तास्किन अहमद
तास्किन अहमद ताझिम (जन्म ३ एप्रिल १९९५) हा एक बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे. व्यापारी अब्दुर रशीद आणि सबिना रशीद यांचा तो मुलगा आहे. तो उजव्या हाताने तेजगती गोलंदाजी करतो आणि डावखोरा फलंदाज आहे. प्रथम वर्गीय क्रिकेट आणि लिस्ट अ क्रिकेटमध्ये तो ढाका मेट्रोपॉलिस संघाकडून खेळला आहे तर बांगलादेश प्रीमियर लीग मध्ये तो चित्तगॉंग किंग्स आणि चित्तगॉंग विकिंग्स ह्या फ्रँचायझी संघांकडून खेळला आहे.
तास्किन अहमद | ||||
बांगलादेश | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
पूर्ण नाव | तास्किन अहमद ताझिम | |||
उपाख्य | ताझिम, तास्किन | |||
जन्म | ३ एप्रिल, १९९५ | |||
मोहम्मदपूर, ढाका,बांगलादेश | ||||
उंची | ६ फु २ इं (१.८८ मी) | |||
विशेषता | गोलंदाज | |||
फलंदाजीची पद्धत | डावखोरा | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने जलदगती | |||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
एकदिवसीय शर्ट क्र. | ३ | |||
राष्ट्रीय स्पर्धा माहिती | ||||
वर्ष | संघ | |||
२०११-सद्य | ढाका मेट्रोपॉलिस | |||
२०१३-सद्य | चित्तगॉंग किंग्स | |||
२०१५-सद्य | चित्तगॉंग विकिंग्स | |||
कारकिर्दी माहिती | ||||
ए.सा. | टी२० | प्र.श्रे. | लि.अ. | |
सामने | २० | १३ | १० | ५० |
धावा | ६ | १७ | ५७ | ९९ |
फलंदाजीची सरासरी | १.०० | १७.०० | ११.४० | ७.०७ |
शतके/अर्धशतके | ०/० | ०/० | ०/० | ०/० |
सर्वोच्च धावसंख्या | २ | १५* | १७ | ३८* |
चेंडू | ८६८ | २२८ | १३३८ | २१७३ |
बळी | ३१ | ९ | २४ | ७९ |
गोलंदाजीची सरासरी | २६.३५ | २६.४४ | २९.०० | २३.२४ |
एका डावात ५ बळी | १ | ० | ० | १ |
एका सामन्यात १० बळी | ० | ० | ० | ० |
सर्वोत्तम गोलंदाजी | ५/२८ | २/३२ | ४/६६ | ५/२८ |
झेल/यष्टीचीत | ४/- | १/- | १/- | १०/- |
१७ नोव्हेंबर, इ.स. २०१६ |
सुरुवातीची कामगिरी
संपादनत्याने किंग खालिद संस्थेमधून एस्.एस्.सी तर स्टॅमफोर्ड महाविद्यालयामधून एच्.एस्.सीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या तो अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ बांगलादेशचा विद्यार्थी आहे. त्याने १० जानेवारी २००७ रोजी अबाहानी मैदानावर क्रिकेटची सुरुवात केली. १५ आणि १७-वर्षांखालील स्तरावर क्रिकेट खेळल्यानंतर त्याला १९-वर्षांखालील संघात खेळण्याची संधी मिळाली. ढाका मेट्रोपोलिस संघाकडून ऑक्टोबर २००११ मध्ये त्याने बारिसल विभागाविरुद्ध प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[१]
१९-वर्षांखालील विश्वचषक, २०१२ मध्ये ११ गडी बाद करून, तो बांगलादेशचा सर्वात जास्त गडी बाद करणारा गोलंदाज होता.[२] बांगलादेश प्रीमियर लीगचा उपांत्य आणि त्याच्या दुसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात त्याने चित्तगॉंग किंग्सकडून दुरोंतो राजशाही संघाविरुद्ध खेळताना ३१ धावांमध्ये ४ गडी बाद केले आणि त्याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने ४ सामन्यांमध्ये ८ बळी मिळवले आणि हेच त्याची कारकिर्दीतील महत्त्वाचे वळण ठरले.[३]
बीपीएल-३ मध्ये तो चित्तगॉंग विकिंग्स कडून खेळला. २०१५ मध्ये तो बांगलादेशमध्ये गुगलवर सर्वात जास्त शोध घेतल्या गेलेल्या व्यक्तिंमध्ये चवथ्या क्रमांकावर होता.[४]
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
