Dhoni is the only captain to win all icc trophies क्रिकेट संघाचा कर्णधार बहुदा स्कीपर म्हणून उल्लेखला जातो.[]. एक नियमीत खेळाडूपेक्षा कर्णधाराच्या खांद्यावर एक नायक म्हणून बऱ्याच अतिरीक्त भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. इतर खेळांप्रमाणेच, कर्णधार हा सहसा एक अनुभवी, चांगले संवाद कौशल्य असलेला, आणि संघामध्ये नियमीत असलेला खेळाडू असतो. संघनिवडीमध्ये कर्णधाराचे मत महत्त्वाचे असते. सामन्याच्याआधी कर्णधार नाणेफेक करतो. सामन्याच्या दरम्यान फलंदाजीची क्रमवारी लावण्याचा निर्णय कर्णधाराचा असतो, तसेच प्रत्येक षटक कोणता गोलंदाज करेल, आणि क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवण्याची जबाबदारी सुद्धा कर्णधाराची असते. कर्णधाराचे निर्णय अंतिम असला तरीही, हे निर्णय सहसा सर्वसंमतीने घेतलेले असतात. कर्णधाराला क्रिकेट विषयीच्या धोरणामधील गुंतागुंतीचे असलेले ज्ञान, त्याचा धूर्तपणा आणि मुत्सदेपणा यावर संघाचे यश बऱ्याच अंशी अवलंबून असते.

कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त सामन्यांत कर्णधारपदाचा तसेच सर्वाधिक कसोटी विजयांचा विक्रम ग्रेम स्मिथच्या नावावर आहे. त्याने २००३ ते २०१४ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. []
काही देश वेगळ्या स्वरूपाच्या खेळासाठी वेगवेगळे कर्णधार निवडण्याचा पर्याय अवलंबतात. मुशफिकूर रहिम (डावीकडे) बांगलादेशचा कसोटी कर्णधार, आणि मशरफे मोर्तझा (उजवीकडे) त्यांचा एकदिवसीय व टी२० कर्णदार.

मैदानावर मोठे निर्णय घेणे गरजेचे असल्याने, इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेट कर्णधाराच्या खांद्यावर खूपच जास्त जबाबदारीचे ओझे असते. []

सध्याचे कर्णधार

संपादन

आयसीसी पूर्ण सभासद

संपादन
देश कर्णधार उप-कर्णधार
  इंग्लंड अ‍ॅलास्टेर कूक (कसोटी)
आयॉन मॉर्गन (ए.दि. आणि टी२०)
ज्यो रूट (कसोटी)
जोस बटलर (ए.दि. आणि टी२०)
  ऑस्ट्रेलिया स्टीव्ह स्मिथ
डेव्हिड वॉर्नर
  झिम्बाब्वे हॅमिल्टन मसाकाद्झा सिकंदर रझा (टी२०)
  दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स (कसोटी आणि ए.दि.)
फाफ डू प्लेसी (टी२०)
रिक्त (कसोटी आणि टी२०)
हाशिम आमला (ए.दि.)
  न्यूझीलंड केन विल्यमसन
रिक्त
  पाकिस्तान मिसबाह-उल-हक (कसोटी)
अझर अली (ए.दि.)
शाहिद आफ्रिदी (टी२०)
अझर अली (कसोटी)
सरफराझ अहमद (ए.दि. आणि टी२०)
  बांगलादेश मुशफिकुर रहीम (कसोटी)
मशरफे मोर्तझा (ए.दि. आणि टी२०)
तमिम इक्बाल (कसोटी)
शकिब अल हसन (ए.दि. आणि टी२०)
  भारत विराट कोहली (कसोटी)
महेंद्रसिंग धोणी (ए.दि. आणि टी२०)
विराट कोहली (ए.दि. आणि टी२०)
  वेस्ट इंडीज जेसन होल्डर (कसोटी आणि ए.दि.)
डॅरेन सामी (टी२०)
क्रेग ब्रेथवाईट (कसोटी)
ड्वेन ब्राव्हो (टी२०)
  श्रीलंका ॲंजेलो मॅथ्यूज लहिरु थिरिमन्ने (कसोटी)
दिनेश चंदिमल (ए.दि.) आणि (टी२०)

संदर्भ

संपादन
  1. ^ "नोंदी / कसोटी सामने / Dhoni is only captain to win all icc limited over tournaments वैयक्तिक विक्रम (कर्णधार, खेळाडू, पंच) / कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने". line feed character in |title= at position 84 (सहाय्य)
  2. ^ "skipper Definitions".
  3. ^ "कर्णधाराची भूमिकाThe Role of the Captain".