२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२०
२०१६ सालात पार पडलेली विश्व आयसीसी टी-ट्वेंटी ही क्रिकेट स्पर्धा २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा भारतात भरविण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २८ जानेवारी, २०१५ च्या दुबईतील बैठकीत ठरले. ही स्पर्धा ८ मार्च ते ३ एप्रिल २०१६ दरम्यान खेळविली गेली. सामने कोलकाता, बंगलोर, मुंबई, चेन्नई, धरमशाला, नवी दिल्ली, हैदराबाद, मोहाली, आणि नागपूर येथे खेळले गेले.
२०१६ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा - भारत | |
---|---|
संघ | १६ (८ संघांतून) |
यजमान देश | भारत |
विजेता संघ | वेस्ट इंडीज (२ वेळा विजेते) |
उपविजेता संघ | इंग्लंड |
सामने | ३५ |
सर्वाधिक धावा | तमिम इक्बाल (२९५) |
सर्वाधिक बळी | मोहम्मद नबी (१२) |
मालिकावीर | विराट कोहली |
← २०१४ (आधी) | (नंतर) २०२० → |
२०१४ च्या स्पर्धेप्रमाणे यावेळी सुद्धा स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ २०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी मधून निवडण्यात आले.
स्पर्धा तीन टप्प्यांत विभागली गेली होती. पहिल्या फेरीत, सर्वात खालच्या दहा संघांपैकी दोन संघ, अग्रस्थानी असलेल्या पहिल्या आठ संघांबरोबर सुपर १० फेरी साठी निवडण्यात आले. सर्वात शेवटी दुसऱ्या फेरीच्या दोन गटांमधून प्रत्येकी दोन असे चार संघ बाद फेरीमध्ये . इडन गार्डन्स, कोलकाता येथे खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करून २०१२ नंतर दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकली.
भारतीय फलंदाज विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. स्पर्धेत सर्वाधिक धावा बांगलादेशच्या तमिम इक्बालने केल्या तर सर्वाधिक गडी अफगाणिस्तानचा मोहम्मद नबीने केले.
मैदाने
संपादन२१ जुलै २०१५, रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाने २०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी यजमान शहरांची घोषणा केली. बंगळूर, चेन्नई, धरमशाला, मोहाली, मुंबई, नागपुर आणि नवी दिल्ली या शहरांव्यतिरिक्त अंतिम सामन्यांचे यजमानपद कोलकाता या शहराला दिले गेले.
एम्. ए. चिदंबरम मैदानाच्या तिसऱ्या स्टँडच्या बांधकामाबाबत काही कायदेशीर समस्या असल्याने चेन्नई शहरामध्ये एकाही सामन्याचे आयोजन होऊ शकले नाही. गट अचे सर्व सामने धरमशाला येथील एच.पी.सी.ए. मैदानावर आणि गट बचे सर्व सामने नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळविण्यात आले. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा गट २चा सामना एच.पी.सी.ए. मैदानवर नियोजित होता. परंतु एच.पी.सी.ए. कडून पाकिस्तानी क्रिकेट संघाला सुरक्षा देण्याबाबत असमर्थता दर्शवण्यात आल्यामुळे सदर सामना इडन गार्डन, कोलकाता येथे खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.[१]
दक्षिण दिल्ली महानगर पालिकेकडून मैदानामधील मेहरा ब्लॉकला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते त्यामुळे सुरुवातीला फिरोजशाह कोटला मैदानावर होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्याबाबत अनिश्चितता होती. प्रमाणपत्र न मिळाल्यास आयसीसी आणि बीसीसीआय सदर सामना दुसऱ्या मैदानावर घेण्याच्या तयारीत होते. परंतू, २३ मार्च रोजी, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला (डीडीसीए) दक्षिण दिल्ली महानगर पालिकेकडून सदर ब्लॉक वापरण्याची परवानगी मिळाली.[२]
स्थळ | शहर | क्षमता | सामने |
---|---|---|---|
ईडन गार्डन्स | कोलकाता | ६६,३४९ | ४ (अंतिम) |
एम. चिन्नास्वामी मैदान | बंगळूर | ४०,००० | ३ |
वानखेडे मैदान | मुंबई | ३२,००० | ४(उपांत्य) |
एच.पी.सी.ए. मैदान | धरमशाला | २३,००० | ८ (गट फेरी) |
फिरोजशाह कोटला मैदान | दिल्ली | ४०,७१५ | ४ (उपांत्य) |
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान | मोहाली | २६,९५० | ३ |
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान | नागपूर | ४५,००० | ९ (गट फेरी) |
पात्र संघ
संपादनस्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा १६ देशांचे संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ ६ ते २६ जुलै २०१५ दरम्यान आयर्लंड व स्कॉटलंड दरम्यान खेळविल्या गेलेल्या २०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी मधून निवडण्यात आले.