संपादनरुबेल हुसेन नंतर, बांगलादेश क्रिकेटमधील तास्किन अहमद हा दुसरा सर्वात तेज गोलंदाज आहे. त्याने २०१६ आशिया चषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान विरुद्ध गोलंदाजी करताना ताशी १४८ किमीच्या वेगाने चेंडू टाकला होता आणि २००९ आयसीसी विश्व ट्वेंटी२० च्या एका सराव सामन्यात रुबले हुसेनने ताशी १४९.५ किमी वेगाने चेंडू टाकला होता. तास्किन अहमद १४५ किमीच्या वेगाने सातत्याने गोलंदाजी करु शकतो. १ एप्रिल २०१४ रोजी मशरफेला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्यासाठी राष्ट्रीय संघाचे दार अचानक उघडले गेले आणि त्याने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात ग्लेन मॅक्सवेलचा बळी घेतला. १७ जून २०१४ रोजी त्याने भारताविरुद्ध ५ गडी बाद केले आणि एकदिवसीय पदार्पणात ५ बळी घेणारा पहिला बांगलादेशी गोलंदाज ठरला. त्याच्या ह्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला २०१४ क्रिकइन्फो पुरुस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचे नामांकन सुद्धा मिळाले.[५]
२०१४ च्या मोसमात स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला क्रिकेट विश्वचषक, २०१५ स्पर्धेत बांगलादेश क्रिकेट संघात निवडले गेले. विश्वचषक गट फेरीमध्ये त्याने अफगाणिस्तानविरुद्ध एक, स्कॉटलंड विरुद्ध तीन आणि इंग्लंडविरुद्ध दोन गडी बाद केले आणि संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेण्यासाठी मोलाचे योगदान दिले. मेलबर्नमधील, विश्वचषक उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेशची गाठ भारताशी पडली. त्यावेळी भारतीय संघ संपूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरला होता. तास्किनने तीन गडी बाद करून सर्वांना फारच प्रभावित केले. बांगलादेशतर्फे, विश्वचषक २०१५ स्पर्धेत त्याने सर्वात जास्त (९) गडी बाद करण्याची कामगिरी केली. विकेट मिळाल्यानंतर तास्किन आणि मशरफे आनंद साजरा करताना "चेस्ट-बम्प" करत ज्याला विश्वचषक-२०१५चा सर्वात संस्मरणीय क्षण म्हणून नामांकन मिळाले होते.
त्याने एप्रिल २०१५ मध्ये पाकिस्तानला बांगलादेशने एकदिवसीय मालिकेमध्ये दिलेला व्हाईटवॉश आणि त्यानंतर जून २०१५ मध्ये भारताविरुद्ध मिळवलेल्या मालिकाविजयामध्ये मोलाची कामगिरी बजावली.
२०१६ मध्ये त्याची २०१६ आयसीसी वर्ल्ड ट्वेंटी२० साठी बांगलादेश संघात निवड करण्यात आली. परंतु नंतर स्पर्धेमध्ये गोलंदाजीच्या अवैध शैलीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याला गोलंदाजीसाठी निलंबित करण्यात आले.[६] त्यानंतर आयसीसीने निर्बंध हटवल्यानंतर त्याने २५ सप्टेंबर २०१६ रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सुरू झालेल्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात पुनरागमन केले.[७]
विक्रम आणि आकडेवारी
संपादनएकदिवसीय सामन्यांमध्ये ५ बळी
संपादन# | कामगिरी | सामना क्र. | विरुद्ध | स्थळ | शहर | देश | वर्ष | निकाल | धावफलक |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | ५/२८ | १ | भारत | शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान | ढाका | बांगलादेश | २०१४ | पराभूत | [१] |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "बारिसल विभाग वि. ढाका मेट्रोपोलिस, ३० ऑक्टोबर – २ नोव्हेंबर २०११". १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी १९-वर्षांखालील विश्वचषक, २०१२ / नोंदी / सर्वाधिक बळी". इएसपीएन क्रिकइन्फो. १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ इसाम, मोहम्मद. "तास्किनमुखे किंग्सच्या अंतिम सामन्यातील आशा कायम" (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ पान्वर, दक्ष. "तास्किन अहमद: अ टॉल, फास्ट ॲंड हॅंडफूल पोस्टर-बॉय". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "एकदिवसीय गोलंदाजी मनांकने, द ऑल-पेस ऑल-स्टार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अवैध शैलीमुळे तास्किन आणि सनी निलंबित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "२०१६ मधील बांगलादेशच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पुनरागमनासाठी तास्किन सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
संपादन- तास्किन अहमद क्रिकइन्फो वर
- खेळाडू माहिती: तास्किन अहमद क्रिकेट आर्काईव्ह
- तास्किन अहमद प्रोफाइल Archived 2016-09-23 at the Wayback Machine.