भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६
भारतीय क्रिकेट संघाने २००५-०६ च्या मोसमात पाकिस्तानचा दौरा केला. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघाचे मोसमात कसोटी क्रिकेट खेळून झाले होते. भारताने श्रीलंकेला मायदेशी २-० ने हरवले होते तर तितक्याच फरकाने पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवला होता. भारताची नोव्हेंबर २००५ मधील, दक्षिण आफ्रिकेविरूद्धची एकदिवसीय मालिका २-२ अशी अनिर्णितावस्थेत संपली होती तर पाकिस्तानने डिसेंबर २००५ मध्ये इंग्लंडला ३-२ असे हरवले होते.
भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००५-०६ | |||||
भारत | पाकिस्तान | ||||
तारीख | ७ जानेवारी – २० जानेवारी २००६ | ||||
संघनायक | राहुल द्रविड | इंझमाम-उल-हक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विरेंद्र सेहवाग (२९४) | युनीस खान (५५३) | |||
सर्वाधिक बळी | झहीर खान (१०) | अब्दुल रझाक (९) | |||
मालिकावीर | युनीस खान (पा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | युवराज सिंग (३४४) | शोएब मलिक (३१४) | |||
सर्वाधिक बळी | इरफान पठाण (९) | मोहम्मद आसिफ (५) राणा नावेद उल हसन (५) | |||
मालिकावीर | युवराज सिंग (भा) |
७ जानेवारी २००६ रोजी सुरू झालेल्या दौऱ्यात भारताचा पहिला सामना पाकिस्तान अ संघाबरोबर झाला, आणि १९ फेब्रुवारी रोजी कराचीतील एकदिवसीय सामन्याने दौऱ्याची सांगता झाली.
पाकिस्तानचा कर्णधार, इंझमाम-उल-हक, म्हणाला की सुरुवातीला कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाला वरचढ मानला गेला,[१] परंतु माजी तेजगती गोलंदाज सरफराज नवाझच्या मते भारतीय फलंदाजांना बाद करणे सोपे आहे. २००५ च्या शेवटी आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत दुसऱ्या तर पाकिस्तान चवथ्या स्थानावर होते, आणि एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तान तिसऱ्या तर भारत पाचव्या स्थानावर होता.
पाकिस्ताने कसोटी मालिकेत विजय मिळवला तर भारताने एकदिवसीय मालिका ४-१ अशी सहज जिंकली.
संघ
संपादनकसोटी मालिका | एकदिवसीय मालिका | ||
---|---|---|---|
भारत[२] | पाकिस्तान[३] | भारत[४] | पाकिस्तान[५] |
दौरा सामना
संपादन३ दिवसीयः भारतीय वि. पाकिस्तान अ
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१३–१७ जानेवारी
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- विरेंद्र सेहवागच्या २४७ चेंडूंतील २५४ धावा ह्या कसोटी क्रिकेट मध्ये, कमी चेंडूत जास्त धावा करताना सर्वाधिक धावा आहेत.[६]
- सामन्यात ४.९३ च्या धावगतीने धावा केल्या गेल्या. एका कसोटी सामन्यात १००० पेक्षा जास्त धावा असणारे सामने विचारात घेता हा एक विक्रम आहे.[६]
- कसोटी इतिहासात प्रथमच एका कसोटी सामन्यात २ त्रिशतकी भागीदारी झाल्या. मोहम्मद युसुफ आणि युनीस खानने ३१९ तर राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवागने ४१० धावांची भागीदारी केली.[६]
- राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग दरम्यानची ४१० धावांची भागीदारी ही पाकिस्तानातील सर्वोत्तम भागीदारी आहे, तसेच ती पाकिस्तानविरूद्ध कोणत्याही संघाची सुद्धा सर्वोत्तम भागीदारी आहे.[६]
- विरेंद्र सेहवागचे ९३ चेंडूंतील शतक हे भारतीय सलामीवीरातर्फे सर्वात जलद कसोटी शतक आहे.[६]
- विरेंद्र सेहवागने १८२ चेंडूंतील द्विशतक हे कसोटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात जलद द्विशतक आहे.[६]
- कामरान अकमलचे ८१ चेंडूंतील शतक हा यष्टिरक्षकातर्फे सर्वात जलद कसोटी शतकाचा विश्वविक्रम आहे.[६]
२री कसोटी
संपादन२१–२५ जानेवारी
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: रूद्र प्रताप सिंग (भा).
- इंझमाम-उल-हकचे २५ वे कसोटी शतक.[७]
- महेंद्रसिंग धोणी आणि इरफान पठाण दरम्यानची २१० धावांची भागीदारी ही भारतातर्फे पाकिस्तानची ६व्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी आहे.[७]
- महेंद्रसिंग धोणीचे ९३ चेंडूंतील शतक हे भारतीय यष्टिरक्षकातर्फे सर्वात जलद कसोटी शतक आहे.[७]
- सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने १०७८ धावा केल्या. एका संघातर्फे एका सामन्यातील सर्वाधिक धावांचा हा एक विक्रम आहे.[७]
३री कसोटी
संपादन२९ जानेवारी–२ फेब्रुवारी
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, गोलंदाजी.
- इरफान पठाणने पहिल्या डावात पहिल्याच षटकात हॅट्ट्रीक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकातील हॅट्ट्रीकची ही पहिलीच वेळ.[८]
- मोहम्मद युसूफच्या कसोटी क्रिकेट मध्ये ५,००० धावा पूर्ण.[८]
- दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या पहिल्या ७ फलंदाजांनी अर्धशतक केले. पहिल्या ७ फलंदाजांनी अर्धशतक करण्याची कसोटी क्रिकेट मधील ही पहिलीच वेळ. [८]
- पाकिस्तानचा ३४१ धावांनी विजय हा धावांचा विचार करता सर्वात मोठा विजय.[८]
एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन ६ फेब्रुवारी
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
- पाकिस्तानच्या डावादरम्यान ४७ षटकांनंतर अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानला ७ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
२रा सामना
संपादन३रा सामना
संपादन
४था सामना
संपादन५वा सामना
संपादन
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ 'इंडिया आर फेव्हरिट्स - इंझमाम' क्रिकइन्फो, १ जानेवारी २००६. (इंग्रजी मजकूर)
- ^ भारतीय संघ
- ^ पाकिस्तानी संघ
- ^ भारतीय संघ
- ^ पाकिस्तानी संघ
- ^ a b c d e f g आकडेवारी – १ली कसोटी, भारत वि पाकिस्तान, लाहोर. इएसपीएन क्रिकइन्फो, १७ जानेवारी २००६. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b c d आकडेवारी – २री कसोटी, भारत वि पाकिस्तान, फैसलाबाद. इएसपीएन क्रिकइन्फो, २५ जानेवारी २००६. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b c d आकडेवारी – ३री कसोटी, भारत वि पाकिस्तान, कराची. इएसपीएन क्रिकइन्फो, १ फेब्रुवारी २००६. (इंग्रजी मजकूर)
बाह्यदुवे
संपादनसाचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५-०६
१९५४-५५ | १९७८-७९ | १९८२-८३ | १९८४-८५ | १९८९-९० | १९९७-९८ | २००३-०४ | २००५-०६ |