२० एप्रिल २०१४ च्या आय.सी.सी. आंतरराष्ट्रीय टी२० चॅम्पियनशिप क्रमवारीनुसार पूर्ण सभासद असलेले अव्वल ८ संघ आपोआप सुपर १० मध्ये तर इतर ८ संघ गट फेरी मध्ये समाविष्ट करण्यात आले. गट फेरीमधील विजेते अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी सुपर १० मध्ये प्रवेश केला.
ऑक्टोबर २०१५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शाहर्यार खान यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानची मालिका न खेळविली गेल्यास पाकिस्तानी संघ २०१६ विश्व टी-ट्वेंटी मध्ये खेळणार नाही असे जाहीर केले. मालिका शेवटी रद्द करण्यात आली तरीही, फेब्रुवारी २०१६ मध्ये पाकिस्तान सरकारने संघाला भारत दौरा करण्यासाठी मंजूरी दिली [३]. मार्च २०१६ च्या सुरुवातीला पाकिस्तानने स्पर्धआधी सुरक्षा व्यवस्थेचे मुल्यांकन करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविले. ह्या भेटीनंतर पीसीबीच्या विनंतीवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना धरमशाला पासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे हलविण्यात आला, आणि ११ मार्च रोजी पाकिस्तानने स्पर्धेत सहभाग निश्चित केला[४].
पात्रता निकष | देश |
---|---|
यजमान | भारत |
पूर्ण सदस्य | ऑस्ट्रेलिया |
इंग्लंड | |
न्यूझीलंड | |
पाकिस्तान | |
दक्षिण आफ्रिका | |
श्रीलंका | |
वेस्ट इंडीज | |
बांगलादेश | |
झिम्बाब्वे | |
पात्रता | स्कॉटलंड |
आयर्लंड | |
हाँग काँग | |
नेदरलँड्स | |
अफगाणिस्तान | |
ओमान |
सामना अधिकारी
संपादनसंपूर्ण स्पर्धेमध्ये सामना अधिकारी म्हणून आय.सी.सी. रेफ्रींचे एलिट पॅनेलमधील ७ अधिकाऱ्यांनी काम पाहीले.
तसेच आय.सी.सी. पंचांच्या एलिट पॅनेलमधील १२, आंतरराष्ट्रीय पंच आणि रेफ्रींच्या पॅनेल मधील १० व आय.सी.सी. असोसिएट आणि संलग्न पॅनेलमधील २ सदस्य मैदानावर पंच म्हणून कामगिरी पार पाडली.
|
|
|
|
|
बक्षिसाची रक्कम
संपादन२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेमध्ये एकूण २० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स बक्षीस म्हणून देण्यात आले. ही रक्कम २०१४ च्या रकमेपेक्षा ३३% जास्त होती.[५] संघांच्या कामगिरीनुसार सदर रक्कम खालीलप्रमाणे वाटण्यात आली:[६]
टप्पा | बक्षिसाची रक्कम (US$) |
---|---|
विजेते | $३.५ दशलक्ष |
उपविजेते | $१.५ दशलक्ष |
उपांत्य सामन्यातील पराभूत संघ | $७५०,००० प्रत्येकी |
“सुपर १० फेरी” मधील प्रत्येक सामन्यातील विजेत्यास बोनस | $५०,००० |
सर्व १६ संघांना सहभागाबद्दल | $३००,००० |
एकूण | $१०,००,००० |
सराव सामने
संपादनवेळापत्रक
संपादनखाली सुचीबद्ध केलेल्या सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ (यूटीसी+०५:३०) आहेत.
