाधिक बळी घेतलेले आहेत.[७] हा इंग्लंडकडून सर्वाधिक आणि सचिन तेंडुलकरनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात जास्त कसोटी सामने खेळलेला आहे.[८] याने इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यांमध्येही सर्वाधिक (२६९) बळी घेतलेले आहेत.[९] अँडरसन आणि ज्यो रूटची १९८ धावांची भागीदारी इंग्लंडसाठी शेवटच्या विकेटसाठीची विक्रमी भागीदारी आहे. अँडरसन कसोट्यांमध्ये फलंदाजी करीत असताना विक्रमी ११४ वेळा नाबाद राहिला आहे.[१०]

उच्च फॉर्ममध्ये[मराठी शब्द सुचवा] असतानाही २०२४मध्ये इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने अँडरसनला लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर निवृत्त करण्याची घोषणा केली

सुरुवातीचे आणि खाजगी जीवन

संपादन

अँडरसनचा जन्म इंग्लंडच्या लँकेशायर काउंटीतील बर्नली शहरात झाला व त्याचे लहानपण येथेच गेले. याने सेंट मेरीज आणि सेंट थियोडोर आरसी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. हा अगदी लहानपणापासून बर्नली क्रिकेट क्लबमध्ये खेळत असे. शाळांना सुट्या असताना आणि वीकांतात ह क्लबच्या दुसऱ्या दर्जाच्या संघाचा स्कोरर असे. त्याचे वडील मायकेल या संघाचे नायक होते.[११][१२] जेम्सला लहापणापासूनच क्रिकेट खेळाडू व्हायचे होते. वयाच्या १७व्या वर्षी हा लँकेशायर लीगमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक होता.[१३] त्याने म्हणले आहे की "मी नेहमीच सीम बोलिंग करीत असे परंतु १७व्या वर्षी काय झाले माहिती नाही पण अचानक मी जलदगतीने गोलंदाजी करू लागलो."[ संदर्भ हवा ] अँडरसन फुटबॉलचा चाहता असून बर्नली एफ.सी.चा समर्थक आहे.[१४]

२००४मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळत असताना अँडरसनची ओळख डॅनियेला लॉइडशी झाली. त्यांनी २००६मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत.[१५][१६]

काउंटी क्रिकेट

संपादन

अँडरसन आपला पहिला लिस्ट अ काउंटी सामना २००० नॅटवेस्ट चषक स्पर्धेत लँकेशायर क्रिकेट बोर्ड कडून सफोक काउंटी विरुद्ध खेळला. यात त्याने रसेल केटलीचा पहिला बळी घेतला.[१७]

२००२मथ्ये अँडरसन पहिला प्रथम वर्गीय सामना लँकेशायरकडून खेळला. या हंगामात त्याने १३ सामन्यांमध्ये प्रत्येकी २२.२८ धावा देत ५० बळी घेतले. यात तीन वेळा एकाच डावात ५ बळी होते.[१८] इंग्लंडकडून कसोटी सामने खेळलेला इयान वॉर्ड अँडरसनचा पहिला प्रथम वर्गीय बळी होता.[१९] याच वर्षी त्याला लँकेशायरचा सर्वोत्तम नवोदित खेळाडू पुरस्कार दिला गेला.[२०] २००३मध्ये अँडरसन लँकेशायरकडून हॅटट्रिक घेणारा वयाने सगळ्यात लहान खेळाडू झाला. ही हॅटट्रिक त्याने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आपल्या कसोटी पदार्पणाआधी आठवडाभर घेतली होती.[२१] मे २००४ मध्ये अँडरसनने वूस्टरशायरविरुद्ध पहिल्यांदा एकाच सामन्या १० बळी घेतले.[२२]

अँडरसन २००५ च्या हंगामात लँकेशायरकडून पूर्ण वेळ खेळला. याच वेळी त्याला राष्ट्रीय संघात घेण्यात आले होते परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही. हिवाळ्यातील आंतरराष्ट्रीय दौरे संपल्यावर अँडरसन परत लँकेशायरकडून खेळायला लागला परंतु सामन्यांमध्ये खेळण्याचा सराव नसल्याने त्याची कामगिरी फारशी प्रभावशाली नव्हती.[२३] २००५ च्या काउंटी मोसमात त्याने ३०.२१ सरासरीने ६० प्रथम वर्गीय आणि २२.०० सरासरीने २७ एकदिवसीय बळी घेतले.[१८][२४]