पहिली/गट फेरी
संपादनगट अ
संपादनसंघ | सा | वि | प | अ | नेरर | गुण |
---|---|---|---|---|---|---|
बांगलादेश | ३ | २ | ० | १ | +१.९३८ | ५ |
नेदरलँड्स | ३ | १ | १ | १ | +०.१५४ | ३ |
ओमान | ३ | १ | १ | १ | -१.५२१ | ३ |
आयर्लंड | ३ | ० | २ | १ | -०.६८५ | १ |
वि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : ओमान, गोलंदाजी
- पावसामुळे सामना रद्द
- या सामन्याच्या निकालामुळे नेदरलँड्स स्पर्धेतून बाद
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
- पावसामुळे सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.
- बांगलादेशच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला.
- या सामन्याच्या निकालामुळे आयर्लंड स्पर्धेतून बाद
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
- पावसामुळे प्रत्येकी ६ षटकांचा सामना खेळविण्यात आला.
वि
|
||
- नाणेफेक : ओमान, गोलंदाजी
- पावसामुळे ओमान पुढे १२ षटकांमध्ये १२० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले
- बांगलादेश तर्फे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावा पूर्ण करणारा तमीम इक्बाल हा पहिलाच फलंदाज
- या सामन्याच्या निकालामुळे ओमान स्पर्धेतून बाद तर बांगलादेश सुपर १० च्या गट २ मध्ये सामील
गट ब
संपादनसंघ | सा | वि | प | अ | नेरर | गुण |
---|---|---|---|---|---|---|
अफगाणिस्तान | ३ | ३ | ० | ० | +१.५४० | ६ |
झिम्बाब्वे | ३ | २ | १ | ० | -०.५६७ | ४ |
स्कॉटलंड | ३ | १ | २ | ० | -०.१३२ | २ |
हाँग काँग | ३ | ० | ३ | ० | -१.०१७ | ० |
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : झिंबाब्वे, फलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे स्कॉटलंड स्पर्धेतून बाद
वि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे हाँग काँग स्पर्धेतून बाद
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे झिंबाब्वे स्पर्धेतून बाद तर अफगाणिस्तान सुपर १० च्या अ गटात सामील
- अफगाणिस्तानचा संघ प्रथमच विश्व टी२० स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी पात्र
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- स्कॉटलंडच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर १० षटकांत ७६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- आय.सी.सी. स्पर्धेतील स्कॉटलंडचा हा पहिलाच विजय
दुसरी/ सुपर १० फेरी
संपादनगट १
संपादनसंघ | सा | वि | प | अ | नेरर | गुण |
---|---|---|---|---|---|---|
वेस्ट इंडीज | ४ | ३ | १ | ० | +०.३५९ | ६ |
इंग्लंड | ४ | ३ | १ | ० | +०.१४५ | ६ |
दक्षिण आफ्रिका | ४ | २ | २ | ० | +०.६५१ | ४ |
श्रीलंका | ४ | १ | ३ | ० | -०.४६१ | २ |
अफगाणिस्तान | ४ | १ | ३ | ० | -०.७१५ | २ |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- ख्रिस गेलचे विश्व टी-ट्वेंटी मध्ये सर्वात वेगवान शतक
- विश्व टी-ट्वेंटी स्पर्धेत दोन शतके करणारा ख्रिस गेल हा पहिलाच फलंदाज
- ख्रिस गेलचे नवीन विक्रम - आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक षट्कार - ९८ व विश्व टी-ट्वेंटी मध्ये सर्वाधिक षट्कार - ६०
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- विश्व टी-ट्वेंटी मधील सर्वात मोठा तर आंतरराष्ट्रीय टी२० मधील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.
- इंग्लंडच्या पहिला १७ चेंडूंतील ५० धावा ह्या आंतरराष्ट्रीय टी२० मधील दुसऱ्या क्रमांकाच्या वेगवान धावा.
- क्विंटन डि कॉकचे २१ चेंडूतील अर्धशतक हे दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात वेगवान अर्धशतकाशी बरोबरी करणारे ठरले.
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- एका शतकात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक २९ धावा काढणारा एबी डि व्हिलियर्स हा दुसरा फलंदाज.
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- या सामन्याच्या निकालामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद
- ह्या मैदानावर खेळविला गेलेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत दाखल
- वेस्ट इंडीज तर्फे १००० धावा पूर्ण करणारा मार्लोन सॅम्युएल्स हा दुसरा तर ड्वेन ब्राव्हो हा तिसरा फलंदाज.
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- या सामन्याच्या निकालामुळे इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल, तर श्रीलंका व दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाहेर
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- इव्हीन लुईसचे वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण
- अफगाणिस्तानने यशस्वीरित्या टी-२० विश्वचषक सामन्यात दुसऱ्या सर्वात कमी धावसंख्याचे रक्षण केले.
वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- तिलकरत्ने दिलशान हा सर्वात जास्त विश्व ट्वेंटी२० सामने खेळणारा क्रिकेट खेळाडू ठरला (३५ सामने).
- हाशिम आमला हा दक्षिण आफ्रिकेतर्फे १००० धावा पूर्ण करणारा चवथा फलंदाज.
गट २
संपादनसंघ | सा | वि | प | अ | नेरर | गुण |
---|---|---|---|---|---|---|
न्यूझीलंड | ४ | ४ | ० | ० | +१.९०० | ८ |
भारत | ४ | ३ | १ | ० | -०.३०५ | ६ |
ऑस्ट्रेलिया | ४ | २ | २ | ० | +०.२३३ | ४ |
पाकिस्तान | ४ | १ | ३ | ० | -०.०९३ | २ |
बांगलादेश | ४ | ० | ४ | ० | -१.८०५ | ० |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- न्यू झीलंड तर्फे मिचेल सँटनरने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये फिरकी गोलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविली
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा शकिब अल हसन हा बांगलादेशचा दुसरा फलंदाज [७]
- आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावा व ५० बळी घेणारा शकिब अल हसन हा दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- ओल्या मैदानामुळे सामना उशिरा सुरू झाला व प्रत्येकी १८ षटकांचा खेळविण्यात आला.
- आय.सी.सी. एकदिवसीय व टी-ट्वेंटी विश्व चषक स्पर्धेतील मिळून हा भारताचा पाकिस्तानवर ११वा विजय[८].
- आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पाकिस्तानकडून १०० धावा पूर्ण करणारा अहमद शाहजाद हा ५वा फलंदाज.
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
- साकलेन साजीबचे बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
- टी२० क्रिकेट मध्ये ६००० धावा पूर्ण करणारा डेव्हिड वॉर्नर (ऑ) हा ४था फलंदाज
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलँड, फलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र.[९]
- शहीद आफ्रिदी (पाकिस्तान) ट्वेंटी -२० विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी (३९) घेणारा गोलंदाज झाला.[१०]
वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश स्पर्धेतून बाद.
- २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील हा चवथा १ धावेने मिळविलेला विजय.
- पाठलाग करणाऱ्या संघाचे डावातील शेवटच्या तीन चेंडूंवर तीन गडी बाद होण्याची आंतरराष्ट्रीय टी२० मधील ही पहिलीच वेळ.
- आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावांचा टप्पा पार करणारा महेंद्रसिंग धोणी हा भारताचा पाचवा फलंदाज.