२००६ च्या मे महिन्यात अँडरसनच्या पाठीत अस्थिभंग झाल्याने त्याला लँकेशायरकडून खेळता आले नाही.[२५] या वर्षी तो फक्त दोन सामने खेळला आणि त्यातही त्याने फक्त प्रत्येकी ४ षटके तीन वेळा टाकली. इंग्लड राष्ट्रीय संघाने त्याला अधिक दुखापत होऊ नये म्हणून हे बंधन घातले होते.[२६] लँकेशायरने आपल्याकडून खेळू न शकणाऱ्या अँडरसनला ग्लॅमॉर्गन संघात पाठविण्याचाही विचार केला परंतु शेवटी खेळता आले नाही तरी त्याला आपल्याच संघात ठेवून घेतले.[२७]

२००८चा दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर अँडरसन लँकेशायरकडून खेळला नाही..[२८] या मोसमात त्याने लँकेशायरसाठी ७.७५ धावांच्या सरासीने २० प्रथम वर्गीय बळी घेतले.[२९]

२००९ मोसमाच्या पहिल्याच सामन्यात अँडरसनने ससेक्सविरुद्ध प्रथम वर्गीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी करीत १०९ धावांत ११ बळी घेतले. त्यानंतर लगेचच त्याला वेस्ट इंडीजविरुद्ध मालिका खेळण्याची संधी दिली गेली.[३०] २६ एप्रिल २००९ पर्यंत अँडरसनने लँकेशायरसाठी ४८ सामन्यांमध्ये २४.३७ च्या सरासरीने १८८ बळी आणि ४४ लिस्ट अ सामन्यांमध्ये २१.७८ च्या सरासरीने ६६ बळी घेतले होते.[३१][३२]

आंतरराष्ट्रीय क्रिकेट

संपादन

अँडरसनची   इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी २००२मध्ये पहिल्यांदा निवड झाली तेव्हा त्याने अजून लँकेशायरकडून काउंटी सामना सुद्धा खेळलेला नव्हता.[३३] निवडीच्या वेळी त्याने २६.७५ च्या सरासरीने ५ लिस्ट अ सामन्यांमध्ये २३ बळी घेतलेले होते.[३४]

अँडरसनची गोलंदाजीची पद्धत निराळी आहे. चेंडू टाकतानाच्या क्षणी त्याचे डोके खाली झुकलेले असते आणि त्यानी डोळे मिटलेले असतात. इंग्लंडच्या क्रीडा मार्गदर्शकांच्या सल्ल्याने त्याने काही काळ डोके न झुकवता चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु असे करताना त्याचा वेग कमी होत असे. अँडरसनने पुन्हा आपली पहिलीच पद्धत अवलंबिली..[३५] २००३ साली इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज बॉब विलिसने भाकित केले होते की अँडरसनच्या या पद्धतीमुळे त्याला फारतर ५ वर्षे खेळता येईल[१३] परंतु अँडरसन २१ वर्षे कसोटी क्रिकेट खेळला.

२००२-०३: विश्वचषक, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका

संपादन

१५ डिसेंबर, २००२ रोजी वयाच्या २०व्या वर्षी अँडरसन आपला पहिला एकदिवसीय सामना   ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबोर्न येथे खेळला. सलामीला गोलंदाजी करीत त्याने ६ षटकांमध्ये १/४६ अशी कामगिरी केली.[३६]   श्रीलंका शामिल असलेल्या या तिरंगी स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर त्याची २००३ च्या विश्वचषक खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघात निवड झाली. या स्पर्धेत त्याने   पाकिस्तानविरुद्ध दिवस-रात्रीच्या सामन्यात ४ बळी घेउन इंग्लंडला विजय मिळवून दिला व स्वतः मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला. याच स्पर्धेतील   ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आपल्या शेवटच्या षटकात त्याने १२ धावा दिल्या व नंतर इंग्लंडचा संघ हा सामना हरला व स्पर्धेबाहेर पडला.

२००३ च्या मोसमात अँडरसन आपला पहिला कसोटी सामना खेळला. लॉर्ड्स मैदानावर   झिम्बाब्वेविरुद्ध त्याने पदार्पणातच एका डावात ५ बळी मिळविले. इंग्लंडकडून आपल्या पहिल्याच कसोटीमध्ये ही कामगिरी करणारा हा ४२वा खेळाडू आहे.[३७] यानंतरच्या लगेचच्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील एकदिवसीय सामन्यात त्याने ओव्हल मैदानावर हॅटट्रिक घेतली. इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा अँडरसन पहिलाच खेळाडू होय.[३८]

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अँडरसनला अपेक्षित इतके यश मिळाले नाही.[३९] यात त्याने ३९.८६ च्या सरासरीने १५ बळी घेतले.[४०] यातील ५ बळी त्याने पाचव्या सामन्यात एकाच डावात १०२ धावा देउन घेतले.[४१][४२] या सामन्यांमध्ये विशेषतः ग्रॅम स्मिथने त्यला चांगलेच झोडपले. त्याने अँडरसनच्या गोलंदाजीवर १७२ बॉलमध्ये १५७ धावा काढल्या आणि फक्त एकदाच अँडरसनकडून बाद झाला.[४३]