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाद.
- ऑस्ट्रेलियातर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये एका सामन्यात ५ गडी बाद करणारा जेम्स फॉकनर हा पहिलाच गोलंदाज
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- हेन्री निकोल्सचे न्यू झीलंड कडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- बांगलादेशतर्फे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये एका सामन्यात ५ गडी बाद करणारा मुस्तफिजूर रहमान हा दुसरा गोलंदाज.
- बांगलादेशची आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या (७०).
- या सामन्यात एकूण १० फलंदाज यष्टीचीत झाले, आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक.
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत उपांत्य फेरीसाठी पात्र आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद.
- शेन वॉटसनचा (ऑ) शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना.[११]
- रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज.[१२]
- आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये विराट कोहली सर्वात जलद १५०० धावा (३९ डावांत).[१३]
- विराट कोहलीच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त धावा (५३६) आणि एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त सामनावीराचे पुरस्कार मिळवणारा क्रिकेट खेळाडू (६).[१४][१५]
- महेंद्रसिंग धोणी सर्वात जास्त (३२) बळी घेणारा यष्टिरक्षक.[१६]
बाद फेरी
संपादनउपांत्य | अंतिम सामना | |||||||
②१ | न्यूझीलंड | १५३/८ (२० षटके) | ||||||
①२ | इंग्लंड | १५७/३ (१७.१ षटके) | ||||||
① | इंग्लंड | १५५/९ (२० षटके) | ||||||
② | वेस्ट इंडीज | १६१/६ (१९.४ षटके) | ||||||
①१ | वेस्ट इंडीज | १९६/३ (१९.४ षटके) | ||||||
②२ | भारत | १९२/२ (२० षटके) |
उपांत्य सामने
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- जेसन रॉय विश्व ट्वेंटी२० सामन्यात इंग्लंड तर्फे दुसऱ्या सर्वात जलद ५० धावा करणारा फलंदाज (२६ चेंडू).[१७]
- आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भागीदारीत १००० धावा पूर्ण करणारी मार्टीन गुप्टील आणि केन विल्यमसन (न्यू झीलंड) ही दुसरी जोडी
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- विश्व ट्वेंटी २० मालिकेतील हा वेस्ट इंडीजचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग [१८]
अंतिम सामना
संपादनइंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र झाले (अनुक्रमे २०१० आणि २०१२ साठी). वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सामी ने नाणेफेक जिंकून, मालिकेतील आधीच्या प्रत्येक सामन्या घेतल्याप्रमाणे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने निर्धारित २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या. ज्यो रूट ३६ चेंडूत ५४ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता. वेस्ट इंडीज तर्फे कार्लोस ब्रेथवेटने २३ धावा देऊन ३ गडी बाद केले, तर सॅम्युएल बद्रीने एक षटक निर्धाव टाकत १६ धावा देऊन २ गडी बाद केले. वेस्ट इंडीजने १५६ धावांचे आव्हान ६ गड्यांच्या मोबदल्यात २ चेंडू राखून पूर्ण केले. बेन स्टोक्सने टाकलेल्या शेवटच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी १९ धावांची गरज होती. कार्लोस ब्रेथवेटने लागोपाठ चार षटकार खेचून हे आव्हान पार केले. मार्लोन सॅम्यूएल्सने ६६ चेंडूंत ८५* धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.[१९] सामन्याला ६६,००० प्रेक्षकांनी हजेरी लावली.[२०]
सांख्यिकी
संपादनसर्वाधिक धावा
संपादनफलंदाज | सामने | डाव | धावा | सरासरी | स्ट्राइक रेट | सर्वोच्च | १०० | ५० | चौकार | षट्कार |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तमिम इक्बाल | ६ | ६ | २९५ | ७३.७५ | १४२.५१ | १०३* | १ | १ | २४ | १४ |
विराट कोहली | ५ | ५ | २७३ | १३६.५० | १४६.७७ | ८९* | ० | ३ | २९ | ५ |
ज्यो रूट | ६ | ६ | २४९ | ४९.८० | १४६.४७ | ८३ | ० | २ | २४ | ७ |
मोहम्मद शहझाद | ७ | ७ | २२२ | ३१.७१ | १४०.५० | ६१ | ० | १ | २३ | १२ |
जोस बटलर | ६ | ६ | १९१ | ४७.७५ | १५९.१६ | ६६* | ० | १ | १३ | १२ |
स्रोत: ESPN Cricinfo[२१] |
सर्वाधिक बळी
संपादनखेळाडू | सामने | डाव | बळी | षटके | इको | सरासरी | सर्वोच्च | स्ट्राइक रेट | ४ विकेट | ५ विकेट |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मोहम्मद नबी | ७ | ७ | १२ | २७ | ६.०७ | १३.६६ | ४/२० | १३.४ | १ | ० |
रशीद खान | ७ | ७ | ११ | २८ | ६.५३ | १६.६३ | ३/११ | १५.२ | ० | ० |
मिशेल संटनेर | ५ | ५ | १० | १८.१ | ६.२७ | ११.४० | ४/११ | १०.९ | १ | ० |
इश सोधी | ५ | ५ | १० | १९.४ | ६.१० | १२.०० | ३/१८ | ११.८ | ० | ० |
डेव्हिड विली | ६ | ६ | १० | २१ | ७.५७ | १५.९० | ३/२० | १२.६ | ० | ० |
स्रोत: ESPN Cricinfo[२२] |
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "पाकिस्तानचा संघ भारतात येणार, सरकारची मंजूरी". 2016-03-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-23 रोजी पाहिले.
- ^ "उपांत्य लढत दिल्लीतच". 2016-07-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-24 रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानचा मार्ग मोकळा". 2016-03-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-23 रोजी पाहिले.
- ^ पाकिस्तानचा संघ भारतात येणार, सरकारची मंजूरी[permanent dead link]
- ^ विश्व ट्वेंटी२० मध्ये महिलांपेक्षा विजेत्या पुरूष संघाला १६ पट जास्त बक्षीसाची रक्कम (इंग्रजी मजकूर)
- ^ "२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० बक्षीसाची रक्कम (इंग्रजी मजकूर)". 2018-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-12 रोजी पाहिले.
- ^ बूम, बूम आफ्रिदीपुढे बांगलादेश ढेर
- ^ टीम इंडिया की जय! पाकवर ६ विकेट्सनी मात
- ^ न्यू झीलॅंड उपांत्य फेरीत
- ^ न्यू झीलॅंड वि पाकिस्तान सामन्या नंतरची आकडेवारी हायलाइट्स
- ^ वॉटसनचा टी२० क्रिकेटमधून सन्यास
- ^ आयसीसी विश्व ट्वेंटी२०: रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज
- ^ कोहलीची जादुगिरी आणि ऑस्ट्रेलिया आणि फॉकनरसाठी भूताटकी (इंग्रजी मजकूर)
- ^ आयसीसी विश्व ट्वेंटी२०: या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामनावीराचे पुरस्कार मिळवणारा क्रिकेट खेळाडू (इंग्रजी मजकूर)
- ^ नोंदी / आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / फलंदाजीतील विक्रम / एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा
- ^ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / नोंदी / सर्वाधिक बळी
- ^ चार षटकांचा फरक आणि रॉयचा विक्रम
- ^ रन्स इन बाउंड्रीज - १४६ वि. ९२ (इंग्रजी मजकूर)
- ^ ब्रेथवेटच्या ६, ६, ६, ६ मुळे वेस्ट इंडीजने विजेतेपद जिंकले. (इंग्रजी मजकूर
- ^ चित्रफीत: विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना क्षणचित्रे
- ^ फलंदाजीची आकडेवारी www.espncricinfo.com वर
- ^ गोलंदाजीची आकडेवारी www.espncricinfo.com वर