अँडरसनला या वर्षीचा क्रिकेट राइटर्स यंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार एकमुखाने मिळाला होता.[४४] त्याच सुमारास त्याला इंग्लंड बोर्डाने मध्यवर्ती कंत्राट देऊ केले.[४५] यानंतर लगेचच डाव्या गुडघ्याला दुखात झाल्याने त्याने बांगलादेश दौऱ्यातून माघार घेतली.[४६]

श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी अँडरसनची निवड झाली परंतु दुखातपींमुळे त्याला फक्त एक कसोटी सामना खेळता आला. यात त्याने ०/८५ अशी कामगिरी केली.

२००४-०५: वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे, पाकिस्तान

संपादन
 
२००६मध्ये ॲडलेड ओव्हल मैदानावर सराव करताना अँडरसन

दुखापतीतून बरे झालेल्या अँडरसनला वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय मालिकांसाठी निवडले गेले होते[४७] परंतु कसोटी सामन्यांसाठी जेम्स कर्टली व इतर गोलंदाजांना कौल देत अँडरसनला राखून ठेवण्यात आले.[४८] एकदिवसीय सामन्यांमध्ये अँडरसनने प्रत्येकी ३७ धावा देत ४ बळी घेतले.[४९] या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात क्रिस गेलला बाद करून त्याने आपला ५०वा एकदिवसीय बळी मिळवला.[५०] यावेळी अँडरसनची एकूण बळींची संख्या २३.७८ च्या सरासरीने ५० इतकी होती.[५१]

२००६: भारत, ऑस्ट्रेलिया

संपादन

२००७: विश्वचषक, वेस्ट इंडीज, भारत, श्रीलंका

संपादन

विक्रम

संपादन

पुरस्कार आणि बहुमान

संपादन

इतर व्यवसाय आणि छंद

संपादन
  इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
  इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

साचा:इंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०१५

साचा:इंग्लंड संघ - क्रिकेट टी२० विश्वचषक, २०१०

 1. ^ Hogwood, Cameron (22 February 2023). "Anderson returns to top of ICC Test bowling rankings". Sky Sports. 1 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2024 रोजी पाहिले.
 2. ^ "England's 'evergreen' Anderson becomes oldest cricketer to top Test rankings". The Times of India. 22 February 2023.
 3. ^ "ICC – Test Match Player Rankings". Icc-cricket.com. 22 February 2023 रोजी पाहिले.
 4. ^ "James Anderson: England bowler set to join illustrious list of stars to compete at the elite level after turning 40". BBC Sport. 16 August 2022.
 5. ^ "James Anderson profile and biography, stats, records, averages, photos, and videos".
 6. ^ "England's greatest Test XI revealed". ICC. 30 July 2018. 22 December 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 December 2022 रोजी पाहिले.
 7. ^ "James Anderson becomes third-highest wicket-taker in Tests". International Cricket Council. 4 April 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2021 रोजी पाहिले.
 8. ^ "Records – Test Matches – Individual Records (Captains, Players, Umpires) – Most Matches In Career". ESPNcricinfo. 22 December 2022 रोजी पाहिले.
 9. ^ "Records - England - One-Day Internationals - Most Wickets". ESPNcricinfo. 22 December 2022 रोजी पाहिले.
 10. ^ "Records. Test matches. Partnership records. Highest partnerships by wicket". ESPNcricinfo. 16 November 2021 रोजी पाहिले.
 11. ^ Anderson, James; Gibson, Richard (2012). Jimmy: My Story. London: Simon & Schuster. pp. 12–13. ISBN 978-0857207050. Unknown parameter |name-list-style= ignored (सहाय्य)
 12. ^ साचा:Cite podcast
 13. ^ a b Emma John (19 September 2003). "Lessons in life". ESPNcricinfo. Retrieved on 29 May 2008.
 14. ^ "The Big Interview: Jimmy Anderson". Evening Standard. 1 June 2009. 31 January 2021 रोजी पाहिले.
 15. ^ Emma John (October 2007). "How the pin-up grew up". ESPNcricinfo. Retrieved on 10 December 2007.
 16. ^ Lancashire County Cricket Club (12 January 2009). "Jimmy's Finest Delivery". ESPNcricinfo. 16 June 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Retrieved on 12 January 2009.
 17. ^ "Suffolk v Lancashire Cricket Board, 2000 NatWest Trophy". CricketArchive. 2021-12-22 रोजी पाहिले.
 18. ^ a b "First-class bowling in each season by James Anderson". CricketArchive. Retrieved on 29 May 2008.
 19. ^ "Stats - James Anderson joins 1000 first-class wickets club". ESPNcricinfo. 6 July 2021 रोजी पाहिले.
 20. ^ "James Anderson". ESPNcricinfo. Retrieved on 29 May 2008.
 21. ^ "Hat-trick for Anderson as Essex stumble at Old Trafford". ESPNcricinfo. 14 May 2003. Retrieved on 26 May 2008.
 22. ^ Andrew Miller (14 May 2004). "Anderson and Keedy take Lancashire top". ESPNcricinfo. Retrieved on 29 May 2008.
 23. ^ "Cooley backs Anderson for Pakistan". ESPNcricinfo. 28 September 2005. Retrieved on 30 May 2008.
 24. ^ "ListA bowling in each season by James Anderson". CricketArchive. Retrieved on 30 May 2008.
 25. ^ "Anderson out for two months". ESPNcricinfo. 2 February 2006. Retrieved on 29 May 2008.
 26. ^ "Cork haul overshadows Anderson". ESPNcricinfo. 21 September 2006. Retrieved on 29 May 2008.
 27. ^ "Anderson included in Lancashire squad". ESPNcricinfo. 17 September 2006. Retrieved on 29 May 2008.
 28. ^ "Harmison available for season finale". ESPNcricinfo. 1 September 2008. Retrieved on 1 September 2008.
 29. ^ "Test bowling in each season by James Anderson". CricketArchive. Retrieved on 26 April 2009.
 30. ^ ESPNcricinfo staff (24 April 2009). Big wins for Nottinghamshire and Lancashire. ESPNcricinfo. Retrieved on 26 April 2009.
 31. ^ "First-class bowling for each team by James Anderson". CricketArchive. Retrieved on 26 April 2009.
 32. ^ "List A bowling for each team by James Anderson". CricketArchive. Retrieved on 26 April 2009.
 33. ^ "James Anderson". CricketArchive. Retrieved on 29 May 2008.
 34. ^ "ListA bowling in each season by James Anderson". CricketArchive. Retrieved on 29 May 2008.
 35. ^ Andrew Miller (18 April 2008). "Anderson seeks consistency in England comeback". ESPNcricinfo. Retrieved on 3 June 2008.
 36. ^ "Australia v England VB Series 2002/03; Melbourne Cricket Ground 15 December 2002 (50-over match) (day/night)". CricketArchive. Retrieved on 29 May 2008.
 37. ^ "1st Test: England v Zimbabwe at Lord's, May 22–24, 2003". ESPNcricinfo. 13 December 2011 रोजी पाहिले.
 38. ^ Andrew Miller (20 June 2003). "Anderson and Trescothick batter Pakistan to defeat". ESPNcricinfo. Retrieved on 4 September 2008.
 39. ^ Freddie Auld (6 August 2003). "Don't panic!". ESPNcricinfo. Retrieved on 28 May 2008.
 40. ^ "JM Anderson – ODI Batting – Career summary". ESPNcricinfo. Retrieved on 28 May 2008.
 41. ^ "South Africa in England Test Series, 2003 – England averages". ESPNcricinfo. Retrieved on 28 May 2008.
 42. ^ Andrew Miller (6 August 2003). "Into the hands of fate". ESPNcricinfo. Retrieved on 16 May 2008.
 43. ^ Rob Smyth (9 September 2003). "As the dust settles ..." ESPNcricinfo. Retrieved on 28 May 2008.
 44. ^ "Anderson voted Young Cricket of the Year". ESPNcricinfo. 15 August 2003. Retrieved on 28 May 2008.
 45. ^ "Anderson, Flintoff and Collingwood awarded central contracts". ESPNcricinfo. 11 September 2003. Retrieved on 28 May 2008.
 46. ^ "Anderson to miss Bangladesh Tests". ESPNcricinfo. 25 September 2003. Retrieved on 28 May 2008.
 47. ^ "England name unchanged squad for Windies tour". ESPNcricinfo. 7 January 2004. Retrieved on 29 May 2008.
 48. ^ "Anderson waits for his opening". ESPNcricinfo. 22 April 2004. Retrieved on 29 May 2008.
 49. ^ "England in West Indies, 2003–04 One-Day Series Averages". ESPNcricinfo. Retrieved on 21 December 2008.
 50. ^ "a15876, o2127: West Indies v England, England in West Indies 2003/04 (7th ODI)". CricketArchive. Retrieved on 21 December 2008.
 51. ^ "JM Anderson: One-Day Internationals – Bowling analysis, cummulative". ESPNcricinfo. Retrieved on 21 December 2008.